अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचारवंत, आहात का? तुमचं मत हवं होतं. Happy

Why did Sheila Dixit need 31 ACs, 15 coolers and 25 heaters as a Delhi Chief Minister?
"काँग्रेसी असलेच" असं म्हणू नका. कारण तुमचे लाडके बीजेपीगण ह्यापेक्षा भारी आहेत.
Chhattisgarh Assembly Speaker leaves former Delhi CM Shiela Dixit far behind in luxurious lifestyle with 48 ACs at his bungalow

मिर्ची,

१. आपची भ्रष्टाचाराची व्याख्या काय आहे ?
२. खातेनिहाय असलेला भ्रष्टाचार कसा काय नाहीसा करणार ?
३. Technical बाबीमुळे आलेला भ्रष्टाचार कसा काय आटोक्यात आणणार ?

<<१. आपची भ्रष्टाचाराची व्याख्या काय आहे ?>>

आपचं माहीत नाही.
जे काम करणं हे संबंधित व्यक्तीचं कर्तव्य आहे ते करण्यासाठी लाच घेणं, पदाचा दुरूपयोग करून ठराविक लोकांना फायदा होऊ देणं,जनतेच्या पैशाचा उपयोग स्वतःच्या ऐशोरामासाठी करणं, योजना ज्यांच्यासाठी बनवल्या आहेत तिथपर्यंत न पोहोचवता स्वतःची बँक अकाउंट्स भरणं हा सगळा भ्रष्टाचारच.

पुढचे दोन मुद्दे समजले नाहीत. 'खातेनिहाय असलेला भ्रष्टाचार' आणि 'Technical बाबीमुळे आलेला भ्रष्टाचार' म्हणजे काय हे जरा विस्तार करून समजावून सांगाल का?

>>विचारवंत, आहात का? तुमचं मत हवं होतं.
तुम्ही हे मला उद्देशून लिहिले होते का ? तसे असेल तर उत्तर नाही असे आहे.
माझा माबोवर आलो तेव्हापासुन हा एकच आयडी आहे.
आणि मी प्रत्यक्षात सुद्धा फार विचार करत नाही असे लोक म्हणतात Happy

मिर्ची,

आताच तुम्ही उपस्थीत केलेल्या प्रश्नावर कालच झी टीव्हिवर बराच उहापोह झाला.
त्यातला बातमीदार ने सांगीतले की,
सगळ्या राज्यात शासकीय निवास स्थाने ही सा.बां वि कडेच असतात आणि त्यांच व्यवस्थापन करणेही सा बां विचच काम आहे. छत्तिस गढ मध्ये ४८ एसी लावले आहेत हे सत्यच आहे पण मोदींनी अगदी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, की साधे पणानेच रहायच आहे. त्यामुळे मोदींकडे बातमी पोहोचताच हे एसी उतरु लागतील. आणी मोदींकडे बातमी पोहोचायला वेळ लागणार नाही.

त्याच बरोबर त्याच प्रोग्राम मध्ये उपस्थीत असलेल्या एका आरटीआय च्या कार्यकर्त्याने पुढील माहीती दिली.
दिल्लीत युपीए सरकारने ४४ बंगले अश्या लोकांना रहायला दिलेले आहेत जे त्या कॅटॅगोरीत बसतच नाहीत. आणी त्या लोकांनी हे बंगले बर्याच वर्षांपासुन बळकावलेले आहेत.

ह्या च सरकारच्या काळात अश्या बंगल्याचे भाडे ठरवले गेले होते. आता कपिल सिब्बल रहायला जाणार्या दोन -तिन खोलीच्या छोट्या बंगलीच भाड १७ लाख प्रती माह आहे,
मग शासकीय बंगल्यांच किती असाव ?
काही एकराच्या क्षेत्रफळावर असलेल्या अश्या बंगल्याच भाड मात्र काही हजारातच आहे. जे त्या बंगल्यात
दिलेल्या मुदतीपेक्षा जास्त रहातात त्यांना बाजर भावाने नाही तर अश्या कमी केलेल्या भावानेच रहाता येते.
याचा अर्थ त्यांना कुठल्याही महागाईची झळ पोहोचत नाही.

<<तुम्ही हे मला उद्देशून लिहिले होते का ?>>
नाही महेश.
'विचारवंत' नावाचा आयडी आहे की. त्यांना केजरीवाल (भाडं भरत असले तरी) सरकारी निवासस्थानात जास्त दिवस राहिले ह्याची फार तळतळ होत असते. ओव्हरऑलच केजरीवालांचं घर हा त्यांचा आवडता मुद्दा आहे.

<<छत्तिस गढ मध्ये ४८ एसी लावले आहेत हे सत्यच आहे पण मोदींनी अगदी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, की साधे पणानेच रहायच आहे. त्यामुळे मोदींकडे बातमी पोहोचताच हे एसी उतरु लागतील. आणी मोदींकडे बातमी पोहोचायला वेळ लागणार नाही.>>

अशी आशा करूया Happy
(मोदी जे बोलतात ते करत नाहीत असा आजवरचा अनुभव असल्याने मनात शंका आहे)

केजरीवाल आणि आपच्या आमदारांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना भेटून दिल्लीत निवडणूका करवण्याची मागणी केली. राष्ट्रपतींना दिलेलं पत्र इथे वाचता येईल.

