बसपा, रा काँ पा, भा क पा या सारख्या राष्ट्रीय पक्षांची मान्यता रद्द ??

Submitted by शेखर-नंद्या on 30 June, 2014 - 05:17

२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या, बर्याच तथाकथीत राष्ट्रीय पक्षाची मान्यता निवडणुक आयोग काढून घेणार असल्याच समजतय !!

निवडणुक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या सारख्या
पक्षाची राष्ट्रीय मान्यता काढून घेणार आहे. याचा अर्थ येत्या वर्षात निवड णुकीच्या रींगणात फक्त तीन पक्ष
उरतील. ते म्हणजे, भाजप, काँग्रेस आणि सीपीआएम.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सहा, भाकपाला एक जागा मिळाली तर बसपाला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळेच हे पक्ष गोत्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने एखाद्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा बहाल करण्यासाठी काही अटी निश्चित केलेल्या आहेत. त्यानुसार देशातील कोणत्याही चार राज्यांमध्ये कमीत कमी ६ टक्के मते वा लोकसभेच्या तीन चतुर्थांश जागांवर २ टक्के मतं मिळवण्याची आवश्यकता आहे. चार राज्यांमध्ये राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा असल्यासही राष्ट्रीय दर्जा अबाधित राहतो. या सर्वच निकशांमधून राष्ट्रवादी, बसपा आणि भाकप हे तिन्ही पक्ष लोकसभेतील मोठ्या पराभवामुळे बाद झाले आहेत.

निवडणूक आयोगाने या पक्षांना नोटिस बजावून म्हणणे मांडण्यासाठी २७ जूनची मुदत दिली होती. ही मुदत तीन दिवसांपूर्वीच संपली असून आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो यावर या तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय मान्यतेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. या तीन पक्षांची राष्ट्रीय मान्यता संपुष्टात आल्यास भाजप, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआयएम) हे तीनच पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून उरणार आहेत.

जर असे घडले तर त्याचा भारतीय राजकारणावर काय परीणाम होईल ?

बरेच पक्ष हे स्थानिक राज्यातील पक्ष बनुन रहातील, उदा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बसपा वैगेरे

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/India-may-be-left-with-onl...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या धाग्याला दहा प्रतिसाददेखील आले नाहीत. तुमचीही मान्यता काढुन घ्यावी

सत्ताभिलाषेने मूळ पक्षापासून फुटून स्वतंत्र चूल मांडणार्‍यांना अनेक वर्षे सत्ता चाखता आली. स्थानिक पातळीवर थेटपणे आणि केंद्रात एक कुबडी म्हणून! भाजपलाटेत ते वाहून गेलेले आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द होण्याची प्रक्रिया, त्यावर होऊ शकणारे दावे-प्रतिदावे हे सर्व क्लिष्ट व दीर्घकाळ चालू शकेल असे आहे.

पण एक प्रकारे असे झाले तर बरेच होईल.

ह्याचा राजकारणावर परिणामः

१. केंद्रात हे पक्ष ज्यांच्या कुबड्या बनायचे त्यांची साथ आता हे पक्ष बहुतेक सोडून देतील. राष्ट्रीय पातळीवर अस्तित्वच नाही आहे म्हंटल्यावर स्थानिक राजकारणात खासदार निवडून आले तरी अशी किती पदे मिळणार? (तेही ज्यांना कुबडी द्यायची त्यांना बरीच जास्त मते पडली तर)

२. मुजोरी वाढेल. ह्याचे कारण पक्षामधील रग तीच राहील पण कार्यपरिघ आकुंचित होईल. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षापक्षांमध्ये भीषण राजकारणे खेळली जातील. (ह्याला थोडा वेळ लागेल)

३. भारतीत मतदाराला लोकसभेच्या मतदानाच्या वेळी डोळ्यासमोर एक स्वच्छ चित्र ठेवता येऊ लागेल. आपले मत आपण कोणाला देत आहोत हे माहीत असायचे पण कोण कोणाशी हातमिळवणी करून सरकार स्थापेल हे 'काहीवेळा' माहीत नसायचे. आता त्या गोष्टीचा अंदाज अधिक लावता येईल.

४. ह्या पक्षांतर्फे जे नेते केंद्रसरकारात पाठवले जाणार होते तेही आता स्थानिक गर्दीत उडी घेणार असल्याने अंतर्गत स्पर्धा व अंतर्गत कलह ह्यांना ऊत येईल.

५. मूळ पक्षापासून फुटून वेगळी चूल मांडण्याची प्रक्रिया अकस्मात बंद पडेल व ती प्रक्रिया आता 'रिव्हर्स' होऊ लागेल, म्हणजे बरेच वर्षांपूर्वी फुटलेले आता हळूहळू पुन्हा मूळ पक्षात किंवा वेगळ्या पक्षात जाण्याचे मनसुबे रचू लागतील.

असे व आणखीन काही परिणाम होतील असे वाटते.

ल गो,

तुमच्या ड्यु आयड्याना तर अ‍ॅडमीनचीच मान्यता नसते तरी ईथे फिरत असताच ना ?

रच्चाकने, तुम्ही लिहीलेल्या ६ पैकी ३ धाग्याला २ पेक्षा जास्त प्रतीसाद आले नाही हे तुम्ही सोईस्कर रित्या ईसरलात, जमोप्या.

