![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2020/12/29/20140726_093645.jpg)
पोहे भाजल्यामुळे खमंग वास येतो.
पापडही भाजून ह्यावर कुस्करून घालतात तसेच नारळ पाणीही घालतात. त्या पद्धतीनेही मी करते. तेही चविष्ट लागतात.
तुमच्या आवडीनुसार कोबी, बिट, टोमॅटो तसेच कच्च्या खाऊ शकणार्या भाज्या घालू शकता.
वरील पाककृती मी एका पुस्तकात पाहून चेंज म्हणून केली होती. मुळ रेसिपी बर्याच माबोकर मैत्रीणींनी प्रतिसादात दिली आहे. त्यात अजुन फेरफार करुनही छान रेसिपी प्रतिसादात दिल्या आहेत. त्या एकत्र वाचता याव्यात म्हणून इथे एकत्र देत आहे.
मुग्धानंद
पातळ पोहे(चिवड्याचे) पाखडुन स्वच्छ करुन घेणे. एक मुठ भर पोह्यांचा एका मोठ्या पातेल्यात थर देणे. त्यावर एक थर ओल्या खोबर्याचा. मग पुन्हा पोह्यांचा, मग किसलेला कांदा, काकडी, गाजर हवे असल्यास, बारीक चिरलेला टोमॅटो यांचा थर, परत पोह्यांचा थर, त्यावर, थोडे मेतकुट, मीठ, साखर इ. घालणे. हे थोडा वेळ दडपुन ठेवणे, म्हणजे खोबरे, कांदा आदिचा ओलावा पोह्याला लागतो.
फोडणी-- तेल, जिरे, मोहोरी, कढिलिंब, हळद, हिंग, हवे असल्यास शेंगादाणे.
फोडणि करुन घालणे.
मग सगळे व्यवस्थित हलविणे. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालणे
रॉबिनहुड यांनी दडपे पोह्यांच्या विविध प्रकारांसाठी दिलेली लिंक https://www.youtube.com/results?search_query=dadpe+pohe+recipe
शुम्पी
पातळ पोहे , तळलेली सांडगी मिरची आणि दाणे मात्र मस्ट.
टोमॅटो, लिंबू, ओलं खोबरं, कोथिंबीर यांचा ओलेपणा पुरतो पोह्याला, अगदीच वाटलं तर मी ताकाचा हबका मारते क्वचित.
नीधप
कांदा, कोथिंबीर, टोमॅटो चिराचिरीच्या गोष्टी व्हायच्या आधीच पोह्यांमधे नारळाचा चव, मीठ (इथे शिजवायचं किंवा उकळायचं नसल्याने मी सैंधव घालते) आणि किंचित साखर मिक्स करायची. नारळाच्या चवाने पोहे ओले होणे सुरू होते. डाळिंबाचे दाणे, किसलेलं गाजर, कोचलेली काकडी वगैरे जे काय तयार असेल ते आधी ढकलायचे. किंवा मग जसे जसे होत जाते तसे ढकलायचे.
मग कां, को आणि टो चिरलेले घालून वरून लिंबू पिळून घ्यायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे.
दाणे चांगले भाजलेले असतील तर इथेच घालायचे. भाजले नसतील तर आधी भाजून घ्यायचे. जरा जास्तच भाजायचे. आणि दाणे सढळ हाताने घालायचे.
मग फोडणीच्या वस्तू जमवायच्या. मिरची धुवून चिरून घेणे, कढीपत्ता धुवून चिरून, आले किसून घेणे वगैरे. फोडणी करायच्या आधी सांडग्याच्या मिरच्या कढल्याला तेलाचा हात पुसून भाजून घ्यायच्या (तळणापेक्षा तेल कमी, अर्थात खमंगपणा पण कमी होतोच) त्या पोह्यांवर आधी घालायच्या नाहीत. त्यातला फक्त चुरा भुरभुरायचा पोह्यांवर.
मग फोडणी करून ती जिवंत फोडणी ओतायची पोह्यांवर. सगळं व्यवस्थित मिक्स करून एकत्र करून झाकणी घालून वरून दाबून ठेवायचं. १५ मिनिटांनी घ्यायचे. तळलेली मिरची चुरून किंवा नुसतीच प्लेटीवर सजवायची.
