मायबोलीकर मनीषला भेटण्यासाठी गटग

Submitted by चिनूक्स on 17 June, 2014 - 03:43
ठिकाण/पत्ता: 
मल्टिस्पाइस, एरंडवणे, पुणे.

तर, मायबोलीकर मनीष पुण्यास सुट्टीनिमित्त येत आहे.
त्याला भेटण्यासाठी गटग करण्याचे आयोजिले आहे.

तरी सर्वांनी अवश्य येण्याचे करावे. धन्यवाद. कृपया. धन्यवाद.

माहितीचा स्रोत: 
मीच.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 21, 2014 - 09:59 to 14:29
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढ्या बारकाईने वाचला नव्हता रे मेन्यू. सहसा मी तिथे गेल्यावर समोर आलेले पदार्थच बघते किंवा ऑर्डर देण्याच्या किचकट कामात सहभागी नसल्याने माहिती कमी पडते अशी..

ठीकाय ... मजा करा लेको.. मटरपनीर खा, फ्रूटसॅलड खा (पालक सूप प्या)!!

चिनूक्स.. मनालीपेक्षा मस्पा चालेल. मी जेव्हा मनालीत गेलो होतो तेव्हा तरी मला ते फारसे आवडले नव्हते. शिवाय पार्किंगचाही प्रश्न आहेच.

माझी यायची इच्छा आहे, जमलं पाहिजे. मस्पाच ठीक आहे कारण इतक्या वेळा तिथे जाऊन त्यांना आपली इतकी सवय झाली आहे की हॉटेलमध्ये गेल्या गेल्या असतो त्या सुरवातीच्या अवघडलेपणात वेळ जाणार नाही . शिवाय ओम ईशा सारखा त्यांनी माबोगटगसाठी एक डेडिकेटेड चंदू द वेटरही ठेवला आहे. चवीबाबत शंका असलेल्यांनी केप्रकडे जावे. चवीनं खाणाऱ्यांना तेच देतात.

तेव्हा तरी मला ते फारसे आवडले नव्हते>> म्हणजे मस्पा आवडले होते????????? Uhoh Proud

ठीके, मस्पा तर मस्पा. पालक सूप मात्र नको बाबा! भीषण असते.

म्हणजे मस्पा आवडले होते????????? >> वैनी, मी असं कुठं म्हणालोय. मी मस्पामधे कधीच गेलो नाहिये अजून.

माझी यायची इच्छा आहे, जमलं पाहिजे >> जमव आशू Wink

मी मस्पामधे कधीच गेलो नाहिये अजून.>>>>>>> काऽऽऽऽय???????????? ही बातमी आहे.... >>>मस्पामध्ये बुधवारची सोय नाहीये ना.. Proud

पालकाचे सूप वगळून काहीही चालेल.... >>>बर्र हो.. क्सा,कळ्व बाबा मस्पावाल्यांना. पालकसूपाला मेनूमधुनच वगळा म्हणुन. :). जो आयटम(खाण्याचा पदार्थ :फिदी:) वहिनी खात नाय तो मेनूमध्ये पण अजाबात चालणार नाय :).

mala yaychikhup ichcha aahe. koni gharun pickup n parat ghari drop karayla tayar asel tar mi yein.

अरे सूप आणि वड्यांच्या पुढे सरका रे Proud आपण भजी मागवू. अगदी खात्रीशीर. पालकभजी तर अतिखात्रीशीर. (माहितीचा स्त्रोतः मीच)

तसं असेल तर मेनूची उजवी बाजू साफ उडवावी लागेल...>>>उजव्या बाजूला तर किंत असते ना आशू. वहिनीमुळे तुला मस्पाला फुकटात जेवायला मिळेल हा तुझा आशावाद जरा जास्तच होतोय असं वाटत नाही का तुला?:फिदी:

प्राचीला पिकअप करणार असाल तर वाटेत माझ्या घरीही विमान/हे.कॉ थांबवा दोन मिनिटं. तेवढीच इंधनाची बचत - एका फेरीत दोन पुपुकरांची सोय होईल Wink

साजिर्‍या, स्त्रोत नव्हे रे स्रोत.. (लिही शम्भर वेळा - पण इथे नको).. मी अजून मस्पा मधे एकदाही पालकभजी बघितलेली नाहीत.

वैनीने माझा आशावाद उंचावायला नेहमीच मदत केली आहे. संदर्भ: तिच्या रेसिप्या.
वरदा, मिक्स भजीतले नेमके पालक भजे नेमक्या लोकांच्या हातात जाते. त्यासाठी आधी पालकसूपाचा कर्मयोग साधावा लागतो तेव्हा हे घबाड मिळते. मस्पा हे अशा साधकांचे तपोवन आहे.

Pages