प्रत्येक घराची, नात्याची एक वेगळी अशी भाषाशैली असते. एखाद्या सदस्याचा अगदी पेट शब्द असतो, जोक्सची जातकुळी असते आणि कोणावर कशाप्रकारचे जोक्स 'मारले' जातात हेही त्या कुटुंबाच्या कालौघात नक्की झालेले असते. पुढे आपापल्या आयुष्याच्या दिशा बदलल्या, वर्षानुवर्षे सहवास नसला तरी यातले काही शब्द, म्हणी किंवा एखाद्या घटनेच्या संदर्भात निर्माण झालेली वाक्य त्या कुटुंबासाठी अगदी सौ टक्का हसायला लावणारी, त्या त्या व्यक्तीचे स्वभावविशेष दर्शवणारी अशी असतात. मूळ भाषेतला शब्द, वाक्प्रचार या प्रक्रियेत अगदी बदलून जातो, ज्याने वापरला त्याच्या मालकीचा असल्यासारखा होतो किंवा नवीनच शब्द किंवा म्हण त्यातून तयार होते. ही खरंतर त्या त्या व्यक्तीची अभिजात कलाकृती म्हणून पेटेंटेड असायला हवी. पण हा लांबचा मुद्दा आणि त्यात काय काय करावे लागेल याची कल्पना नसल्यामुळे सध्या तरी असल्या अभिजात शब्द, वाक्यकुळींची देवाण घेवाण इथे करूयात.
माझी आमच्या अख्या खानदानात असलेली ओळख म्हणजे,' गन्ना खडा था' - संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी मायबोलीवर प्रसिध्द झालेली मामू ही पोस्ट वाचावी.
http://www.maayboli.com/node/47803
आमच्या घरात लहानपणापासून ऐकलेली बाबांची त्यांच्या पापभीरू स्वभावाला साजेल अशी फटकारतानाची म्हण - तुला खाल्ले म्हशीने - मला कधीही कळले नाही कि याची उत्पत्ती कुठून झाली - आम्हा बहिणींचे यावरचे अनुमान की आपले बाबा फारच सौम्य, सोज्वळ - शिवी कधी देणार नाहीत - पण सातत्याने डोईजड होणाऱ्या कार्ट्याना ओरडायला तर पाहिजे - मग कमीत कमी नुकसानदायक ( least damaging ) असा वाक्प्रचार त्यांनी शोधला असावा - एकतर म्हस काय आपल्या पोरींना खाणार नाही याची त्यांना खात्री असावी - म्हस ही safe आणि मुलीही असे असावे - असो - लहानपणी खूप हसायचो पण गम्मत म्हणजे माझी मुलगी तीन चार वर्षाची असताना मला खूप संताप आला होता. आम्ही बालहक्कवाले म्हणून हात काय उचलता येत नाही म्हणून अगदी जोरात तिच्यावर खेकसले - तुला खाल्ले म्हशीने ! माझ्या कुटुंबात आता ही सर्वमान्य शिवी आहे- म्हणजे मी मुलीला, ती छोट्या भावाला, छोटा आमच्यापैकी कुणालाही सर्वांसमोर हा अपशब्द वापरू शकतो. माही म्हणताना म्हशीनं ऐवजी तुला खाल्लं मशीनं, असंच म्हणतो.
बाबा अगदी लहानपणापासून राजकीय कार्यकर्ते आणि पेशाने शिक्षक. कुठलीही गोष्ट सहज आहे तशी न सांगता त्याचे सर्वांगाने विश्लेषण करायची सवय ( खोड), त्यात वारंवार येणारे वाक्य - 'पण गम्मत अशी झाली की' -- आम्ही लहानपणी अगदी मन देऊन ऐकायचो, काय गम्मत असणार आहे पुढे बरं ?- कधी कळलेच नाही. बऱ्याच वर्षानी जेव्हा प्रशासकीय स्वरूपाचे रिपोर्ट लिहायला, वाचायला लागले तेव्हा कळले की - however, nevertheless-- अशा अनेक शब्दांचा सार म्हणजे बाबांचे 'गम्मत अशी की', होते. मधल्या काळात आणि आताही त्यांच्या व्रात्य मुली आणि बायको यावरून असंख्य 'गमती' करून हसत असतातच.