तुमची जीत्याची खोड जाणार नाही.

स्वता: नागडे पण दुसर्यावर आक्षेप घेताहेत.

आँ ! मान्यता नसते? मग ते आय्डी फिरत कसे असतात?

तुमच्या आयडीना प्रशासनाने ताम्रपत्र देउन सत्कार केलाय की काय?

सर्वात मोठा धोका हा आहे की,

अजुन विरोधीपक्ष नेता निवडलेला नाही.

काँग्रेसचा नेता असु शकत नाही कारण त्यांना १०% पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत.

मग आता कोण होणार विरोधी पक्ष नेता ?

मायबोली वरुनच उमेदवार निवडायला लागणार !!

ईथे बरेच मोदी विरोधक आहेत , पाहु या कोण ईंटरेस्टेड आहे.

ल गो

तुमच्या धाग्याना दोन पेक्षाही जास्त प्रतिसाद आलेले नाहीत मग चला तुमचा पण सत्कारच करुया

चपला हारांनी !!

:G:-G:खोखो:
:G:-G:खोखो:
:G:-G:खोखो:

विरोधी पक्षनेत्याची गरज काय आहे? कॉम्ग्रेसच्या सगळ्या योजनाना पूर्वी भाजपाने विरोध केला होता. अता ते स्वतः त्याच योजना आणत आहेत.

त्यांच्याच पूर्वीच्या पोस्ट, फेसबुकवरच्या पोस्टी, ट्विट त्याना कुणीतरी पाठवलं की झालं.

विरोधी पक्षनेत्याची गरज काय आहे नै का?

तुमच्या तोंडात. साखर पडो जोशीबुवा!

हिंदु धर्मातलं पब्लिक ज्याला जोड्याने मारतं , हजार वर्शानंतर लोक त्याचेच देऊळ बांधतात .

तुम्ही मला जोड्याने हाणा. पण उद्या तुमचा खापरपणतु माझ्या देवळासमोर रांगेत उभा राहील.

Proud

लगो,

तुमचा खापर पंजोबा सोमनाथ देवळाच्या शुद्दीकरणाला गेलता अस तुम्ही ईथच जाहीर केल होत !!

त्यांचाच पणतु, तुम्ही काय करता आहात आणि तुमची हिंदु धर्माबद्दलच्या धारणा जग जाहीर आहे,

तरी बर तुम्ही माझा खापरपणतु आस्तिक असावा अस तरी म्हणताहात,

काँग्रेसला विरोधीपक्ष नेता मिळावा म्हणुन नियम बदलावेत आणि त्यासाठी भाजपाने प्रयत्न करावेत

अस दिग्विजय ने सुचवलय !!

दिग्विजय : तु सी ग्रेट हो.

:हहगलो::हहगलो::हहगलो:

>>काँग्रेसला विरोधीपक्ष नेता मिळावा म्हणुन नियम बदलावेत आणि त्यासाठी भाजपाने प्रयत्न करावेत Lol

मुद्द्याला धरून बोला हो, बास झाली नेहेमीची भांडणे, हे सर्वांनाच उद्देशून आहे. नाही तर परत यायचे माझ्यावर हल्ला करायला. Angry

पक्षाची मान्यता रद्द झाल्यानंतर पुन्हा मान्यता मिळण्यासाठी काय करावे लागते ? निवडणूकीशिवाय पर्याय नाही का काही ?

धागा सुरु केल्या पासुन मुद्द्यालाधरुन ज्या पोस्टी आल्यात त्याच्या विरुद्द बाजुने एकतरी आलीय का ?

इथे ज्यांना विरोध करायचा आहे त्यांना विरोध त्या सदस्याचा करायचा आहे मुद्द्याचा नाही हे लक्षात घ्या, अन्यथा

त्या लगोने दिल्यासारख्या पोस्टी आल्याच नसत्या.

पक्षाची मान्यता आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.या सर्व पक्षाच्या इलेक्शन कमिशनने दिलेल्या मान्यता , आणि नोंदणी अजून शाबूत आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता असलेल्या पक्षाचे चिन्ह देशभर राखीव चिन्ह ठेवले जाते. उदा. राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह राष्ट्रीय पक्श असताना कोणत्याही राज्यात अगदी ग्रामपंचायतीलाही अधिकृत उमेदवाराशिवाय निवडता येत नव्हते. आता राष्ट्रीय पक्श म्हणून मान्यता रद्द झाल्यास. ते इतर राज्यात कोणालाही उपलब्ध होईल. तसेच मतपत्रिकेत (यंत्रावर ) यादी चा अनुक्रम अकारविल्हे लावताना प्रथम राष्ट्रीय पक्श, प्रादेशिक पक्ष, मान्यता असलेले व नोंदणी केलेले पक्ष, केवळ नोंदणी केलेले पक्ष आणि अपक्ष बाजारबुणगे असा क्रम असतो. चिन्ह ही पक्षाची ओळख आणि अस्मिता असते. तसेच मतदान काळातप्निवडणूक आयोगाकडून मिळणार्‍या सुविधा बाबत वरील क्रम अवलंबण्यात येतो. उद्या राष्ट्रवादीने बिहारात घड्याळ मागितले आणि ते आधीच कोणी क्लेम केले असेल तर लॉट पडतील.मात्र महाराष्ट्रात घड्याळ राष्ट्रवादीला राखीवच राहील.