अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< माझे मत अमूल्य आहे. मी ४९ दिवसांत सरकार सोडून पळणार्‍या माणसाला ते का द्याव? >>

ह्या प्रश्नाचं उत्तर कदाचित वडोदरातील मतदार चांगलं देऊ शकतील !
इथे तसा संबंध नाहीये पण जाता जाता एक उल्लेख - वडोदरामध्ये वाराणसीपेक्षा NOTA चा १०% जास्त वापर झाला आहे. काय बुवा हे वडोदराचे लोक...इतक्या जव्वळ असूनही विकासपुरूषाचा विकास दिसला नाही ह्यांना म्हणजे काय म्हणावं??

<<त्याने मला माझ्या मताच्या बदल्यात पाच वर्षाचं स्थिर सरकार देणं अपेक्ष्हित आहे की नाही??>>

नेमकं काय होतं हो स्थिर सरकार मिळालं तर? स्थिर आहेत पण लोकांच्या हिताविरोधी निर्णय घेत असतील, एकामागून एक घोटाळे करत असतील, स्नूपिंग, जिनोसाइड सगळ्यामध्ये हात रंगवून घेत असतील तर त्याचा आपल्याला कसा फायदा होणार हे काही आकलन होत नाही.
(हे सगळं सिद्ध झालेलं नाही हे लक्षात आहे. ते होईल अशी आशा बाळगणंसुद्धा वेडेपणा ठरेल इतके आपले नेते क्लीन-चिट मास्टर्स आहेत!)

Political stability is not necessarily an essential pre-requisite item for good economic growth. In actual practice, it is the other way around as it can be argued, that it is good economic growth, that essentially leads to political stability.

गुजरात मॉडेल वालं स्थिर सरकार तुम्हाला विकास देणार आहे? बरं.
पण आम्हीच का असल्या लेखांजवळ येऊन धडकतो बरं ? Uhoh
CONCLUSION:
1. Gujarat’s GDP growth rate higher than India, predates Modi’s term.
2. Initial GDP growth rate of Modi’s term, constitutes a recovery, from a low base of extremely bad 4 years of growth.
3. Under Modi, Gujarat’s GDP growth is inline with other progressives States.

इतकं आणि काही आलेख मला कळले. ह्या क्षेत्रातील तज्ञ आणि इच्छुक मंडळींनी आणखी पडताळून पाहिल्यास आणि खरंखोटं आम्हाला समजावून सांगितल्यास फार छान होईल.

<<नेटीझन्सना आप म्हणजे प्रचंड वेगळं काहीतरी वेगळं वाटतं (तितकं बहुतेकांचं नागरिकशास्त्र कच्चं असतं!!) पण मुळात त्यांना भारतीय राजकारण, त्यामधले व्यामिश्र भाग, इतर कॉम्प्लेक्सिटीज यांचं आकलन जवळपास शून्य असतं. >>

अगदी खरंय तुमचं. ते काय ते व्यामिश्र भाग वगैरेंचं आकलन शून्य आहे आणि त्याचा काsssहीच कमीपणा वाटत नाही मला तरी. त्या व्यामिश्र भागांचेच परिणाम पाहतोय आत्तापर्यंत. आम्हाला लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न समजावून घेऊन बहुमताने लॉजिकली प्रश्न सोडवणारेच नेते हवेत. कॉम्प्लेक्स राजकारण गेलं चुलीत. फार पाहिलं आजवर.

हे घ्या अगदी ताजा ताजा व्हिडिओ -
अरविंद केजरीवाल काली बारी सब्जी मंडीमध्ये मोहल्ला सभा घेताना.

Till now I have not found a single reason to HATE this man ! चुकत असतील, राजकारण येत नसेल पण कळकळ खरी आहे ह्यात शंका नाही.

