Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13
गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.
सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.
--डॉ.कैलास गायकवाड.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या शेरातिल सुचवणीमुळे जमिन
या शेरातिल सुचवणीमुळे जमिन सुलभ करुन दिल्याबद्दल आपली ऋणी आहे बेफिजी .
-सुप्रिया
विदिपा, समीरजी, जयदिप शेर
विदिपा, समीरजी, जयदिप शेर आवडले.
-धन्यवाद !
वादळे भटकून दमली माग माझा
वादळे भटकून दमली माग माझा शोधताना
शान्त होतो झोपलेलो खोपटाच्या वळचणीला...
विद्ध झालो, क्लान्त झालो, दगदगीने कष्ट झाले,
सांगुनी असलेच काही रंग भरती मैफलीला..
गुळमटूनी तोंड नुसते तेच ते जगणे अताशा,
झणझणावी एक मिरची पालटाया या चवीला..
- स्वामीजी
कालचेच वेचतो अजून
कालचेच वेचतो अजून चांदणे!
आणतेस एवढे कुठून चांदणे?
का न व्हायची हरेक रात्र पौर्णिमा?
काळजात ठेवले जपून चांदणे!
.......प्रा.सतीश देवपूरकर
*******************************************
दुरावा, राग, चिडखोरी खुबीने टाळता येते!
न हस्तांदोलने केली तरीही हासता येते!!
प्रथम भेटीमधे व्यक्ती जराशी चाळता येते!
घरोबा जाहल्यावरती, चवीने वाचता येते!!
.............प्रोफेसर
*************************************************
ही तीच गे कोजागिरी....
तू आणि मी जागायचे!
ये बिलग पण, ऐसे बिलग....
आलिंगनी हरवायचे!
...........प्रोफेसर
ती जशी होती तशी आहे तलम आजही
ती जशी होती तशी आहे तलम
आजही ताजीच आहे ती जखम
जयदीप
' करीन मीही स्तुती तुझी रे
'
करीन मीही स्तुती तुझी रे कौतुक कर तूही माझे
अशीच आहे प्रथा इथे रे ना जमणे तुजशी माझे ..
.
हल्ली कुशीत माझ्या निजतात
हल्ली कुशीत माझ्या निजतात शब्द माझे
यावर लिहित होतो.
एक शेर सुचला.
शृन्गार दो घडीचा वेड्या मनास उमगे
पण मोगर्यास बघता चळतात शब्द माझे
दुसर्याच्या ओळी ढापुन लिहिले
दुसर्याच्या ओळी ढापुन लिहिले तर गल्ला मेहेरबान झाला तरी अल्ला मेहेरबान व्हायला स्वतःचीच प्रतिभा लागते.
-- गुरुवर्य बेफिकिर 'अल्ला मेहेरबान ' या आयडीला बोलले होते.
संपादित....
संपादित....
सगळे कसे अताशा, छान चालले
सगळे कसे अताशा, छान चालले होते
जखमांना काळाचे, मलम लावले होते
-अशोक
आहे जागा जखमांना, हृदयावर अजून थोडी
ये परजून शस्त्रे सारी, माझ्यावर अजून थोडी
-अशोक
. आरसाही आज हसला बघुन माझा
.
आरसाही आज हसला बघुन माझा मुखवटा
साजरा करण्यास गेलो एक खोटा दुखवटा
.
एक काहीसा नवा शेरः अपुली गती
एक काहीसा नवा शेरः
अपुली गती रहावी अपुलीच पाह इतके
दुनियेस सोडुनी दे, दुनिया खिशात थोडी
समीर चव्हाण
ह्या भुकेल्या श्वापदांचे
ह्या भुकेल्या श्वापदांचे चोचले पुरवायला
दु:ख आनंदात भरुनी ठेव तू मुरवायला
-'बेफिकीर'!
