निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!

नि. गप्पांचे धागे धावताय जोरात! जागुतै नि इतर अभिनंदन..
मी कधीमधे येवुन इथलं वाचुन जाते .. फोटो बघायला पण येते .. बरीच नवीन माहिती देता तुम्ही लोकं.. Happy
कधी एकदा माझी बाग करता येईल असं वाटतं.. पण सध्या तरी नो चान्स Sad

नलिनी .. मस्त आहेत फोटो!

२१व्या भागाबद्दल सगळ्यांचे (माझ्यासहित Wink ) अभिनंदन!!!!

हेमाताई, फोटो आणि प्रस्तावना झक्कास. ;-). नलिनी दोन्ही फोटो खासच Happy

हि घ्या सांगला गावातील ताजी ताजी चेरी Happy

जागु, मस्तच गं..मनीने मस्त मनोगत लिहिलंय..

जिप्स्या, तुला मात्र कट्टी फुssssssssss.. अशी झाडावरची चेरी दाखवुन जळवतोयस होय...

(रच्याकने, सांगला म्हणजे सांगली वाटले, मग सांगलीत चेरी बघुन अचंबित झाले, मग जिप्स्याचे नाव वाचले आणि मग..... )

मनीमोहोर,मनोगत आवडले.
जागू ,नवीन भागाचे स्वागत.
नलिनी, तेरड्याचे रंग सुरेख.
जिप्सी,ताजी ताजी चेरी खासच.

(रच्याकने, सांगला म्हणजे सांगली वाटले, मग सांगलीत चेरी बघुन अचंबित झाले, मग जिप्स्याचे नाव वाचले आणि मग..... )>>>>>>>>
साधना + १००

मानुषी, साधना, सरिवा मनापासून धन्यवाद सगळ्याना.
जिप्सी, धन्यवाद. पण तुमच्यापुढे आमची फोटोग्राफी म्हणजे दिव्यापुढे काजव्याने चमकण्यासारखे आहे. Happy Happy Happy चेरीचा फोटो सुंदर. अशा घडानी लागतात होय? प्रथमच बघतेय झाडावरच्या चेरी.
नलिनी, पहिला फोटो आहे ना त्याला आम्ही डबल तेरडा म्हणतो. गुलाबासारखच दिसत ते फुल. फोटो मस्त आलाय.
शोभा १२३, ब्रम्ह्कमळ सुंदर.
रच्याकने, वरचा जो फोटो आहे ना तो आमच्या कोकणातल्या भातशेतीचा आहे. ह्या दिवसात शेती बघायला इतक सुंदर वाटत ना! पण दरवर्षी जाण शक्य नसत म्हणून फोटोवर समाधान मानायच.

हा आहे पावसाळ्यात गावाला जाताना काढलेला ( गोवा हायवे)

From mayboli

हा नुकतीच लावणी झालेला

From mayboli

आणि हा पिक वाढलेला

From mayboli

आमच्या भागात सपाटी कमी असल्याने डोंगर उतारावर अशी पायर्‍यांची शेती पहायला मिळते.

From mayboli

२१ व्या भागाबद्दल सगळ्यांचेच अभिनंदन! Happy

जागु + मनिमोहोर अभिनंदन, हेमा ताई कीती छान मनोगत लिहिलयत, अगदी अस वाटतय की
तुम्ही समोर बसुनच बोलताय... खरच ...आणि फोटो बघुन तर खुप प्रसन्न वाटतय....

नलिनी, तोरडा खुपच गोड.. त्याला इकडे तिवडी म्हणतात..
जिप्सी मला वाटलं की सफरचंद इतके छोटे कसे काय? मग नीट वाचल्यावर कळल चेरी आहेत म्हणुन Proud :-

हेमा ताई.... काय फोटोज आहेत, आत्ता या क्षणी कोकणात पळुन जावेसे वाटते आहे ....

शोभा ताई ब्रम्हकमळ सुरेखच...

जागु ताई , मनापासून धन्यवाद

ताजी ताजी चेरी पाहुन तोंडाला पाणी आले, मस्तच...

मायबोलीतले नंदनवन जर कुठे असेल तर नि. ग.च्या धाग्यावर. तर या ह्या नंदनवनात नी घ्या अभिनंदन Happy

(रच्याकने, सांगला म्हणजे सांगली वाटले, मग सांगलीत चेरी बघुन अचंबित झाले, मग जिप्स्याचे नाव वाचले आणि मग..... )>>> हे हे मी आधीच जिप्सी असे वाचुन मग पुढे सुरुवात केली सो सांगला वाचले. (हुश्शार किनैमी) Wink

तर अशी चुक न केल्याबद्दल, मला जिप्सी त्यातल्या थोड्या चेरी देणार आहे. होन्न्न्ना रे.

तर अशी चुक न केल्याबद्दल, मला जिप्सी त्यातल्या थोड्या चेरी देणार आहे. होन्न्न्ना रे.
>>>

19 taarakhelaa yeteyas ka mag??? amhalahi milatil tujhyasobat

मनीमोहोर खरच खुप सुंदर मनोगत लिहील आहेस. धन्यवाद.

नलिनी तुझा तेरडा पाहून आठवण झाली माझ्याकडे तेरड्याचे बी आहे ते पेरायचे आहे. आज संध्याकाळी पेरते .

जिप्स्या १९ ला चेरी सकट दुसरा काय खाऊ आणला असशील तो घेऊन ये.

जाई लिंक साठी धन्यवाद.

आता ही माझी नाही तर नानांची रिक्षा.
http://www.maayboli.com/node/49950

अगदी शेवटच्या दिवशी लिहील्याने मला लेखाची मांडणी तशी निट करता आली नाहिये. पण गोड मानून वाचा. माझा लेख म्हणून नका वाचा तर ज्या व्यक्तीवर लिहीलय त्याचे व्यक्तीचित्रण वाचा.

19 taarakhelaa yeteyas ka mag??? amhalahi milatil tujhyasobat>>> सॉरी. Sad
त्या दिवशी मी डोंबिवलीला जाणारे. ते टाळले तर आईकडुन ओरडा नाही फटके मिळतील.
माझे वाशीतले गटग मिस होणारे. मज्जा करा.
जिप्सी चेरी आणेलच नी बाकिचा खाऊ पण. माझ्यावाटचा ऐशुसाठी, श्रावणीसाठी, राधासाठी न्या.

जिप्सी सम्पर्कातू न मेल केलीय तुला पाहिलीस का?>>>>हो मानुषीताई, ईमेल पाहिलाय, पण रीप्लाय करता येत नाहीए सध्या. Sad १० दिवस सुट्टीवर असल्याने मेलबॉक्स ओसंडुन वाहतोय. Sad १-२ दिवसात रीप्लाय करतो किंवा संपर्कातुन उद्या री करतो. चालेल?

मायबोलीतले नंदनवन जर कुठे असेल तर नि. ग.च्या धाग्यावर. तर या ह्या नंदनवनात नी घ्या अभिनंदन स्मित >> मोनालिप, +++ १ खूप आवडल.

सायली, मोनालिप, जागू आणि अंजू मनापासुन धन्यवाद.

सायली, सगळ्या निगकरांना घेऊन गावची/ कोकणची ट्रिप नक्की काढुया. कोणत्याही मोसमात गेल तरी अप्रतिमच वाटत.

Pages