Submitted by समीर चव्हाण on 16 July, 2014 - 00:47
हे पान हलेनासे का झाले आहे
हे गूढ कळेनासे का झाले आहे
फारा दिवसांनी रस्त्यावर हा आलो
संदर्भ मिळेनासे का झाले आहे
डोळ्यांत तुझ्याही इच्छा धूसर धूसर
काहीच दिसेनासे का झाले आहे
प्रेमात निखरले एके प्रतिमेचेपण
हे रंग विटेनासे का झाले आहे
हे वाट असे बघणे आशेवर कोण्या
हे पाय निघेनासे का झाले आहे
सांजेस विरागी पाचोळा होताना
आयुष्य ढळेनासे का झाले आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मतला आणि शेवटचा शेर
मतला आणि शेवटचा शेर उत्तम!
एके ह्या शब्दाचा अर्थ लागला नाही.
एके प्रतिमेचा ही एक फ्रेज
एके प्रतिमेचा ही एक फ्रेज आहे.
एके प्रतिमेचा म्हणजे of one mould
धन्यवाद.
घर माझे, वावर माझा, पाउल
घर माझे, वावर माझा, पाउल माझे.....
अस्तित्व जुळेनासे का झाले आहे?
घर माझे, वावर माझा, पाउल
घर माझे, वावर माझा, पाउल माझे.....
अस्तित्व जुळेनासे का झाले आहे?
वृत्त चुकले आहे. गा गा ल ल गा गा गा गा गा गा गा गा
असे हवेय. आपली स्वतःची जमीन कसण्यातली गंमत वेगळी.
मात्रावृत्तातला शेर होता मी
मात्रावृत्तातला शेर होता मी दिलेला
८+८+६=२२मात्रा
समजाती-पद्मावर्तनी-शुभगंगा-मात्रावृत्त!
शेराच्या बहिरंगावरचे प्रेम रमणीय आहे!
'जमिन' सोन्याची परंतू हात कसणारे करंटे....
पीक शेरांचेच त्यांच्या केवढे बदचाल होते!
प्राचार्य सतीश देवपूरकर
प्रोफेसर, रसिकांनी साधारण
प्रोफेसर,
रसिकांनी साधारण आस्वाद घेतल्यानंतर एखाद्या गझलेचे मातेरं करायला आपण अवतरत जा अशी सद्भावनापूर्वक नम्र विनंती.
पोतेरे/मातेरे याची तुझी
पोतेरे/मातेरे याची तुझी व्याख्या वेगळी आहे!
मातीचे काय मातेरे करणार अजून?
मात्रावृत्तातला शेर होता मी
मात्रावृत्तातला शेर होता मी दिलेला
माझ्या गझलेशी त्याचा काय संबंध ?
जमीन न समजता घाईघाईत लिहिले गेले हे स्पष्ट आहे.
८+८+६=२० ? आपण Z_2 मध्ये काम करता का ? (गंमतीत घ्यावे).
आपल्यात जराही originality नाही हे हृदयद्रावक आहे.
शेवटच्या शेराबद्दल आपल्याशी सहमत.
दुस-यांच्या जमीनीत तिस-याची शेरांची बदचाल पीके पाहून खरंच खिन्न व्हायला होतं.
त्यातल्या त्यात स्वतःच्या जमीनीतली बदचाल पीके माफ करण्याजोगी.
समीर, त्यांचे वय झालेले आहे
समीर, त्यांचे वय झालेले आहे तेव्हां लेट हिम कंटीन्यू!
कुणी कसा प्रतिसाद द्यायचा
कुणी कसा प्रतिसाद द्यायचा याला इथे काय नियम आहे?
शायर रसिकांना सांगतो आहे कसा प्रतिसाद द्यावा?
गझल-प्रतिसाद यांचे नाते तुला समजेल माझी कोणतीही गझल उघड!
तुझे हृदय फारच केविलवाणे दिसते आहे जे नसत्या गोष्टीने द्रवते आहे
चालच ज्याला नाही तो काय
चालच ज्याला नाही तो काय बदचालीची भाषा करणार?
प्रतिसाद कसा द्यावा ह्यावर मी
प्रतिसाद कसा द्यावा ह्यावर मी काही बोललो नाही. खोटे बोलू नये.
तो गझलेशी संबधित हवा इतकीच अपेक्षा. अन्यथा त्याला प्रतिसाद म्हणणे चूक ठरावे.
नसत्या गोष्टीने कसे प्रोफेसरसाहेब, originality नाही म्हणून तर द्रवते आहे ना.
चालच ज्याला नाही तो काय बदचालीची भाषा करणार?
नाही नाही असे नाही प्रोफेसरसाहेब.
उलट ज्याला चाल नाही तोच बदचालीची भाषा करतोय. पाहिलं नाही आपण ?