Kejriwal’s letter said, “In the last few days, BJP has approached 15 of our MLAs, with offers of ministerial berths, properties and cash ranging from Rs 10 crore to Rs 20 crore. When this did not work, the BJP has now resorted to making life threats on our MLAs. On the evening of July 1, 2014, Bandana Kumari, our MLA from Shalimar Bagh, was given a life threat. She has already filed a police complaint in this regard. We are attaching a CD with this letter which contains CCTV footage of the people who came to threaten Bandana Kumari.”

लोकसभेत 'दणदणीत' 'लँडस्लाइडिंग' विजय मिळवूनही बीजेपी मात्र निवडणूका टाळायला बघत आहे.

"Many leaders feel that Delhi BJP can cash in on the party's sterling performance in the Lok Sabha elections. "We should make the most of our victory in the Lok Sabha elections. The present mood is in our favour," said a leader.
But another section is of the opinion that BJP should wait for some time. They say the rise in AAP's vote share in the city, despite it losing the support of the middle class, is a cause of concern for BJP."

उलटी गंगा ! हरलेले म्हणतायेत पुन्हा लढू द्या, जिंकलेले घाबरतायेत. Uhoh

विचारवंत, आहात का? तुमचं मत हवं होतं.
<<
ते आजकाल नव्या नावाने काम पहातात. पहिल्या आयडीने त्यांनी जे करायचं ते करून चुकलेत. आता नवी विटी नवे राज्य सुरू आ।ए.

शेखर-नंद्या हा आयडी विचारवंतांच्या अनेक अवतारांपैकीच एक आहे असं मोदींच्या धाग्यावर कोणीतरी लिहिलं होतं. खखोविजा.

मिर्ची ताई हे थोड जास्त समजावुन सांगल काय?

<<सध्या आपल्यासमोर असलेल्या बहुतांश प्रश्नांच्या मुळाशी 'भ्रष्टाचार' हे एक अति-महत्वाचं कारण आहे आणि त्याला ताब्यात आणायला मजबूत जनलोकपालबिलाशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.

शिक्षणव्यवस्थेतील प्रश्न, महिलांवरील अत्याचार, महागाई, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, वाढतं नैराश्य,आत्महत्या,पावसाळी छत्र्यांसारखे उगवणारे बुवाबाबा, बाँबस्फोट, हॉस्पिटलची अवास्तव बिलं, बिनाडिग्रीचे धोकादायक डॉक्टर्स, मगरूर पोलिस, परकीयांची घुसखोरी, वाढत्या झोपडपट्ट्या.....बारकाईने पाहिलं तर सगळ्याच्या मागे भ्रष्टाचाराचा भस्मासूर दडलेला दिसेल.>>

मला वाटत होत या सगळ्याच्या मागे अगदी भ्रष्टाचार वाढण्या मागे सुध्धा भारताची वाढणारी बेसुमार लोकसंख्या आहे. सतत वाढणारी प्रचंड मागणी आणि तुलनेने स्थिर किंवा कमीच होत जाणारा पुरवठा असे पर्यंत हाहे तो पर्यंत तरी हे आटपणे कठीणच वाटते.

असो पण केजरीवाल याना वाटत असेल तर बरोबरच असेल.

शिक्षणव्यवस्थेतील प्रश्न, महिलांवरील अत्याचार, महागाई, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, वाढतं नैराश्य,आत्महत्या,पावसाळी छत्र्यांसारखे उगवणारे बुवाबाबा, बाँबस्फोट, हॉस्पिटलची अवास्तव बिलं, बिनाडिग्रीचे धोकादायक डॉक्टर्स, मगरूर पोलिस, परकीयांची घुसखोरी, वाढत्या झोपडपट्ट्या...

या बोल्ड केलेल्या प्रश्नांच्या मागे भ्रष्टाचार नक्की कशाप्रकारे आहे? त्याखेरीज समलैंगिकता, नक्षलवाद, परराष्ट्रीय धोरण, दुष्काळ, पूरस्थिती, या सर्वांवर आपकडे काय उपाय आहेत?

भ्रष्टाचार संपवणार म्हणजे नक्की काय करणार? आप कार्यकर्त्यांचा एक गोंडस समज असतो की जनलोकपाल आलं की संपलाच भ्रष्टाचार. जो पैसे खाईल त्याला डायरेक्ट घरीच पाठवायचं.

पण तसं होइल का? जनलोकपाल बिल "भ्रष्टाचार झाल्यावर (तसं सिद्ध झाल्यावर) कारवाई करणारी यंत्रणा आहे,मुळात एक घटनाबाह्य सत्ताकेंद्र प्र्स्थापित करणे आणि त्याला इतके अधिकार देणे हेच इतर पक्षांना मान्य नाही (आणि त्यांची कारणं बरोबर आहेत!!! ते पक्ष भ्रष्टाचारी असले तरी त्यामध्ये काही लोकांना लोकशाही काय आहे ते समजतं. आपवाले म्हनतात तसे सगळेच मूर्ख आणि पैसेखाऊ लोक नाहीत)
उद्या या जनलोकपालानंच भ्रष्टाचार केला तर काय करणार आहेत आप?

