मी नास्तिक आहे असा माझा समज आहे.... पण

Submitted by ब्रह्मांड आठवले on 10 July, 2014 - 10:23

सामान्य माणूस नास्तिक असू शकतो का ?
कारण मी नास्तिक आहे, असा माझा समज आहे. मी नास्तिक असण्याने इतरांना त्रास होतोय असं आजवरच्या वाटचालीवरून वाटलं नाही. पण मी नास्तिक का आहे याची कारणं मला माहीत असलीच पाहीजेत असा आजूबाजूच्यांचा आग्रह का ?
मग मिळेल ते वाचावं लागतं. म्हणजे असं वाटतं की आपण इतरांच्या कटकटीला वैतागून वाचतोय हे सर्व..
पण खरं म्हणजे
माझ्या नास्तिक असण्याशी माझा अंतर्गत झगडा चालू असतो. निरंतर.
मग सगळी तत्त्वज्ञानं थोडी थोडी, झेपेलशी चाळून मेंदू बधीर होतो. वाचनासाठी डोळे खोबणीतून बाहेर येतात आणि झोप न झाल्याने आता आत खेचले जाऊन मेंदूला चिकटतात.
मग मेंदूचं कामकाज सुरळीत चालत नाही. जडत्व येतं
मग वाटतं या मेंदूच्या हार्डवेअरचा निर्माता कोण ?
याला सूक्ष्म डीसी करंट पुरवणारा जनरेटर कुठला ?
मेंदूचं विचाररुपी सॉफ्टवेअर आणि त्याची प्रोग्रामिंग लँज्वेग लिहीणारा तो अभियंता कोण ?

बाळ जन्मताना त्याचे एकेक अवयव तयार होणं
त्यात चैतन्य निर्माण होणं
मग पूर्ण आकार आल्यावर
आईशी नाळेनं बांधलं जाणं
आईने पचवलेलच बाळाला आयतंच मिळणं
आणि बाहेर आल्यानंतर
आईला पान्हा फुटणं
हा कुठला प्रेग्राम असेल ब्वॉ ?
जन्मण्याआधीच लिंग, स्वभाव, रंग रुप निश्चित होणं
आणि हे सर्व
या अफाट ब्रह्मांडातल्या एका सूर्य नामक ता-याच्या
जीवसृष्टी असलेल्या एकांड्या ग्रहावर

या अशा प्रश्नांची उत्तर मिळेनाशी होतात, तेव्हां मग भीती वाटू लागते.
स्वतःच्या नास्तिक असण्याची

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक घागुझावा :धर्मावरून जितक्या लोकांनी जगाच्या इतिहासात जितक्या लोकांना प्राण गमवावे लागले, तितके अन्य कुठल्याही कारणाने गमवावे लागलेले नाहीत.

एक घागुझावा>>> म्हणजे काय ?

धर्मावरून जितक्या लोकांनी जगाच्या इतिहासात जितक्या लोकांना प्राण गमवावे लागले, तितके अन्य कुठल्याही कारणाने गमवावे लागलेले नाहीत.>>>>>> नाही. धर्म हे फक्त निमित्त आहे, खरे कारण आहे ते सत्ता/ संपत्ती/ वर्चस्व.

ब्र.आ.<< +१
धर्म हे फक्त निमित्त आहे<<< म्हणजे ते निमित्त तर आहे.तेच नसतं तर निमित्त काय काढलं असतं...म्हणजे धर्माला सबस्टिट्यूट होईल अस कोणतं दुसरं निमित्त आहे?

