
खाकरे - प्लेन किंवा फ्लेवर्ड.
तेल, मोहरी, जिरं, हळद, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, किसलेले आले, भाजलेले दाणे, लिंबू, सैंधव
हेतेढकलवस्तू - बोल्ड केलेल्या मस्ट.. बाकीच्या ऑप्शनल
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, कोचवलेली काकडी
न वापरलेले पण वापरू शकाल अश्या वस्तू - किसलेले गाजर, किसलेला कोबी, सॅलडची पाने, मक्याचे दाणे, संत्र्याच्या फोडींचे तुकडे, पुदिन्याची पाने, स्प्राऊटस, उकडलेला बटाटा, सांडग्याची मिरची वगैरे
चित्रातल्या प्रमाणे खाकरे चुरून घेणे.
फोडणी: तेल-तापले-मोहरी-जिरे-तडतड-हळद-हिंग-हिरवी मिरची-किसलेले आले-कढीपत्ता... जरा खमंग परतून घेणे.
खाकरे दमट झाले असतील तर ते फोडणीवर घाला. नसतील तर फोडणी खाकर्यांवर ओता.
भाजलेले दाणे घाला. मिक्स करून घ्या.
माझ्याकडचे खाकरे प्लेन असल्याने मी फोडणी केली. मसाला किंवा फ्लेवर्ड खाकरे वापरत असाल आणि त्याची चव तशीच ठेवायची असेल तर फोडणी स्किप करू शकता. पण मग सगळे मिक्स करताना तिखटाच्या अंदाजाने लाल तिखट पावडर घालावी.
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व बाकीच्या ढकलवस्तू चिरून झाल्या असल्यास तुमची तयारी पूर्ण झाली आहे.
परतलेल्या चुर्यामधे या सर्व वस्तू मिक्स करून मग वरून चवीप्रमाणे सैंधव घाला, वरून लिंबू पिळा आणि लगेच खा.
खायच्या अगदी आयत्या वेळेला चुरा व ढकलवस्तू मिक्स करायच्या आहेत. खाकर्यांचा कुरकुरीतपणा खाताना जाणवला पाहिजे.
हा चटपटा वगैरे स्वाद कमी वाटला तर मग भेळेच्या चटण्या हा बाफ रेफर करून हवी ती चटणी ओता. पण खरंतर गरज पडणार नाही.
पाहिजे ते व्हेरिएशन करून बघा.
या खाकरा भेळेची प्लेट सेट करून त्यावर प्लेन ऑम्लेट टाकून पण भारी लागत असणार.
भेळ आहे त्यामुळे फरसाण घालून करून बघायला हरकत नाही.
ह्म्म दक्षे.
ह्म्म दक्षे.
हेतेढकल<<< मस्त कल्पना
हेतेढकल<<<
मस्त कल्पना
लै भारी. >>>>>>>+१००००००००
लै भारी. >>>>>>>+१००००००००
नी, लय भारी आहे पाकृ ...
नी, लय भारी आहे पाकृ ... संध्याकाळच्या खाण्यासाठी मस्त एकदम
कांदा टोमॅटो कोथिंबिरीची चव
कांदा टोमॅटो कोथिंबिरीची चव इतर कशाने येणे अशक्य आहे! पण ते उपलब्ध नसतील तर आमचूर पावडर / चाट मसाला / चिंचेची चटणी, खारे / भाजलेले दाणे, मोड आलेले हिरवे मूग, डाळिंबाचे दाणे, आवडत असल्यास हिरव्या मिरचीचा ठेचा / हि मि तुकडे, शेव/बुंदी वगैरे अगडम् बगडम् साहित्य घालूनही चांगली लागते ही भेळ. एक मैत्रिण चिली सॉस, केचप पण घालते. कॉर्नचे दाणे घालते.
हेतेढकल...... टेस्टी च लागत
हेतेढकल...... टेस्टी च लागत असेल..सुप्पर्ब आयडिआ .. खूप आवडली... मी पण करीनच्..मायनस फोडणी ...
आहाहा!! तोंपासु.. नावही सहीच
आहाहा!! तोंपासु.. नावही सहीच
नाव प्रचंड आवडल
नाव प्रचंड आवडल
अगडम् बगडम् साहित्य <<< येस्स
अगडम् बगडम् साहित्य <<<
येस्स म्हणून तर नाव हेतेढकल!
नी टायटलमध्ये ' हे ढकल ते
नी टायटलमध्ये ' हे ढकल ते ढकल' करतेस का , जास्त र्हायमिंग वाटेल ते