१२ वर्षांपूर्वीचे लोकांमध्ये जागृती करणारे केजरीवाल आणि वरच्या व्हिडिओमधील केजरीवाल...तीळमात्र फरक पडलेला दिसत नाही.
जागत्या पहार्‍यावर म्हटलं होतं पण नागरिकशास्त्राचं पुस्तक वाचायचा प्लॅन कॅन्सल. थेट प्रॅक्टिकल्स शिकायला मिळत असेल तर थिअरी कशाला वाचत बसा? Happy

<<प्रसारमाध्यमं हाही एक उद्योगच आहे, आण तो उद्योगपतींकडूनच चालवला जातो, त्यात फारसं काही भुवया उंचावण्यासारखं नाही. >>

हा बघा उद्योगपतींनी विकत घेतलेल्या प्रसारमाध्यमांचा उद्योग. आणि ह्यात भुवया उंचावण्यासारखं काहीच नाही म्हणता?
News18 Rajasthan वर आलेली ही बातमी गायब का झाली असेल?

80yrs old couple news.jpg80yrs old couple.jpg80yrs old deleted news.png

<<पण मला इम्प्लिमेन्टेशन दिसलं नाही. असतं तर ६५ वर्षांत ही अवस्था झाली नसती.>> प्लीज यावर सविस्तर लिहाल का? ६५ वर्षापूर्वीचा भारत आणि आजचा भारत या "अवस्थेमध्ये" काय काय फरक आलेत हे सांगू शकाल का? >>

चुकलंच. खरंच फार फार फरक आलेत ! वरच्या चित्रांमध्ये दिसत आहेत. Sad

खरंच फार फार फरक आलेत ! वरच्या चित्रांमध्ये दिसत आहेत.>> मिर्ची.. या चित्रांत जे दिसतंय तसं खरंच झालं असेल तर ते फारच दु:खद आणि शॉकिंग आहे. पण, फक्त असलेच फरक पूर्ण भारतात आहेत असं तुमचं म्हणणं आहे काय?

शिवाय... 'इकॉनॉमिक/इंडस्ट्रीयल पॉलिसी काय आहे आआपची' याबद्दल पण थोडं लिहाल काय? आआपकडं अर्थतज्ञ कोण आहे?

नविन धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद!

>>Till now I have not found a single reason to HATE this man <<
नो बडी हेट्स हिम, पॉइंट इज - हि इज नॉट लीडर्शीप मटीरियल. आपच्या गोटातल्याच लोकांनी (शायना, कॅ. गोपीनाथ इ.) जहाजावरुन उड्या टाकलेल्या आहेत, काहि तयारीत आहेत. काय कारणं अस्तील बुवा?

<<आप्चे पण तसेच आहे. सगळेच social worker आहेत. उदा. विजेची बिल ५०% कमी करुन २ महिने विज देउ शकत पण नंतर काय? >>
साहिल, वीजेची बिलं कमी केली तर तिजोरीवर ताण पडेल असं आपल्याला वाटतं ना. पण आपल्या कल्पनेपेक्षा प्रचंड जास्त पैसा ह्या खादी नेत्यांच्या दिमतीत आणि भ्रष्टाचारात खर्च होतो. तो वाचवला तर सबसिडीज देणं शक्य आहे.
मोदी म्हणतात, "मैं किसी को कुछ भी मुफ्त नहीं दूंगा, बल्कि इतने रोजगार तैय्यर करूंगा की मुफ्त लेने की जरूरत ही ना पडें"
अशी वाक्ये कानाला ऐकायला फार गोडगोड वाटतात. पण खरंच घडतात का?
बातम्या काही वेगळंच सांगतात. Jobless growth in Gujarat असा सर्च टाकला तर ढीगभर आर्टिकल्स मिळतील.
Hemantkumar Shah, an academician considered close to the Sangh ideology, says Gujarat is a classic example of jobless growth. "There has been a decline in growth rates of employment in the decade 2001-2011," he says, arguing that the state government's claim of eight lakh jobless people in Gujarat is not accurate. "There are about 16 lakh unemployed youth, double than what is on record. Data obtained from statistical department suggests that." The annual rate of growth of employment in Gujarat was 2.4% during 1999-00 - 2004-05 (2.89% in India), and it fell to 1.3% during 2004-05 to 2009-10 (1.48% in India).

