Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
<सव्यसाचीचा अर्थ महागड्या पण
<सव्यसाचीचा अर्थ महागड्या पण सुंदर साड्या>
विनोद जाऊ दे पण सव्य हा शब्द
विनोद जाऊ दे पण सव्य हा शब्द म्हणजे उजवे की डाव? कारण सव्यापसव्य असा पण शब्द आहे.
सव्यसाचीचा अर्थ महागड्या पण
सव्यसाचीचा अर्थ महागड्या पण सुंदर


साड्या>>>>> lol सिमन्तिनी
पण सेम पिंच
जेव्हा मी हां शब्द पहिल्यांदा वाचला होता तेव्हा तेच आलेल डोक्यात
चिनूक्स , मामा , वरदा धन्यवाद
या शब्दाने बरेच दिवस गोंधवळलं होत मला
घ्या! शब्दार्थ नाही पण
घ्या! शब्दार्थ नाही पण अर्जुनला का म्हणायचे सव्यसाची सांगितल तरी आम्हला नो धन्यवाद! जाई अन्याय है!!
सव्य म्हणजे डावी बाजू/हात/पाय
सव्य म्हणजे डावी बाजू/हात/पाय तसेच डावीकडून उजवीकडे - क्लॉ़कवाईज - अशी दिशा पण
अय्यो राहिल मिस्टेक हो गय्या
अय्यो राहिल
मिस्टेक हो गय्या जी
तुला पेश्शल धन्यवाद !
अर्जुनचा अर्थ सांगितल्याबद्दल आणि त्या सुंदर आणि महागड्या साडयाबद्दलही
अंबर = वस्त्र ना?
अंबर = वस्त्र ना?
हो. विठोबाच्या आरतीत म्हणतो -
हो. विठोबाच्या आरतीत म्हणतो - पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. (ती द्विरुक्ती आहे अर्थात.)
अंबर = वस्त्र, आकाश
अंबर = वस्त्र, आकाश
अंबरखान्यात अंगावर घालायचे
अंबरखान्यात अंगावर घालायचे कपडे : अंगरखे बाराबंद्या लुगडी पागोटी शेले शालू पैठण्या अन तत्सम बाबी सांभाळल्या जायच्या. यांची धुणी रोज होत नसत.
फरासखाना हा तंबूची कापडं, गाद्या गिरद्या लोड तक्ये यांचेसाठीचा असा वेगळा केलेला असावा असे वाटत नाही.
घोड्यांची पागा या अर्थी बरोबर वाटतो आहे. अर्थात अशोक सरांनी कोशात पाहून लिहिलंय, पण या कारखान्यांचं डिट्टेल वर्णन गोनिदांच्या महाराष्ट्र दर्शनात आहे, ते पुस्तक काढून पहायला हवं.
आणि अंबार म्हणजे बळद. दोन
आणि अंबार म्हणजे बळद. दोन भिंतींमधे असलेली धान्य साठवणीची जागा/पोकळी
फरासखान्याचा मोल्सवर्थने अशोक. यांनी दिलेला अर्थच लिहिलेला आहे.
बळद <<< वरदा, म्हणजेच पेव का?
बळद <<< वरदा, म्हणजेच पेव का?
नाही, पेव जमिनीत खोदून आतून
नाही, पेव जमिनीत खोदून आतून लिंपलेलं असतं. बळद दोन भिंतींच्या मधे असतं.
मोठ्यामोठ्या पेवांचं वर्णन वाचायचं असेल तर अनिल अवचटांनी सांगलीच्या हळदीच्या व्यापारावर, तिथल्या कामगार-हमालांवर एक रिपोर्ताज लिहिलं आहे ते वाच.
उष्टर; खबुतर; जनान; जवाहीर;
उष्टर; खबुतर; जनान; जवाहीर; जामदार; जिकीर; तालीम; तोफ; थट्टी; दप्तर; दारू; दिवान; नगार; पील; फरास; वंदी; मोदी; शिकार-असे अठरा खाने.
<<
यात थट्टी = पागा आहे बहुतेक.