आता या प्रश्नाला उत्तर म्हणून हजारो लिंका फेकल्या जातील. "इतर पक्ष" कसे नालायक आहेत याचं गुणगान केलं जाईल. आणि आलचेकच स्वच्छ कॅरेक्टर असलाच। ठासून सांगित्लं जाईल.

@ नंदिनी ,

लोक संख्या वाढण्यामागे पण भ्रष्टाचारा असेल तर? मग नको का लोकपाल?

लोकसंख्यावाढी मागे भ्रष्टाचार आहे.. कारण जर कंडोम निकृष्ट दर्जाची बनवुन बाजारात विकत असतील आणि त्याला सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करुन दुर्लक्ष करत असतील तर लोकसंख्या सहाजिकच वाढणारच Happy

मिर्ची, हा धागा सुरू झाल्यापासुन मी तुमचे सर्व प्रतिसाद पाहिले, अत्यंत तिरकस प्रश्नांनासुध्दा तुम्ही न चिडता संयत प्रतिसाद दिलेत म्हणुन तुमचे मला फार कौतुक वाटते.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला अभुतपुर्व यश मिळाले आणि अरविंद केजरीवाल जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळी ती त्यांच्यासाठी आणि आआपसाठी एक मोठी संधी होती. पण जनलोकपालच्या मुद्यावरून जेव्हा त्यांनी राजीनामा दिला तेव्हा त्यांनी ती संधी गमावली ज्याची उपरती त्यांना नंतर झाली. पाच वर्षे राज्यकारभार करून दिल्लीच्या जनतेला पर्यायी देशातील जनतेला उत्तम कारभार करून दाखवला असता तर आआपची लोकप्रियता आणि जनाधार अजुन वाढला असता. पण सत्तेत आल्या पहिल्या दिवसापासुन अरविंद केजरीवाल असे वागत होते जसे त्यांना राज्यकारभार करायचाच नाही फक्त आंदोलने करायची आहेत. इतरांवर आरोपांची राळ उठवली की जनता आपल्यालाच मत देणार या भ्रमाने ते पुरते पछाडलेले होते. आता तरी त्यांच्या लक्षात आले आहे की नाही माहिती नाही पण जनता तुम्ही काय काम करता यालाच मत देते. तुम्हाला अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास आहे त्यात काहीही वावगे वाटत नाही परंतु दिल्लीच्या जनतेचा त्यांनी पुर्ण भ्रमनिरास केला आहे.

<<मला वाटत होत या सगळ्याच्या मागे अगदी भ्रष्टाचार वाढण्या मागे सुध्धा भारताची वाढणारी बेसुमार लोकसंख्या आहे. >>
युरो,
आधी कोंबडी की आधी अंडं !
भ्रष्टाचार वाढण्यामागे बेसुमार लोकसंख्या हे कारण आहे हा तुमचा मुद्दा मला मान्य.
पण लोकसंख्या बेसुमार का वाढतेय?
अनेक कारणे आहेत. त्यातली मला महत्वाची वाटणारी दोन कारणे -
१. गर्भनिरोधनासाठी उपलब्ध असणारी साधने आणि त्यांची योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही. शिकलेल्या लोकांमध्ये सुद्धा प्र चं ड गैरसमज आहेत ह्याबाबत. अशिक्षितांचं तर विचारायलाच नको.
२. धार्मिक समजूती - उदा- मुस्लिम धर्मात मुले ही 'अल्ला की देन' समजतात आणि त्यामुळे नो फॅमिली प्लॅनिंग. पण त्यातही असं दिसतं, शिकलेले, आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर असलेले मुस्लिमधर्मीय असं वागत नाहीत. लपून-छपून का होईना साधने वापरतात. चुकून गर्भ राहिला तर गर्भपात करवून घेतात.

अनिर्बंध मुले होण्याचा गरिबी, निरक्षरता ह्याच्याशी थेट संबंध आहे. सर्वात दु:खद गोष्ट म्हणजे आपल्या नेत्यांची 'वोटबँक' वाढत असल्याने त्यांच्याकडून हे थांबवायला फार प्रयत्न केले जात नाहीत.
फॅमिली प्लॅनिंगच्या साधनांचा प्रसार व्हावा म्हणून सरकार पैसा देतं. पण तो पैसा जातो कुठे? आजही खेडोपाड्यात (शहरातही) अनेक बायाबाप्यांना तांबी माहीत नाही. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय.

हे पटत नसेल तर तुमची बाजू मांडा.

