मॉरिशियस - भाग तिसरा - बोटॅनिकल गार्डन, Pamplemousses Botanical Garden, Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden

Submitted by दिनेश. on 4 August, 2014 - 08:59

मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140

मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन http://www.maayboli.com/node/50152

मॉरिशियस - भाग दुसरा - शुगर म्यूझियम - Aventure du Sucre http://www.maayboli.com/node/50186

सोमवारपासून माझ्या सहली सुरु झाल्या. एकेका दिवसात बरीच ठिकाणे बघून व्हायची.
सुरवात झाली ती तिथल्या बोटॅनिकल गार्डन पासून. याचे लोकप्रिय नाव आहे Pamplemousses Botanical Garden तर शासकीय नाव आहे Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden.

३७ हेक्टरवर पसरलेले हे उद्यान जगपसिद्ध आहे. फक्त एकच प्रॉब्लेम होता कि सध्या तिथे हिवाळा असल्याने
फारशी फुले नव्हती. हे ड्रायव्हरने आधीच सांगितल्याने सहलीतली अर्धी माणसे उतरायला नाखुष होती.
पण माझ्या गटातल्या लोकांची मेजॉरिटी झाल्याने आमची जीत झाली. मर्यादीतच वेळ दिला होता.
त्यामूळे मनसोक्त भटकता आले नाही... आणि अशा ठिकाणी माझे व्हायचे तेच झाले.. मी हरवलो:

ड्रायव्हरसकट काही माणसे मला शोधायला आत शिरली आणि त्यांनाही मी अडकवून ठेवले.

हे खरे आहे कि फुले नव्हती, पण ती जागा खुपच सुंदर राखलेली आहे. आणि फुले नसल्याने एक मात्र झाले,
तिथे परत त्यांच्या वसंत ऋतूमधे जायचे मी मनात ठरवून टाकले.. तर चला हरवू या !

प्रभाते करदर्शनम.. प्रमाणे नमनाला समुद्र हवाच

१)

२)

३)

४) तिथे इंद्रधनुष्याचे वेगवेगळे प्रकार बघितले, हा नमुना बघा

५)

६) हॉटेलच्या लॉनवर दिसलेली देखणी चिमणी

७) "वडगावाच्या" आत

८) हॉटेलच्या बाजूला एक देवालयही होते. भाविकांची ये जा होती ( सोमवार होता ) तरीही किती सुंदर राखले होते बघा.

९) इथून पुढचे फोटो त्या बोटॅनिकल गार्डनमधले

कमळाचे फळ व बिया.. या बियांच्या लाह्या म्हणजेच मखाणे

१०) बिक्सा अनोटा म्हणजेच आपले कुंकवाचे झाड.. या फळातील बियांपासून सुरक्षित खाद्यरंग तयार करतात.

११)

१२)

१३) मला आवडलेली एक फ्रेम

१४)

१५)

१६) पैगाम / कमांडमेंट्स / आकाशवाणी वगैरे

१७)

१८)

१९)

२०)

२१)

२२) हे झाडासमोरचे चौथरे दिसताहेत त्यावर प्रत्येक झाडाचे नाव आणि माहिती होती

२३)

२४)

२५)

२६)

२७) Brownea Grandiceps, Rose de Venezulela, Scarlet Flame Bean

२८) या ब्राऊनिया ग्रँडीसेप्स ची शेंग पण खुप सुंदर होती ( तर फुल किती सुंदर असेल !! )

२९) एक अजूबा बघितला

३०) जवळ जाऊन बघितले तर असे होते

३१)

३२)

३३) वॉटर लिलीचे खुप फोटो टाकले आजवर... तरी हे दोन टाकतोच

३४)

३५)

३६) खर्‍या कमळाचे हे कोवळे पान

३७) ही जून पाने ( सहज अर्धा मीटर व्यासाची )

३८) हा कळा

३९) पहिल्या दिवशी असे

४०) दुसर्‍या दिवशी असे

४१)

४२)

४३)

४४)

४५) Le Château de Mon Plaisir, पण आत जायला वेळ नव्हता

४६) जीव गुंतला...

पुढे चालू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय मनमोहक अजुबा आहे. नेहमीप्रमाणे नितांत सुंदर प्र.ची. त्या प्र. ची. पाहुनच कळतय की तुम्ही का हरवलात ते. Happy

छान!