मोठ्या दिदीचा आवडीचा शब्द - भंपक आणि भंपकपणा करू नको. या भंपक आणि भंपकपणा शब्दाच्या पिल्लावली माझ्या आणि दोन्ही दिद्यांच्या घरी जल्मल्या आहेत की त्याची गिनती आता आम्ही थांबवली आहे . सगळ्या रागलोभांना व्यक्त करायला ही शब्दावळ पुरेशी आहे या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. उदा. भम्पू , भम्पूगिरी ( हा शब्द इग्लिश मध्ये पण आहे -कधीही ऑफिसमधून फोन करून विचारले की मनु आणि माहिपैकी कोणीतरी she is doing भम्पुगिरि अशी तक्रार असते) मग भम्पूचे लाडात आल्यावर ढम्पू, टम्पू , ढम्पुकलं, चिडून ढम्प्या असे अनेक versions तयार होताहेतच. भंपक- ढम्पक - ढम्पूकली - असे होता होता अगदी नव्या पिढीच्या माझ्या ताज्या ३ वर्षाच्या भाच्याने यात 'पुकली ढमढम' अशी भर घातली आहे.
सांगलीहून अकलूजला साधारण १२ वर्षाआधी जात होते. अशीच एक टूर, मध्येच एक रात्र बहिणीला भेटून पुढे प्रवास असा बेत. सकाळी सात वाजता एस टीत कंडक्टरच्या शेजारची सीट, दोघा बहिणींच्या प्रेमाला आणि पर्यायाने टपल्या मारून खिदळण्याला बहर आलेला. कंडक्टर आपल्या पॅडवर आकडेमोड करता करता खुदकन हसत होता आमचे बहरलेले बोलणे ऐकून. शेवटी गाडी निघण्याची वेळ, बेल वाजवताना बहिणीला म्हणाला,' नका काळजी करू फार'.
बहिणाई,' काय सांगू, अवखळ आहे फार, सांभाळून न्या लहानीला'. हसून कंडक्टरने आणि मी निरोप दिला. पुढे गप्पा, एके ठिकाणी चहा करत, अकलूज आले. उतरताना कंडक्टर मला म्हणे, ' सांगा बहिणीला, तिच्या "अवजड" बहिणीला सांभाळून पोहचवले.
आधी समोरच्या STD च्या पिवळ्या खोक्यात घुसून बहिणीला, 'अवखळ ते अवजड' प्रवास सांगितला !
तेव्हापासून प्रवासाला निघाले की मी , " अवजड" होते .
सासरी आमच्या कोणाच्याही वाढदिवसाला पूर्ण happy birthday to you म्हणतच नाहीत. कारण मोठ्या दिराच्या मुलीने २ वर्षाची असताना पूर्ण म्हणता येत नाही म्हणून happy टू यू असे म्हणलेले इतके फ़ेमस झाले आहे हि त्यानंतर येणाऱ्या सगळ्यांच्या सगळ्या वाढदिवसांना फक्त हैप्पी टू यू असंच म्हणायचा संकेत आहे.
खरे तर सासरचे खूप किस्से आहेत कारण त्यांच्याच भाषेत सांगायचे तर सगळेच equally 'पाजळत' असतात. पण वारसाहक्काने त्याचे पेटंट दुसऱ्या एका माबोकरीण बाईंकडे जाते, तरीही पुढील किस्सा सांगितलाच पाहिजे. तुमच्या घरी काय काय म्हणतात असे अगदी विस्मयचकित होऊन उद्गार काढले असता प्रिय नवऱ्याने ही गोष्ट सांगितली. यात कोण कोणास म्हणले हे बाजूला सारून मूळ कथाभाग सांगते. ' शी किती घाण पादण्याचा वास', असे म्हणले असताना प्रतिप्रश्न, 'तुम्ही फार सुगंधी पादता वाटतं !' . हे ऐकल्यावर जेव्हा घरातल्या सार्वजनिक ठिकाणी बसले असता असे नाक बंद करायची वेळ आली तर गुमान तिथून पलायन करणे, हा एकच मार्ग. उगाच काही बोलले आणि असला प्रतिप्रश्न आला तर खरे किंवा खोटे उत्तर द्यायच्या फंदात कोण पडणार?