<<असो पण केजरीवाल याना वाटत असेल तर बरोबरच असेल.>>
पुरे की. या आता तिरकस मोडातून बाहेर Happy

<<शिक्षणव्यवस्थेतील प्रश्न, महिलांवरील अत्याचार, महागाई, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, वाढतं नैराश्य,आत्महत्या,पावसाळी छत्र्यांसारखे उगवणारे बुवाबाबा, बाँबस्फोट, हॉस्पिटलची अवास्तव बिलं, बिनाडिग्रीचे धोकादायक डॉक्टर्स, मगरूर पोलिस, परकीयांची घुसखोरी, वाढत्या झोपडपट्ट्या...
या बोल्ड केलेल्या प्रश्नांच्या मागे भ्रष्टाचार नक्की कशाप्रकारे आहे?>>

नंदिनी,
१. महिलांवरील अत्याचार - सध्याचे नेते महिलांबाबत किती 'उच्च' विचार करतात ह्याविषयी मोदींच्या धाग्यावर अनेक उदाहरणे सापडतील.
तुम्हाला लिन्का वाचायला आवडत नाहीत हे आत्तापर्यंत कळलंय.पण वेळ मिळाल्यास उघडून बघा लिन्क.
For Rape Victims in India, Police Are Often Part of the Problem
त्यात लिहिलेलं चित्र तुमच्या आजूबाजूला नाही दिसत का तुम्हाला? मला दिसतं.

जानेवारीमध्ये दिल्लीमध्ये नेहा यादव नावाच्या स्त्रीला सासरच्या लोकांनी जाळलं. दोन दिवसांपूर्वी मेली ती. केजरीवाल रेल्वेमंत्रालयासमोर जी "नौटंकी" करत होते त्यात ह्या घटनेचाही संबंध होता.
"The day chief minister Arvind Kejriwal began his dharna outside Rail Bhavan, demanding that some policemen, including one dealing with an alleged dowry burning case in Sagarpur, be suspended, the victim, Neha, would have celebrated her 29th birthday. However, she was fighting for her life at Safdarjung Hospital with 45% burns.

Within 24 hours of the CM voicing his demand, Neha's mother-in-law, Sumitra, sister-in-law Reena and brother-in-law Rajbir were arrested from their hideout in Dwarka. The father-in-law, Abhay, is already in custody.

The crime took place eight days ago in Sagarpur's Indra Park in west Delhi. She would have been just another victim of dowry and domestic violence in police records had Delhi's women and child development minister, Rakhi Birla, not got involved. Neha's father, Virender Yadav, was at the protest site since Monday, asking for suspension of the Sagarpur SHO."
केजरीवालांची नौटंकी योग्य की अयोग्य हा वादाचा मुद्दा. पण पोलिसांकडून अशा घटनांमध्ये कडक कारवाई का केली जात नाही? कारवाई सोडा, गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्याला लक्ष घालावं लागतं? असले गुन्हे करणार्‍यांना जरब वाटावी अशी पोलिसव्यवस्था, न्यायव्यवस्था का नाहीये?
कारण पोलिस हप्ते गोळा करायचं काम करत असतात !
पण फक्त पोलिसांना दोष देऊन अजिबात उपयोग नाही. राजकारणी धेंडांनी वेठीला धरलंय त्यांना.

बरं, अगदी ताजी घटना. तुम्ही पत्रकार आहात. तनु शर्माबद्दल माहीत असेलच ना तुम्हाला? का दाबली जातेय ती केस? काही सांगू शकाल का?

२. बाँबस्फोट - मुंबई, मालेगाव इथे झालेले बाँबस्फोट करणार्‍या व्यक्ती देशात कशा घुसल्या बरं? शस्त्रास्त्रं कशी घुसतात देशात?
हावरट कस्टम्स ऑफिसर्सनी १९९३ चे बाँबस्फोट घडू दिले !
हे मी नाही म्हणत हं. सुप्रिम कोर्ट म्हणतंय. Greedy customs officials allowed blasts: SC
The Supreme Court on Thursday upheld the conviction and sentence of eight Mumbai policemen and five customs officials and said that but for their complicity in the conspiracy because of greed and corruption, the 1993 serial blasts could have been averted.

३. पावसाळी छत्र्यांसारखे उगवणारे बुवाबाबा - ह्यावर खरंतर काही लिहिण्याची गरजच नाही. पोलिस, राजकारणी ह्यांचा वरदहस्त असल्याशिवाय बाबाबुवांची अवघ्या काही वर्षांत कोट्यावधी रूपयांची मालमत्ता तयार होते का? रामदेवबाबांनी विकत घेतलेल्या स्कॉटिश बेटाबद्दल ऐकलं असेल ना?
आणि "बावले हो क्या? पैसे की बात यहां मत करो" चा व्हिडिओ पाहिलाय का?
कशाला मरमरून पोस्ट-ग्रॅज्युएशन करायचं ओ? बराय की हा व्यवसाय. २२० मिलियन डॉलर्सचं योगसाम्राज्य !
आणि ह्यात इतका फायदा आहे, राजकारण्यांचा हात पाठीवर आहे म्हटल्यावर एक जुने झाले की दुसरे बाबा अवतार घेतातच. लोक महागाई आणि दैनंदिन प्रश्नांना इतके त्रासले आहेत की बिचारे ते पण भजनी लागतात.

<<त्याखेरीज समलैंगिकता, नक्षलवाद, परराष्ट्रीय धोरण, दुष्काळ, पूरस्थिती, या सर्वांवर आपकडे काय उपाय आहेत?>>
( 'काहीही केलं तरी एक ना एक दिवस माणूस मरतोच' ह्या प्रश्नावर आपकडे काय उपाय आहे असं उद्या तुम्ही विचारू नये अशी आशा करते !)
पूरस्थिती, दुष्काळ ह्या नैसर्गिक आपत्ती आहेत. कधी येतील ते कुणी सांगू शकत नाही. पण दुर्दैवाने घडलंच तर आपत्तीग्रस्त लोकांना केलेली मदत त्यांच्यापर्यंत किती प्रमाणात पोहोचते ह्यावर लिहायला हवंय का? आपकडून हा प्रकार घडणार नाही (असं वाटतंय). घडला तर त्यांना खाली खेचायची पॉवर ते जनतेला देत आहेत. बाकीचे पक्ष ह्यासाठी तयार नाहीत.

