शक्य तिथे आणि तेवढी काटकसर

Submitted by हर्ट on 19 January, 2010 - 04:46

मी माझे पुर्वीचे दिवस जे अत्यंत काटकसरीचे होते त्यांची जर आजच्या दिवसांशी तुलना करुन पाहिली तर माझी मला खूपच लाज वाटते! काटकसरीची जी सवय चांगली होती ती जशी जशी प्रगती होत गेली तशी तशी मागे पडत गेली. हल्ली प्रवास, कपडे, ग्रंथालयाचे दंड, विजेचे-पाण्याचे बील, खाणे-पिणे कुठेच मला कपात करता येत नाहीये. पुर्वी बस साठी मी तासंतास ताटकाळत उभा असायचे. हल्ली बस येत नाही आली तर इतर पर्याय मला असतात. हीच गत अनेक माझ्यासोबतच्या मित्रांची आहे. काटकसर ही फक्त पैशाचीच असते असे नाही. जी कुठली गोष्ट जास्त खर्च होते.. नि वाया जाते तिथे तिथे आपण काटकसर करू शकतो.

तुम्ही जी काटकसर पुर्वी करायचे आणि आत्ता करता त्याबद्दल इथे नीट लिहा. कदाचित इथे उधळपट्टी करणारे भानावर येतील!!!!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिरा हुड प्रयोग Rofl

शब्दांची, खाण्यापिण्याची काटकसर करायला शिकायला हवे आता. जैन धर्मात एकभुक्त राहतात तसे.
महागाई काय बोकाळलिय??????

मामी नविन सेल्स डीपार्ट. का? Lol

काल अमुल चीज स्लाइस आणले खूप दिवसांनी. किंमत पाहिली तर ७५ रु. २०० ग्रॅ. अग बाबौ आता कद्दी नाय आननार. हौसाक्का शप्पत.

रोजच्या खाण्यात तेल, तुप, मिठ आणि साखर याचि थोडि जरि काटकसर केलि (थोडे कमि वापरले) तर तब्येतिसाठि सेव्हिंग होते.

<<आपल्याला एकाआड एक दिवस दाढी घोटावी लागते (अन्यथा देवदास झालाय का, नोकरी गेली का, आजारी आहात का, गालावर काही रोग झालाय का, पारायण चालू आहे का इ. प्रश्न ऐकावे लागतात. बायकोही तुच्छतेने वागवते ते वेगळेच>>

अगदी अगदी. आम्हा बायकान्चे "टीकली': च्या बाबतित असेच होते.एक दिवस थोडा वेळ जरी "टीकली" कपाळावर दिसलि नाही. तरी जास्त ओळखीची + कमी ओळखीची माणस लाम्बुनच कपाळाकडे बोट दाखवुन प्रश्नार्थक हात हलवतात.
अरे एक दिवस सुद्धा आम्ही "टीकली" ची काट्कसर करायची नाहि कि काय?
नाहितरी "टीकली" ची पाकिट घेण्यात महिन्याकाठी बराच खर्च होतो.हा हा हा

.

किंमत पाहिली तर ७५ रु. २०० ग्रॅ.

काय सांगता मामी?????.. मी फक्त लेक इथे असते तेव्हाच घेते.. त्यामुळे लेटेस्ट किंमत माहित नाही हो..... हल्ली डिमार्ट मध्ये गेले की फक्त चक्कर येऊन पडायचेच बाकी असते.

मागे एकदा असेच लेकीला शॉपिंग करायचे होते. डव शांपु, फेसवॉश इ.इ. नेहमीचेच यशस्वी घटक सगळे घेतले. शेवटी एक लिपगार्ड दिसले तेही घेतले. मग बिल आले रु. १२००... लगेच लिपगार्ड ची किंमत पाहिली निविया १० का २० ग्रॅम - रु.१२५ फक्त. आम्ही दोघीही टकामका एकमेकांकडे पाहत बसलो. आता घेतलेली वस्तु परत कशी देणार??? Proud

हल्ली सुपरमार्केट मध्ये जाणे सोडलेय, खिशात क्रेडिट कार्ड ठेवायचे पण बंद केले. लगेच न लागणा-या ब-याच वस्तु घरात येणे थोडे थांबलेय त्यामुळे...

अगदी अगदी. आम्हा बायकान्चे "टीकली': च्या बाबतित असेच होते>>>>अगदी अगदी. माझा नवरा मला नेहमी म्हणतो बाथरुमच्या भिंतींना, कपाटाला सौभाग्य देतेस तु.

मामी मोरारजी काय म्हणतोय बघाना. शिवाम्बू पिल्यासारखा काय बोलतोय?>> मला हौसेने वेड लागणार.
टिकली महागच पडते. ती गंधाची बाट्ली आणायची. एक महिना जाते. नाहीतर स्त्रीवादी वाक्य फेकायचे. समोरचा गार.
साधना हो गे. मला असे स्टिकर शॉक बसतात नेहमीच.

