![khakara bhel](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2020/12/17/khakra-bhel-04.jpg)
खाकरे - प्लेन किंवा फ्लेवर्ड.
तेल, मोहरी, जिरं, हळद, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, किसलेले आले, भाजलेले दाणे, लिंबू, सैंधव
हेतेढकलवस्तू - बोल्ड केलेल्या मस्ट.. बाकीच्या ऑप्शनल
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, कोचवलेली काकडी
न वापरलेले पण वापरू शकाल अश्या वस्तू - किसलेले गाजर, किसलेला कोबी, सॅलडची पाने, मक्याचे दाणे, संत्र्याच्या फोडींचे तुकडे, पुदिन्याची पाने, स्प्राऊटस, उकडलेला बटाटा, सांडग्याची मिरची वगैरे
चित्रातल्या प्रमाणे खाकरे चुरून घेणे.
फोडणी: तेल-तापले-मोहरी-जिरे-तडतड-हळद-हिंग-हिरवी मिरची-किसलेले आले-कढीपत्ता... जरा खमंग परतून घेणे.
खाकरे दमट झाले असतील तर ते फोडणीवर घाला. नसतील तर फोडणी खाकर्यांवर ओता.
भाजलेले दाणे घाला. मिक्स करून घ्या.
माझ्याकडचे खाकरे प्लेन असल्याने मी फोडणी केली. मसाला किंवा फ्लेवर्ड खाकरे वापरत असाल आणि त्याची चव तशीच ठेवायची असेल तर फोडणी स्किप करू शकता. पण मग सगळे मिक्स करताना तिखटाच्या अंदाजाने लाल तिखट पावडर घालावी.
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व बाकीच्या ढकलवस्तू चिरून झाल्या असल्यास तुमची तयारी पूर्ण झाली आहे.
परतलेल्या चुर्यामधे या सर्व वस्तू मिक्स करून मग वरून चवीप्रमाणे सैंधव घाला, वरून लिंबू पिळा आणि लगेच खा.
खायच्या अगदी आयत्या वेळेला चुरा व ढकलवस्तू मिक्स करायच्या आहेत. खाकर्यांचा कुरकुरीतपणा खाताना जाणवला पाहिजे.
हा चटपटा वगैरे स्वाद कमी वाटला तर मग भेळेच्या चटण्या हा बाफ रेफर करून हवी ती चटणी ओता. पण खरंतर गरज पडणार नाही.
पाहिजे ते व्हेरिएशन करून बघा.
या खाकरा भेळेची प्लेट सेट करून त्यावर प्लेन ऑम्लेट टाकून पण भारी लागत असणार.
भेळ आहे त्यामुळे फरसाण घालून करून बघायला हरकत नाही.
लै भारी. रोज संध्याकाळी काय
लै भारी. रोज संध्याकाळी काय खावे हा प्रश्न पडतो.. एका संध्याकाळची सोय झाली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
...
...
हायला खरंच अगदीच हे ते ढकल
हायला खरंच अगदीच हे ते ढकल रेसीपी. मस्त लागत असणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी पाहीन करून. यात न संपलेले पुड्याच्या तळात गेलेले चिवडे पण ढकतला येतील.
मस्तच
मस्तच
माझ्याकडेही आहेत खाकरे आणि
माझ्याकडेही आहेत खाकरे आणि संपत नाहीयेत. तेव्हा ट्राय करायला हवं अधेमधे.
योक्या, त्या चिवड्यांना जुने
योक्या, त्या चिवड्यांना जुने झाल्यावर तेलाचा वास यायला लागतो. तेव्हा ते बघ. अन्यथा चालेलच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा वा... अगदीच कोणालाही करता
वा वा... अगदीच कोणालाही करता येऊ शकेल असा पदार्थ..
योग्या..पुड्यांच्या तळ्यात गेलेले चिवडे रिस्की असतात.. पार वाट लावू शकतील पदार्थाची सगळं मीठ खाली जमा झाल्यामुळे..
चिव्डेप्रकार ईतके राहात नाहीच
चिव्डेप्रकार ईतके राहात नाहीच पण.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदीच कोणालाही करता येऊ शकेल
अगदीच कोणालाही करता येऊ शकेल असा पदार्थ.. <<![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी केलाय म्हणल्यावर असाच असणार ना हिम्या
पदार्थ आणी नाव दोन्हि भारि.