समलैंगिकता ह्या विषयावर आपने आपलं मत आधीच स्पष्ट केलेलं आहे. आप ३७७ कलमाच्या विरुद्ध आहे.

"The Aam Aadmi party is disappointed with the judgment of the Supreme Court upholding the Section 377 of the IPC and reversing the landmark judgment of the Delhi High Court on the subject. The Supreme Court judgment thus criminalizes the personal behavior of consenting adults. All those who are born with or choose a different sexual orientation would thus be placed at the mercy of the police. This not only violates the human rights of such individuals, but goes against the liberal values of our Constitution, and the spirit of our times."

नक्षलवाद्यांबद्दल आज सकाळीच इब्लिस ह्यांनी मोदींच्या धाग्यावर तिरकस भाषेत पण नेमकं लिहिलंय. माझी त्यांच्या अप्रोचला सहमती. नक्षलवादी मुळात कोण आहेत? का आहेत? हा वेगळा आणि फार मोठा विषय आहे. इथे नको.
पण नक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचं समर्थन अजिबात होऊ शकत नाही. आपही करत नाही.

"In Chattisgarh such violent incidents are happening time and again. The Raman Singh's Government and the Centre, both have failed miserably to find a viable, feasible and long lasting solution to this menace. Naxalite problem is the result of these ineffective governments.
These Governments which are in neck–deep in corruption have looked the other way from the problems of tribal inhabitants,
which has resulted in these situations where hundreds of armed men attack in broad daylight to kill innocent people.
The life of our security personnel and common man is always at stake due to the lack of foresightedness and political willpower."

ही वाक्ये राजकारणी वाटू शकतील पण पटतात.

<<भ्रष्टाचार संपवणार म्हणजे नक्की काय करणार? आप कार्यकर्त्यांचा एक गोंडस समज असतो की जनलोकपाल आलं की संपलाच भ्रष्टाचार. जो पैसे खाईल त्याला डायरेक्ट घरीच पाठवायचं.
पण तसं होइल का? जनलोकपाल बिल "भ्रष्टाचार झाल्यावर (तसं सिद्ध झाल्यावर) कारवाई करणारी यंत्रणा आहे,मुळात एक घटनाबाह्य सत्ताकेंद्र प्र्स्थापित करणे आणि त्याला इतके अधिकार देणे हेच इतर पक्षांना मान्य नाही (आणि त्यांची कारणं बरोबर आहेत!!! ते पक्ष भ्रष्टाचारी असले तरी त्यामध्ये काही लोकांना लोकशाही काय आहे ते समजतं. आपवाले म्हनतात तसे सगळेच मूर्ख आणि पैसेखाऊ लोक नाहीत)
उद्या या जनलोकपालानंच भ्रष्टाचार केला तर काय करणार आहेत आप?>>

प्रत्येक वाक्यावर खूप लिहिता येईल. पण तेवढा वेळ नाही. एवढंच सांगा, तुमचा जनलोकपालबिलाला विरोध आहे का? आणि असेल तर का? भ्रष्टाचार रोखण्याचा दुसरा काय पर्याय आहे तुमच्याकडे?
वरची ठळक केलेली वाक्ये वाचून धक्का बसला. सवड मिळेल तेव्हा सध्याच्या पक्षांची कुठली कारणे तुम्हाला बरोबर वाटतात ह्यावर जरा सविस्तर लिहाल का?

तोवर आपची मते वाचा.
"Today a corruption case gets extended for years in our courts. In this time the corrupt politician is re-elected many times over to loot the nation. Many times accused politicians have died before being declared corrupt by the courts. Janlokpal Act will ensure that investigation of corruption charges and prosecution is done under fast tract conditions within 6 months. If found guilty the corrupt official shall serve appropriate jail time from 1 year to life, depending on the severity of the case, his or her property will be seized and he or she will be dismissed from job.

If our party’s government comes into existence, those found guilty of corruption charges in graft scandals in recent years will be jailed within six months. (नेत्यांकडून इतका विरोध होण्याचं खरं कारण !)

When a common man goes to an office, he is asked for a bribe. Under Janlokpal, every function of a government officer, the officer responsible and the time limit within which the work must be completed will be clearly defined. If the concerned officer doesn’t do the work within the stipulated time, Lokpal will penalize such officer, compensate the sufferer and get the work done in 30 days."

वेळेअभावी बरीच इंग्रजी वाक्ये तशीच इथे देतेय त्याबद्दल क्षमस्व. जमेल तेव्हा मराठीकरण करून पोस्ट संपादित करेन.

