वेगवेगळ्या प्रकाराच्या तव्यांबद्दल चर्चा

Submitted by रूनी पॉटर on 27 April, 2011 - 18:53

स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे या धाग्यावर परत परत तेच तेच प्रश्न विचारले जातात म्हणून हा वेगळा धागा काढला आहे.
इथे मुख्यतः पोळ्या, भाकरी, फुलके, पराठे, दोसे, उत्तपा, पुरणपोळी, खाकरा वगैरे प्रकारासाठी वापरण्यात येणार्‍या वेगवेगळ्या प्रकारांच्या (लोखंडी, नॉनस्टीक, हार्ड अ‍ॅनोडाइझ्ड, अ‍ॅल्युमिनियम, माती, कास्ट आयर्न/बिड इ. इ.) तव्यांबद्दल तसेच कुठल्या तव्याची कशी काळजी घ्यावी, कसे वापरावेत इ. चर्चा अपेक्षित आहे.
स्वयंपाकाच्या इतर उपकरणांची चर्चा कृपया वेगळा धागा काढून त्या धाग्यावर करावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

hard anodized च्या त white material कसं काय?
ते काही नोन स्टिक सारखं लेयर नाही.

मी पुण्यातून छोटी लोखंडी कढई घेतली आत्ता. विक्रेता म्हणाला की रोज वापरली तर गंजत वगैरे नाही. खूप दिवस वापरणार नसाल तर गंजेल. मी सध्या रोज वापरत आहे. भाजी करपत नाहीये, कढई अगदी खूप जड वाटत नाहीये. एकंदरीत आवडली मला. मंडईसमोरून घेतली.

मीही मागच्या भारतवारीत एक लो कढई घेऊन आले. अगदी रोज वापरत नाही. पण स्वच्छ करुन पुसून ठेवली कि गंजत नाही. पदार्थ करून थंड झाला कि तो काळा पडू नये म्हणून दुसर्‍या भांड्यात काढून कढई लगेच धुऊन ठेवते.

Pages