वासावरून थोडे विषयांतर ( भाषांतर ) होईल पण आणखी एक किस्सा. माझी पहिली वाहिली नोकरी बारावीनंतर पाचगणीच्या म्यप्रोमध्ये. तिथले प्रॉडक्शन म्यानेजर हे उत्तर प्रदेशचे शुध्द हिंदी भाषिक मिश्रा'जी', अशा 'जी' लोकांसमोर आमचे हिंदी म्हणजे टाईमपास मधल्या शाकालसमोर दगडूचे म्हराटी. मिश्राजी मात्र अतिशय सौम्य, सालस माणूस. फ्याक्टरीत ** कुठल्याही फळाचं प्रोसेसिंग होत असले की घमघमाट सुटायचा. एक दिवस पायनाप्पल जॅम बनवत होते. मी त्या घमघमाटाने अगदी हुंगून ( मुग्ध, भारावून असे काही म्हणता येत नाही आणि नेमके विशेषण सुचत नाहीये ) जाउन त्यांना म्हणले, ' मिश्राजी क्या बास आ रही है !' मिश्राजींचा चेहरा अगदी कावराबावरा . क्या बास आ रही है, शबाना ? दोन तीन वेळा सांगितल्यावर त्यांना मला काय म्हणायचे होते ते कळले. त्यानंतर अर्धा तास त्यांनी बास म्हणजे काय आणि मला जे म्हणायचे होते त्यासाठी खुशबू, सुगंध तत्सम शब्द समर्पक आहेत, हे समजावून सांगितले. पण अजूनही अननस आणला की मला त्या 'बास' चीच आठवण येते.
(*** factory, mapro यातला ya उच्चार लिहायला जमत नाहीये )
लग्न झाल्यावर थोडी एकमेकांच्या स्वभावाची वास्तववादी ओळख झाल्यावर मी नवऱ्याला म्हणले अरे कधी तरी Romantically बोलत जा -- तेव्हा त्याने 'रोमन टिकली' कसं बोलतात हे माहित नसल्याची कबुली दिली होती. पण त्यानंतर प्रेमाचे दोन शब्द नवऱ्याकडून म्हणजे 'रोमन टिकली' !
लोकहो, तुमच्याकडचे असे भंपक शब्द , वेगवेगळ्या टिकल्या ऐकायला आवडतील. मराठी भाषा अस्तास चालली आहेची ओरड आपण नेहमी ऐकतो, आपापल्या परीने शब्दभांडार वाढवूयात का इथे. माय, बाप, बहिण आणि इतर नातीबोली वाचायला आवडेल.
चाफ्याच्या आजच्या कथेत
चाफ्याच्या आजच्या कथेत वाचल्यावर आठवलं...
निसर्गाच्या हाकेला ओ देणे हा माझ्या ग्रूपचा फेमस वाक्यप्रचार
कुठे चाललीस गं ला आलेच ओ देऊन हे उत्तर नकळत तोंडातून अजुनही बाहेर पडतं.
आताशा ऑफिसमध्ये टीममध्ये त्यालाच टीमआऊटिंग शब्द फेमस केलाय मी
माझ्या ग्रूपचे असे खूऊऊऊऊऊऊप पेटंट शब्द होते.
