शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच बातमी आहे की दिवाळखोरीकडे वाटचाल करणार्‍या आंध्र प्रदेश सरकारनं पैसे मिळवण्यासाठी रक्तचंदनाची विक्री करण्याचा निर्णय घेतला असून कोर्टाने या विक्रीस मान्यता दिली आहे.

वरदा,
होय, हे रक्तचंदनबाहुली प्रकरण फार जुने आहे हे खरेच. पण गंमत म्हणजे इतर लेप्य वनस्पतींबाबत मात्र असा काही समज दिसत नाही. उदा. वेखंड, आंबी हळद, सागरगोटे,बिब्बे वगैरे. बिब्बे सागरगोटे आकाराने छोटेच असतात म्हणा-बाहुली न बनवता येण्याजोगे.

पुणे महानगरपालिकेने दिलेल्या एका जन्माच्या दाखल्यावर कोपर्‍यात मुद्रणालयाची संक्षिप्त अक्षरे बारीक छापली आहेत.
मुमादामु. ८२४ (१०० पानी ३०० पॅड्स) ६-२०००

यात मुमादामु चा फुल फॉर्म कुणी सांगू शकेल का? शेवटचे मु मुद्रणालय असावे असं वाटतंय. पहिलं 'मु' मुख्य असेल का?

building leases, title-deeds, mortgages,
scrip<<< पैकी स्क्रिप म्हणजे काय?

'लांबड' हा शब्द बहुतकरुन पुण्याच्या अलीकडे वापरतात.नगरी,खानदेशी आणि मराठवाड्यात बोलीभाषेत 'लांबण' हा शब्द वापरतात. सापाला ग्राम्य बोलीत 'लांबडं' असा शब्द आहे,जो कोल्हपूर-मान बाजूला वापरला जातो.माडगूळकरांच्या कथा,शंकर पाटील कथा बघा.

नंदिनी स्क्रीप साठी प्रमाणपत्र किंवा उतारा (जसा ७-१२ चा असतो तसा, सापाचा नाही) शब्द जमेल का?

हो... मी खरं तर माडगुळकरांच्याच पुस्तकात लांबड वाचलं होतं. पण मग त्या कथा ग्रामीण भागातल्या म्हणून सोडून दिलं होतं.(शहरी भागातच लहानाची मोठी झाल्याने असे बरेच शब्द सोडूनच देत असते.) आमच्या घरी-दारी लांबणच म्हणतात. आज इथल्याच एका लेखात लांबड वाचलं, तेव्हा लक्षात आलं की 'लांबण' लेखी कधीच 'वाचलं' नाही आहे, उलट 'लांबड' वाचलंय. म्हणून इथे विचारलं.

नंदिनी....

शासन व्यवहार कोशात मला Scrip सापडले....तिथे त्याचा अर्थ "पट्टी" असा दिला आहे. जमिनीचा पट्टा, तुकडा या अर्थाने तो घेतला असणार.

"लांबड" आणि "लांबडं" अशा दोन प्रकारे कोल्हापूर भागात उल्लेख केले जातात.

१) लांबड = व्यर्थ चर्चा करू नकोस...थोडक्यात बोल....असे म्हणायचे असेल तर, "बाबुराव, आता जास्त लांबड लावू नका. वेळ नाही माझ्याकडे....थोडक्यात काय ते सांगा..." असे ज्यावेळी म्हटले जाते त्यावेळी एखाद्या घटनेविषयी संबंधित बाबुराव अवास्तव माहिती देत असल्यास त्याला जरब दाखविली जाते. त्या अवास्तव माहितीलाच लांबड लावणे असे म्हटले जाते.

२) लांबडं = हे नाम सापासाठी उद्देशून वापरले जाते. उदा. "शेताला पाणी देत होतो....आणि असलं काळ जर्द लांबडं पाटातून सळसळत गेलं बगा....लै वंगाळ !". इकडे सांजवेळेला "नाग, साप' असे थेट नाम घेतले जात नाही, त्याऐवजी "लांबडं" (लांबड नव्हे)....म्हणतात.

'हुरडा' हा शब्द सगळ्यानाच माहिती असावा

पण हुरडा या शब्दाचा शब्दशः अर्थ माहित असल्यास सांगा... संदर्भ असेल तर अधिक चांगले..

मुळ प्रश्न असा:
हुरडा म्हणजे कच्चा दाणा

की

हुरडा म्हणजे भाजल्यानंतरचा दाणा..

'भिशी' हा शब्द ईग्रजीवरुन आला आहे का ? हा शब्द पुर्वी पासून वापरात होता?

याला काही जणं 'भिसी' देखिल म्हणतात...

मोल्सवर्थ बाबा ने हुरडा हा सर्वानाच शब्द दिला आहे पण धान्य स्पेचिफिक नावे असतात. उदा. ज्वारी चा हुरडा. बाजरीच्या हुरद्याला निम्बूर तर हरबर्याच्या हुरड्याला ' हुळा ' किंवा हावळा म्हनतात

reconnaissance
rɪˈkɒnɪs(ə)ns/

noun: reconnaissance; plural noun: reconnaissances

military observation of a region to locate an enemy or ascertain strategic features.

preliminary surveying or research.

यावरून तो रेकी आलेला आहे.

ताज, ट्रायडंट, सी.एस.टी हल्ल्याच्यावेळेस 'रेकी' हा शब्द ऐकला होता. तेव्हापासून तो शब्द ऐकला की तेच सगळं आठवतं.

Pages