पोहे भाजल्यामुळे खमंग वास येतो.
पापडही भाजून ह्यावर कुस्करून घालतात तसेच नारळ पाणीही घालतात. त्या पद्धतीनेही मी करते. तेही चविष्ट लागतात.
तुमच्या आवडीनुसार कोबी, बिट, टोमॅटो तसेच कच्च्या खाऊ शकणार्या भाज्या घालू शकता.
वरील पाककृती मी एका पुस्तकात पाहून चेंज म्हणून केली होती. मुळ रेसिपी बर्याच माबोकर मैत्रीणींनी प्रतिसादात दिली आहे. त्यात अजुन फेरफार करुनही छान रेसिपी प्रतिसादात दिल्या आहेत. त्या एकत्र वाचता याव्यात म्हणून इथे एकत्र देत आहे.
मुग्धानंद
पातळ पोहे(चिवड्याचे) पाखडुन स्वच्छ करुन घेणे. एक मुठ भर पोह्यांचा एका मोठ्या पातेल्यात थर देणे. त्यावर एक थर ओल्या खोबर्याचा. मग पुन्हा पोह्यांचा, मग किसलेला कांदा, काकडी, गाजर हवे असल्यास, बारीक चिरलेला टोमॅटो यांचा थर, परत पोह्यांचा थर, त्यावर, थोडे मेतकुट, मीठ, साखर इ. घालणे. हे थोडा वेळ दडपुन ठेवणे, म्हणजे खोबरे, कांदा आदिचा ओलावा पोह्याला लागतो.
फोडणी-- तेल, जिरे, मोहोरी, कढिलिंब, हळद, हिंग, हवे असल्यास शेंगादाणे.
फोडणि करुन घालणे.
मग सगळे व्यवस्थित हलविणे. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालणे
रॉबिनहुड यांनी दडपे पोह्यांच्या विविध प्रकारांसाठी दिलेली लिंक https://www.youtube.com/results?search_query=dadpe+pohe+recipe
शुम्पी
पातळ पोहे , तळलेली सांडगी मिरची आणि दाणे मात्र मस्ट.
टोमॅटो, लिंबू, ओलं खोबरं, कोथिंबीर यांचा ओलेपणा पुरतो पोह्याला, अगदीच वाटलं तर मी ताकाचा हबका मारते क्वचित.
नीधप
कांदा, कोथिंबीर, टोमॅटो चिराचिरीच्या गोष्टी व्हायच्या आधीच पोह्यांमधे नारळाचा चव, मीठ (इथे शिजवायचं किंवा उकळायचं नसल्याने मी सैंधव घालते) आणि किंचित साखर मिक्स करायची. नारळाच्या चवाने पोहे ओले होणे सुरू होते. डाळिंबाचे दाणे, किसलेलं गाजर, कोचलेली काकडी वगैरे जे काय तयार असेल ते आधी ढकलायचे. किंवा मग जसे जसे होत जाते तसे ढकलायचे.
मग कां, को आणि टो चिरलेले घालून वरून लिंबू पिळून घ्यायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे.
दाणे चांगले भाजलेले असतील तर इथेच घालायचे. भाजले नसतील तर आधी भाजून घ्यायचे. जरा जास्तच भाजायचे. आणि दाणे सढळ हाताने घालायचे.
मग फोडणीच्या वस्तू जमवायच्या. मिरची धुवून चिरून घेणे, कढीपत्ता धुवून चिरून, आले किसून घेणे वगैरे. फोडणी करायच्या आधी सांडग्याच्या मिरच्या कढल्याला तेलाचा हात पुसून भाजून घ्यायच्या (तळणापेक्षा तेल कमी, अर्थात खमंगपणा पण कमी होतोच) त्या पोह्यांवर आधी घालायच्या नाहीत. त्यातला फक्त चुरा भुरभुरायचा पोह्यांवर.
मग फोडणी करून ती जिवंत फोडणी ओतायची पोह्यांवर. सगळं व्यवस्थित मिक्स करून एकत्र करून झाकणी घालून वरून दाबून ठेवायचं. १५ मिनिटांनी घ्यायचे. तळलेली मिरची चुरून किंवा नुसतीच प्लेटीवर सजवायची.