एखाद्या हॅण्डसम मुलावर लाईन मारताना कोणी म्हणलं त्याला गर्लफ्रेण्ड आहे की आम्ही म्हणायचो असू देत आम्ही बहिणी बहिणीसारखं राहू. आताशा त्याला गर्लफ्रेण्ड आहे पेक्षा तुला बहिणशी अॅडजेस्ट करावं लागेल हां हे सूरू झालंय
ज्याला जगभराची काळजी आणि उसनवारी करायची असते त्याला 'पाटील म्हणणं हे ही तितकंच फेमस ग्रूप मध्ये.
एकदा सिंहगडला जाताना मला मका घ्यायचाय हे वाक्य कोणीतरी ट्विस्ट करून मक्याचं मुका करून म्हणलं तेंव्हापासुन मुक्याला मका तर अगदीच हिट्ट!
बरेच शब्द होते असे
आठवतील तसे सांगते 
इन्ना खूप हसतेय तुझ्या लेकाचे
इन्ना खूप हसतेय तुझ्या लेकाचे पेटंटेड शब्द वाचून
मुलीचे बालबोबडे बोल. वेलाँग -
मुलीचे बालबोबडे बोल.
वेलाँग - आता आम्ही तोच शब्द वेल्दोडा + लवंग कॉम्बोसाठी उचललाय
ऑल-डेरी - ऑलरेडी
ओढला मोठ्ठा.....(एवढा मोठ्ठा)
हॅप्पेडी
एकदा तिची कान खाजत होता तेव्हा म्हणाली होती की कानात खवखवतंय. तेव्हापासून कान खवखवणे हा शब्द रुढ झालेला आहे. ह्याची बरीच इतर व्हर्जन्स सुद्धा आहेत
एक नातेवाईक आई स्वतःच्या मुलीला सतत तिचेच कौतुक सांगायची. मग ती मुलगी हुरळून जाऊन आईला परत परत विचारायची...आई कशी ना मी पण्..मी त्या वयात कशी एवढी स्टेज वर जाउन न घाबरता नाटकात काम करायचे ना...मग आई..अगं हो....सभाधीट होतीसच तू त्या वयात्..म्हणून न घाबरता काम करायचीस.....वगैरे वगैरे....मग आमच्या घरी..कुणीही आत्मप्रौढी मिरवायला लागल्यास लगेच्...तू सभाधीटच होतास अरे...असे म्हणतात.
समोरच्या घरात एक वरिष्ठ पदावर काम करणारे व कोणाशीही कधीच न बोलणारे अत्यंत घुमे काका रहात. एकदा ते त्याच घुम्या चेहर्याने नळीच्या पाण्याने कार धुवत होते. तेव्हा एक लहान मुलगा टायर घेवून गाडी गाडी करत तिथे आला. त्याला एक लहानसे भुभु दिसले व तो त्याला पाहून हरखून गेला होता. तो आनंदातिशयाने त्या ओळखीच्या नसलेल्या काकांना ते भुभू दाखवत होता...काका भुभु.., काका भूभू...पण काका बघायलाही तयार नव्हते. तेव्हापासून एखादा माणूस कळवळून समोरच्याला काही दाखवत असेल व समोरच्याला त्यात इंटरेस्ट नसेल तर ...काका भुभु करु नकोस म्हणतात
मस्त आहेत पेटंट्स. लहानपणी
मस्त आहेत पेटंट्स.
लहानपणी मला एनिहाउ हा शब्द मराठी वाटायचा. कारण आमच्याकडे काहीही संपत आले असेल तर ते 'एनिहाउ आणायला हवे' असे म्हणायची पद्धत होती. पुढे पुढे नुसतेच एनिहाऊ. म्हणजे दळण एनिहाऊ झालंय, साखर आज एनिहाऊ आहे वगैरे.
दाद, इन्ना आणि सुमेधाव्ही तुमची पेटंटे लक्षात राहिली आहेत.
रिया आणि इतर तरूण तुर्कांची पेटंटे वाचून कॉलेजातले अनेक वाक्र्पचार आठवले.
पौर्णिमा, तरंगणे बद्दल डीट्टो. आमच्याकडेही त्याच अर्थाने वापरतात.