पदार्थ आणी नाव दोन्हि भारि.
वॉवच कॅटेगरी हां. फोटो तर
फोटो तर मस्तच दिसताहेत.
पदार्थ आणी नाव दोन्हि भारि.
पदार्थ आणी नाव दोन्हि भारि. >>+११०००
खाकरा ईथे पण मिळतोय आजकाल... नक्की करणार...
मस्तच. मी करते अशी थोड्या
मस्तच. मी करते अशी थोड्या वेगळ्या प्रकारे म्हणजे फोडणी नाही करत. डाळिंबाचे दाणे मात्र टाकून नाही बघितले. कधी कधी खाक-यावर सर्व कोशिंबीर करून पण घालते.
आता सेम ह्या पद्धतीने करून बघेन.
मस्तच दिसतोय पदार्थ,. फोडणी
मस्तच दिसतोय पदार्थ,. फोडणी आणि शेंगदाणे वगळले तर मस्त डाएट भेळच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बयो, डाएट म्हणजे तेल पूर्ण
बयो, डाएट म्हणजे तेल पूर्ण वर्ज्य करतेस की काय?
भाज्यापण बिनातेलाच्या, बिनाफोडणीच्या शिजवतेस?
हेतेढकल >> नाव भारी आहे पण
हेतेढकल >> नाव भारी आहे पण एकदम.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
छान दिसतेय भेळ.
छान दिसतेय भेळ.
मस्तच दिसतेय भेळ .. हेतेढकल -
मस्तच दिसतेय भेळ ..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हेतेढकल - शब्द भारीय
मस्त! नाव भारी
मस्त! नाव भारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रेसिपी आणि नाव दोन्ही भारी
रेसिपी आणि नाव दोन्ही भारी आहे.
मस्त आहे हे
मस्त आहे हे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे ही हेतेढकल खाकरा भेळ मी
अरे ही हेतेढकल खाकरा भेळ मी पण करते. माझ्या व्हर्जनमध्ये मेथी खाकरे, भाजलेला पापड, भाजलेले दाणे, मीठवाले साधे कॉर्नफ्लेक्स, हिरवी मिरची, कांदा, टॉमॅटो ( घरात असेलच तर कैरी/लिंबू, गाजर, काकडी, मोड आलेली मटकी, आलू भुजिया किंवा इतर कोणतीही शेव) आणि इमली पिचकू असतं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अल्पना, खूप जण करत असणार. मी
अल्पना, खूप जण करत असणार. मी टाकली रेस्पी इतकंच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाव इंटरेस्टिंग आहे हे वरती
नाव इंटरेस्टिंग आहे हे वरती लिहायला विसरले.
मस्त ! सोप्प संध्याकाळच्या
मस्त ! सोप्प
संध्याकाळच्या डब्यात टिकेल का ?
म्हणजे सकाळी करून नेल आणि पाच सहा च्या दरम्यान काही तरी खाण्यास होईल अस .
जाई, खाकरा कुरकुरीत असताना
जाई, खाकरा कुरकुरीत असताना खायला मजा.
बाकीचं एकत्र करून आणि खाकरा चुरा वेगळा असं नेलंस आणि आयत्यावेळेला मिक्स केलंस तर जमेल पण मग कच्च्या कांद्याच्या वासाचं काय करशील?
जाई नाही टिकणार बहुतेक, खाकरा
जाई नाही टिकणार बहुतेक, खाकरा मऊ पडेल. ऐनवेळी बाकीच्या पदार्थात खाकरा वेगळा नेऊन चुरडला तर चालेल पण काकडीला पण पाणी खूप सुटेल.
हो काकडीला पाणी सुटणे,
हो काकडीला पाणी सुटणे, कांदा-टोमॅटो दिवसभरात वास बदलणे हे होणार..
ओह कांदा नाही का ! पण ते
ओह कांदा नाही का ! पण ते एडजस्ट करून घेईन थोड ।
तुझी आईडिया मस्त आहे . वेगवेगळ डबे न्यायची .
वडापाव , भज्या , शेवपुरी हादडण्यापेक्षा हे बेस्ट आहे
हो ! अंजू ताई , बरोबर
नी तेल पूर्ण वर्ज्य नाही करत.
नी तेल पूर्ण वर्ज्य नाही करत. पण जेवणाशिवाय इतर कोणत्याही पदार्थातून अतिरिक्त तेल नको इतकंच पाळते.
Pages