वेगवेगळ्या प्रकाराच्या तव्यांबद्दल चर्चा

Submitted by रूनी पॉटर on 27 April, 2011 - 18:53

स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे या धाग्यावर परत परत तेच तेच प्रश्न विचारले जातात म्हणून हा वेगळा धागा काढला आहे.
इथे मुख्यतः पोळ्या, भाकरी, फुलके, पराठे, दोसे, उत्तपा, पुरणपोळी, खाकरा वगैरे प्रकारासाठी वापरण्यात येणार्‍या वेगवेगळ्या प्रकारांच्या (लोखंडी, नॉनस्टीक, हार्ड अ‍ॅनोडाइझ्ड, अ‍ॅल्युमिनियम, माती, कास्ट आयर्न/बिड इ. इ.) तव्यांबद्दल तसेच कुठल्या तव्याची कशी काळजी घ्यावी, कसे वापरावेत इ. चर्चा अपेक्षित आहे.
स्वयंपाकाच्या इतर उपकरणांची चर्चा कृपया वेगळा धागा काढून त्या धाग्यावर करावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हार्ड अ‍ॅनोडाईज्ड वर धिरडी, डोसे होतात का नीट ? माझ्याकडे आहे त्यावर मी पोळ्या करते रोज. त्या चांगल्या होतात.
एकदा डोसा घातला पण तव्यानेच खाल्ल्यामुळे आम्हाला खाववेना. Sad

अ‍ॅबसोल्यूट विनातेलाचा. फकस्त मिठाचं पाणी, अन अगदी हवंच असेल तर थोडं तेल शिंपडणे >>> मी नॉनस्टिक वर पण हेच करते...

वरदा, कनफ्युज झालीस का गं आता Wink

वरदा, डोश्यांसाठी प्रेस्टीजचा नॉन स्टीक तवा घे. ओमेगा प्ल्स, ओमेगा सिलेक्ट असे प्रकार आहेत त्याव्र. नॉन स्टीक कोटींग असलं तरी त्यावर स्टीलचा चमचा वापरला तर चालतो. कोटींग सहजा सहजी निघत नाही.
http://prestigesmartkitchen.com/cookware/omega-select-plus-omni-tawa-250... हा आहे माझ्याकडे.
मस्त तवा आहे.

अल्पना, माझ्या कडे हाच आहे..
१ डोस्या साठी (उथळ) आणि एक थोडा खोलगट (पॅन) टाईप असे घेतले होते..
३ वर्षापासून काहीही प्रॉब्लेम नाहिये

मी पूर्णच कन्फ्यूज्ड Uhoh

हा अ‍ॅ नॉनस्टिक असतं का? इथे परस्परविरोधी मतं मिळताहेत

नाहीतर अल्पनाने सुचवलेला तवा आहेच शेवटी (शिवाय घरी बाद झालेला प्रे. कुकर आहेच एक्स्चेन्जसाठी)

http://prestigesmartkitchen.com/cookware/omega-die-cast-plus-tawa-310-mm...
मी हा बरीच वर्ष वापरते आहे.( भारतात ५ वर्ष वापरला) छान टिकतो. अजुन ही तिकडचा छान आहे अस आई म्हणत होती.
ईकडे येताना पण १ घेऊन आले होते तो पण २ वर्ष झाली अजुन छान आहे, फक्त डोसे, धिरडी वैगरे साठी. आता किंमत खूप जास्ती दिसतीय मी ८०० च्या आसपास घेतला होता.

वरदे, माझ्या हा अ‍ॅ पडून आहे. मला वापरायला जमत नाहीये. बाईलाही नाही. तो नॉ स्टि असतो की नाही मला कळत नाही. माझ्याकडे तरी तो मुळात नॉ स्टि असला तरी नुसता स्टिकस्टिकाट होतो.. Wink
माझ्याकडे हा सेट आहे.