दुसरी कारणं असतील..पण आता समजा धर्म,आस्तिक-नास्तिक मुद्दे नसतेच तर आपण कशासाठी भांडणं केली असती? राज्य विस्तारासाठी? ती तर आताही करु शकतो. मग ,आर्थिक स्तर? तसे काही बलशाली कारण नव्हे हे.
सामाजीक पत्,अहंभाव्,न्यूनगंड-- हे कशातून आले.धर्मातून आणि शिक्षणातून.पहीला कट...शिक्षणातून आलेला न्यूनगंड किंवा अहंगंड...त्याने भांडणं..धूसफूस होईल्,राग-विलाप असेल्,पण युद्ध? नो वे... दुसरं काय जात आणि रेस...त्यात पहील्या मुदद्द्यात जात तर दुसर्‍यात कातडीचा रंग...कृष्णवर्णी आणि श्वेतवर्णी...प्रांतातले भौगोलिक वैविध्यामुळे आलेले रंग्,हे एकमेव कारण युद्धाला,कलहाला धर्मानंतर दुसरं मोठं निमित्त होतं.
चारी बाजूंनी पाहता,धर्म हाच युद्धाला कारण झाला.मुघल्,मराठा,हिंदू,मुस्लीम,ज्यूविश,आफ्रिकन मुस्लिम्,ख्रिस्त निदान हे आस्तिक धर्म होते म्हणूनच वाद उद्भवले.(ख्रिस्त त्यातल्या त्यात बरे)

असहमत.
युद्धाचे मूळ धर्मात नसुन मानवी प्रवृत्ती मधे आहे. जरी जगात धर्म नसला तरी युद्धे होत राहणारच. धर्म नाही तर अजून काही सही....

मुघल, सिकंदर भारतात हिंदूंशी लढायला आले नव्हते तर भारत जिंकायच्या उद्देशाने आले होते. सत्ता आणि पैशासाठी आले होते. सत्ता मिळाल्यावर मोगलांनी धर्मप्रसार चालू केला त्यातून पुढे वैमनस्य वाढली.
मोंगलांच्या जागी एखादा क्रुरकर्मा हिंदू राजा असता तरी महाराज त्यांच्या विरोधात लढले असतेच ना?

श्रध्दा कुठेतरी ठेवून त्यात तो आस्तिक गुंगुन जातो आणि काळजी ,चिँता दुसऱ्यावर टाकल्याने थोडा निवांतपणा मिळवतो याचा नास्तिकाला हेवा वाटत असावा ,अगदी ठाम नास्तिकाला तसे होत नसावे .

धर्म नाही तर अजून काही सही....<<< तेच तर विचारलं.त्याला त्या ताकदीचं सबस्टीट्यूट काय असेल?
धर्मानं युद्ध करायला बळ दिलं.धर्म प्रसार हेच मूळ कारण असावं,ते त्यांनी वेळ येताच वर आणलं.

सत्ता मिळाल्यावर मोगलांनी धर्मप्रसार चालू केला<<< म्हणजे इथेही धर्म मूळ.धर्मच या वैमनस्याला कारण ठरला. धर्माचं नसणं युद्धांना,कलहांना गंभीर रुप देऊन गेला हे तरी मान्य करायलाच हवं.

अर्थात धर्म नसते तर युद्ध झालीच नसती असं थोडीच आहे,हे जरी खरं असलं तरी,धर्म बुडाशी होता म्हणून जगण्याला आधार(?) मिळाला.त्यातून अहं.आणि त्यातून वरचढ ठरण्याची स्पर्धा.त्यातून प्रांत काबीज करण्याची वृत्ती.

ज्या कुणी रामायण - महाभारत लिहीलय त्यांनी धर्मामुळे ही युद्धं झाली असं नाही लिहीलय. म्हणजे धर्मामुळेच मोठी युद्धं होतील असा तेव्हा कदाचित कोणी विचार केला नसावा. पहिले - बहन के अपमान का बदला, दुसरे - भावकीत कंदाल.

अर्थात धर्म नसते तर युद्ध झालीच नसती असं थोडीच आहे,>>>>>>>>>>>

बास मज पामराचे ईतुकेच म्हणणे आहे. धन्यवाद

बास मज पामराचे ईतुकेच म्हणणे आहे. धन्यवाद<<< किती स्वच्छ हसू उमटवलत तुम्ही चेहर्‍यावर..धन्यवाद!
आम्ही युद्धाच्या इंटेन्सिटीबद्दल बोललो.नुसतं युद्ध होण्यासाठी तर अशी कित्ती कारणे आहेत.पण त्याची प्रखरता,धर्मामुळे अधिक आली असं म्हणणं आहे हो! Happy धर्म हे प्रमुख कारण आहे,प्रमुख युद्धे झाली त्याचे.
बघा बुवा!पटतंय का?