झंपी
आम्ही ह्यात हिरवी मिरची तळून कुस्करून घालतो जर दह्यातील मिरची नसेल तर... पोह्याचा पापड, घरचा उडदाचा पापड, मिरगुंड, बटाटा पापड(हे मी माझ्यासाठी) वरून भरपूर कों, लिंबू, बारीक शेव. जरासं लाल तिखट भुरभुरवायचं आणी एक गरम चहा.
एक घास ह्याचा, एक घोट चहाचा.
हिरवी मिरची तिखट हवी.
दडप्या पोह्यांना जाडे
दडप्या पोह्यांना जाडे पोहे?
मी जनरली पातळ पोहे वापरते. लहानपणापासून तेच बघत आलीये त्यामुळे असेल.
याला आमच्यात "दडपे पोहे"
याला आमच्यात "दडपे पोहे" म्हणतात.
यम्मी प्रकार..
यात काकडीचा कीसही
यात काकडीचा कीसही घालतात.
कर्नाटकी पदार्थ आहे
दडपे पोहे हे. ओल्या
दडपे पोहे हे. ओल्या खोबर्यामुळे अटमोस्ट यम्मी लागतात!
गाजर आहे म्हणून पौष्टिक का?
आम्ही पण पातळ पोहेच
आम्ही पण पातळ पोहेच वापरतो...
पण कदाचित जाड पोहे भाजुन घेतले की छान कुर्कुरीत लागत असतील...
करुन बघीन मी
मस्त प्रकार. करून बघणार
मस्त प्रकार. करून बघणार नक्कीच.
जागू, मस्त आहेत गं दडपे पोहे.
जागू, मस्त आहेत गं दडपे पोहे. मांडामांड एकदम झकास ककेलीयेस्!
खायला घेताना वरून पोह्याचा भाजलेला / तळलेला पापड पण पाहिजे चुरून
माझी दडप्या पोह्याची
माझी दडप्या पोह्याची रेसीपी-
कालच केलेले.
पातळ पोहे(चिवड्याचे) पाखडुन स्वच्छ करुन घेणे. एक मुठ भर पोह्यांचा एका मोठ्या पातेल्यात थर देणे. त्यावर एक थर ओल्या खोबर्याचा. मग पुन्हा पोह्यांचा, मग किसलेला कांदा, काकडी, गाजर हवे असल्यास, बारीक चिरलेला टोमॅटो यांचा थर, परत पोह्यांचा थर, त्यावर, थोडे मेतकुट, मीठ, साखर इ. घालणे. हे थोडा वेळ दडपुन ठेवणे, म्हणजे खोबरे, कांदा आदिचा ओलावा पोह्याला लागतो.
फोडणी-- तेल, जिरे, मोहोरी, कढिलिंब, हळद, हिंग, हवे असल्यास शेंगादाणे.
फोडणि करुन घालणे.
मग सगळे व्यवस्थित हलविणे. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालणे
जागु पापड आणी बारीक किन्वा
जागु पापड आणी बारीक किन्वा लसणी शेव टाक. मस्त दिसतायत पोहे.:स्मित:
माझ्या लेकीला दडपे पोहे खुपच
माझ्या लेकीला दडपे पोहे खुपच आवडतात आणि नेमके मला ते अजिबात नीट करता येत नाही. जागु आणि मुग्धानंद दोघींच्या रेस्पी अगदी सोप्या वाटताहेत. उद्याच ट्राय करते.
रच्याकने, हे दडपुन ठेवतात म्हणजे कसे ठेवतात?? पोह्यांवर दाबुन बसेल असे झाकण घालुन वर वजन ठेवायचे काय??
मी वापरते जाडे पोहे दडपे पोहे
मी वापरते जाडे पोहे दडपे पोहे करताना. फक्त भाजून न घेता धुवून जरा ओलसर असतानाच बाकीचे जिन्नस मिक्स करते म्हणजे कोरडे होत नाहीत. ह्यात तळून सांडगी मिरची आणि भाजलेला पापड दोन्ही मिसिंग आहे. डाळींबाची चव चांगली लागेल असं वाटतंय.
मांडामांड एकदम झकास
मांडामांड एकदम झकास ककेलीयेस्!>>>> मला पा.कृ. वाचण्यापूर्वी तिची ही मांडामांड पहायला खूप आवडते.
जागू,
पा.कृ.मस्तय.