<<आता या प्रश्नाला उत्तर म्हणून हजारो लिंका फेकल्या जातील. "इतर पक्ष" कसे नालायक आहेत याचं गुणगान केलं जाईल. आणि आलचेकच स्वच्छ कॅरेक्टर असलाच। ठासून सांगित्लं जाईल.>>
Lol कठीण आहे. स्वतःचा मुद्दा मांडून त्याच्या समर्थनार्थ इतर ठिकाणच्या लिंका दिल्या तर त्यात काय बिघडलं कळत नाही. हायपरलिंक करतेय ना. लिंक नसेल वाचायची तर उघडू नका. हाकानाका.
बरं मग तुमच्या मते चर्चा किंवा वाद-विवाद कसे करतात?

"इतर पक्ष" नालायक आहेत हे तेच येता-जाता सिद्ध करत आहेत. अगदी पहिल्या पानावर तुम्ही लिहिलं होतं "बाँग्रेसम्धे (किंवा कुठल्याही पक्षामध्ये) निवडून येणार का? त्या मतदार संघामध्ये तुमची पत काय आहे? यावर तिकीट मिळते."
ह्या पार्श्वभूमीवर Ex-Karnataka CM caught on tape demanding bribe हे वाचून सकाळीच तुमची आठवण झाली होती.
"Defending his action Kumaraswamy told HT, “This is the bitter truth of present-day politics. I am not one of those leaders who say one thing on the face and do something else behind the scenes. It is not right to project me as a villain. The other parties have also done the same in these elections. I am ready to respond inside and outside the assembly.”
छान. प्रामाणिकपणाचे मार्क्स मात्र द्यायलाच पाहिजेत महोदयांना.

<<मिर्ची, हा धागा सुरू झाल्यापासुन मी तुमचे सर्व प्रतिसाद पाहिले, अत्यंत तिरकस प्रश्नांनासुध्दा तुम्ही न चिडता संयत प्रतिसाद दिलेत म्हणुन तुमचे मला फार कौतुक वाटते. >>
धन्यवाद Happy

<<परंतु दिल्लीच्या जनतेचा त्यांनी पुर्ण भ्रमनिरास केला आहे.>>
हा तुमचा भ्रम आहे ! दिल्लीची जनता आपच्याच मागे उभी आहे. एवढ्या मोठ्या सुनामीमध्ये आणि इतका निगेटिव प्रचार झालेला असतानासुद्धा आधीपेक्षा जास्त दिल्लीकरांनी आपला मते दिली आहेत.
मतं वाढूनही जागा का मिळाल्या नाहीत ह्यामागचं गणित क्लिष्ट आहे. गुगलून बघा. तुम्हाला समजलं तर मला पण सांगा समजावून.

हा तुमचा भ्रम आहे ! दिल्लीची जनता आपच्याच मागे उभी आहे. एवढ्या मोठ्या सुनामीमध्ये आणि इतका निगेटिव प्रचार झालेला असतानासुद्धा आधीपेक्षा जास्त दिल्लीकरांनी आपला मते दिली आहेत.
>>>
हाच निकष लावायचा झालं तर दिल्लीची जनता भाजपाच्या पाठीशी आहे, कारण त्यांचाही वोट शेअर वाढला आहे आणि जागाही जिंकले आहेत.

प्रश्न काँग्रेस किंवा भाजपा वाईट आहेत असा नाहिये, आपला सत्ता मिळूनही त्यांनी अपेक्षाभंग केला असा आहे. आपने ४९ दिवसात काही ठोस केलेले नाही. केले असल्यास दाखवून द्या. दुसर्यांवर बेलगाम आरोप केले म्हणजे तुम्ही एकदम स्वच्छ असा अर्थ होत नाही.

सिब्बल ह्यांची मालमत्ता २००४ मध्ये १५ कोटी होती, २००९ मध्ये ३१ कोटी झाली आणि २०१४ मध्ये थेट ११४ कोटींवर जाऊन धडकली. त्यांचं वार्षिक उत्पन्न ७७ लाख आहे, पत्नीचं वार्षिक उत्पन्न २८.७ लाख आहे. मग तीन वर्षांत मा५लमत्ता तिप्पट कशी झाली, वार्षिक उत्पन्नच जर १ कोटी असेल तर १६ लाख गुणिले १२ = १.९२ कोटी इतकं भाडं कसं देत असतील? >>>

१९९९ साली ज्या फ्लॅटची किंमत रु. ४ लाख होती, त्याची २००४ मधली किंमत रु. ५ लाख इतकी झाली, २००९ मधे तीच किंमत १६ लाख झाली तर आजच्या घडीला त्या फ्लॅटची किंमत ६० लाख रुपये आहे.

हे पुण्यातल्या खराडी जवळचं सांगतोय. दिल्लीतल्या प्रॉपर्टीच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत.