तसे नसेल तर फरासखाना हा घोड्यांशी संबंधित होईल. अन्यथः, उष्ट्र - उंट, पीलखाण्यातले हत्ती, हे दोन सोडले तर युद्धासाठी घोड्या इतका महत्वाचा अन्य प्राणी कोणताही नाही.
या क्षणाला फक्त आठवणीतून लिहितो आहे. पुस्तक हातात नाही.
वरची यादी बरोबर आहे, त्यात
वरची यादी बरोबर आहे, त्यात थट्टी आहे.
ओके, वरदा. आमच्या गावाकडच्या
ओके, वरदा. आमच्या गावाकडच्या घराच्या भिंती जवळजवळ तीन फूट जाडीच्या असतील. माजघरातल्या एका भिंतीत मधल्या भागात धान्य साठवण्यासाठी अशा तीन पोकळ्या आहेत. त्यात धान्य ओतण्यासाठी वरच्या माळ्यावर तोंडं ठेवलेली आहेत. आणि धान्य काढण्यासाठी (माजघरात) तळाशी लहानशी दारं ठेवलेली आहेत. तर या पोकळ्यांना आमच्या घरात (आजोबांपासून (किंवा त्यांच्या आधीचेही?) सगळे) पेव म्हणत आले. म्हणून मला तो प्रश्न पडला.
बळद हा शब्द आता तुझ्यामुळे कळला.
पेव जमिनीत खोदून आतून लिंपलेलं असतं <<< मग 'पेव फुटणे' असा वाक्प्रचार कशावरून आला असावा? जमिनीत खोदलेली पोकळी कशी फुटेल?
डॉक्टर आणि वरदा.... केतकर
डॉक्टर आणि वरदा....
केतकर ज्ञानकोशात उल्लेख केल्याप्रमाणे
जिराईत=धान्यकोठार. थट्टी=गुरें, गोठा. फरास=बिछायती, तंबू वगैरे कापड.....असे अर्थ मिळतात.
अर्थात केतकर पुढे असेही म्हणतात की महाराजांपासून पेशवाई येईतो या कारखान्यांच्या व्याख्येत बदलही होत गेले......केतकरांच्याच शब्दांत :
"....हे कारखाने वारंवार स्वरूपांत बदलत असत असें दिसतें. राज्यसूत्रें पेशव्यांच्या हातीं आल्यावर त्यांसहि १८ कारखाने ठेवणें भाग पडलें.
पेशवे सरकारचे अठरा कारखाने व त्यांतील अधिकारी :
१ तोफखाना -सखारामपंत पानशे, २ गणपतराव विश्वनाथ पानशे, ३ माधवराव कृष्ण पानशे, ४ जयवंतराव पानशे. दारूगोळा, खलासी वगैरे कामगार, रखवालीचे गाडदी, गाडयांचे बैलसुद्धां कारखाना तयार होता.
२ पीलखाना- ह्यांत हत्ती शंभर होते. सरदार-१ भगवंत परशजी व २ अल्लीमहात. कारकून रामचंद्रपंत गाडगीळ.
३ उष्टरखाना-गणपतराव मोरेश्वर. ह्यांत उंट अजमासें १००० एक हजार.
४ शिलेखाना-सदाशिवपंत वाकणकर.
५ फरासखाना-राघोपंत आंबीवर यांजकडे. खरडयाच्या स्वारींतील डेरे राहुटया वगैरे दलबादल डेर्यांसुध्दां.
६ कोठी
७ लकडखाना
८ इमारत
९ बागा
१० कुरणें
११ वहीतकोठी
१२ रथखाना
१३ पुणें पेटा
१४ थट्टी -
१५ पोतें व जामदाखाना -
१६ जिन्नसखाना व वैद्यशाळा-
१७ पुस्तकशाळा-
१८ खासगी-नारो शिवराम खासगीवाले.
डॉक्टरांनी "गोनिदां"च्या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. त्यातील मजकूर मिळेपर्यंत निदान आतातरी केतकरांच्या ज्ञानकोशाचाच आधार ग्राह्य मानावा लागेल. इतिहाससंग्रह पुस्तक १ लें. अंक १२ वा जुलै १९०९ यात कारखान्यांच्या व्याख्या तसेच कार्यपद्धती यावर लेखन आहे.