झंपी
आम्ही ह्यात हिरवी मिरची तळून कुस्करून घालतो जर दह्यातील मिरची नसेल तर... पोह्याचा पापड, घरचा उडदाचा पापड, मिरगुंड, बटाटा पापड(हे मी माझ्यासाठी) वरून भरपूर कों, लिंबू, बारीक शेव. जरासं लाल तिखट भुरभुरवायचं आणी एक गरम चहा.
एक घास ह्याचा, एक घोट चहाचा.
हिरवी मिरची तिखट हवी.
ह्हा........!
ह्हा........!
शुम्पीचे पोहे फारच छान
शुम्पीचे पोहे फारच छान दिसताहेत. तेल जास्त वापरलंय का
मस्त मिळून आलेत. रंग पण मस्त. चवही असेलच. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी कधीच दडपे पोहे केले नाहीयेत आणि माझ्याकडे सध्या जाडे पोहे आहेत. पण दाळिंब वगैरे नाहीये त्यामुळे त्याशिवाय करेन. जागू तुझी रेसिपी लिहायची पद्धत चांगली आहे. पदार्थ करून पाहायची इच्छा होतेय सो गुड जॉब
अवांतर: सगळे जण दडपे पोह्याची चर्चा करताहात पण जागुने दबके लिहिलंय...ये कुछ अलग डिश है शायद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच
मस्तच
शूम्पी , तुमची पा.कृ.द्या
शूम्पी ,
तुमची पा.कृ.द्या ना.पोहे छान दिसत आहेत.
आमच्याकडेही सांडग्याची मिरची
आमच्याकडेही सांडग्याची मिरची मस्ट...
नारळाचा चव, पिळलेले लिंबू, टोमॅटोच्या फोडीतून पाझरणारा रस, बारीक चिरलेल्या कोथिंबीरीतून पाझरणारा रस अश्या सगळ्या गोष्टी इनफ होतात दडपले जायला. मी पाण्याचा हबकाही मारत नाही जर नुकत्याच फोडलेल्या नारळाचे पाणी नसेल तर.
डाळींबाचे दाणे, किसलेले गाजर, कोचलेली काकडी, बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेली पुदिन्याची पाने (ही कढीपत्त्याच्या डबल पण तरी कमी प्रमाणातच घालावीत अन्यथा टूथपेस्ट लावून खाल्ल्याचा फिल येऊ शकतो.), भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, फ्लेक्ससीडस इत्यादी पण आवडीप्रमाणे घालता येऊ शकतात. या तिन्ही बिया जस्ट थोड्याश्याच घालायच्या पण. जास्त घातल्या तर चव बिघडते.
ये कुछ अलग डिश है शायद
ये कुछ अलग डिश है शायद <<
नाही हे दडपे पोहेच आहेत. बारीक सारीक पेरिफेरल वस्तू बदलत्या आहेत पण मूळ कृती आणि तत्व तेच आहे.
मी फार काहीच वेगळं करत नाही
मी फार काहीच वेगळं करत नाही देवकी.
पातळ पोहे वापरते. वर नीधपने लिहिल्याप्रमाणे तळलेली सांडगी मिरची आणि दाणे मात्र मस्ट.
टोमॅटो, लिंबू, ओलं खोबरं, कोथिंबीर यांचा ओलेपणा पुरतो पोह्याला, अगदीच वाटलं तर मी ताकाचा हबका मारते क्वचित.
मी हा प्रकार स्वैपाकाचा कंटाळा आला असेल तरच करते त्यामुळे काकडी,डाळिंबाचे दाणे, गाजर, कोबी असलं काही नाही घालत.
माझ्याकडे कोशिंबीर किंवा सॅलड
माझ्याकडे कोशिंबीर किंवा सॅलड प्रकरण रोज असतेच जेवणात त्यामुळे सकाळची कोशिंबीर संध्याकाळच्या खाण्यात ढकलते मी. त्यामुळे काकडी, किसलेलं गाजर, बारीक कोबी, डाळिंब वगैरे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दडपे पोहेच नाव आहे.
