पोळी - चपाती - फुलके इत्यादी संदर्भात चर्चा

Submitted by क्ष... on 28 April, 2011 - 17:04

मायबोलीवर दर दोन महिन्यांनी पोळ्या नीट होत नाहीत, तवा कोणता वापरू? पीठ कोणते वापरू अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ते सगळे एकत्र करण्यासाठी हे पान.

भाकरी आणि फुलक्यांचा व्हिडीओ - http://www.maayboli.com/node/14935

जुन्या मायबोलीवरील पोळ्यांची चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/4519.html

अजुन एक चर्चा इथे पण मिळेल - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/111686.html?1225813423

माझे काय चुकले? आणि युक्ती सांगा या दोन्ही बा.फ. वर यासंदर्भात असंख्य वेळा विचारले गेले आहे. तेच सर्व इथे डकवले जाईल.

पोळ्यांसाठी कोणता तवा चांगला? ते इथे सापडेल
- http://www.maayboli.com/node/25369
जुन्या मायबोलीवरची तव्यासंदर्भातली चर्चा इथे आहे - http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103164.html?1157632534

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! रोटीमेकर मस्तच आहे.
गेले चारपाच वर्ष हे असं प्रॉडक्ट कुणी तयार केलं तर किती छान होईल असं वाटत होतं. मधे काही दिवस तर स्वतःच डिझाईन करायचं खूळ पण डोक्यात आलं होतं पण बनवणार/ बनवून घेणार कसं याचा विचार करत बारगळलं. Wink त्यात सर्वात महत्वाचा भाग नंतरची साफसफाई हा वाटत होता. या रोटीमॅटीक मधे ते ही सोप्पं आहे असं वाटतंय Happy मस्त. बाजारात आलं की लगेच घेणार.

हे फक्त भारतातल्या व्होल्टेज वर चालणारं नसावं. युनिव्हेर्सल बनवलं पाहिजे. मागे मी भारतातून इलेक्ट्रिक रो मे
आणला. त्या बिग बझार वाल्याने ऐटीत सांगितलं होतं की बिन्धास्त घेऊन जा अमेरिकेत चालतो हा रो मे. आणि डेमो देताना अर्थातच भारतातल्या व्होल्टेज वर दिला. इथे २ पोळ्या झाल्यावर घरातलं त्या भागातील सर्किटच ब्रेक झालं. रिसेट करून पुन्हा असंच. वैतागून तो पीस ऑफ जंक कचर्‍यात टाकला. Happy

या रोटीमॅटीक मधे ते ही सोप्पं आहे असं वाटतंय<< रोटी ज्या ज्या भागाला टच करेल ते धुवायला पाहीजे. पण इथे फक्त कप्स धुतांना दाखवले आहेत.ते पुरेसे असेल का?

गरम तवासदृश भाग स्वच्छ ओल्या कापडाने वा पेपरटॉवेलने पुसु शकतो. मशीन छाने.
पोळी जरा बारीक झाली तर व कडा अजुन शेकल्या गेल्या तर बरं.
कणकेत जरा तेल टाकले (मशिनला चालत असेल तर) वा पाणी कोमट करुन टाकले तर थोड्या मऊ होऊ शकतील असे वाटते. एकजीव सारणातच कणिक भिजवुन पराठे करायचे शक्ती मशीनमधे आली तर अजुन बरं.

रोटिमॅटिकचा व्हिडीओ पाहिला. भन्नाटच कल्पना आहे. वरती लिहिल्याप्रमाणे कडा जरा कच्चटच वाटताहेत. पण आत्ता तर कुठे मशीन बाजारात येतंय. त्याच्यात निश्चितच सुधारणा होतील. कुणीतरी अशी लाखो बायकांची रोजची ड्रजरी संपवणारी कल्पना प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करत आहे हे काय कमी आहे?

प्रॉडक्ट बाजारात आलं की त्याचा रिव्ह्यू बघून नक्कीच घेणार Happy

rotimatic.com वर पोळ्यांचा जो फोटो आहे, त्यात तर पोळ्या कोरड्या ठक्क वाटतायत.
पण.... (पण आत्ता तर कुठे मशीन बाजारात येतंय. त्याच्यात निश्चितच सुधारणा होतील.) +१

त्यात सॉफ्टनेस, थिकनेस, ऑइल अशी वेगवेगळी सेटिंग्ज दिसतायत. तेव्हा ते थोडं ट्रायल अ‍ॅन्ड एरर करत तंत्र बसवायला लागणार असावं असा अंदाज!

मलातर हे रोमे वै उगीच झंझट च काम वाटत. सरासर चपात्या करुन मोकळं व्हावं झालं. अर्थात हेमावैम.
लग्ना आधी कधी पीठ ही मळलं नव्हतं तरी ल्ग्ना नंतर सकाळी २५ व संध्या. १२-१३ चपात्या कराव्या लागायच्या. जाम वैताग. तारांबळ. शिवाय चपात्यांची क्वालिटी कधी बरी तर कधी हे राम. पण सरावाने जमलं. आता वेळच्या वेळीच पीठ मळुन (मी पीठ फ्रीजात ठेवत नाही मळुन) सरासर चपात्या करते. आणि आता ९ वर्षाच्या सरावानंतर क्वालिटी सुपर्ब. सो मशीनीपेक्शा मॅनमेड चपात्याच चांगल्या कारण शेकणे, लाटणे, साइज, तेल लावयचं की तुप, कडा कच्च्या आहेत का हे सगळं त्या मशीनला कोण सांगेल??