सभाधीट ,काका भुभु ,एनिहाऊ
सभाधीट ,काका भुभु ,एनिहाऊ >>>
एवढ्या उटपटांग गोष्टी चालल्या
एवढ्या उटपटांग गोष्टी चालल्या आहेत पण लक्षच गेलं नाही .मुद्याला धरून नसलेलं काहीपण बोलणे म्हणजे उटपटांग .धागा फारच आवडला .उटपटांग काहीच नाही ,मजा केली .मी बावीसाव्या वर्षी फुल पांढरा शर्ट नेहमी घालायचो आणि फावर लुबाचे स्टिल पट्टयाचे घड्याळ हातावर .आमचे नामकरण ऑफिसात तेव्हाच काका झाले .
"बेणं आहे"=पक्का हुशार माणूस .बटाटे ,ऊस यांचे असे तुकडे करतात की त्यावर दोन तीन कोंब असतील .त्याला बेणं म्हटतात .कोणत्याही परिस्थितीत एक तरी कोंब टिकतोच .
टेम्पर्वारी, नाविलाज त्याला
टेम्पर्वारी, नाविलाज त्याला काय विलाज, ट्रॉफिक हे माझे आणि बहिणिचे पेटंटेड शब्द. अजुन आठव्ले की लिहिन,
होस्टेलला असताना माझा एक
होस्टेलला असताना माझा एक मित्र होता. चहा पिणे किन्वा कॅन्टीनला जाणे होस्टेलच्या पोरांच्या भावविश्वात किती महत्वाचे असते ते तुम्ही जाणताच
चहा घ्यायचा का असे विचारल्यावर ' It will walk म्हणजे ते चालेल ' असा आख्खा डायलॉग ठरलेला असायचा. पुढे पुढे कोणत्याही गोष्टीला मान्यता देताना हा संवाद ठरलेलाच !
एस आर डी , फावर लुबा ! ६०-७०
एस आर डी , फावर लुबा ! ६०-७० च्या दशकातला अत्यंत प्रेस्टिजिअस ब्रॅन्ड ! रिको सिको येण्यापूर्वीचा
लग्न जमवण्याच्या निगोशिएसन्सपैकी एक महत्वाचे. माझे एक खेड्यातले काका त्याला फोर्लोपा म्हणायचे ते मला कधीच कळल्र नाही
टेम्पर्वारी, ट्रॉफिक >> असेच
टेम्पर्वारी, ट्रॉफिक >> असेच वर्जिनल
It will walk म्हणजे ते चालेल
>> असेच आमच्याकडे "Are you remaining?" म्हणजे "तू थांबणार आहेस का?"
आणि "I Sold" किंवा "Is it sold?" म्ह्णजे "मी सोलले" किंवा "सोललेले आहे का?"
माझे डोळे मिटके होतायत आता.
माझे डोळे मिटके होतायत आता. -फार झोप येतेय
हा त्रास्कुटा आहे- सतत मागे लागणार्या लहान भावा बद्दल
गाडी चढावाला लागली, -ताटातल वाढलेल (आवडल नसल्यानी ) संपत नाहीये.
एकदम झेप्लेस आहे. -ह्याला खेळायला घेणार नाही कारण त्याला खेळता येत/झेपत नाही.
मेडीटेटिंग योगी- कॉन्स्टीपेशन झालेला.
ह्याला बार्बेक्यु नेशन ला काय नेताय हा गवत खातो - शाकाहारी आहे.
निसर्गाच्या हाकेला ओ देणे =
निसर्गाच्या हाकेला ओ देणे = शु-क्रिया करणे = थँक्यू म्हणणे.
निसर्गाच्या हाकेला ओ देणे =
निसर्गाच्या हाकेला ओ देणे = शु-क्रिया करणे = थँक्यू म्हणणे.