अतरंगी... तुमचा सध्याचा उपप्रश्न अवांतर असला तरी ...असो.
पण समजावून सांगणे अवघड दिसतेय. तुम्ही मंजो नसाल अशी आशा.

धर्म हे प्रमुख कारण आहे,प्रमुख युद्धे झाली त्याचे.
<<
दोन्ही महायुद्धांचे कारण साम्राज्य वाढवणे हे होते.

त्या पूर्वीच्या क्रूसेड्स, अन इतर महायुद्ध्/धर्मयुद्धांबद्दल बोलत असाल तर मान्य.

नाही मी इन ऑल सर्वच प्रमुख युद्धांबद्दल बोलतोय.पण अगदी दुसरं महायुद्ध घेतलं तर,ज्यूंवरुन या युद्धाचा भाग पेटतो.ज्युविश धर्म महत्वाचा आहे या युद्धात.पण कुठे ना कुठे धर्म्,आस्तिकत्व हे मानापमानाची भाषा,डंख बाहेर काढतच.

पण समजावून सांगणे अवघड दिसतेय. तुम्ही मंजो नसाल अशी आशा.>>>>>>>>
संदर्भासहीत स्पष्टिकरण....
माझा आठ वर्षापुर्वीचा id manyah, तो (पासवर्ड विसरल्याने) बंद पडला म्हणून, अभिजीत२५, आणि आता अतरंगी. याशिवाय माबो वर माझा कोणताही id नव्हता. अजून काही ????????

घाब्रू नका! प्रत्येक सजीव जन्मजात नास्तिकच असतो!
अगदी व्हायरस पासून सस्तन व्हेलमाशा पर्यंत!
भटुकड्य़ा-पादरी-मुल्लांनी फशी पाडलेल्या आयबापांनी
अंधश्रद्धेचं जोखड नकळत्या वय़ातच गळ्यात-लंगोटीत अडकवलेलं असतं.
आपण मनाचं कवाड सताड उघडून 'स्वभावे, स्वस्थानी, 'स्वगृही' परत' आला आहात,
हे थोड्यांनाच साधतं. अभिनन्दन!
=
Now enjoy your 'GEMS LIFE' without having to carry any burden of blind-faith!
GEMS Life = God-free Eco-friendly Moral-ethical & Self-reliant Life, interesting, fun & exciting!
Happy

स्वत:च अस्तित्व नाकारन म्ह्न्जे नास्तिक आणि ते स्वीकारण म्ह्न्जे आस्तिक.
आधी "स्व" चा शोध घ्या.
त्या शिवाय "ईश्वर" काय हे कस कळणार ?

स्वतःच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या जीवावर बेतले किंवा तत्सम महत्वाच्या क्षणी ईश्वराची आठवण होते का? ईश्वर सर्व ठीक करेल असे मनापासून वाटते की नाही यावर तुमची आस्तिकता नास्तिकता ठरते.>> +११११
आख्या आयुष्यात नास्तिकांना देव आठवत नाही पण अश्या संकटाच्या वेळी मात्र बरोबर आठवतो . तो खरा नास्तिक नसतो .
तुम्ही आस्तिक असा नाहीतर नास्तिक . इतरांना काय फरक पडतो ? तुम्हालाच फरक पडणार आहे

>>तुम्ही आस्तिक असा नाहीतर नास्तिक . इतरांना काय फरक पडतो ? तुम्हालाच फरक पडणार आहे<<
येस्स देअर यु आर. माझ्या मते अस्तिक व नास्तिक असे काही वॉटर टाईट कंपार्टमेंट नसते. त्या मनाच्या अवस्था आहेत. इश्वर या स्ंकल्पनेतील कुठली संकल्पना तुम्हाला अभिप्रेत आहे यावर बरच काही अवलंबून आहे. निर्गुण निराकार, सगुण साकार, भक्तवत्सल करुणाघन कोणते इश्वराचे रुप अभिप्रेत आहे?

Pages