नवे शेर घाईत ह्या पोचायच्या
नवे शेर
घाईत ह्या पोचायच्या पाऊस आला नेमका
येथेच आहे घर चला छत्री नको उघडायला
करपाडीला(*) दारीद्र्याचा बक्कळ पाउस पडतो बहुधा
छोटी छोटी किती खोपटी उगवतात दररोज नव्याने
करपाडी - डोंगराचा उतरत जाणारा भाग(गावाकडच्या बोली भाषेतील शब्द)
-विजय दिनकर पाटील
करपाडीला दारीद्र्याचा बक्कळ
करपाडीला दारीद्र्याचा बक्कळ पाउस पडतो बहुधा
छोटी छोटी किती खोपटी उगवतात दररोज नव्याने
व्वा.
दारिद्र्याचा असा शब्द असावा.
छत्रीचा शेरही उत्तम.
करपाडीला दारीद्र्याचा बक्कळ
करपाडीला दारीद्र्याचा बक्कळ पाउस पडतो बहुधा
छोटी छोटी किती खोपटी उगवतात दररोज नव्याने<<< मस्त
एक काहीसा नवा शेरः सवयीने मी
एक काहीसा नवा शेरः
सवयीने मी विचारले पण बरे वाटले
बरे वाटले तुझे बरे चालले पाहुनी
मस्त
मस्त
* वाचायचेच असेल तर डोळेच वाच
*
वाचायचेच असेल तर डोळेच वाच माझे
अर्थांपेक्षा अनर्थ जास्त होतात शब्दांचे
--- अरविंद
* शिकवावा लागत नाही,असावा
*
शिकवावा लागत नाही,असावा लागतो तो
प्रामाणिकपणात नसते कुठली टक्केवारी
--- अरविंद
अरविंदजी: शिकवावा लागत
अरविंदजी:
शिकवावा लागत नाही,असावा लागतो तो
प्रामाणिकपणात नसते कुठली टक्केवारी
अगदी खरे.
पहिला शेर वाचताना लयीत अडखळायला झाले.
पुन्हा एकदा धागा वाचत
पुन्हा एकदा धागा वाचत आहे.
पाट्या टाकत ये जा करतो कायम एकच रस्त्याने
पूर्वी पायी आता गाडी हेच काय ते न्यारेपण
विजय, जबरदस्त शेर आहे.
चव प्रत्ययांची समजते अन्
चव प्रत्ययांची समजते अन् भावतेही....
पेल्यास हृदयाच्या सतत विसळून घ्यावे!
------प्रा.सतीश देवपूरकर
अरविंदजी दोन्ही शेर आवडले
अरविंदजी दोन्ही शेर आवडले
एक नवा शेर तृष्णेच्या सागरास
एक नवा शेर
तृष्णेच्या सागरास असतो कधी किनारा
आणि कधी खा-या पाण्याने तहान शमते
समीर चव्हाण
कसली तृष्णा, ओढ कशाची मला
कसली तृष्णा, ओढ कशाची मला लागली आहे?
आयुष्याची नदी कोरडी कुठे चालली आहे?
धन्यवाद समीर
धन्यवाद समीर
एक जुना शेर कटवतो कसाबसा दिवस
एक जुना शेर
कटवतो कसाबसा दिवस मी माश्यांना मारत
माश्याही फिरकून पहाण्याश्या झाल्या आहे
समीर चव्हाण
माश्याही फिरकून पहाण्याश्या
माश्याही फिरकून पहाण्याश्या झाल्या आहे<<<<< ????????
ओरीजनॅलिटीच्या नावाखाली मराठी भाषेची बोंब होत आहे काय हे तपासावे प्लीज !!!!!!!
कसाबसा मी दिवस कटवतो
कसाबसा मी दिवस कटवतो माश्यांना मारत
माश्याही फिरकून पाहिनाश्या झाल्यात अता
.......असे करता येते . बघा पटले तर !
Pages