मलातर हे रोमे वै उगीच झंझट च काम वाटत. सरासर चपात्या करुन मोकळं व्हावं झालं.>>>>माझी आई हा रोटीमेकर बघून अगदी अस्सच म्हणेल Happy

सस्मित प्लिज रागावू नये. पण जरा वेगळ्या मुद्द्यावर लिहिते आहे. सरासर पोळ्या करणार्‍या सर्व व्यक्तींबद्दल नितांत आदर आहे. पण सगळे पोळ्या एक्स्पर्ट हे सरावानेच तयार झालेले असतात. थोडंफार स्कील आणि खूप जास्त प्रॅक्टिस. बाकी काही लागत नाही.
सध्याचे धावपळीचे युग पाहता इच्छा असूनही मुलींना पोळ्यांवर घालवण्यासाठी वेळ नसतो. आणि वेळ न दिल्याने पोळ्या जमत नाहीत. मग एक कंटाळवाणे काम म्हणून याकडे पाहीले जाते.

या मशिनचा शोध लावणार्‍यांचे आभारच मानले पाहिजेत. याहून पुढे जाऊन एक प्रचंड फायदा देणारा उद्योग म्हणून याकडे पाहीलं पाहीजे. मशिन तयार करण्याचा व्यवसाय आणि त्यावर आधारित ताजी पोळी-भाजी विक्रीचा व्यवसाय. आज इटालियन पास्ता, मेक्सिकन टाकोज, चायनीज नुडल्स, ब्रेड बटर जसे जगावर राज्य करताहेत तशी मराठी पोळी-भाजी पण अशा शोधांमुळे पुढे येऊ शकेल. आपल्या सपोर्ट आवश्यकता मात्र आहे. Happy

धनश्री अगदी.
मला चपात्या सुरेख करता येतात. अगदी भरभरं. पण तरीही कंटाळा येतोच बरेचदा. अशावेळी हे मशिन मस्तच ऑप्शन आहे. दुसरं म्हणजे कुणीतरी (बाईनेच शेवटी) मशीन तयार करण्याचा प्रयत्न केला याच कौतुक आहेच.

या मशीन ची मॅक्स. किती पोळ्यांची कपॅसिटी आहे ते कळले नाही मात्र . पिठाच्या अन पाण्याच्या कन्टेनर्स वरून तरी फार कमी वाटली मला. शिवाय मिनिटाला एक पोळी. माणशी ५-६ पोळ्या खाणारे ५ लोक असतील घरात तर काही पत्ता लागायचा नाही या मशीन चा! मला वाटते न्यूक्लीयर आणि डाएट कॉन्शस फॅमिलीकरता असावे हे मशीन Happy असो, तरीसुद्धा हे असे बिनबोभाट चालणारे मशीन अफोर्डेबल किमतीत असेल तर इट्स नेक्स्ट बिग थिंग!!

मला तर आवडेल हे मशिन वापरायला. मला पोळ्या बनवायला जमतात पण प्रत्येक वेळी अगदी बरोबर जमतील ह्याची खात्री नाही. मूडप्रमाणे बर्याच वेळा बिघडतात, चांगल्या होतात..
मशिन मुळे गॅरंटीने छान पोळ्या मिळाल्या तर बरच आहे. राईस कुकर मध्ये भात लावला आणि सगळ मापाने टाकल की कस टेन्शन नसत, तस ह्या मशिनमुळे होईल अस वाटत.

मलाही आता सरावाने चांगल्या पोळ्या जमतात आणि पोळ्या करायचा फारसा कंटाळा येत नाही. आठवडाभराची कणिक आधीच भिजवून फ्रीजरमध्ये ठेवल्यास आणि पोळ्या करण्याआधी योग्य वेळी थॉ केल्यास उत्तम पोळ्या होतात, वेळही वाचतो. पण तरीही हे मशिन बाजारात आले आणि रिव्ह्यु चांगला असला तर मी घेणार आहे!
पुढच्या पिढीला हवे तेव्हा पोळ्या करुन खाता याव्यात आणि पोळ्या करणार्‍या बाईंची वाट बघण्यात/ पोळ्या करण्यात त्यांचा वेळ जाऊ नये यासाठी मला या मशिनची नितांत आवश्यकता वाटते आहे!

पुढच्या पिढीला हवे तेव्हा पोळ्या करुन खाता याव्यात आणि पोळ्या करणार्‍या बाईंची वाट बघण्यात/ पोळ्या करण्यात त्यांचा वेळ जाऊ नये यासाठी मला या मशिनची नितांत आवश्यकता वाटते आहे!
<<<<<<

हा सर्वात बेस्ट युज होईल.

