Submitted by स्नू on 23 July, 2014 - 02:47
लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
पालकाची पाने (10-15)
मॅकरोनी पास्ता
काळी मिरी पाऊडर - 1 छोटा चमचा
लसूण पाकळ्या 3-4
शेंगदाणे किंवा बदाम (मूठभर)
2 चीज स्लाइस
बटर किंवा तेल
मीठ चवीनुसार
१. पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत
२. उकळत्या पाण्यात साधारण २ मिनिट पालकाची पाने टाकून गॅस बंद करावा
३. पालकाची पाने निथळून घ्यावीत आणि पाने, बदाम / शेंगदाणे, मीठ, मिरी पाऊडर, लसूण पाकळ्या ई. ची पेस्ट करावी. फार बारीक नको. बदाम / शेंगदाणे जास्त थोडे भरड राहतील असे पाहावे.
४. कढईत थोडे बटर गरम झाल्यावर पेस्ट ओतावी. पेस्टला उकळी आल्यावर १ चीज स्लाइस टाकावा.
5. उकडून ठेवलेला पास्ता कढईत ओतावा आणि उरलेला चीज स्लाइस कढईत टाकावा. २ मिनिट व्यवस्थित हलवून गरमागरम वाढवा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव. करुन बघणेत येइल.
वॉव. करुन बघणेत येइल.
अ पिक्चर इज वर्थ थाऊजंड
अ पिक्चर इज वर्थ थाऊजंड वर्ड्स!
पण थोडे वर्ड्स हवे होते अजून यात.
लसूण पाकळ्या व शेंगदाणे
लसूण पाकळ्या व शेंगदाणे चित्रातून अंतर्धान पावले आहेत. तसंच, परोपकारी मिक्सरलाही फूटेज मिळाले नाहीय.
मस्त रेसिपी.
छान दिसतेय डिश.. स्टेप्स
छान दिसतेय डिश..
स्टेप्स समजतायत पण थोडीशी तरी कृती लिहा की अहो
त्या दाण्या-बदामांचं काय करायचं, मीठ्-बीठ किती घालायचं/नाही, वगैरे
इब्लिस यांच्याशी सहमत. कारण
इब्लिस यांच्याशी सहमत.
कारण पालकाची पाने नुसती शिजवल्यावर अशी पातळ पेस्ट होते का? पाककृतीच्या जिन्नसामध्ये लिहिलेल्या इतर पदर्थांचे उदा. बदाम, काळीमिरी पावडर, लसुण, बटर किंवा तेल त्याचे काय करायचे किंवा कधी मिक्स करायचे? असे प्रश्न निर्माण होत आहेत.
बाकी पाककृती एकदम झक्कास! नक्कीच करून खाण्यात येईल. संपुर्ण केलीत तर.:)
धन्यवाद ! पाककृतीचे पुनश्च
धन्यवाद ! पाककृतीचे पुनश्च संपादन केले आहे !!!
श्रावण येत असल्याने हा पास्ता
श्रावण येत असल्याने हा पास्ता नक्की करून बघते
भारीच !
भारीच !
वाहव्वा...सुन्दर दिसतय!
वाहव्वा...सुन्दर दिसतय! नक्कीच करुन बघणार.
छान आहे, सोपी आहे, सगळ्यांना
छान आहे, सोपी आहे, सगळ्यांना आवडण्यासारखी आहे. जमेल.
छान दिसते आहे... लेकीला नक्की
छान दिसते आहे... लेकीला नक्की आवडेल..
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
झकास पाककृती. पिवळ्या
झकास पाककृती.
पिवळ्या प्लेटमधे हिरवा पास्ता मस्तं दिसतो.
सोपीये व छान पण आहे.
सोपीये व छान पण आहे.
मस्त दिसतोय पास्ता. पेस्टोला
मस्त दिसतोय पास्ता. पेस्टोला बदल म्हणून चांगलाय.
मी green mac-n-cheese बरेचदा
मी green mac-n-cheese बरेचदा करते. ह्यात pasta उकडताना last 2-3 minutes green peas आणि ब्रोकोली florets पण घालते. माझा butter+flour+spinach puree+milk+cheese असा sauce असतो, आता बदाम्-पूड घालून बघिन.
मस्त दिसतोय. नक्की करणार.
मस्त दिसतोय. नक्की करणार. थँक्यु.
सुंदर दिसतोय नक्की करणार.
सुंदर दिसतोय नक्की करणार.
छान दिसते आहे... ...
छान दिसते आहे... ...
मी करते नेहेमी पालकपास्ता.
मी करते नेहेमी पालकपास्ता. लालूच्या पास्त्याच्या धाग्यावर रेसेपी लिहिली होती बहूतेक. नंदिनीने त्याला कसलासा मिनार पास्ता म्हणून नावपण दिलंय, हिरव्यागार रंगामूळे.
शेंगदाणे-बदाम नाही घालत मी. या पद्ध्तीने पण करुन बघेल.
लालूच्या पास्त्याच्या
लालूच्या पास्त्याच्या धाग्यावर रेसेपी लिहिली होती बहूतेक. नंदिनीने त्याला कसलासा मिनार पास्ता म्हणून नावपण दिलंय, हिरव्यागार रंगामूळे>>>
अल्पनाने लिहिलेल्या रेसिपीने घरात कायम हा ग्रीन पास्ता होत असतो. लेकीला प्रचंड आवडतो. मी ब्रिटानियाचं मोझेरेल्ला चीज मिळतं ते किसून घालते. शेंगदाणे बदाम नाही, पण मटर आणि गाजराचे तुकडे घालते.
सगळ्यांना धन्यवाद.
सगळ्यांना धन्यवाद.
आहाहा!!! काय सुंदर रेसिपी आहे
आहाहा!!! काय सुंदर रेसिपी आहे स्नू.... फोटोज तर भलतेच टेम्प्टिंग!!!! करुन पाहणेंत येईल... धन्यवाद सखे!!
सानी, धन्यवाद. तुझेच
सानी, धन्यवाद. तुझेच प्रोत्साहन......माबोवर कोबीची भाजी येऊ दे म्हणते मी...
ओके... पुढच्यावेळी केली की
ओके... पुढच्यावेळी केली की फोटोसहित टाकेन इकडे..
छान दिसतोय. करुन बघीन.
छान दिसतोय. करुन बघीन.
दिनेश दा... खूप आभार. तुमच्या
दिनेश दा...
खूप आभार. तुमच्या पाककृती बघूनच सध्या जोश आलाय स्वयंपाकाचा..