पेव वरूनही लिंपून चापूनचोपून
पेव वरूनही लिंपून चापूनचोपून बंद केलेलं असतं. उघडायच्या वेळेला फोडावंच लागतं
कणगी, पेव, बळद/अंबर या वेगवेगळ्या साठवणीच्या जागा/पद्धती आहेत.
तुमच्या गावाकडे, आसपासच्या परिसरातही कदाचित बळदाला पेव म्हणत असतील. वेगवेगळ्या प्रदेशांमधे नावांमधे व्हेरिअशन्स असणं स्वाभाविक आहे. पण एकुणात सर्वमान्य रूढार्थाप्रमाणे मी पेव आणी बळद/अंबार याची व्याख्या सांगितली.
पेव आणि बळद यांचे वर
पेव आणि बळद यांचे वर सांगितलेले अर्थ बरोबर आहेत.
सव्यसाची ची व्युत्पत्ती काय ? हाच अर्थ आधी माहिती होता. सव्यसाची धनुर्धर आणि गुडाकेश (गुडाका = झोप त्याचा ईश म्हणते झोपेवर हुकुमत असलेला) अशी दोन विशेषणे आठवतात अर्जुनाची.
गुडाकेश बद्दल धन्यवाद बाबु!
गुडाकेश बद्दल धन्यवाद बाबु!
निद्रा जिंकी गुडाकेश असं काहीसं वाचल्याचं आठवतं. पण गुडाका म्हणजे निद्रा हे आज कळलं. मी तो शब्द गुडा आणि केश असा वाचायचो!
आ.न.,
-गा.पै.
नमस्कार वरदा! नार आणि आयन
नमस्कार वरदा!
नार आणि आयन यांच्या परस्परसंबंधांवर तुम्ही म्हणालेलात की :
>> उद्यापरवा विचारून इथे लिहेन
संधी मिळाली का? तुम्हाला थोडा त्रास देतोय.
आ.न.,
-गा.पै.
सव्यापसव्याचा संबंध जानव्याशी
सव्यापसव्याचा संबंध जानव्याशी आहे.जानव्याचा धागा नेहमी डाव्या खांद्यावर असला पायजेल हाय . जानवे डाव्या खांद्यावर असल्यास त्यास 'सव्य 'असे म्हटले जाते . ते उजव्या खांद्यावर ठेवल्यास त्या स्थितीस अपसव्य'' म्हंत्यात ...
आन नेकलेसासारकं गळ्यात अडकिवल्यावं त्याले 'निवित ' मंतेत. धनुष्य बाय डिफॉल्ट उजव्या खांद्याले लावून समुरच्याचा काटा काढतेत. पन अर्जुन असा एकच भाद्दर हुता की तो डाव्या खांद्याले पन धनुष्य लावून संबुरच्याचा गेम करू शकत असे. म्हणून तो सव्यसाची ! त्यो अपसव्यसाची बाय डिफॉल्ट हुताच त्यामुळे त्याचा येगळा उल्लेख करायच कारान न्हाय .
श्राद्धात पिंडदान केल्यावर व पिन्डपूजा केल्यावर 'सव्य 'करतात.आणि नैवेद्य दाखवला जातो त्याला 'विकीर 'की काय मंतेत.त्यानन्तर अपसव्य केले जाते (बोटाने जान वे या खांद्यावरून त्या खांद्यावर त्या खांद्यावर नेणे ) व नैवेद्य दाखविला जातो.
या जानवी फिरवण्याच्या प्रकाराला सव्यापसव्य मंतेत. मग हा शब्द उलट्यापालट्या कृतीला यातायातीला रूढ झाला...
कळ्ळं ?
( हा लिम्ब्या नेमका कामाच्या येळंला कुटं कडमडतो कुनास दख्खल::फिदी:)
सव्यसाची ह्या शब्दाची
सव्यसाची ह्या शब्दाची व्युत्पत्ती-
सव्येण अपि साची (म्हणजे, वर सगळ्यांनी जो अर्थ दिलाय तसाच- डाव्या हातानेही जो धनुष्य पेलू शकतो तो)
अपसव्येण साची = सगळेच असतात म्हणून रॉबिनहूड म्हणतात तसा त्याचा वेगळा उल्लेख होत नाही.