मस्त प्रचि. आठवणी ताज्या झाल्या. समुद्राची प्रचि फारच सुरेख आणि ते इंद्रधनुष्यही.

ती कमळाची पानं ही खर्‍या कमळाची नाही आहेत. ही एक कमळाची वेगळी जात आहे जी फक्त मॉरिशसलाच दिसते.

ते वडगाव मलाही खूप आवडलं होतं. त्याच्या समोरच एक भेटवस्तुंचं दुकान आहे त्यामुळे आम्ही दोन तीनदा तिथे थांबलो होतो.

या ठिकाणची माझ्या पोतडीतून काही :

ही ती सुप्रसिद्ध कासवं :

मामी, हा फोटो मला आठवत होता.
त्या दुकानात मी पण बरीच खरेदी केली.

तशी कमळे मी सिंगापूर आणि न्यू झीलंडलापण बघितली आहेत. फुललेले फुल ( दोन्ही रंगातले ) मात्र पहिल्यांदाच बघितले. या फुलांबद्दल डेव्हीड अटेंबरांच्या, द प्रायव्हेट लाईफ ऑफ प्लांट्स मधे एक प्रकरण आहे.

प्रत्यक्ष त्या जागेवर न जाताही प्रकाशचित्रांमुळेच जर इतके वेड लागते तर तिथे गेलेल्या तुमच्यासारख्या कवीमनाच्या व्यक्तीने देहभान हरपून गेल्यासारखेच वर्णन करणे साहजिकच म्हणावे लागेल. प्रसन्न वाटले इतकी सुंदरता पाहून.

शेवटच्या चित्राला "जीव गुंतला" असे जे शीर्षक दिले आहे तुम्ही, ते किती सार्थ आहे हे पटतेच.

ती देखणी चिमणी म्हणजे - Red Fody (Foudia madagascariensis), किंवा Red Cardinal Fody or Common Fody.

सर्वच प्र चि व माहिती मस्तच ...... Happy

मामींचा झब्बूही खासच ...

दिनेश दा

मॉरिशियस : एक 'अम्रुतानुभव' एवढेच म्हणता येईल.

फोटो पाहुन नि:शब्द झालो.

केदार

दिनेशदा व मामे मस्त फोटो.
ते २३ मधे नारळाचे स्लॅन्टींग वाढवलेले झाड मस्त. असे केले तर आपल्याकडचे कितीतरी उत्पन्न वापरता येईल.
३५ मधली झाडे कोणती आहेत?

आभार दोस्तांनो,
मोनालि, ते एक प्रकारचे शोभेचे पाम आहे. आपल्याकडे पण काही ठिकाणी आहेत ही.
आणि आडवी वाढणारी झाडे अपघाताने वाढली असावीत. मालवणला पण एक झाड होते असे.

Dinesh da, ekda mazya dokyawar haat thewa ho... mhanaje mi pan ashi sagalikade firun ghe_een... Happy
He photo pahun te thikane oodh lawataat jeevala..

ek basic Q - water lili ani kamal lotus yaat farak kay ?
net var milel mahiti, pan mala tumachyakadun aikayachi aahe...

धनवन्ती... मुंबई परीसरात विकायला असतात त्या वॉटर लिलीज. याची पाने पाण्यावर तरंगत असतात.
खर्‍या कमळांची पाने पाण्याच्या वर असतात. ती फुलेही आकाराने मोठी असतात. त्यांनाच अशी फळे येतात व त्याचे मखाणे बनवतात. पुर्वी सातपुडा पर्वताच्या उत्तरेसच हि फुले फुलत असत. प्राचीन चित्रात ( अजंठा वगैरे )
हिच फुले दिसतात. थायलंड, कंबोडीया मधे देवपुजेत हिच फुले असतात. आपल्याकडे पनवेलला, स्मृती उद्यानामागच्या तळ्यात आहेत हि कमळे..

डोक्यावर हात ठेवण्याएवढा थोर नाही मी... पण शुभेच्छा जरूर आहेत.

दिनेश दा

आपल्याकडे पनवेलला........?

आपण कुठे राहता ?

मी ही जुन्या पनवेलला सावरकर चोकात राहतो.

केदार

केदार, खुप वर्षांपुर्वी पनवेलला नियमित जात होतो. त्यावेळी बघितली होती. स्मृती उद्यान, स्टँड्च्या समोर भरपूर कमळे असत. अजून आहेत ना ?

