मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे : ५ किंवा ६
टोमाटो : १ चिरलेला
दही : १/२ वाटी
धणे पुड : दोन चमचे (चहाचे)
तेल : एक पळी
मीठ, हळद, ति़खट, मोहरी, जिरं अंदाजे..
उकडलेले बटाटे सोलुन, नेहमीच्या भाजीला कापतो तसेच कापुन घ्यायचे,
फक्त त्यातला एक बटाटा कुसकरुन घ्यायचा..
आता कढई मधे एक पळी तेल गरम करुन त्यात जिरं मोहरी तडकली की हळद, ति़खट घालायचं,
लगेच चिरलेला टोमाटो घालायचा, वाफ काढुन घ्यायची, तेल सुटायला लागल की अर्धी वाटी दही
घालायचे, दोन चमचे धणे पुड घालुन परत ५ मी. झाकण ठेवा... आता अंदाजाने पाणी घाला,साधारण
दिड ते दोन वाटया, मीठ घालुन उकळी येऊ द्या.. बटाट्याचे काप घाला.. ३, ४ मीनीटांनी कुसकरलेला बटाटा
घाला, ५ मी. झाकण ठेवा.. बारीक कोथींबीर घालुन सर्व्ह करा...
आलु का शाग आणि पुरी हे उत्तम कोंबीनेशन आहे... मुलांना ही भाजी खुप आवडते....
आमच्या कडे तस हे कोम्बीनेशन ऑल टाईम हीट आहे. पण जर तुम्ही वर्कींग वुमन असाल आणि गणपती / नवरात्रात जर बच्चा कंपनी ला जेवायला बोलवत असाल तर हा मेनु खुप सोपा पडतो.. शिवाय मुलं
आवडीने खातात...
छान आहे प्रकार. फोर्ट मधल्या
छान आहे प्रकार. फोर्ट मधल्या एका युपी टाईप हॉटेलमधे मिळायचा.
धन्यवाद दा..
धन्यवाद दा..
छान आहे!!
छान आहे!!
नक्की करुन पाहण्यात येइन. दही
नक्की करुन पाहण्यात येइन.
दही आबंट घेतलय की गोडसर ????
धन्यवाद म्रुदुल,
धन्यवाद म्रुदुल, अंकु....
अंकु, दही आंबट असेल तर जास्त छान...
बटाटे माझे ऑल टाईम फेव्हरेट
बटाटे माझे ऑल टाईम फेव्हरेट आणि हा पदार्थ मी नागपुरला सिताबर्डीमध्ये एक गुजराती थाळीचे भोजनालय आहे तिथे चांगलाच ओरपलाय लई भारी चव असते बघा. आपण पाककृती दिलेली आहे त्यामुळे लवकरच घरी आंबट दही घालुनच बनविण्यात येईल. पाककृती बद्दल मंडळ आपले आभारी आहे.
मस्तंय हं पदार्थ.. सोप्पा आणि
मस्तंय हं पदार्थ.. सोप्पा आणि टेस्टी दिसतोय. आजच करीन.
गुळाचा खडा वगैरे का नाही टाकायचा थोडासा?
धन्यवाद नरेश, सई... नाही.
धन्यवाद नरेश, सई...
नाही. गुळ नाही घालायचा, मग तो मारवाडी/गुज्जु फील नाही येत.....
ओक्के आज नक्की करेन. अशा
ओक्के आज नक्की करेन. अशा सुटसुटीत आणि हमखास आवडतील अशा कृत्या आवडतात मला.
मी केलं काल रात्री आलू का
मी केलं काल रात्री आलू का साग, अत्यंत चवीष्ट प्रकार आहे. आता वरचेवर होईल ही रसभाजी, थँक्यु गं सायली
फोटो काढलाय, अपलोड होत नाहिये. प्रयत्न करतेय टाकायचा.
झटपट बनविण्यासाठी छान पदार्थ
झटपट बनविण्यासाठी छान पदार्थ आहे. धन्यवाद.
पानकोबी घेतली होती चिरायला.
पानकोबी घेतली होती चिरायला. ही रेसिपी वाचली आणि ठेउन दिली. आता बटाटे लावलेत कुकरला.
- सुरुचि
सायली, मी पण काल ही भाजी केली
सायली, मी पण काल ही भाजी केली होती. मस्त झाली होती. मुलाला खूप आवडली.
धन्यवाद सई, हेमा ताई... लगेच
धन्यवाद सई, हेमा ताई... लगेच करुन बघीतलीत... आनंद झाला :)....
सुरुची, किशोर मुंढे धन्यवाद.....
मी करते अशी भाजी दही वगळून.
मी करते अशी भाजी दही वगळून. टमाटा पेस्ट टाकते आणि वेळ असेल तर कांद्याची पण पेस्ट टाकते. टमाटा+दही खुप आंबट नाही ना होणार.
हे सईने बनवलेला आलू का साग.
हे सईने बनवलेला आलू का साग.
थँक्यु गं फोटोसाठी पिंकी, मी
थँक्यु गं फोटोसाठी
पिंकी, मी ताजं गोड दही घातलं त्यामुळे आंबट झाली नाही. सायलीनं आंबट दही सांगितलं होतं, त्यामुळे होण्याची शक्यता असेल...
गरम तुपभाताशी मजा आली भाजीची. मी नुसतीही थोडी ओरपली. पावसाळी हवेत सुपला अॅडिशनल पर्याय मिळाला.
मस्त वाटतेय भाजी. आज करणार.
मस्त वाटतेय भाजी. आज करणार.
पण दही घातल्यावर फुटत नाही का? कढी फुटते तशी?
नाव वाचून सरसों का साग
नाव वाचून सरसों का साग प्रमाणे ग्रेव्ही असेल वाटले होते, पण ही तर करी आहे, कधीतरी घरी कादां- टोमॅटो-बटाटा चा रस्सा खावा लागतो, त्याएवजी ट्राय करेन
वा छान आहे, करायला हवी.
वा छान आहे, करायला हवी.
छान रेसिपी. सई तूपभाताबद्दल
छान रेसिपी.
सई तूपभाताबद्दल +१. रेसिपी वाचताना गरम तूपभातच मनात आला एकदम.
सोपी आणि मस्तं पाककृती
सोपी आणि मस्तं पाककृती वाटतेय. लवकरच करून बघणार.
सायली, फोटोपण सही आहे.
पण दही घातल्यावर फुटत नाही
पण दही घातल्यावर फुटत नाही का? कढी फुटते तशी? >>> खरच ?
धन्यवाद. नाही दही घातल्यावर
धन्यवाद. नाही दही घातल्यावर फुटत नाही.
मी आज केला हा शाग बरका.
मी आज केला हा शाग बरका. सगळ्यांना फारच आवडला. मला अजुनच आवडला कारण सोप आणि चवीश्ट.
छान प्रकार आहे.
छान प्रकार आहे.
काल रात्री केला होता हा
काल रात्री केला होता हा प्रकार. चविष्ट, सोपा व झटपट होणारा. फोडणीत तिखट आणि नंतर दही+धणेपूड असे मिक्स्चर घातल्यावर जो काही खकाणा उडला त्यात गृहसदस्यांनी तीन-तीनदा शिंकून घेतले!!
हा आलू शाक/ग चा फोटू :
सुभाषिणी, जागु, अरुंधती,
सुभाषिणी, जागु, अरुंधती, धन्यवाद..
अप्रतिम.... सायली ताई
अप्रतिम.... सायली ताई
व्वा! टेस्टी!
व्वा! टेस्टी!
Pages