शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फरासचा अर्थ माहीत नाही, पण मृतदेह हाताळणार्‍यांना मुडदेफरास असा शब्द वाचल्याचं मात्र आठवतंय.
'मुर्दाफरोश'चा अपभ्रंश असेल की काय अशी मला शंका येते आहे, तेव्हा ते शोधून बघते.

(फरासखान्याचा मृतदेहांशी काही संबंध आहे का? मला पुण्याची माहिती नाही.)

उर्दू 'फरोश'चा अर्थ विक्रेता असा आहे. ती संगती लागत नाही. (मग सरफरोश म्हणजे काय?! जाऊ दे, फारच अवांतर झालं.)

>> अडका (p. 015) [ aḍakā ] m A copper piece of money, the half of a रुकाः

मोल्सवर्थमधून साभार.

अमित, तू दिलेल्या लिंकवर The Name FARAS It is 2 syllables long and is pronounced 'f(A)- ras' असं म्हटलंय. (फारस.)
(फारसी घोडे विकणार्‍यांची वगैरे भाषा की काय? मधे कोण गापै की कोणीतरी घोड्यांवरून पडलेली नावं सांगत होते ना प्रदेशांची?

मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या उर्दु मराठी शब्द कोशात फरास असा शब्द नाही. फराश म्हणजे पतंग ( किडा) ; फरोश म्हणजे विकणारा, फरोशी म्हणजे विक्री असं दिलंय.

हा उर्दू शब्द नाही ना पण? अरेबिक आहे.
आतच एका अरेबिक माणसा कडून कन्फर्म केलं फारस म्हणजे घोडा. स्पेलिंग FARAS मराठीमध्ये फरास झाला असेल का?
त्याने फारसैया म्हणजे घोडेस्वारी असा खेळ आहे असं सांगितलं. हा उच्चार असा मला ऐकू आला, तो तसच असेल याची खात्री नाही.

अरबी-फारसी-उर्दू बहिणी ना?
(मला माहीत नाही. विचारते आहे.)

(त्या शेंडेनक्षत्रांचा प्रश्न कुणीकडेच राहिला. गुड गुड. परंपरा पाळली गेली पाहिजे. :P)

स्वाती....अमितव...शेंडेनक्षत्र....

"फरासखाना" म्हणजे कपडेलत्ता ठेवण्याची जागा. शिवाजी महाराजांनी विविध कार्यासाठी अठरा कारखाने स्थापन केले होते. उष्टर; खबुतर; जनान; जवाहीर; जामदार; जिकीर; तालीम; तोफ; थट्टी; दप्तर; दारू; दिवान; नगार; पील; फरास; वंदी; मोदी; शिकार-असे अठरा खाने.

फरास=बिछायती, तंबू वगैरे कापड.....

पेशवाईतसुद्धा कारखान्याची ही प्रथा चालू राहिली होती व प्रत्येक खान्यावर एक स्वतंत्र अधिकारी नेमलेला असे.

(ज्ञानकोशकार केतकर यांच्या "महाराष्ट्रीय ज्ञानकोशा" त ही माहिती सविस्तर दिलेली आहेच.)

उर्दू मध्ये अरबी आणि पर्शियन शब्द बरेच आलेत. अरबी-फारसी उर्दूच्या आई/ मावशा म्हणू, कालानुसार पण तसच असेल. उर्दू मधून संस्कृत शब्द काढून शुधीकारणाबद्दल मध्ये वाचले होते. पर्शियन लिहायला बरीच स्क्रिप्ट इवोल्व झाल्येत. ढीगाने युनीकोड वापरलेत.

रच्याकने: कालगणना/ भाषा इ, मुळे संगणक अभियंत्याच्या भाजी-भाकरीचा प्रश्न सुटलाय. Happy

While having a lesser influence on Arabic and other languages of Mesopotamia and its core vocabulary being of Middle Persian origin, New Persian contains a considerable amount of Arabic lexical items,which were Persianized and often took a different meaning and usage than the Arabic original. Persian loanwords of Arabic origin especially include Islamic terms. The Arabic vocabulary in other Iranian, Turkic and Indic languages are generally understood to have been copied from New Persian.

फरासखान्याचा अजून उलगडा झाला नाही.
पण अरबी फारसी आणि उर्दू बहिणी वगैरे नाहीत.
अरबीने फारसीवर आक्रमण करून आपला प्रभाव त्या भाषेवर व संस्कृतीवर टाकला. फारसी आज ज्या लिपीत लिहिली जाते तीही अरबी लिपीच (त्यात थोडी भर घालून बनवलेली).
फारसी, संस्कृत आणि लॅटिन ह्या बहिणी आहेत.
उदा. पाचः फारसीत पंज, संस्कृत पंच. हातः फारसीत दस्त, संस्कृत हस्त, फारसीत आफत, संस्कृत आपत्ती,
फारसीत आशिक संस्कृत आसक्त. मी, तू, तो असली सर्वनामे, क्रियापदांची रुपे ह्यात ह्या तिन्ही भाषांत साम्य आहे. आणि भाषाशास्त्रही ह्या साम्याला पुष्टी देते.

