पालक पास्ता (फोटोसहित)

Submitted by स्नू on 23 July, 2014 - 02:47

लागणारा वेळ:

१५ मिनिटे

लागणारे जिन्नस:

पालकाची पाने (10-15)
मॅकरोनी पास्ता
काळी मिरी पाऊडर - 1 छोटा चमचा
लसूण पाकळ्या 3-4
शेंगदाणे किंवा बदाम (मूठभर)
2 चीज स्लाइस
बटर किंवा तेल
मीठ चवीनुसार

१. पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत

1.jpg

२. उकळत्या पाण्यात साधारण २ मिनिट पालकाची पाने टाकून गॅस बंद करावा

2.jpg

३. पालकाची पाने निथळून घ्यावीत आणि पाने, बदाम / शेंगदाणे, मीठ, मिरी पाऊडर, लसूण पाकळ्या ई. ची पेस्ट करावी. फार बारीक नको. बदाम / शेंगदाणे जास्त थोडे भरड राहतील असे पाहावे.

3.jpg

४. कढईत थोडे बटर गरम झाल्यावर पेस्ट ओतावी. पेस्टला उकळी आल्यावर १ चीज स्लाइस टाकावा.

4.jpg

5. उकडून ठेवलेला पास्ता कढईत ओतावा आणि उरलेला चीज स्लाइस कढईत टाकावा. २ मिनिट व्यवस्थित हलवून गरमागरम वाढवा.

5.jpg6.jpg7.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लसूण पाकळ्या व शेंगदाणे चित्रातून अंतर्धान पावले आहेत. तसंच, परोपकारी मिक्सरलाही फूटेज मिळाले नाहीय.
मस्त रेसिपी.

छान दिसतेय डिश..
स्टेप्स समजतायत पण थोडीशी तरी कृती लिहा की अहो Happy
त्या दाण्या-बदामांचं काय करायचं, मीठ्-बीठ किती घालायचं/नाही, वगैरे Happy

इब्लिस यांच्याशी सहमत.

कारण पालकाची पाने नुसती शिजवल्यावर अशी पातळ पेस्ट होते का? पाककृतीच्या जिन्नसामध्ये लिहिलेल्या इतर पदर्थांचे उदा. बदाम, काळीमिरी पावडर, लसुण, बटर किंवा तेल त्याचे काय करायचे किंवा कधी मिक्स करायचे? असे प्रश्न निर्माण होत आहेत.

बाकी पाककृती एकदम झक्कास! नक्कीच करून खाण्यात येईल. संपुर्ण केलीत तर.:)

मी green mac-n-cheese बरेचदा करते. ह्यात pasta उकडताना last 2-3 minutes green peas आणि ब्रोकोली florets पण घालते. माझा butter+flour+spinach puree+milk+cheese असा sauce असतो, आता बदाम्-पूड घालून बघिन.

मी करते नेहेमी पालकपास्ता. लालूच्या पास्त्याच्या धाग्यावर रेसेपी लिहिली होती बहूतेक. नंदिनीने त्याला कसलासा मिनार पास्ता म्हणून नावपण दिलंय, हिरव्यागार रंगामूळे. Happy

शेंगदाणे-बदाम नाही घालत मी. या पद्ध्तीने पण करुन बघेल.

लालूच्या पास्त्याच्या धाग्यावर रेसेपी लिहिली होती बहूतेक. नंदिनीने त्याला कसलासा मिनार पास्ता म्हणून नावपण दिलंय, हिरव्यागार रंगामूळे>>> Happy

अल्पनाने लिहिलेल्या रेसिपीने घरात कायम हा ग्रीन पास्ता होत असतो. लेकीला प्रचंड आवडतो. मी ब्रिटानियाचं मोझेरेल्ला चीज मिळतं ते किसून घालते. शेंगदाणे बदाम नाही, पण मटर आणि गाजराचे तुकडे घालते.