एकदा नॉनस्टिक खराब केल्यावर बाईला पोळ्या, भाकर्‍यांसाठी लोखंडी तवा दिलाय. आणि धिरडी, डोसे, आम्लेट इत्यादीसाठी नॉनस्टिक. तो मीच वापरते. आणि ही नवीन बाई घासताना त्याला स्पंजच लावते कटाक्षाने त्यामुळे नो प्रॉब्लेम. एरवी मी स्वतः धुवून टाकला असता.

बाकी नॉ स्टि रेग्युलर वापरात असेल तर ३-४ वर्षांनी बदलून टाकावा म्हणतात.

टेफलॉनपेक्षा हा.अ‍ॅ. चं कोटिंग जास्त चांगलं असतं, डोसे धिरडी मस्त होतात >> हा अ‍ॅ वर कसे करतात डोसे. माझे तर तव्यालाच चिकटतात.

बिडाचं भांड आणि लोखंडाचं ह्यात फरक कसा ओळखावा?

बिडाचे तवे वगैरे हा सुगरण बायकांचा कट आहे हा आमच्यासारख्या स्वैपाक बिगारीपर्यंतच जेमतेम शिकलेल्या बायकांना कमीपणा दाखवण्यासाठी असे माझे अत्यंत प्रामाणिक मत आहे. तेव्हा वरदा बिगारीत असशील तर सरळ नॉ स्टि घे.
थोडे दिवसात नॉ स्टी कसे चांगले असे संशोधन येईलच. Wink

पहिले वाक्य Light 1 सकट वाचावे.

Futura non stick flat tawa is the best. सर्व प्रकारचे डोसे, धिरडी, थालीपीठ ई उत्तम होतात. तवा छान जड़ आणी जाड आहे.

इब्लिस, क्रॉफर्ड मार्केटात केक, चॉकलेट मोल्ड वगैरे विकणारा 'अरीफ' आहे त्याच्याकडे पाहिले आहेत सीझलरचे तवे.

माझ्याकडे हॉकिन्स फ़्युचुरा चा एक फ़्रायपॅन आणि एक डोश्याचा तवा आहे, दोन्ही हार्ड अॅनोडाइज्ड. दोन्हीवर डोसे मस्त होतात, तेल फ़ार नाही लागत. धिरडी मात्र नुसत्या पिठाची (तांदूळ वगैरे) असतील, तर चिकटतात. म्हणून मी त्या पिठात गाजर वगैरे किसून घालते, मग नाही चिकटत.

दोन्ही हार्ड अॅनोडाइज्ड. दोन्हीवर डोसे मस्त होतात,
म्हणून मी त्या पिठात गाजर वगैरे किसून घालते, <<<
सुगरणीची व्यवच्छेदक लक्षणे.. Wink
Light 1

विविध सूचना, सल्ले, अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद.
मी सुगरण नाही, ती व्हायची महत्वाकांक्षाही नाही आणि कधी जमेल अशा आवाक्यातली गोष्टही नाही.
मी दोसे उत्तप्पे फारसे करत नाही, विविध प्रकारची धिरडी आणि पराठे वगैरेच जास्त होतात आणि घरीही त्यालाच जास्त मागणी असते (करायला सोप्प्यात सोप्पीही). पुरणपोळी करायची हिंमत आयुष्यात एखादवेळी होईलही कदाचित पण गूळपोळी, खवापोळी आणि अशाच कायकाय अवघडातले पदार्थ कदापिही होणारे नाहीत

एकूण चर्चेवरून मला कळलेले मुद्दे असे -
१. हा अ‍ॅ तव्यावर धिरडी, डोसे करायला थोडेफार तेल आवश्यकच आहे. पोळ्या, पराठे यासाठी गरज नसावी
२. हा अ‍ॅ तव्याचं तापमान मॅनेज करायला शिकायला लागतं.
३. त्याचं कोटिंग बर्‍यापैकी नॉनस्टिक असावं. ते अनेको दिवस रहातं