उर्दूचे मातृत्व फारसी आणि संस्कृत ह्या दोघींना देता येईल कारण तिचे दोघींशी घनिष्ट नाते आहे. उर्दूने अरबीकडून शब्दांची (थेट वा फारशीतून) उसनवारी भरपूर केली आहे पण भाषाशास्त्रीय दृष्टीने अरबी ही उर्दू वा फारसीपेक्षा खूप वेगळी भाषा आहे. मुस्लिम धर्म हा अरबकेंद्रित असल्यामुळे त्या धर्माशी निगडित असणार्‍या भाषांमधे धर्माशी संबंधित शब्द, नावे ह्या सगळ्यावर अरबीचा मोठा प्रभाव आहे. मग भाषा फारसी असो वा उर्दू वा पुश्तु.

उर्दू ही अवधच्या खडी बोलीतून निर्माण झाली आहे असे म्हनतात . अमीर खुस्रोने वेगवेगळ्या क्षेत्रात जे फ्युजन केले त्यात बहुधा उर्दु अरेबिक आणि फारसीच्या जवळ गेली असावी. गालिबचे बहुतांश लेखन फारसीत आहे आजही पाकिस्तानची राष्ट्रभाषा जी की उर्दू , पाकिस्तानात भारतीय भाषा मानली जाते आणि तिचा द्वेषही केला जातो.

क्षमस्व, तुमचा प्रतिसाद आधी वाचला नाही. अशोक, आपले मनःपूर्वक आभार. फरासचा अर्थ समजावून दिल्याबद्दल धन्यवाद.

बागुलबुवा....अहो नतमस्तक कशासाठी ?? मलाही "फरासखाना" चा अर्थ अगदी योगायोगाने मागेच सापडला होता. पन्हाळा किल्ल्यावर "अंबारखाना" नामक एक भाग आहे....महाराजांच्या काळातील. आम्ही त्या भागाला "अंबार" वरून "अंबारी" =.वरात... असा अर्थ घेत होतो. पण तेथील इतिहास संशोधक मंडळाच्या कार्यालयात त्याचा अर्थ "धान्यकोठार" असा मिळाला....त्याचवेळी फरासखाना नाम समोर आले होतेच...त्याचा अर्थ कपडेकोठार असा मिळाला....ते डोक्यात होते इतकेच. नंतर ज्ञानकोशाशी परिचय झाल्यावर ते १८ कारखानेही मिळाले.

शेंडेनक्षत्र....धन्यवाद. काही वेळा प्रतिसादांचे घाईगडबडीत वाचन राहून जाते. असो.

सव्यसाची म्हणजे नेमके काय ?
एका ठिकाणी अर्जुन असा तर दुसर्या ठिकाणी संपूर्ण असा असा अर्थ सांगितला गेला आहे
नक्की काय आहे ?

सव्यसाची म्हणजे नेमके काय ?
एका ठिकाणी अर्जुन असा तर दुसर्या ठिकाणी संपूर्ण असा असा अर्थ सांगितला गेला आहे
नक्की काय आहे ?

अर्जुन दोन्ही हाताने धनुष्य बाण चालवू शकायचा म्हणून त्याला सव्यसाची म्हणायचे. (सामान्यपणे लोक अचूकपणे एकच हात वापरू शकतात.) हे नाम नसून विशेषण आहे खरे तर.

बागुलबुवा, उर्दू ही भारतात राजमान्य भाषा आहे. मात्र बहुतेक अन्य भारतीय भाषांप्रमाणे तिचा उगम संस्कृतपासून नाही. उर्दूचा विकास बर्याचअंशी भारतीय उपखंडात झाला.

सव्यसाचीचा अर्थ महागड्या पण सुंदर साड्या Happy

जाई.... एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा अनेक पैलूंची गुणवत्ता असली की त्याला सव्यसाची म्हटले जात असे. उदाहरणार्थ शांतीच्या काळात लेखणीने आपल्या बुद्धिमत्तेची झळाळी दाखविणारा तर युद्ध प्रसंगी तीच व्यक्ती समशेरबहाद्दर बनून युद्धभूमीवर जात असेल तर अशा गुणांमुळे तो सव्यसाची मानला जातो.

इंग्लिशमध्ये सव्यसाची म्हणजे Ambidextrous = दोन्ही हातांनी कार्य करण्यास सक्षम, निपुण असणारा असा अर्थ आहे.

Pages