<<हाच निकष लावायचा झालं तर दिल्लीची जनता भाजपाच्या पाठीशी आहे, कारण त्यांचाही वोट शेअर वाढला आहे आणि जागाही जिंकले आहेत.>>

चिखल्या,
ती लोकसभा निवडणूक होती. देशभरात आप अजून मजबूत नाही, केंद्रात आप येणार नाही, त्यामुळे भाजपाला मत नाही दिलं तर काँग्रेस येईल हे न समजण्याइतकी दिल्लीची जनता खुळी आहे का?
विधानसभा निवडणूकीत भाजपाला बहुमत मिळणार नाही हे भाजपाला सुद्धा माहीत आहे. ते उघडपणे सांगत आहेत तसं आणि म्हणून निवडणूक टाळत आहेत.
Despite LS sweep, BJP sees Delhi polls as tall order
आमच्याकडे 'स्वच्छ प्रतिमेचे' नेते नाहीत, आमचे उमेदवार हे मुख्यतः बिल्डर्स आणि दलाल (पॉवर ब्रोकर्सना काय म्हणतात?) आहेत ही त्यांची कारणं.
While BJP, which fielded quite a few first-timers in the capital, won all the seven Lok Sabha seats in Delhi, the party sees it more as a mandate for 'Modi as PM' and feels the assembly polls will be a different ball game. Party leaders feel voters are unlikely to be driven by the Modi factor for the state polls.
घोडेबाजार करायचा तर अटीतटीने प्रयत्न झाला आहे. आपच्या आमदार बंदनाकुमारीने त्यांना आणि कुटुंबाला जीवे मारायची धमकी दिल्यावरही स्पष्ट सांगितलं "तुम्ही चुकीचा दरवाजा ठोठावला आहे. अनेक जण नोकर्‍या,घरदार सोडून आपसाठी काम करत आहेत, अशांसोबत मी गद्दारी करू शकत नाही" (प्राऊड ऑफ हर!)
वरील प्रसंग CCTV मध्ये रेकॉर्ड झाला आहे आणि ती रेकॉर्ड राष्ट्रपती आणि पोलिस दोघांना सबमिट केली आहे. त्यामुळे त्या खोटं बोलत नसतील असा विश्वास ठेवायला हरकत नाही.

<<आपने ४९ दिवसात काही ठोस केलेले नाही. केले असल्यास दाखवून द्या. दुसर्यांवर बेलगाम आरोप केले म्हणजे तुम्ही एकदम स्वच्छ असा अर्थ होत नाही.>>

आरोपांचे पुरावे आहेत भाऊ त्यांच्याकडे. गुन्हे दाखल करतायेत ते पुराव्याशिवाय का?
आपने ४९ दिवसांत काय केलंय हे एकदा सविस्तर लिहिते.
तोवर प्लीज ह्या चित्रावर आणि बातम्यांवर समाधान मानून घ्या.
What Kejriwal's govt achieved in its 49 days

2aap49.JPG

<< दिल्लीतल्या प्रॉपर्टीच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत.>>
आब्र,
बरं, मान्य करूया. त्यांनी दिलेल्या विवरणामध्ये प्रॉपर्टीज कधी घेतल्या ह्याच्या तारखा दिलेल्या नसल्याने काही बोलू शकत नाही.

वार्षिक उत्पन्न १ कोटी असताना सुमारे २ कोटी भाडं देऊन घर का घेतलं असावं ह्यावर तुमचं काय मत आहे?
आणि आता तर उत्पन्न कमी होणार. पगारपण नसेल ना. बचतीचा पैसा वापरून लोक घरभाडं भरतात का? माझ्या माहितीत असे लोक नाहीत.

महिंदरसिंग मटियाला, संजय पालिवाल आणि रंजु मिन्हास ह्या तीन लोकांना आपने पार्टीतून काढून टाकलं आहे. वॉच अहेड, हे लोक आता गरळ ओकायला सुरूवात करतील.
Individuals misusing party name

परवा गुगल हँगआऊटमध्ये सांगितलेली एक साधी टेस्ट पटली.
आपबद्दल, त्यातल्या खटकणार्‍या गोष्टींबद्दल कोणी तक्रार करत असेल तर अजिबात हरकत नाही. ती तक्रार वरपर्यंत पाठवा. नक्की विचार केला जाईल.
मात्र आप बेक्कार पार्टी आहे, म्हणून बीजेपी किंवा काँग्रेसमध्ये सामील व्हा असं जर कोणी सांगत असेल तर सावध व्हायची गरज आहे. आप ला पर्याय बाँग्रेस असूच शकत नाही !
(मला तर १००% पटलं, कारण 'आप' नहीं तो कोई नहीं :डोमा:)

AVAM - aap volunteers action munch नावाचं एक प्रकरण बोकाळलं होतं मध्ये. नंतर कळलं की आपविरोधक हा उद्योग करत आहेत. Lol

वार्षिक उत्पन्न १ कोटी असताना सुमारे २ कोटी भाडं देऊन घर का घेतलं असावं ह्यावर तुमचं काय मत आहे? >>

विवरणपत्र पाहीलंय का ?
भाडं कंपनी खर्च म्हणून दाखवलय का ?
मागच्या पोस्ट्स लक्षात नाहीत त्यामुळे कुणाबद्दल आहे हे लक्षात नाही. कपिल सिब्बल यांच्याबद्दल असेल तर इतकीधडधडीत चूक दिल्लीतला एक मोठा वकील करणार नाही असं तर्कट

<<विवरणपत्र पाहीलंय का ?भाडं कंपनी खर्च म्हणून दाखवलय का ?
मागच्या पोस्ट्स लक्षात नाहीत त्यामुळे कुणाबद्दल आहे हे लक्षात नाही. कपिल सिब्बल यांच्याबद्दल असेल तर इतकीधडधडीत चूक दिल्लीतला एक मोठा वकील करणार नाही असं तर्कट >>

विवरणपत्राची लिंक दिलीय. कुठली कंपनी खर्च करणार?
कपिल सिब्बलांच्या दरमहिना १६ लाख रूपये भाड्याच्या घरावरून विषय निघाला होता.
चूक छोटी असो की मोठी, सिद्ध होऊन शिक्षा होईपर्यंत इतकी वर्षे जातात की हल्ली कोणी घाबरत नाही असल्या चुका करायला.