जाड पोहे वापरुन केले.
जाड पोहे वापरुन केले.
दडपे पोहे.. शेंगदाणे आणी
दडपे पोहे.. शेंगदाणे आणी तळलेली सांडगी मिरची मात्र मस्ट आहेत ह्यात.
डाळिंबाचे दाणे /गाजर / जाडे पोहे घालून कधी केले नाहीत मी अजून.
हा माझा झब्बू.
यम्म्म! उपवासाच्या दिवशी असे
यम्म्म! उपवासाच्या दिवशी असे फोटो पहाणं म्हणजे पाप
अर्रे सगळेच प्रकार मस्त आहेत.
अर्रे सगळेच प्रकार मस्त आहेत. आम्ही आधी नारळाचे दूध अथवा गेलाबाजार नारळपाणी घालून दडपवतो.
कसले चविष्ट लागतात हे. जयवंत दळवींच्या म्हणण्याप्रमाणे नवरा-बायकोने दुपारी / संध्याकाळी नवरा कामाहून परत आला की व्हरांड्यात / पडवीत एकत्र बसून पाऊस पहात पहात खायचा पदार्थ!
शूम्पी, भारी फोटो!
शूम्पी, भारी फोटो!
सगळेच प्रकार मस्त! शूम्पी,
सगळेच प्रकार मस्त!
शूम्पी, भारी फोटो! +१
शुम्पी! मस्तच!, आमच्याकडे
शुम्पी! मस्तच!,
आमच्याकडे साईडला घट्त दही मस्ट असत..
रच्याकने, हे दडपुन ठेवतात
रच्याकने, हे दडपुन ठेवतात म्हणजे कसे ठेवतात?? पोह्यांवर दाबुन बसेल असे झाकण घालुन वर वजन ठेवायचे काय??>>> साधना दडपवायचे म्हणजे हबका द्यायचा पाण्याचा नि थोडे दाबून परातीत एकत्र झाकायचे, त्यांच्या आकारमानापेक्षा छोट्या भांड्याखाली!!
दडपे पोहे मी पातळ पोहे
दडपे पोहे मी पातळ पोहे वापरते.
नक्की करुन बघणार. चित्रात
नक्की करुन बघणार.
चित्रात बटाटा दिसतोय तो उकडुन टाकायचा का??
हे हय दडपे पोह्यांच्या
हे हय दडपे पोह्यांच्या रेचिपीची लिंक.... अणेकाणेक रेश्प्या
https://www.youtube.com/results?search_query=dadpe+pohe+recipe
आमच्याकडे नारळाचे पाणी आणि
आमच्याकडे नारळाचे पाणी आणि कच्चा कांदा.. पण असे पण चांगले लागतील.
मी जाडे पोहे वापरते. आई
मी जाडे पोहे वापरते. आई नारळाच्या पाण्यात भिजवते. मी साध्या पाण्याचा हबका मारते. भाजलेला पोह्याचा पापड आणि सांडगी मिरच्या मस्ट!
उचलुन तोंडात टाकावेसे
उचलुन तोंडात टाकावेसे वाटतात. एकदम मस्त कलरफुल. वा जागु.
ह्हा........!
ह्हा........!
जागू, मस्त दिसतायत ग . माझी
जागू, मस्त दिसतायत ग . माझी आवडती डिश. ह्यात आपल्याला हवी तशी वेरिएशन्स करु शकतो. फुगी मिरची, टोमॅटो हे ही घालु शकतो. पण ह्यात आलं बेस्ट लागते.
फोड्णीचे पोहे गार चांगले नाही लागत पण ह्या पोह्यांच्या बाबतीत तो प्रश्न नाही. मुलांना डब्यात द्यायला खूप छान.
डबा संपून घरी येतो.
छान !
छान !
याचं आणखी झटपट व्हर्शन म्हणून
याचं आणखी झटपट व्हर्शन म्हणून मी पातळ पोह्यांमधे कांदा, टोमॅटो, काकडी चिरून घालते, वरून हिंगहळदमोहरीदाणे अशी फोडणी आणि टोमॅटो नसेल तर थोडं लिंबू पिळते. साखर, मीठ. पाच मि. कालवून ठेवलं तरी चालतं. ओलं खोबरं वगैरे लाड जेव्हा मूड असेल तेव्हा.
Pages