साहित्य : दोन वाट्या कोवळे अमेरिकन मक्याच्या कणसाचे दाणे , अर्धी वाटी बारूक रवा, तीन कोशिंबीरीचे मोठे चमचे बेसनपीठ , तीन कोशिंबीरीचे मोठे चमचे भाजणी ,चवीनुसार आलें,लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट , एक चमचा जिरेपूड ,एक छोटा बारीक चिरलेला कांदा मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , चवीनुसार मीठ व भजी तळण्यासाठी तेल.
कृती : मिक्सरवर मक्याच्या कणसाचे कोवळे दाणे भरडसर वाटून घ्यावेत. (फार पेस्ट करू नये, फक्त अर्धवट मोडले जातील असे वाटावे) , भरडलेल्या दाण्यांत बारीक रवा,भाजणी, चवीनुसार आलें,लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट, जिरेपूड, बेसनपीठ,बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसारमीठ घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे पाणी घालून दाटसर पीठ भिजवावे. पीठ पातळ भिजवू नये, चिकटसर असे भिजवावे. गॅसवर एका कढईत तेल गरम करून आच मध्यम ठेवावी. चमच्याने लहान लहान गोळे तेलात घालून भजी तळून घ्यावी.
हिरव्या पुदिन्याच्या चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावी.
विशेष सूचना :
१) जर मक्याचे दाणे जून आहेत असे वाटले तर आधी थोडे वाफवून घ्यावेत.
२बेसन पीठा बरोबर आपण इतर पीठेसुद्धा वापरू शकतो. जसे तांदुळाचे, सोयाबीनचे पीठ. पीठाचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकतो.
३) जर भजी तेलात फुटत असतील तर थोडे पीठ वाढवावे.
छान. मस्तच लागतील हे. बर्याच
छान.
मस्तच लागतील हे.
बर्याच दिवसांनी आलात.
तुमच्या रेसिप्यांची आठवण येत होती.
वा मस्तच !! एक फोटो पण काढा..
वा मस्तच !! एक फोटो पण काढा.. तुमची खरेच आठवण होते...
यल्कम ब्याक.
यल्कम ब्याक.
Fakt Dane, besan, mirchi
Fakt Dane, besan, mirchi ekatra bhijaun pan mast lagtat mi asech banavate
माहितीचा स्रोत: माझी
माहितीचा स्रोत:![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझी पत्नी
>>
हे भारी
मी आजवर जिथे जिथे या मकईभज्या खाल्ल्या आहेत त्या आवडल्याच आहेत.
हा घ्या फोटो, लोनावळ्याला
हा घ्या फोटो, लोनावळ्याला कधीतरी लॉयन पॉईंटला खाल्ली होती, त्यावरून ईंस्पायर होऊन बनवलेली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![021](https://farm4.staticflickr.com/3889/14571510369_29ce237378.jpg)
अरे वा! बर्याच दिवसांनी
अरे वा! बर्याच दिवसांनी आलात!
पा.कृ मस्त.
प्रसिक फोटो मस्त.
काका बरं झालं परत आलात आम्ही
काका बरं झालं परत आलात आम्ही तुमच्या रेसिपी मिस करत होतो.
भाजणी म्हणजे थालिपिठाची घ्यायची का?
@प्रसिक - झकास फोटो!
अगदी तोपासु... फोटो टाका
अगदी तोपासु...
फोटो टाका प्लीज..
काका खुप दिवसांनी आलात... तुमच्या रेसीपीस खुप छान असतात... पियुश तर कसल हीट झालं
आमच्या कडे..
प्रमोद काका , पहिल्यांदाच
प्रमोद काका , पहिल्यांदाच तुम्ही लिहिलेली रेसिपी वाचली. मस्त वाटतेय. नक्की करून बघेन.
अगदी तोपासु... फोटो टाका
अगदी तोपासु...
फोटो टाका प्लीज..
काका खुप दिवसांनी आलात... तुमच्या रेसीपीस खुप छान असतात... पियुश तर कसल हीट झालं
आमच्या कडे..
मस्त रेसिपी @ प्रसिक :-
मस्त रेसिपी
@ प्रसिक :- फोटो मस्त
पा.कृ मस्त. काका बर्याच
पा.कृ मस्त.
काका बर्याच दिवसांनी आलात तुमच्या रेसीपीस खुप छान आणी सोप्प्या असतात.
प्रमोद काका , पहिल्यांदाच
प्रमोद काका , पहिल्यांदाच तुम्ही लिहिलेली रेसिपी वाचली. मस्त वाटतेय. नक्की करून बघेन>
ओह सॉरी, मला पहिल्यांदा प्रमोद देव काका वाटले, म्हणून वरील रिप्लाय लिहिला.
प्रमोद काका खूप दिवसांनी आलात. वेलकम बॅक.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)