हेतेढकल खाकरा भेळ

Submitted by नीधप on 6 August, 2014 - 08:36
khakara bhel
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खाकरे - प्लेन किंवा फ्लेवर्ड.

तेल, मोहरी, जिरं, हळद, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, किसलेले आले, भाजलेले दाणे, लिंबू, सैंधव

हेतेढकलवस्तू - बोल्ड केलेल्या मस्ट.. बाकीच्या ऑप्शनल
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, कोचवलेली काकडी
न वापरलेले पण वापरू शकाल अश्या वस्तू - किसलेले गाजर, किसलेला कोबी, सॅलडची पाने, मक्याचे दाणे, संत्र्याच्या फोडींचे तुकडे, पुदिन्याची पाने, स्प्राऊटस, उकडलेला बटाटा, सांडग्याची मिरची वगैरे
khakra-bhel-03.jpg

क्रमवार पाककृती: 

चित्रातल्या प्रमाणे खाकरे चुरून घेणे.
khakra-bhel-01.jpg

फोडणी: तेल-तापले-मोहरी-जिरे-तडतड-हळद-हिंग-हिरवी मिरची-किसलेले आले-कढीपत्ता... जरा खमंग परतून घेणे.
खाकरे दमट झाले असतील तर ते फोडणीवर घाला. नसतील तर फोडणी खाकर्‍यांवर ओता.
भाजलेले दाणे घाला. मिक्स करून घ्या.

khakra-bhel-02.jpg
माझ्याकडचे खाकरे प्लेन असल्याने मी फोडणी केली. मसाला किंवा फ्लेवर्ड खाकरे वापरत असाल आणि त्याची चव तशीच ठेवायची असेल तर फोडणी स्किप करू शकता. पण मग सगळे मिक्स करताना तिखटाच्या अंदाजाने लाल तिखट पावडर घालावी.

कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व बाकीच्या ढकलवस्तू चिरून झाल्या असल्यास तुमची तयारी पूर्ण झाली आहे.

परतलेल्या चुर्‍यामधे या सर्व वस्तू मिक्स करून मग वरून चवीप्रमाणे सैंधव घाला, वरून लिंबू पिळा आणि लगेच खा.

खायच्या अगदी आयत्या वेळेला चुरा व ढकलवस्तू मिक्स करायच्या आहेत. खाकर्‍यांचा कुरकुरीतपणा खाताना जाणवला पाहिजे.
khakra-bhel-04.jpg

हा चटपटा वगैरे स्वाद कमी वाटला तर मग भेळेच्या चटण्या हा बाफ रेफर करून हवी ती चटणी ओता. पण खरंतर गरज पडणार नाही. Happy

वाढणी/प्रमाण: 
आवडले तर एका माणसाला नाही आवडले तर पूरी बारात खायेगी.. ;)
अधिक टिपा: 

पाहिजे ते व्हेरिएशन करून बघा.
या खाकरा भेळेची प्लेट सेट करून त्यावर प्लेन ऑम्लेट टाकून पण भारी लागत असणार.
भेळ आहे त्यामुळे फरसाण घालून करून बघायला हरकत नाही.

माहितीचा स्रोत: 
केलेले प्रयोग हो फक्त प्रयोग! :)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांदा टोमॅटो कोथिंबिरीची चव इतर कशाने येणे अशक्य आहे! पण ते उपलब्ध नसतील तर आमचूर पावडर / चाट मसाला / चिंचेची चटणी, खारे / भाजलेले दाणे, मोड आलेले हिरवे मूग, डाळिंबाचे दाणे, आवडत असल्यास हिरव्या मिरचीचा ठेचा / हि मि तुकडे, शेव/बुंदी वगैरे अगडम् बगडम् साहित्य घालूनही चांगली लागते ही भेळ. एक मैत्रिण चिली सॉस, केचप पण घालते. कॉर्नचे दाणे घालते.

हे ते ढकलायची आयडिया आवडली. मुख्य क्रमवार फोटो आहेत त्यामुळे कच्चे फलंदाज पण तग धरतील. Wink

माझ्याकडे देशावरून आलेला (महातेलकट) कोंडजी चिवडा आहे त्याला या ढकलगाडीत ढकलला तर फोडणीची पण गरज लागणार नाही असं वाटतंय.

आईशप्पथ... मी 'हेतेढकल' हे एखाद्या गावाचं, भागाचं नाव असल्यासारखं वाचलं. मग नीरजाचं नाव... मगच त्या 'हेतेढकल' ला खरा अर्थं प्राप्तं झाला Happy
सॉलिड आहे प्रकार.

ढकलाढकलीवाले पदार्थ फारच हिट्ट असतात असं निरिक्षण आहे <<<
हो मी आता हेतेढकल अशी पदार्थांची सिरीजच लिहिण्याच्या विचारात आहे. Proud

मग नीरजाचं नाव... मगच त्या 'हेतेढकल' ला खरा अर्थं प्राप्तं झाला <<<
काय ओळखलंय मला... Lol

Pages