मका कणसाच्या दाण्यांची भजी

Submitted by pltambe@yahoo.co.in on 27 July, 2014 - 07:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : दोन वाट्या कोवळे अमेरिकन मक्याच्या कणसाचे दाणे , अर्धी वाटी बारूक रवा, तीन कोशिंबीरीचे मोठे चमचे बेसनपीठ , तीन कोशिंबीरीचे मोठे चमचे भाजणी ,चवीनुसार आलें,लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट , एक चमचा जिरेपूड ,एक छोटा बारीक चिरलेला कांदा मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , चवीनुसार मीठ व भजी तळण्यासाठी तेल.

क्रमवार पाककृती: 

कृती : मिक्सरवर मक्याच्या कणसाचे कोवळे दाणे भरडसर वाटून घ्यावेत. (फार पेस्ट करू नये, फक्त अर्धवट मोडले जातील असे वाटावे) , भरडलेल्या दाण्यांत बारीक रवा,भाजणी, चवीनुसार आलें,लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट, जिरेपूड, बेसनपीठ,बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसारमीठ घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे पाणी घालून दाटसर पीठ भिजवावे. पीठ पातळ भिजवू नये, चिकटसर असे भिजवावे. गॅसवर एका कढईत तेल गरम करून आच मध्यम ठेवावी. चमच्याने लहान लहान गोळे तेलात घालून भजी तळून घ्यावी.
हिरव्या पुदिन्याच्या चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावी.

वाढणी/प्रमाण: 
चार व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

विशेष सूचना :
१) जर मक्याचे दाणे जून आहेत असे वाटले तर आधी थोडे वाफवून घ्यावेत.
२बेसन पीठा बरोबर आपण इतर पीठेसुद्धा वापरू शकतो. जसे तांदुळाचे, सोयाबीनचे पीठ. पीठाचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकतो.
३) जर भजी तेलात फुटत असतील तर थोडे पीठ वाढवावे.

माहितीचा स्रोत: 
माझी पत्नी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Fakt Dane, besan, mirchi ekatra bhijaun pan mast lagtat mi asech banavate

माहितीचा स्रोत:
माझी पत्नी
>>
हे भारी Happy

मी आजवर जिथे जिथे या मकईभज्या खाल्ल्या आहेत त्या आवडल्याच आहेत.

काका बरं झालं परत आलात आम्ही तुमच्या रेसिपी मिस करत होतो.

भाजणी म्हणजे थालिपिठाची घ्यायची का?

@प्रसिक - झकास फोटो!

अगदी तोपासु... Happy फोटो टाका प्लीज..

काका खुप दिवसांनी आलात... तुमच्या रेसीपीस खुप छान असतात... पियुश तर कसल हीट झालं
आमच्या कडे..

अगदी तोपासु... Happy फोटो टाका प्लीज..

काका खुप दिवसांनी आलात... तुमच्या रेसीपीस खुप छान असतात... पियुश तर कसल हीट झालं
आमच्या कडे..

प्रमोद काका , पहिल्यांदाच तुम्ही लिहिलेली रेसिपी वाचली. मस्त वाटतेय. नक्की करून बघेन>

ओह सॉरी, मला पहिल्यांदा प्रमोद देव काका वाटले, म्हणून वरील रिप्लाय लिहिला.

प्रमोद काका खूप दिवसांनी आलात. वेलकम बॅक. Happy