मोदींनी नाही का इतकी वर्षे शपथेवर खोटी माहिती दिली...

Shanti Bhushan is the richest member of the committee with movable assets worth over Rs.111 crore and residential properties in Noida, Bangalore, Allahabad and farm land in Roorkee and Noida.

The eminent lawyer said his total income during the last ten years was over Rs.136 crore.

Read more at: http://indiatoday.intoday.in/story/anna-hazare-aides-declare-assets/1/13...

शांती भूषण यांनाही सोळा लाख भाडे परवडेल. सुप्रीम कोर्टातल्या वकिलांच्या उत्पन्नाचे आकडे असेच असावेत. कपिल सिब्बल यांच्यावर इतर टीका जरूर करा पण केवळ सोळा लाख ( ते ही व्हाईट) भाडे भरल्याबद्दल पिंजर्‍यात उभे नका करू.

सर्वच पक्ष चोर आहेत हे एका नव्या पक्षाने जाहीर केलं आहे. ज्या लोकप्रतिनिधींवर यापूर्वी कुठले ना कुठले आरोप झाले आहेत त्यांच्याविरुद्ध या नव्या पक्षाने आपले उमेदवार देण्याचे ठरवले आहे.

तुम्हाला कळलं का कुठली पार्टी ते ?

बनाना आदमी पार्टी

बनाना उर्फ केळे हे गरीब माणसाचे अन्न आहे. गरीब माणसाला आम परवडत नाही, पण केळंही महाग होत चालल्याने तो वैतागला आहे. केळ्याचे भाव का वाढताहेत हे पाहताना सगळेच चोर असल्याचं आम्हाला जाणवलं. म्हणूनच गरीब आदमी तर्फे निवडणूक लढवण्यासाठी बनाना आदमी पार्टीची स्थापना करण्यात आली. पार्टीचं हेडक्वार्टर जळगाव इथं आहे. तिथून स्वस्तात केळं आणून गरीब आदमीला देण्याचा पार्टीचा प्रयत्न धनदांडग्यांनी हाणून पाडला.

आज गरीबांचा खायला अन्न नाही, नेसायला वस्त्र नाही, पोरी बाळी आपले अंग झाकू शकत नाहीत. ही शरमेची बाब आहे. तशाच अवस्थेत त्यांना कामावर जावे लागते.
म्हणूनच आम्ही व्यवस्था बदलवण्यासाठी या पिचलेल्या ललनांना या दांडग्यांविरुद्ध उभे करण्याचे ठरवलेले आहे. आमची पहिली यादी खालीलप्रमाणे

१. अमेठी - चाहुल चांदी यांच्या विरोधात पूनम पांडे
२. अहमदाबाद - सरेण्डर गोदींच्या विरुद्ध सनीताई लहाने
३. बारामती - वरद गवार यांच्याविरोधात राखी सावंत
४. नागपूर - यतीन झडकरी व गंजली रमानिया यांच्या विरोधात तनिषा चोप्रा (कामसूत्र थ्री डी फेम )
५. दिल्ली - अर्नोल्ड सब्रवॉल यांच्या विरोधात निरुपा रॉय

अर्नोल्डजींना संस्कारी चाचा परलोकनाथ यांचे आशिर्वाद प्राप्त असल्याने पिचलेल्या लोकांची देवी अर्थात निरुपाय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पार्टीमधे सर्वच गरीब असल्याने अनु. क्र. १ ते ४ या उमेदवारांचे प्रचार तिकीट लावून केले जातील. याखेरील मल्लिकाकाकू शेरावत, योगिनीताई दांडेकर यांच्या नावाचा विचार चालू आहे. पुण्यातून उमेदवारी साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी इच्छुकांनी पार्टीचे समन्वयक श्री ......................... यांचेशी संपर्क साधावा.

लक्षात ठेवा
बनाना आदमी पार्टी
खूण - केळं

( गुर्जींच्या वॉलवरून साभार )

<< The eminent lawyer said his total income during the last ten years was over Rs. 136 crore>>
म्हणजे वर्षाला साधारण १३ कोटी रूपये उत्पन्न. मग १११ कोटीची प्रॉपर्टी असू शकते ना.
सिब्बल ह्यांनी वार्षिक उत्पन्न ७७ लाख दाखवलं आहे. मग ११४ कोटीची प्रॉपर्टी ?

दोन्हीमध्ये किती ठळक फरक आहे. नाहीये का ?

आब्र, काय कळलं नाही.

@ मिर्ची

जोपर्यंत त्यांच्या वकिली फर्मचे की वैयक्तिक रिटर्न्स हे समजत नाही तोपर्यंत काहीच अंदाज करता येत नाही.
मी सिब्बलांचा वकील नाही.

Pages