वर धनश्रीने सांगितल्याप्रमाने या मशिनमुळे "चपाती रोल" हा प्रकार विकणारया दुकानाची चेन तयार होईल. लोक फॉईलमध्ये गुंडाळलेले ताज्या चपातीचे रोल घेउन जातील. ऑफिसेस चहा/कॉफी मशिन सोबत हे चपाती मशीन देखील पॅंन्ट्रीमध्ये बसवतिल. मग सर्वजण फक्त भाजीचा डब्बा घेउन जातील. पुढील पिढीतील तरुण मुली आज मी चपाती कशी घरी करुन पाहिली सेम अ‍ॅज बाजारात मिळणारा पिज्जा घरी करुन बघितल्यासारखा याचे कौतुक सांगतील कारण हे मशिन जर यशस्वी झाले तर लोक चपाती हाताने बनवता येते हेच विसरुन जातील. ( किती तो कल्पनाविलास Proud )

मला व माझ्या मैत्रिणिंना हि मशीन आवडली आहे. वॉट्सअप वर हा विडियो फॉरवर्ड केल्यावर वॉव, ऑसम, बढिया है, कब आ रहा है मार्केटमे अश्या प्रतिक्रिया अर्ध्याहुन अधिक मैत्रिणींनी दिल्या.

हा विडियो नवर्‍याला दाखवला तर मागेच लागला, आत्ताच्या आत्ता घेउ म्हणाला. यात कशाही पोळ्या झाल्यातर मला चालतील. आयत्या मिळतात तेच खुप आहे म्हणाला.

हे मशीन मलापण आवडलं, सुधारणा होईल त्याच्यात असे वाटतेय म्हणजे बाजारात आलेकी त्यात काय कमतरता आहे वगैरे समजेल मग सुधारणा करतील, हे माझ्या आईसाठी मला घ्यायला जास्त आवडेल ती ७०वर्षाची आहे आणि पोळ्यांना बाई ठेवणे तिला पसंत नाही, जर असे मशीन आले तर बरे होईल. रोटीमेकर आहे पण त्याच्याशी तिचे सूत जुळले नाही. गावाला सासूबाईंनापण द्यायला आवडेल हे.

धनश्री, वत्सला, यशस्विनी खरंच गं. वर कुणीतरी म्हणल्याप्रमाणे एकदम क्रांतीकारक होईल हे मशीन. यामुळे लोकं कशा का होईना पण घरी बनवलेल्या पोळ्या खायला लागतील आणि हा तब्येतीच्या दृष्टीने प्रचंड मोठा फायदा असेल. वेळोवेळी रिव्ह्युजनुसार मशीनमध्ये जे बदल केले जातील ते पोळ्या आणखी चांगल्या कशा होत जातील हेच पहाणारे असतील. मागणीप्रमाणे मोठ्या कुटुंबांसाठी, यशस्विनी म्हणतेय तसं चेन्स वगैरेसाठी तर कपॅसिटीपण वाढवतीलच. मी पोळ्या ब-या करते आणि करायचा कंटाळाही नाही, पण तो उद्या येणार नाही हे कुणी सांगावं? आज वेळ आहे करायला, उद्या असेल्/नसेल. करणा-यांना सुटं होता येईल, न येणा-यांची, करु न शकणा-यांची सगळ्यांचीच उत्तम सोय होईल. मीही नंबर लावला. उड्या पडणारेत या मशीनवर. मराठी स्त्रीलाच दु:ख समजलं म्हणायचं!

कोणी अमेरिकेत लाटणं विकत घेतलं आहे का? कुठून घेतलं आणि कितीला? इथे (http://www.amazon.com/J-K-Adams-FRP-1-French-Rolling/dp/B000IYYFIQ/ref=s...) एक दिसतंय खूप चांगले रिव्हुज पण आहेत पण पोळ्या करता येतील का त्याने?

त्यापेक्षा भारतीय वस्तु मिळणार्‍या दुकानात चांगले व याहुन स्वस्त मिळेल की. तिथे पाहिलेस का?

रोलिंग पिन म्हणुन बर्‍याच दुकानात मिळत की. मला फ्लाट आणि जड लाटण्याची सवय आहे म्हणुन मी तस घेतल. हे पण पोळ्यांसाठी चालेल

हे ऑटोमॅटीक रोटीमेकर यंत्र कोणी घेऊन वापरून पाहिले आहे का ? काही अनुभव असल्यास शेअर करणे.

>> ते अजून बाजारात अलेले नाहिये. Pre - Order आणली होती त्यांनी काही देशात पण अजून वितरण झालेले नाहिये. Happy आले की मी घेउन बघणार आहे. अर्थात किम्मत कळल्यावरच. Proud

हे मी वापरून पाहीलेय पण माझ्यासाठी हे खूप मोठे होते त्यामुळे पोळपाटावर नाही लाटता येत. डायरेक्ट ओट्यावर लाटावे लागते जे मला जमत नाही. तू कुठे रहातेस मला पत्ता कळव तुला आमच्या इथल्या देसी दुकानातून घेवून पाठवते नेहमीचे लाटणे.
अमॅझॉनवर Indian rolling pins, Belan आहे पण महाग आहे.

Pages