वरती मोदीखान्याचा उल्लेख
वरती मोदीखान्याचा उल्लेख पाहिल्यावर पुण्याचा मोदी गणपती आठवला. मोदीखान्याशी त्याचा काही संबंध आहे का हे शोधावं वाटलं. पण त्या गणपतीला मोदी गणपती हे नाव वेगळ्याच कारणानी पडले आहे असं म. श्री. दिक्षीत म्हणतात. ते असं - दुसर्या बाजीरावाच्या काळात खुश्रुशेठजी मोदी नामक पारशी दुभाषा पुण्यात होता. पेशवे आणि संगमावरील इंग्रज रेसिडेंटस यांचात बोलणी होत, तेव्हा मोदींचा उपयोग होत असे. कंपनी सरकारचे ते पगारी नोकर होते आणि राहात होते नारायण पेठेतील आपल्या बागेत. या बागेतील पारावर स्वयंभू गणेशाची एक मूर्ती होती. भट यांच्या पूर्वजांनी (उत्तर पेशवाईत कोकणातून पुण्यात आलेलं कुटूंब) उजव्या सोंडेची ती गणेशमूर्ती बघून तिथे मंदिर उभारलं. मोदी यांच्या निष्ठेबद्दल एलफिन्स्टनला संशय वाटू लागून त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले. हा अपमान सहन न होऊन मोदी यांनी १८१५ मधे आत्महत्या केली. खुश्रुशेठजी मोदी यांच्या बागेमधला म्हणून तो मोदी गणपती.
अशोकमामा आणि सगळेच, खूप छान माहिती मिळते आहे. धन्यवाद.
शुगोल थोडंसं अवांतर -
शुगोल
थोडंसं अवांतर - मोदीगणपतीच्या पिछाडीच्या भागाला, म्हणजे मागच्या चौकापासून जी गल्ली केळकर रस्त्याला मिळते त्याच्या आसपासच्या भागाला अजूनही पेठी पुण्याच्या परिभाषेत सीताफळबाग असंच म्हणतात.
पेव नावाची पांढरी फुलं असलेली
पेव नावाची पांढरी फुलं असलेली वनस्पती असते..पावसाळ्यात फुलते (first flowers of the monsoon - अशी काहीतरी कॅटेगरी आहे.) रानभर जिकडे नजर जाईल तिकडे ही फुलं दिसतात. 'पेव फुटणे' हा शब्दप्रयोग यावरूनच आला आहे - अश्या माहितीची एक मोठी पाटी बोरिवली नॅशनल पार्कात आहे.
तुमच्या गावाकडे, आसपासच्या
तुमच्या गावाकडे, आसपासच्या परिसरातही कदाचित बळदाला पेव म्हणत असतील. वेगवेगळ्या प्रदेशांमधे नावांमधे व्हेरिअशन्स असणं स्वाभाविक आहे. पण एकुणात सर्वमान्य रूढार्थाप्रमाणे मी पेव आणी बळद/अंबार याची व्याख्या सांगितली. <<< शक्यता आहे. माझ्या माहितीनुसार आमच्या गावात अशी पेवं/बळदं फक्त आमच्या घरातच आहेत. माहितीबद्दल धन्यवाद.
ललिता, ओह. परवा गूगल करताना
ललिता, ओह. परवा गूगल करताना फ्प्लिकरवर त्या फुलाचा फोटो पाहिला होता.
चंदन याला समानार्थी शब्द कोणी
चंदन याला समानार्थी शब्द कोणी सांगू शकेल का?
गंध होऊ शकेल का?
शुगोल, रोचक माहिती दिलीये
शुगोल,
रोचक माहिती दिलीये तुम्ही. धन्यवाद!
खरोखरच मोदीने आत्महत्या केली का इंग्रजांनीच त्याचा गेम केला ते कळायला हवं. याच एल्फिन्स्टनच्या कारकीर्दीत इंग्रजांनी गायकवाड सरकारचे प्रतिनिधी गंगाधरशास्त्री यांचा पंढरपुरात खून केला, मात्र पावती त्र्यंबकजी डेंगळ्यांच्या नावावर फाडली.
आ.न.,
-गा.पै.
Pages