Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13
गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.
सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.
--डॉ.कैलास गायकवाड.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद समीर
धन्यवाद समीर
कशाहीमुळे का असेनात पण बरे
कशाहीमुळे का असेनात पण
बरे वाटले की बरे वाटते
-'बेफिकीर'!
व्वा. छान शेर आहे, भूषण.
व्वा. छान शेर आहे, भूषण.
म्हाता-याचा अंत्यविधी थोड्या
म्हाता-याचा अंत्यविधी थोड्या वेळाने उरकू
एक बारसे आहे तेथे पंगत झोडुन येतो
-'कणखर'
वा, टिपीकल कणखर शेर!
वा, टिपीकल कणखर शेर!
वा भूषणजी आणि कणखरजी.....
वा भूषणजी आणि कणखरजी..... उत्तम शेर.
टिपीकल कणखर शेर!<< + १
टिपीकल कणखर शेर!<< + १
बेफिजी, विदिपा जबरी शेर !
बेफिजी, विदिपा जबरी शेर !
जगाशी जगासारखे वागणे जगाला
जगाशी जगासारखे वागणे
जगाला जगावेगळे वाटते
-'बेफिकीर'!
१००
१००
बेफीजी...क्या बात हे... खूप
बेफीजी...क्या बात हे...
खूप खूप आवडले सगळे शेर...
समीरजी...विजयजी... वैभवजी...
धन्यवाद
एकलव्य मी गुरू न येथे कोणी
एकलव्य मी गुरू न येथे कोणी मजला
तरी अंगठा मागायाला द्रोण हजारो
प्रशांत...
नियम पाळायला सांगू नका, जमणार
नियम पाळायला सांगू नका, जमणार नाही
गळे काढायला सोकावला विद्रोह माझा
- सदानंद बेंद्रे
वा वा फार छान शेर प्रशांत
वा वा फार छान शेर प्रशांत आणि सदानंद यांचे.
मनात माझ्या तिचे जरासे विचार
मनात माझ्या तिचे जरासे विचार तरळुन गेले
पारिजातकाजवळ उभा मी झाडहि हुरळुन गेले
वा विदेशजी !!... खूप दिवसांनी
वा विदेशजी !!... खूप दिवसांनी आणि तोही इतका मंद हळुवार दरवळणारा शेर घेवून
व्वा !!
धन्यवाद ...
____________
झाडहि हुरळुन गेले <<<हि आणि हु मुळे निर्माण होणारा नादरस हवासा वाटल्याने आपण असे केले असावेत बहुधा पण सोपे पर्याय अनेक सापडले असते तुम्हाला जसे....>>> झाड दरवळुन गेले <<< वगैरे ...
असो
सहज मनात आले ते बोलून दाखवले इतकेच
न पटल्यास क्षमस्व
असो !
धन्यवाद वैभव ! सुचले ते
धन्यवाद वैभव !
सुचले ते लिहिले, मुद्दाम प्रयत्न केला नाही .
आहे इथे कुणाला ती हौस
आहे इथे कुणाला ती हौस अत्तराची
कचऱ्यातल्या सुगंधी घाणीत जीव रमतो
कचरा आवडला विदेशजी
कचरा आवडला विदेशजी
मोकळा होऊनही उडणार नाही या
मोकळा होऊनही उडणार नाही
या खगाला पिंजर्याची सवय आहे
जयदीप
वा जयदीपजी चंगला शेर
वा जयदीपजी चंगला शेर
कुणाची नजर लागली या घराला घडे
कुणाची नजर लागली या घराला
घडे का असे जे नको ते मनाला
काटे सगळे अवतीभवती माझी
काटे सगळे अवतीभवती माझी त्यांची ओळख झाली
बागेमधली पुष्पे बघता नजरेलाही टोचत गेली
जगाशी जगासारखे वागणे जगाला
जगाशी जगासारखे वागणे
जगाला जगावेगळे वाटते
खूप सुंदर शेर भूषण जी
हिवाळा,उन्हाळा पुन्हा
हिवाळा,उन्हाळा पुन्हा पावसाळा
मनाचा ऋतू याहुनीही निराळा
-सुप्रिया.
ठेवुनी गेलीस गुपचुप तू सुगंधी
ठेवुनी गेलीस गुपचुप तू सुगंधी ही फुले
सांगुया साऱ्या जगाला वाटले वाऱ्यास का
काय काय मिळते या ठेल्यावरती
काय काय मिळते या ठेल्यावरती बघ ना
भेळ, कचोरी, रगडा, पाणीपुरी...इतरही
~वैवकु
वाहवाची दाद मीही देत गेलो बघत
वाहवाची दाद मीही देत गेलो बघत गर्दी
आज माझ्या मैफिलीला हजर झाले सर्व दर्दी
अरेव्वा! मस्त धागा दिसतोय हा.
अरेव्वा! मस्त धागा दिसतोय हा. धाग्यावरील बहुतेक शेर आवडले.
एक 'सडा' शेर अपुनकाभी.
ऐकताना कान त्यांनी झाकले अन्
बोलले तेही जणू उपकार केले
- अभय
जगतांना कळली नव्हती गंमत
जगतांना कळली नव्हती गंमत जगण्याची
सरणावरती मज पटली किंमत जगण्याची
........स्वाकु
Pages