चखणा म्हणुन चालेल.
इथेही पर्यायी शब्द?
इथेही पर्यायी शब्द?
हे ते ढकलायची आयडिया आवडली.
हे ते ढकलायची आयडिया आवडली. मुख्य क्रमवार फोटो आहेत त्यामुळे कच्चे फलंदाज पण तग धरतील.
माझ्याकडे देशावरून आलेला (महातेलकट) कोंडजी चिवडा आहे त्याला या ढकलगाडीत ढकलला तर फोडणीची पण गरज लागणार नाही असं वाटतंय.
मस्त रेसिपी,मस्त नाव.
मस्त रेसिपी,मस्त नाव.
रेसिपी नावासकट सही आहे..
रेसिपी नावासकट सही आहे.. करणेत येईल..
मस्त मस्त रेसिपी! फोटो पण
मस्त मस्त रेसिपी!
फोटो पण भारी!
तेलकट चिवडा असेल तर फोडणीची
तेलकट चिवडा असेल तर फोडणीची अजिबातच गरज नाही.
हा प्रकार केला जातोच नेहमी,
हा प्रकार केला जातोच नेहमी, पण आता त्याला मस्त भारदस्त नाव प्राप्त झाल्यामुळे अजून छान वाटेल!
मस्त ! नाव पण सहीच ...
मस्त ! नाव पण सहीच ...
नाव न रेसीपी मस्त बाकी
नाव न रेसीपी मस्त

बाकी ढकलताना हळू ढकलणे नाहितर धप्प होईल
मस्त आहे की. ढकलाढकली करु
मस्त आहे की.

ढकलाढकली करु नका.
एका रांगेत या अस म्हण्णरे गुर्जी अथवा बाई नकोत किचन मध्ये.
छान मस्त नविन
छान मस्त नविन प्रकार...
मोनालिप
मस्तच! खरीखुरी भेळ आहे ही!
मस्तच! खरीखुरी भेळ आहे ही!
छान पाक्रु.
छान पाक्रु.
आईशप्पथ... मी 'हेतेढकल' हे
आईशप्पथ... मी 'हेतेढकल' हे एखाद्या गावाचं, भागाचं नाव असल्यासारखं वाचलं. मग नीरजाचं नाव... मगच त्या 'हेतेढकल' ला खरा अर्थं प्राप्तं झाला
सॉलिड आहे प्रकार.
भारी आहे! नाव ठेवताना फारच
भारी आहे!
नाव ठेवताना फारच चालढकल केलिये! असो रेसिपि आवड्ली!
मस्तच
मस्तच
उशीरा बघतेय ही रेसिपी पण भारी
उशीरा बघतेय ही रेसिपी पण भारी आहे.......नी -----^-----
वा, फक्कडच प्रकार आहे! नक्की
वा, फक्कडच प्रकार आहे! नक्की केला जाईल.
ढकलाढकलीवाले पदार्थ फारच हिट्ट असतात असं निरिक्षण आहे
मस्त. डायेटवल्यांपासून
मस्त. डायेटवल्यांपासून हेखातेखावल्यांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त.
ढकलाढकलीवाले पदार्थ फारच
ढकलाढकलीवाले पदार्थ फारच हिट्ट असतात असं निरिक्षण आहे <<<
हो मी आता हेतेढकल अशी पदार्थांची सिरीजच लिहिण्याच्या विचारात आहे.
मग नीरजाचं नाव... मगच त्या 'हेतेढकल' ला खरा अर्थं प्राप्तं झाला <<<
काय ओळखलंय मला...
Pages