>>>
आमच्यात मावशीला माऊ च म्हणतात
आमच्यात मावशीला माऊ च म्हणतात . - माझी मुलगी लहान असताना तिला मावशी म्हणता येत नसे ती माऊ म्हणे म्हणून आता सगळ्या माऊ च
ठ्ब्बे ढोले ढिगारे - हि एक शिवी आहे
.
कॉलेजात ग्रुप चे शब्द... कोनी
कॉलेजात ग्रुप चे शब्द...
कोनी अति करत असेल,, काहीतरी असंबध्द बोलत असेल,, शेखी मिरवत असेल की एक ठरलेला शब्द ( पुस्तकात मोठ्ठ उत्तर पाहिल तरी ) >>> आवरा...
ह्याची इतकी सवय झाली की आता कुठल्याही गोष्टीवर, प्रसंगावर आवरा अस म्ह्टल की नवरा म्हणतो....कुठे आहे पसारा,, सांग लगेच आवरतो..
ती गुल्ल झाली.. >> कोणी प्रवासात झोपल, अवेळी झोपल की ती/तो झोपला अस सांगण्याएवजी.. तो गुल्ल्ल्ल्ल्ल झाला....
आई, आजी च एक ठरलेल वाक्य >> कुठलही काम करताना चुकल ,किंवा बावळटपणा केला की तुझ ग्यान मातीत आहे का ????
कॉलेजमधले शब्दसंग्रह खरेच
कॉलेजमधले शब्दसंग्रह खरेच अफाट होते.
एका मित्राच्या बहिणीचे नाव गुल होते. तिच्या बेस्ट फ्रेण्ड्स यास्मिन, प्राजक्ता, सायली आणि केतकी. सगळ्या कायम एकत्रच फिरायच्या. कॉलेजमध्ये दिसल्या की मित्र म्हणायचा पुष्पगुच्छ आला.
आमच्या कॉलेजमधला अजून एक फेमस शब्द होता, "सदसदविवेकबुद्धी" यातला सद सद म्हणायचा एक टोन होता, कुनी जास्त श्यानपट्टी करत असेल तर हमखास वापरला जायचा.
कुणी जास्तच "शुद्ध" मराठी भाषेमध्ये बोलायला लागल्यावर आम्ही "अरे, आजच्या मराठी बातम्या बंद कर आणि नीट बोल"
निसर्गाच्या हाकेला ओ देणे = शु-क्रिया करणे = थँक्यू म्हणणे.>> आमच्याकडे यालाच सुसाईड करणे असा शब्द होता.
सुसाईड >>>
सुसाईड >>>
कुणी जास्तच "शुद्ध" मराठी
कुणी जास्तच "शुद्ध" मराठी भाषेमध्ये बोलायला लागल्यावर
>> आमच्याकडे "जिभेवर सरस्वतीने छापखान्याचे खिळे..." (पु.लं.) किंवा गटणे झालाय तुझा
गटणे is too common! we says
गटणे is too common!
we says the same
मौसम (शाहीद आणि सोनमचा)
मौसम (शाहीद आणि सोनमचा) सिनेमा बघून आल्यानंतर आम्ही 'चुकामूक होणे' ह्याला 'आज आपला मौसम झाला' असे म्हणत असू....
मौसम करेक्ट आहे खर तर
मौसम
करेक्ट आहे खर तर
सुसाईड लेकाने मराठी, इंग्रजी
सुसाईड
लेकाने मराठी, इंग्रजी तळ्यात मळ्यात करता करता काही क्रियापदं केली होती. त्यातली काही अजून वापरतो घरात.
दात घासिंग - नो.. आय अॅम दात घासिंग
टू कालव (भात कालवणे) - यू कान्ट कालव लाईक आज्जी.
मला काकडी पिलून दे
बाबा इज खाजविंग नारळ (नारळ खवतायत) - हे लवकरच बंद करावं लागलं... खवणं चालू आहे... नामाभिदान बंद.
एखादा खुप बड्बड करुन त्रास
एखादा खुप बड्बड करुन त्रास द्याय्ला लागला तर
डोक्याचे अनेक प्रकार आंम्ही कॉलेजात असताना व्हायचे ...