सांजेस विरागी पाचोळा
सांजेस विरागी पाचोळा होताना
आयुष्य ढळेनासे का झाले आहे<<< व्वा व्वा
फारा दिवसांनी रस्त्यावर हा आलो
संदर्भ मिळेनासे का झाले आहे<<< सुरेख
एकुणच गझल आवडली.
शेराच्या बहिरंगावरचे प्रेम
शेराच्या बहिरंगावरचे प्रेम रमणीय आहे!<<<![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आपल्यात जराही originality नाही हे हृदयद्रावक आहे.<<<![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
छान आहे आवडली
छान आहे
आवडली
मात्रावृत्तातला शेर होता मी
मात्रावृत्तातला शेर होता मी दिलेला
माझ्या गझलेशी त्याचा काय संबंध ?<<<![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
शाबासकी दिखाऊ, अन् बेगडी
शाबासकी दिखाऊ, अन् बेगडी प्रशंसा...
मज कीव येत आहे दांभीक वाहवांची!
हे कोणाला उद्देशून आहे
हे कोणाला उद्देशून आहे प्रोफेसर साहेब? मी तरी ह्या गझलेची खोटी प्रशंसा नाही केलेली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जे करतात त्यांच्यापर्यंत शेर
जे करतात त्यांच्यापर्यंत शेर पोचेल!
जे करतात त्यांच्यापर्यंत शेर
जे करतात त्यांच्यापर्यंत शेर पोचेल!
अगदी अगदी. पण माझ्या गझलेशी ह्या शेराचा संबंध काय ?
आम्ही आपलं घोडं मारलं असेल तर कळवाल.
आम्ही आपलं घोडं मारलं असेल तर
आम्ही आपलं घोडं मारलं असेल तर कळवा.<<<![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
समीर, तूही नकळत स्वतःला आम्ही म्हणू लागलास बघ! हाच प्रोफेसर साहेबांचा प्रभाव असावा
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
समीर, तूही नकळत स्वतःला आम्ही
समीर, तूही नकळत स्वतःला आम्ही म्हणू लागलास बघ! हाच प्रोफेसर साहेबांचा प्रभाव असावा
हा हा. प्रभाव प्रतिसादांपुरता पुरे आहे. गझलेपर्यंत नको यायला!
८+८+६=२०>> कोणीतरी हे गणित
८+८+६=२०>>![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
कोणीतरी हे गणित समजवा प्लिजच..
रच्याकने कोडं असेल तर, काय्बी नाय कळलं
८+८+६=२०<<< त्यात काय
८+८+६=२०<<<
त्यात काय समजवायचंय राव?
आठ अधिक आठ सोळा आणि सोळा अधिक सहा बावीस बरोबर वीस!
हे वाट असे बघणे आशेवर
हे वाट असे बघणे आशेवर कोण्या
हे पाय निघेनासे का झाले आहे--मस्त
सांजेस विरागी पाचोळा होताना
आयुष्य ढळेनासे का झाले आहे--वा वा!
आवडले !
खुप सुन्दर आशय आहे...मस्त गझल!
--- अहो प्रोफ spd
आम्हाला जरा गझल समजुन तरी घेऊ दे... तुमचे युद्ध जरासे पुढे ढकलता काय?
सांजेस विरागी पाचोळा
सांजेस विरागी पाचोळा होताना
आयुष्य ढळेनासे का झाले आहे
फारा दिवसांनी रस्त्यावर हा आलो
संदर्भ मिळेनासे का झाले आहे
गझल आवडली.
८+८+६=२०.........चूक ८+८+६=२२
८+८+६=२०.........चूक
८+८+६=२२..........बरोबर
बरोबर ओळखलेस समीर आता गणिताचा प्राध्यापक शोभतोस! गदगदले माझे हृदय तुझा गणितीय तल्लखपणा पाहून!
--- अहो प्रोफ spd आम्हाला जरा
--- अहो प्रोफ spd
आम्हाला जरा गझल समजुन तरी घेऊ दे.<<<<<<<<<<
समजून घ्यावी लागते ती गझल का?
अजब व्याख्या आहे बुवा गझलेची
आणि जी वाचल्या वाचल्या समजते ती काय? अगझल?
बरोबर ओळखलेस समीर आता गणिताचा
बरोबर ओळखलेस समीर आता गणिताचा प्राध्यापक शोभतोस! गदगदले माझे हृदय तुझा गणितीय तल्लखपणा पाहून!<<<
ते अग्निपंखने ओळखलेले आहे, समीरने अजून ते ओळखलेच नाही आहे.
पण माझ्या गझलेशी ह्या शेराचा
पण माझ्या गझलेशी ह्या शेराचा संबंध काय ?<<<<<<<<<<
शायराच्या गझलेशी प्रतिसाद संबंधीत असावा लागतो का?
हे नवीनच ऐकतोय मी!
फुटकळ/चिल्लर/अगझलीय/छचोर/चावडीखोर असाहित्यिक गप्पात्मक प्रतिसादच तर पहात आलो आहे मी फक्त आणि फक्त येथे! (या संकेतस्थळावर)
Pages