अमेरिका वेस्ट कोस्ट टुर्सची माहिती हवी आहे.

Submitted by दुर्योधन on 21 July, 2014 - 09:57

नमस्कार

मला अमेरिकेच्या वेस्ट कोस्ट टूर्सची माहिती हवी आहे.
माझे आई-बाबा सध्या अमेरिकेत आले आहेत. त्यांना ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये वेस्ट कोस्टची ग्रुप टूर करायची आहे. तुम्हाला जर कोणत्या टुरीस्ट कंपनी माहित असतील किंवा त्यांचा काही अनुभव असेल तर सांगू शकाल का?

खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे फक्त भारतीय टुरीस्ट कंपनीच चालतील असे मला वाटतंय. केसरीची टूर जुलैमध्ये असल्यामुळे तो ऑप्शन बाद झालाय.
धन्यवाद!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणखी कोठेतरी ही माहिती दिलेली होती, बाफ लक्षात नाही. सॅ फ्रा वरून लासन टूर्स म्हणून कंपनी आहे - चायनीज आहे पण थोडेफार भारतीय लोकही असतात.
http://www.lassentours.com/

मात्र भारतीय ऑपरेटर कोणी आहेत का माहीत नाही.

येथेही बघा. गेल्या ३-४ वर्षांत बर्‍याच लोकांनी लिहीले होते अनेक ठिकाणी. पण आता सापडत नाही.
http://www.maayboli.com/node/2178

लासन वाले थोडेफार तरी व्हेजी मिळेल अशा ठिकाणी नेतात असे ऐकले होते. अजून एक करता येइल - या २-३ महिन्यांमधे भारतातून येणारे लोक खूप असतात. असे दोन तीन सिनीयर सिटीझन्स एकत्र येउन एकाच ट्रीप ला गेले तर निदान कंपनी चांगली मिळेल.

www.tripsforfun.com
माझ्या सासूसासर्यांनी West coast ट्रीप केली होती. त्यांचा अनुभव चांगला आहे. आता ऑगस्ट मध्ये दीर जाऊ east coast ह्यांचा कडूनच करत आहेत. ३ STAR हॉटेल्स बुक करतात. खूप घाई घाई हि नाही करत. veg options ही असतात. ते pure vegitrian आहेत. त्यांना काहीही problem आला नाही.

धन्यवाद फारएण्ड!! दोन तीन सिनियर सिटीझन्सची आयडीया चांगली आहे. मी customized tours चा ऑप्शन पाहत आहे. काही सिनियर सिटीझन्स एकत्र येऊन अशी customized tour करता येईल.

कॉक्स अंड किंग्सची टूर आहे ऑगस्टमध्ये. वेगास, एल ए, मॉन्टेरी बे आणि एसएफओ.
कॉक्स अंड किंग्सचा कोणाला काही भला बुरा अनुभव आहे का?

धन्यवाद मृण्मयी. तुमच्या नातेवाईकांचा अनुभव वाचल्यावर मीही गूगल करून पहिले. बऱ्याच तक्रारी आहेत ह्या कंपनीबद्दल...खाली त्यातल्याच काही लिंक्स देत आहे...

http://www.consumercomplaints.in/complaints/cox-and-kings-c338328.html

http://www.reviewcentre.com/reviews197039.html

कॉक्स अंड किंग्सची टूर आहे ऑगस्टमध्ये. वेगास, एल ए, मॉन्टेरी बे आणि एसएफओ.>>> वेस्ट कोस्टच्या टूरमधे ग्रॅन्ड कॅनियन कव्हर करत नाहीत?

trafalgar

Costco membership असल्यस ५-१५% सुट मिळेल.