आलु का शाग (फोटो सहीत)

Submitted by सायु on 18 June, 2014 - 08:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे : ५ किंवा ६
टोमाटो : १ चिरलेला
दही : १/२ वाटी
धणे पुड : दोन चमचे (चहाचे)
तेल : एक पळी
मीठ, हळद, ति़खट, मोहरी, जिरं अंदाजे..

क्रमवार पाककृती: 

उकडलेले बटाटे सोलुन, नेहमीच्या भाजीला कापतो तसेच कापुन घ्यायचे,
फक्त त्यातला एक बटाटा कुसकरुन घ्यायचा..
आता कढई मधे एक पळी तेल गरम करुन त्यात जिरं मोहरी तडकली की हळद, ति़खट घालायचं,
लगेच चिरलेला टोमाटो घालायचा, वाफ काढुन घ्यायची, तेल सुटायला लागल की अर्धी वाटी दही
घालायचे, दोन चमचे धणे पुड घालुन परत ५ मी. झाकण ठेवा... आता अंदाजाने पाणी घाला,साधारण
दिड ते दोन वाटया, मीठ घालुन उकळी येऊ द्या.. बटाट्याचे काप घाला.. ३, ४ मीनीटांनी कुसकरलेला बटाटा
घाला, ५ मी. झाकण ठेवा.. बारीक कोथींबीर घालुन सर्व्ह करा...

आलु का शाग आणि पुरी हे उत्तम कोंबीनेशन आहे... मुलांना ही भाजी खुप आवडते....

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जण
अधिक टिपा: 

आमच्या कडे तस हे कोम्बीनेशन ऑल टाईम हीट आहे. पण जर तुम्ही वर्कींग वुमन असाल आणि गणपती / नवरात्रात जर बच्चा कंपनी ला जेवायला बोलवत असाल तर हा मेनु खुप सोपा पडतो.. शिवाय मुलं
आवडीने खातात...

माहितीचा स्रोत: 
जिवलग मैत्रीण, नमिता व्यास.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बटाटे माझे ऑल टाईम फेव्हरेट आणि हा पदार्थ मी नागपुरला सिताबर्डीमध्ये एक गुजराती थाळीचे भोजनालय आहे तिथे चांगलाच ओरपलाय लई भारी चव असते बघा. आपण पाककृती दिलेली आहे त्यामुळे लवकरच घरी आंबट दही घालुनच बनविण्यात येईल. पाककृती बद्दल मंडळ आपले आभारी आहे.

मी केलं काल रात्री आलू का साग, अत्यंत चवीष्ट प्रकार आहे. आता वरचेवर होईल ही रसभाजी, थँक्यु गं सायली Happy
फोटो काढलाय, अपलोड होत नाहिये. प्रयत्न करतेय टाकायचा.

मी करते अशी भाजी दही वगळून. टमाटा पेस्ट टाकते आणि वेळ असेल तर कांद्याची पण पेस्ट टाकते. टमाटा+दही खुप आंबट नाही ना होणार.

थँक्यु गं फोटोसाठी Happy

पिंकी, मी ताजं गोड दही घातलं त्यामुळे आंबट झाली नाही. सायलीनं आंबट दही सांगितलं होतं, त्यामुळे होण्याची शक्यता असेल...
गरम तुपभाताशी मजा आली भाजीची. मी नुसतीही थोडी ओरपली. पावसाळी हवेत सुपला अ‍ॅडिशनल पर्याय मिळाला.

नाव वाचून सरसों का साग प्रमाणे ग्रेव्ही असेल वाटले होते, पण ही तर करी आहे, कधीतरी घरी कादां- टोमॅटो-बटाटा चा रस्सा खावा लागतो, त्याएवजी ट्राय करेन Happy

मी आज केला हा शाग बरका. सगळ्यांना फारच आवडला. मला अजुनच आवडला कारण सोप आणि चवीश्ट.

काल रात्री केला होता हा प्रकार. चविष्ट, सोपा व झटपट होणारा. फोडणीत तिखट आणि नंतर दही+धणेपूड असे मिक्स्चर घातल्यावर जो काही खकाणा उडला त्यात गृहसदस्यांनी तीन-तीनदा शिंकून घेतले!! Lol

हा आलू शाक/ग चा फोटू :

aaloo shaak2.jpg

Pages