साबणाचे छोटे तुकडे पाण्यात भिजिवले तर त्याचा एक द्राव तयार होतो. तो बाट्लीत भरला तर त्याचा कामचलाउ हॅन्ड वॉश होतो. ( हे माझे लहान पणचे दुपारचे खेळ पैकी एक आहे)

शांपू ची बाट्ली अर्धी झाली की त्यात पाणी भरायचे व परत फुल करायचे. ( च्च शेम ऑन मी)

>>>>> शांपू ची बाट्ली अर्धी झाली की त्यात पाणी भरायचे व परत फुल करायचे. ( च्च शेम ऑन मी)
द्याट्स व्हेर्री गुड! बरीच वर्षे हा नियम एकाच बाटलीवर सलग पाळत असाल ना? Proud

मामी पर त्या शाम्पुला पैसा घालण्यापरीस रिठ शिकाकाई आणा अन ठेचुन भिजवा आन तेवड्याच पैश्यात वरीसभर डोस्क धुवा , ह्याला म्हणत्यात काट कसर .

.

दाजीबा, चान्गला उपाय सान्गितलात हा!
नशिब अस नाही कुणी सान्गते की 'बॉयकट' करा म्हणजे केस धुण्याचे झन्झटच सम्पेल Lol

एलटी राव , बॉय्कट करण्या परीस मग तिरुपतीला जाऊन यायचं , तेवढच देवदर्शन बी व्हईल अन चमन गोटा बी व्हईल .
हौसा गिन्यान वाटल्यान आपलं काय बी नुक्सान व्हणार नाय उलट समद्या मायबोलीकरांचा आशिर्वादच लागलं .

चला जातो उसाला पाणी सोडलया . शेतगडी लय कामचुकार *** ची हायेत , त्यांच्या माग टिपरु घेऊन लागलं तरच काम करत्यात .

.

मी अजुन ही काटकसर करतो. सकाळी जाग आली की प्रथम फ्रीजमधुन दूध बाहेर काढुन थेवुन दात वगैरे सुरु होते.जेव्हा मी ड्रॉईंब रुम मधे असतो तेव्हा इतर खोल्यातील लाईट आ ठवणीने बंद करतो. पेपर मधिल हँड्बील काढून रद्दि मधे टाकतो. सिग्नलला वेळ असेल तर गाडी बंद करतो. आंणि शक्य असेल तेव्हा सीएफल बल्ब वापरतो. एव ढ जरी केलं तरी खुप पैसे वाचतात.
मोठी खरेदि करण्यापुर्वी मी मार्केट सर्व्हे करतो. दुकानदाराला ऑफर्र देतो. मी एक वस्तु घेणार आहे. पण चांगली ऑफर दिलीस तर आणखी १०गिर्हाएइक देईन. कधी कधी चांगली ऑफर मिळते कधि नाहि.

सीएफल बल्बने खूप खर्च वाचतो. आमच्याकडचा एक बल्ब तर गेली तीन वर्ष मस्त चालतोय. बाकीचे कधी आणले होते आठवत नाही Happy

>>सिग्नलला वेळ असेल तर गाडी बंद करतो.
अगदी, अगदी. आजकाल अनेक ठिकाणी सिग्नल बदलायला किती सेकंद उरले आहेत त्याचे आकडे दाखवले जातात. त्यात वीस ते पंचवीस पेक्षा जास्त सेकंद दिसत असल्यास गाडी बंद करावी व ३-५ सेकंद उरलेले असताना पुन्हा सुरू करावी.

वा! मस्त माहिती मिळाली. मी पण काटकसरीचा प्रयत्न करतो. जमतेच असे नाही. पण शक्य असेल तेव्हा दिवे लावत नाही. त्वरेने दिवे बंद करतो. कोणतेही ब्रांडेड कपडे शक्य तो घेत नाही Happy

इतक्यातच पेट्रोल वर चालणारी गाडी बदलून एल पी जी केली आहे. (पण वाचलेले पैसे कुठे गेले ते कळलेच नाही हा! Lol ) गाडी नवीन घेणे असतांना जुनीच वापरतो आहे. अनेक कामे घरीच करतो. एक मोठा चार मिटर गुणिले सात मिटर असा लाकडी डेक घरीच बनवला. त्यामुळे मजुरी वाचली. शिवाय सुतार कामाची अनेक हत्यारे आली ती कुठे कुठे वापरात येतात. यासाठी काही संशोधन करावे लागले पण अनेक नवीन गोष्टी समजल्या. (बनवायला मजा आली ते वेगळेच! Happy )

अश्विनीमामी मी पण हात धुण्याच्या साबणाची अर्धी बाटली झाली की त्यात पाणी मिसळतो. Lol
पण आता तेच योग्य आहे असे वाटते. खूप चिकट दाट साबण हातावरून काढायला अजूनच पाणी लागते. त्या ऐवजी पातळसर साबण असेल तर लवकर स्वच्छ होतात असे वाटते.