सध्या मी पार आफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍यावर असतो Happy

सग़ळेच अनोखे आहे... व्वा दिनेश दा..
ती चिमणी कीती गोड आहे. चुकुन कुंकवाच्या पाळ्यात मान घातली की काय असे वाटते!
कमळाची पाने, शिवालय, समुद्र, आकाश, कमळाची फुलं सगळच मस्त.मुख्य म्हणजे कुंकवाचे झाड.. हे मी कधीच पाहिले नव्हते...

मामीचे ही फोटो मस्त..

सगळीच प्रचि आवडली. चार क्र. चं आडवं हवं असं वाटलं. ३ क्र. चं तर सर्वात आवडलं. पाणकमळं सुंदर आहेत.
शेवटच्या प्रचिला शीर्षक मस्त दिलंय. खरंच गुंता आहे. असं झाड पाहील्याचं आठवत नाही भारतात. वडाचं तर नाही वाटत. ( रात्रीचं भयाण वाटेल त्याकडे पहायला ).

सायली, आपल्याकडे कोकणात आहेत ही झाडे... केनयात याचे व्यापारी तत्वावर उत्पादन करतात. थायलंडमधेही आहे. आपल्याकडेही असणार. हे झाडही देखणे असते याला जांभळट / पांढरी फुले येतात. ती पण छान दिसतात.

स्वर्णसुंदरी.. आडवाही आहे पण त्यात इंद्रधनुष्य पुसट दिसतेय म्हणून जरा झूम केले.

वॉव खूपच सुंदर. चिमणी कित्ती गोड आहे.

कमळाची विविध रूपे मस्त आहेत, कोवळं पान, कळा, बिया सर्वच.

शेवटचा फोटो छान.

मामीचे पण फोटो मस्त आहेत.

अतिशय सुंदर फोटो.. या बागेत मी अख्खा दिवस घालवायला तयार आहे.. मामे, तुझे झब्बुही लै भारीच. कासवे आवडली.

केदार, पनवेलच्या एका तळ्यात मीही पाहिलीत गुलाबी कमळे. पण मला पत्ता नाही यायचा सांगता. गावातच आहे कुठेतरी. बेलापुरला माझ्या कॉलनीच्या बाहेरही एक कमळाचे तळे आहे. गुगल मॅपवर पारसिक हिल, बेलापुर सर्च करा, त्यात दिसेल लोटस पाँड. बेलापुर आणि सीवुड्स स्टेशनच्या मध्ये आहे. ट्रेनने जात असाल तर बेलापुरचा टनेल गेल्यानंतर सीवुड्स यायच्या आधी उजव्या बाजुला बघत बसा, बिल्डिंगी सुरू व्हायच्या आधी मोकळ्या रस्त्यावर कडेला दिसेल Happy सध्या फुले नाहीयेत, पाण्याने आणि पानांनी भरलेय, आता हिवाळा सुरू झाला की पुर्ण तळे गुलाबी होऊन जाईल. त्या तळ्यातुन शिंगाडेही काढतात लोक. नव्या मुंबईत तळी भरपुर आहेत Happy

तसेच अजुन एक तळे माझ्या कॉलनीत आहे, पण त्यात वॉटरलिलीज आहेत. लोक त्यांनाच कमळे समजतात ही गोष्ट वेगळी Happy

दिनेश, खूप मस्त माहिती दिलीत फोटोंमधूनच. रंगपंचमी खेळून आलेली चिमणी आणि वॉटर लिलीचा दुसरा फोटो मस्तच. समुद्राचा दुसरा फोटो तर निव्वळ अप्रतिम.

बिक्सा अनोटा म्हणजेच आपले कुंकवाचे झाड >>> कुंकू हळदीवर प्रक्रिया करून बनवतात ना? पूर्वी मराठी चित्रपटात सवाल-जवाबाच्या लावण्या असायच्या. त्यातल्याच एका जवाबात 'हळदी पासून कुंकू आले म्हणून ती त्याची आई' असे काहीसे होते. (ते गाणे आणि चित्रपट आता आठवत नाहीत)

रच्याकने पिंजर आणि कुंकू हे दोन वेगवेगळे पदार्थ (substances) आहेत का?

Pages