निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा नवीन धागा सुंदर सुरवात सर्वांचे प्रचि सुंदर , क्रुष्णकमळ, तेरडा, चेरी मस्तच
भाताची हिरवी शेत गाव जाने का मन करताहे Happy

are vah 21st bhagabaddal abhinandan

windows 8 chya aagaaupanala kantalle aahe

marathit type nahi yete karta

manimohor goad aahe manogat... Happy

नि.ग. चा प्रत्येक नवा भाग म्हणजे घरातले शुभकार्यच वाटते आता ! गेले तीन दिवस भरपूर भटकतोय. समुद्रकिनारे, बीचेस, धबधबे, सरोवर, देवळं... नुसते जीवाचे मॉरिशियस करून झाले. उद्या दुबईला, परवा मुंबईत, आणखी दोन दिवसांनी दुबईत, मग चार दिवसांनी परत मुंबईत मग दोन दिवसांनी... स्वगृही म्हणजे अंगोलात... तिथे गेल्यावरच फोटोंचा रतीब सुरु होईल.

तरी.. १८ / १९ ला भेटायचे आहेच आपल्याला.

नि गचा नवीन हिरवागार भाग २१ - सुंदर मनोगत, सुरेख फोटोज ...

बाकीचे फोटोही मस्तच .....

सर्व नि गकर पावसामुळे नक्कीच सुखावले असणार ....

मनीमोहोर, मनोगत आणि प्रची दोन्ही मस्तच. नि. ग. वरचे लोक बरेच प्रतिभावान आहेत.खरच.

नलिनी, तेरडा मस्तच ग.

मी पण दिनेशदांना दादर च्या ऐवजी वाशी ला च भेटू का? सगळ्यांनाच भेटता ये ईल.

चेरी संपली :फिदी:, मागच्या भागात नितीनने सगळ्यांसाठी ५-५ किलो सफरचंद आणायला सांगितलेले, पण सफरचंद ना कच्ची ना पिकलेली अशी पौंगडावस्थेत होती, म्हणुन आणली नाही Proud सो सध्या सफरचंदचा फक्त फोटोच बघा. Wink

मी पण दिनेशदांना दादर च्या ऐवजी वाशी ला च भेटू का? सगळ्यांनाच भेटता ये ईल.>>>>हो सामी, वाशीलाच भेटुया. रच्याकने मोगर्‍याच्या फांद्या कुणा कुणाला पाहिजे आहे? येताना आणेन.

सुप्रभात

जिप्स्या मी तुला आज फोन करणारच होते मोगर्‍याची फांदी आणायची आठवण करायला. माझ्यासाठी पण आण.
वरचे अ‍ॅप्पलचे फोटो अप्रतिम आहेत रे. मी गेले होते तेंव्हा फक्त फुले लागली होती.

सामी अरे वा बर झाल म्हणजे तुझीही भेट होईल. वेळ ३-५ आहे. ठिकाण बहुतेक सेंटर वन साधना नक्की सांगेलच.

म्हणजे आता
१) दिनेशदा
२) साधना
३) जिप्सी
४) जागू
५) उजू
६) पलक
७) साती
८) कामिनी

इतकी जण फिक्स आहोत ना? अजून कोण येणार आहे?

रच्याकने मोगर्‍याच्या फांद्या कुणा कुणाला पाहिजे आहे? येताना आणेन.

फांद्याबिंद्या नकोत.. मला थेट गजराच पाहिजे......

माझ्याकडे चार मोगरे झाले बघता बघता.. त्यातला एक वेल मोगरा आहे, जो गेल्या महिन्यात आंबोलीतुन आणला. ज्यांच्याकडुन आणला त्यांच्याकडे वेलीवर पाने दिसतच नव्हती इतका बहरलेला. इथे मुंबईत बघुया काय दिवे लावतोय. चार फांद्या आणलेल्या त्यातली एक जगली. एक माझा खुप जुना १० वर्षआंचा मोगरा ज्याची फुले फेसबुकात मिरवुन झाली. एक मद्रास मोगरा म्हणुन आणलाय, ज्याला कळ्या येतात आणि काहींची फुले होतात तर काही तश्याच गळतात. आणि अजुन एक जो देणा-याने मदनबाण म्हणुन सांगितलेला, पाहताच हा मदनबाण नाही हे मी ओळखलेले, पण तोपर्यंत मला मदनबाधा होऊन मी त्याच्या प्रेमातही पडलेले, म्हणुन मग घेतला झाले.... काय करणार.. नर्सरी दिसली की पाय आत ओढतात आणि एकदा आत गेले की फुले हात ओढतात, आम्हाला उचल म्हणुन...

उजुने २ वाजता भेटले तर चालेल का विचारलेय. जागा फिक्स झाली का? सेंटरवनचे फुडकोर्ट. सामी तु वाशीलाच ये. चिबी करुया. Happy

हो ग जागू मला पण तुम्हा सगळ्यांना भेटायचे आहे
आपण ३-५ पेक्षा लंच साठी भेटूया का? इनऑर्बिट मधे पंचवटी मधे जाता येईल किंवा रघूलीला व्हिलेज

जिप्स्या, तुझे 'उरलासुरला आसमंत' आहे रे माझ्याकडे. Happy ते मी आणते. अजुन काही असेल तर आण. तुला काही हवे असेल तर सांग.. माझ्याकडे नवेबांधपुर का गड तिथले पुस्तक आहे चितमपल्लींचे. अजुन बरेच काही आहे, अगदी अखंड भारत का नाकारला पर्यंत. अजुन मी अखंड वाचले नाहीय, पण खुप सुरेख इतिहास कळतो त्यातुन.

जागु, तु डॅफोडिल्स कुठुन आणले??? आता तुझ्याकडे आहेत असे बोलु नकोस.. मी त्यांच्या प्रेमात आहे आणि ते फक्त थंड हवेतच होतात अशी मी स्वतःची समजुन घातलीय.

सायली, सगळ्या निगकरांना घेऊन गावची/ कोकणची ट्रिप नक्की काढुया. कोणत्याही मोसमात गेल तरी अप्रतिमच वाटत. ++++ खरच असा योग कधी येईल....

दिनेश दा... छान, कीत्ती फीरत आहात ...
जिप्सी सफरचंद अप्रतिम...
जाग डाफोडील्स तुझ्या कडचे आहेत का? खुप गोड...

मंजु ताई, काल तुमच्याशी भेटुन खुप बर वाटल. म्यांगो मुस ची चव अजुन जीभेवर आहे Happy
अप्रतिम केला होता.. पा. क्रू. शेयर करा..

प्लीझ लवकर कळवा लोक हो म्हणजे निग वर खादाडीच्या गप्पा थांबवता येतील, या पुढच्या गटग च्या गप्पा नवी मुंबई धाग्यावर करू. http://www.maayboli.com/node/1688

सगळ्यांना तो सफरचंदाचाच फोटो आवडलाय Sad माझा तो भरारी घेणारा फोटो कुण्णालाच आवडलेला दिसत नाही. :भोकाड पसरणारा बाहुला: Proud

साधना, चितमपल्लींची पुस्तके आण Happy

माझा तो भरारी घेणारा फोटो कुण्णालाच आवडलेला दिसत नाही. :भोकाड पसरणारा बाहुला:

आम्ही जळतोय आणि तु भरा-या घे...................

Pages