दडपे पोहेच नाव आहे. माझ्याकडून घाईघाईत चुकीचे टाईप झालेय. काय झाल लंच टाईम नंतर ऑफिसचे काम करता करता एकीकडे ही रेसिपी लिहत होते. मध्ये बरेच व्यत्यय येत होते. शेवटची १० मिनीटे राहीली होती तेंव्हा रेसिपी अर्धी लिहून व फोटो टाकून झाले होते त्यामुळे तसच बंद करणे जीवावर आले होते. त्यात नेट स्लो. म्हणून पुन्हा चेक न करता तशीच रेसिपी टाकली. ,मला वाटलच होत काहीतरी गडबड झाली असेल. पण घरी जाऊन निट करेन असे ठरवले. पण घरी आले तर पाहुणे आले होते त्यामुळे नाही वेळ मिळायला करायला. आता मी पुन्हा एडीट करते.
सगळ्यांच्या रेसिपी, टिप्स खुप छान आहेत. धन्यवाद सगळ्यांच्याच प्रतिसादाला.
सकाळी ही रेसिपी वाचून आणि
सकाळी ही रेसिपी वाचून आणि शूम्पीचा फोटो पाहून जाडे पोहे, खोबरं, कोथिंबीर, कांदा, लिंबू, मिरच्या, काकडी, सांडगी मिरची, भाजलेला पापड, फोडणी असं सगळं साग्रसंगीत घालून केलेले दडपे पोहे खावेच लागले.
अरे वा सायो फोटो काढलास का?
अरे वा सायो फोटो काढलास का? की फस्त झाले ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कांदा, कोथिंबीर, टोमॅटो
कांदा, कोथिंबीर, टोमॅटो चिराचिरीच्या गोष्टी व्हायच्या आधीच पोह्यांमधे नारळाचा चव, मीठ (इथे शिजवायचं किंवा उकळायचं नसल्याने मी सैंधव घालते) आणि किंचित साखर मिक्स करायची. नारळाच्या चवाने पोहे ओले होणे सुरू होते. डाळिंबाचे दाणे, किसलेलं गाजर, कोचलेली काकडी वगैरे जे काय तयार असेल ते आधी ढकलायचे. किंवा मग जसे जसे होत जाते तसे ढकलायचे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मग कां, को आणि टो चिरलेले घालून वरून लिंबू पिळून घ्यायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे.
दाणे चांगले भाजलेले असतील तर इथेच घालायचे. भाजले नसतील तर आधी भाजून घ्यायचे. जरा जास्तच भाजायचे. आणि दाणे सढळ हाताने घालायचे.
मग फोडणीच्या वस्तू जमवायच्या. मिरची धुवून चिरून घेणे, कढीपत्ता धुवून चिरून, आले किसून घेणे वगैरे. फोडणी करायच्या आधी सांडग्याच्या मिरच्या कढल्याला तेलाचा हात पुसून भाजून घ्यायच्या (तळणापेक्षा तेल कमी, अर्थात खमंगपणा पण कमी होतोच) त्या पोह्यांवर आधी घालायच्या नाहीत. त्यातला फक्त चुरा भुरभुरायचा पोह्यांवर.
मग फोडणी करून ती जिवंत फोडणी ओतायची पोह्यांवर. सगळं व्यवस्थित मिक्स करून एकत्र करून झाकणी घालून वरून दाबून ठेवायचं. १५ मिनिटांनी घ्यायचे. तळलेली मिरची चुरून किंवा नुसतीच प्लेटीवर सजवायची.
जागू, छे, फोटो काढायचा पेशन्स
जागू, छे, फोटो काढायचा पेशन्स कुठला?!
सायो ओके ग. मी पण आता
सायो ओके ग. मी पण आता प्रत्येक वेळी सगळ्यांच्या रेसिपी ट्राय करणार आहे.
नीरजा धन्स. मी करेन नेक्ट टाईम तुझ्याप्रमाणे. तुझी लेमन राईसची रेसिपी मी मधून मधुन करतेच.
रेसिपी तीच आहे गं फक्त क्रम
रेसिपी तीच आहे गं फक्त क्रम मागे पुढे. जेणेकरून पोहे झाल्यावर दडपले जाऊन कमीतकमी वेळात खायला मिळावेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागू, मस्त रेसिपी. सगळ्यांचंच
जागू, मस्त रेसिपी. सगळ्यांचंच व्हर्जन तोंपासू. घरी जाऊन कधी खाते असं होतंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
शूम्पी, तुझा फोटो कातिल आहे
खारची मिरची असेल तर ती आणि
खारची मिरची असेल तर ती आणि कच्चच तेल, फोडणी नाही आणि बाकी कांदा, भरपूर (नारळ, कोथिंबीर, दाणे, लिंबू) पोह्याचा भाजलेल्या पापडाचा चुरा इ. सगळं वरच्या प्रमाणेच. खारच्या मिरचीची चव मस्त येते.