डोके खरवडणे , दहि करणे,पावडर करणे..
उगाच ताणलेला विषय थांबवणे -- चला राष्ट्रगीत घ्या
ग्रुपनी एकत्र चालताना, एखादा सारखा सारखा थांबत चालणार आणि बाकिच्यांना त्याच्यासाठी थांबाव लागणार-- ए दगड मोजत चालतो काय बे !!!! ठरेलेलं
चर्चेचा मुख्य विष्य बाजुला आणि बाकिचा फापटपसारा सुरु झाला कि " ए किस्न्याला बोलवा दूर्योधन थकला रे"
माझ्या ग्रूपचे असे खूऊऊऊऊऊऊप
माझ्या ग्रूपचे असे खूऊऊऊऊऊऊप पेटंट शब्द होते. >>>>> रिया मेघना आठवली का ग?
एका मित्राच्या बहिणीचे नाव गुल होते. तिच्या बेस्ट फ्रेण्ड्स यास्मिन, प्राजक्ता, सायली आणि केतकी. सगळ्या कायम एकत्रच फिरायच्या. कॉलेजमध्ये दिसल्या की मित्र म्हणायचा पुष्पगुच्छ आला. >>>>>
कुठलही काम करताना चुकल ,किंवा बावळटपणा केला की तुझ ग्यान मातीत आहे का ???? >>>> आमच्याकडे डोक्यात कांदे-बटाटे भरलेत का तुझ्या? अस विचारल जायच...
ठ्ब्बे ढोले ढिगारे - हि एक
ठ्ब्बे ढोले ढिगारे - हि एक शिवी आहे >> मृणाल. माझा भाचा पण मला एकदा स्पॉन्टेनियसली ढोली ढबुली म्हणाला होता.
टापा टाकणे- कोणी बाता मारत
टापा टाकणे- कोणी बाता मारत असेल तर
च्यायला
रोज कामाला जाताना भावाचे वाक्य, "काय करतां... आमच्याच पोटाला आग लागली.."
पावसाळी हवेने काही गोष्टी मुरमुरे वगैरे ओलसर झाले तर आमच्याकडे सादळलेयत म्हणतात. नवर्याला या शब्दाची खुप गंमत वाटायची. त्याचा घरी वात्तडे झाले म्हणतात.
भाजी भाकरी कुस्करुन खाणे त्यालाच नवरा मोडुन तोडुन खाणे म्हणतो.
आमच्याकडे सादळलेयत
आमच्याकडे सादळलेयत म्हणतात.
>> आमच्याकडेपण.
माझ्या मैत्रिणीचा भाचा आला
माझ्या मैत्रिणीचा भाचा आला होता (वय ३ वर्ष) आम्ही जोधा अकबर पहात होतो, त्यात तो हृतिक आणि ऐश्वर्याचा तलवारबाजीचा सिन सुरू होता, त्याची (का तिची?)
तलवार खाली पडल्यावर आम्ही तिघी चच्चच्च केलं. हा विचारत होता 'काय पडलं? कुणी उत्तर दिलं नाही.. २-३ वेळा विचारलं. कुणी उत्तर देत नाही म्हणल्यावर चौथ्यांदा जो$$रात ओरडला.. "का$$$$य प$$ड$$लं?"
तेव्हापासून आमच्यात कुणी २-३ वेळा काही विचारूनही काही उत्तर दिलं नाही तर आम्ही "का$$$$य प$$ड$$लं?" म्हणतो, मग लगेच तपशिल मिळतात.
ए किस्न्याला बोलवा दूर्योधन
ए किस्न्याला बोलवा दूर्योधन थकला रे >>>
Best!
थापा मारणे याला हल्ली बरेच
थापा मारणे याला हल्ली बरेच वर्षे लपेटणे हा शब्द वापरतात.
माझी छोटी भाची मला नुसतं अंजू किंवा अंजू माऊ असंच म्हणते.
Pages