शक्य असेल आणि कंटाळा घालवूच शकलो तेथे सायकल वापरतो, नाही तर पायी जातो.
घरच्या घरी भाजीपाला उगवण्याची इच्छा आहे पण काही जमत नाहीये. (ऑर्गॅनिक भाजी फारच महाग पडते Sad .)

तु प्रश्ण विचारण्यात व नवे नवे बीबी उघडण्यात काटकसर करण्याची सुरवात कर बघू! बराच वेळा वाचेल तुझा व इतरांचा... Proud Light 1 घे रे!

ग्रुपोन, रेस्तॉरंट डोट कॉम वैगेरे साईट्स वापरुन काट्छाट उत्तम जमवता येते ... सेल, डिस्काऊंट वैगेरे वर लक्ष ठेवल्यास त्याचाही य उपयोग होतो. इंपल्स बाय करूच नये...

चहा कॉफी पिणंच बंद करा. आरोग्य अन पैसे दोन्ही वाचतील Happy शिवाय गॅस, साखर, दुध पण वाचेल Wink

चांगला आहे हा बीबी..पण कुणी विशेष काही उपाय लिहिले नाहीयेत, असं का?

काटकसरीविषयी काही (लीन) मॅनेजमेंट फंडे:
वेस्ट (waste) ७ प्रकारचे असु शकते- Transportation, Inventory, Motion, Waiting, Overproduction, Over-Processing and Defects.
कुठलीही गोष्ट बनवताना/करताना विचार करायचा की यातून कुठल्या प्रकारचे वेस्ट आपण निर्माण करणार आहे. जर ते वेस्ट पुर्णपणे एलिमिनेट करता येणार नसेल तर ते शक्यतो कमीतकमी करायचा प्रयत्न करायचा. तसंच ज्या प्रकारचं वेस्ट निर्माण होणार असेल त्यापासुन दुसरं काहीतरी उपयोगी बनु शकतं का ह्याचा आधीच विचार करायचा. जर तसं शक्य असेल तर निर्माण होणार्‍या वेस्टची क्वालिटी अशी असायला हवी की ज्यातनं खरंच काहीतरी उपयोगी होऊ शकेल. आपल्याला काय वाचवायचंय ह्याची प्रायोरिटी आधीच ठरवायला हवी.
आपल्याकडे काय भरपूर आहे अन ते वाया गेल्म तरी चालतं अन काय लिमिटेड असल्यामुळे वाचवायचंय हे स्वतःला माहीत हवं. सगळे वेळ वाचवताय म्हणून पेन्शनर माणसाने वेळ वाचवून फायदा नाही. किंवा पेन्शनर माणसासारखे पैसे वाचवून वेळ खर्च करणं नोकरदारांना शक्य नाही. एक मात्र नक्की, एकाच वेळी तुम्ही वेळ, पैसा, श्रम, व्हॅल्यु सगळं काही नाही वाचवू शकत. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है म्हणतात ते हेच.

ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वयंपाकघरात अति-उपयोगी आहेत. (बर्‍याचदा हे लीन फंडे माहीत नसुनही ते आपण वापरत अस्तोच.)
उदा. कुठलीही उसळ करताना आपण ज्या पाण्यात ते कडधान्य भिजवलं असतं ते पाणी फेकुन न देता शिजवण्यासाठी वापरलं तर कडधान्यातले जे न्युट्रीएंट्स पाण्यात जातात, ते आपल्याला मिळतील. पण ते पाणी वापरण्याजोगं असण्यासाठी आधी कडधान्य व्यवस्थित धुवून मग त्यात भिजवायला पाहिजे. मग हे जे पाणी आहे तेच शिजवायला वापरलं तरी ते पुर्णपणे संपत नाही. त्या शिजवलेल्या पाण्याला अजुन कुठल्यातरी भाजीत/आमटीत घालत येतं. अर्थात ते पाणी संपवण्यासाठी दुसरा पदार्थ बनवायचा असं नाही Wink पण दुसरा कुठला बनवणार असु तर त्यात वापरायचं किंवा असाच पदार्थ बनवायचा ज्यात ते वापरल्या जाईल. (हे माझ्या बाईला अनेकदा शिकवूनही काही फायदा नाही).

कपडे धुताना जे वॉ.म. मधून डिटर्जंटचं पाणी येतं त्यानी वॉशिंग प्लेस चांगली स्वच्छ धुतली जाते. (अर्थात त्यासाठी त्यात टाकलेले कपडे अगदी वाईट्ट मळलेले नसले तर Wink )

हे असं भारी काहीतरी लिहिल्यामुळे मी फार नीटनेटकी आहे अशी माझी इमेज होत असली तरी प्रत्यक्षात कहानी कुछ और है! Wink

मस्त

Pages