पोहे शक्यतो भाजून घेतो, त्याने मधेच कुरकुरीत मधेच लिंबू/ टो. मुळे मऊ फील येतो.
आम्ही ह्यात हिरवी मिरची तळून
आम्ही ह्यात हिरवी मिरची तळून कुस्करून घालतो जर दह्यातील मिरची नसेल तर... पोह्याचा पापड, घरचा उडदाचा पापड, मिरगुंड, बटाटा पापड(हे मी माझ्यासाठी) वरून भरपूर कों, लिंबू, बारीक शेव. जरासं लाल तिखट भुरभुरवायचं आणी एक गरम चहा.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
एक घास ह्याचा, एक घोट चहाचा.
हिरवी मिरची तिखट हवी, तेलात घातली की शिंक येइल अशी.:फिदी:
(घ्या करा वजन कमी)
सॉरी जागू, पण गाजर नो नो....
सॉरी जागू, पण गाजर नो नो.... पण तुझी रेसीपी छान आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
wowwww...just yummmm
wowwww...just yummmm
शूम्पी , थॅन्क्स्, फोटो एकदम
शूम्पी , थॅन्क्स्,
फोटो एकदम टेम्टींग आहे.
ह्या धाग्याची लिंक 'पोहे फॅन
ह्या धाग्याची लिंक 'पोहे फॅन क्लब' च्या हेडरात जायला हवी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काल हे वाचल्यावर दपो करणं
काल हे वाचल्यावर दपो करणं आलंच ना! केले मग. करणार काय!
पण मला तरी बुवा बेसिक दपो आवडतात. पोहे, बारीक चिरलेला कांदा, भरपूर तिखट हिरव्या मिरच्या, कोथिम्बिर, लिंबू, ओलं खोबरं, मीठ, साखर एकत्र करून हाताने छान मिक्स करून मग वरुन तेलात मोहरी, हिंगाची फोडणी करून घालायची.
माझ्या सांडग्याच्या मिरच्या
माझ्या सांडग्याच्या मिरच्या संपल्यात आणि काल मी मार्केटात गेले तेव्हा घ्यायच्या विसरले त्यामुळे आज आणून मग करावे लागणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटु टाकायचा पेशन्स राह्यला तर टाकेन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटु टाकायचा पेशन्स राह्यला
फोटु टाकायचा पेशन्स राह्यला तर टाकेन. >>> दपोच्या बाबतीत ही शक्यता कमीच आहे.
हो ना..
हो ना..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही ओले खोबरे न घालता काकडी
आम्ही ओले खोबरे न घालता काकडी किसून घालतो शिवाय यात मेतकूटप्ण भारी लागतात. सोबत उडदाचा पापड कुस्करून.
सर्वांचे दडपे पोहे --- स्लर्प
सर्वांचे दडपे पोहे --- स्लर्प ऽऽ
लै भारी - सक्काळी सक्काळी अशा गोष्टी वाचू नयेत हे फार उशीरा कळतंय .....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुख्य रेस्पी सोडुन इतर
मुख्य रेस्पी सोडुन इतर सगळ्यांच्या रेस्प्याही भारीच.. नीधप, तुझी तर उच्च....
मी दडप्या पोह्यांच्या नावाखाली जे काही करते ते मला अजिबात खाववत नाही (लेक खाते हे माझे नशिब). इथल्या सुग्रणींच्या टीपा वाचुन करण्याचे बळ आले परत. आज संध्याकाळी मीही बघते हात चालवुन....
जागुने पौष्टीक लिहिल्ये, त्यामुळे सांडगी मिर्ची आणि पापड टाळला असेल. मला सांमि (कथल्याला तेलाचा हात पुसून) चालेल, तपा नको.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे असे ज्यात त्यात गाजर बिजर
अरे असे ज्यात त्यात गाजर बिजर घालून सारखं सारखं पौष्टिक नका हो खायला घालू
दडपे पोहे ही झटपट करण्याची पाकृ आहे. आणि ती झटपट केली तरच चांगली लागते. अंगची निगुती पुरते त्यांना. फार लाड करायचे नाहीत![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
Pages