एकुणात नॉनस्टिक तवाच परत घ्यावा असा मी निष्कर्ष काढला. हा अ‍ॅ + गॅरण्टीड नॉनस्टिक असा कुठला तवा असल्यास प्लीज सांगा (तेवढीच व्हरायटी राहिली आहे) Happy

हा अ‍ॅ + गॅरण्टीड नॉनस्टिक असा कुठला तवा असल्यास प्लीज सांगा (तेवढीच व्हरायटी राहिली आहे) स्मित>>> हॉकिन्स फ्युच्युराचे नॉन स्टीक तवे, हा अ‍ॅ वर नॉन स्टीक कोटींग असे आहेत. माझा फुलक्यांचा कॉनकेव्ह तवा तोच आहे. पण नेहेमीच्या नॉन स्टीकप्रमाणे गॅस मंद /मध्यम वापरणे, लाकडी उलथणेच वापरणे हे सगळं करावं लागत. घासायला पण स्पंज किंवा प्लास्टीक घासणी. त्यामाने प्रेस्टीजचा नॉनस्टीक दोसा तवा जास्त बरा वाटतोय मला.

अर्थात हे दोन्ही तवे मीच घासते किंव माझ्यासमोर बाई स्पंजने धुते. माझ्याशिवाय इतर कोणीही (मधंतरी चु साबा आलेल्या होत्या. पण त्या मोठ्ठ्या गॅसवर फुलके बनव्णार आणी पंजाबी स्टाईलनी पराठे तळणार याची खात्री होती म्हणून त्यांना पण लोखंडी तवाच दिला होता वापरायला. Happy )फुलके बनवणार असेल तर मी सरळ लोखंडी तवा काढून देते.

वरदा,
फुच्युराचे हार्ड अ‍ॅनोडाइज्ड तवे नॉनस्टीक (विद नॉनस्टीक कोटिंग) आणि रेग्युलर (विद आउट नॉनस्टीक कोटिंग) अश्या दोन्हीं प्रकारात येतात.
त्यामुळे, हे कन्फ्युजन होते आहे.

हा अ‍ॅ + गॅरण्टीड नॉनस्टिक असा कुठला तवा असल्यास प्लीज सांगा (तेवढीच व्हरायटी राहिली आहे) >>>>
फ्युच्युरामध्ये हा. अ‍ॅ. विद नॉनस्टीक कोटिंग तवा मिळतो.

वरदा, कितीही उत्तमातला, महागातला नॉनस्टीक तवा घेतलास तरी त्याचं आयुष्य तीन ते चार वर्षांहून अधिक नाही अशी मनाची तयारी करून तवा घे, त्रास होणार नाही हा स्वानुभव!

हो, नॉनस्टिकचा व्यवस्थितच अनुभव आहे. दर दोनतीन वर्षांनी बदलावाच लागतो. म्हणूनच तर हा अ‍ॅ कसा आहे ते बघत होते. पण त्यात चिकटाचिकटी होणार असेल तर मग नॉनस्टिकच बरा. निदान कमी तेलात बिनाझंझट काम होतं

हाअ‍ॅ नॉनस्टिकची पण अशीच अवस्था आहे असं वाटतंय (म्हणजे नाजूक नॉनस्टीक कोटिंग)

नीधप यांनी दिलेल्या लिंकमध्ये जो तवा दिसतोय तोच हार्ड अ‍ॅनोडाईज्ड का ??
माझ्याकडे तसाच आहे. आणि त्यावर मी रोज पोळ्याच करते. बाकी डोसे, धिरडी पण होतात का त्यावर ?
कोणीतरी सांगा प्लीज.

मी यावेळी पुन्याहून येताना. लोखंडी तवा घेऊन आलीये. डोसे मस्त होताहेत त्यावर. अखेर नॉनस्टिक च्या जंजाळातून सुटेन अशी आशा वाटतीये. आता हा तवा टिकवण्यासाठी काही सल्ले असतील तर जरूर द्या.

Pages