<<आआपमध्ये कुठला समान विचार दिसतो? मलातरी कुठलाच दिसत नाही. >>

गापै,
आहे ना. माझ्यासारख्या राजकारणाचा वारा ही अंगाला लागू न देणार्‍या व्यक्तीला रात्री जागून कीबोर्ड बडवायला भाग पाडणारा उद्रेक ! हा एकच समान विचार आहे.
मी तर नुसतीच एक समर्थक आहे. गेल्या ३ महिन्यांपासून आप बद्दल वाचतेय, ऐकतेय, समजून घेतेय.
पण आपचे उमेदवार आणि कार्यकर्ते हे अनेक वर्षांपासून सामाजिक कामात असलेले लोक आहेत.(अपवाद असतील. मला अजून माहीत नाहीत)
ह्या उद्रेकातूनच काहीतरी बदल नक्की घडेल. आशा करूया.

आत्ता सध्या शुभरात्रि.

उत्तम राजकारणी होण्यासाठी तो अत्यंत आवश्यक गुण आहे. त्यामध्ये काही चुकीचे नाही. खोटं बोलणं हा तर राजकारणाचा पाया

हे व्यमिश्र विधान नागरिकशास्त्राच्या कोणत्या पुस्तकात आहे बरे ? भारताबाहेर रहाणार्‍या नेटिझन्स ना ते पुस्तक ऑनलाईन मागवून आपले ज्ञान आद्ययावत करता येइल. Happy ( दिव्यांची माळ)

मिर्ची,
नेत्यांच्या दिमतीत आणि भ्रष्टाचारात खर्च कमी व्हावी यात वाद नाही.

पण ५०% विज बिल कमी करणे हे कुठल्याच अर्थ शास्त्रात बसत नाही.

सबसिडी वरुन डॉ मनमोहन सिन्ग चे दोन वाक्य. १> subsidy kills (in 1991) 2> Cross Subsidy is slow poison. (some times in 2005).

देर्श सुधरयचाअसेल तर सबसिदी कमी असावी. सगळ्या विकसित आणी हाय ग्रोथ विकसन्शील देशात सबसिडी कमी आहे. कमीत कमी सबसिडी मध्ये लोकाना रोजगार निर्माण केल्यास आपली long term vote bank तयर होते. जी MP, गुजराथ आणी महाराष्ट्रात मागच्या १५ वर्षात तयार झाली.

तसा एखादा नेता लागतो नाहेतर १९७७ ची जनता पार्टी आणी १९८९ चा जनता दल हे काही (economic ) agenda नसलेले पक्ष. जे आता हयात नाहीत. आप पार्टी मध्ये सध्या कोणीही economic expert नाहीत त्यामुळे त्याचे कुठे सरकार आले तरी ते किती वेळ चालेल ते एक शंकाच आहे.

आपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधे उत्तर प्रदेशात भाजप कार्यकर्त्याच्या घरी इव्हीएम मशीन्स असलेलेले फोटो मध्यंतरी फेसबुक वर व्हायरल झाले होते. मी स्वतःहून त्याबद्दल लिहीलेले नव्हते. कारण आपचे लोक कुठलाही आरोप शेवटास नेत नाहीत आणि महत्वाचं म्हणजे एक महीन्यापूर्वी फेसबुकच्या न्यूजफीड मधे आलेलं मटेरीअल आता शोधणं जिकीरीचं आहे. पण मतमोजणीची एकूण टोटल, मतदान अधिका-यांच्या रिपोर्टची टोटल जुळत नसल्याचे उत्तर प्रदेशातल्या साठ मतदारसंघात व्हावं ही गोष्ट चिंताजनक आहे.

मतदान प्रोसेस चालू असेपर्यंत मतदान यंत्राबद्दलच्या तक्रारींना अर्थ नसतो. सदोष मशीन जरी दिलं गेलं तरी मतदान अधिकारी ते बदलून घेऊ शकतो. शेवटी वहीप्रमाणे झालेलं एकूण मतदान , इव्हीएम मधे आलेला टोटलचा आकडा जुळल्यावर सह्या करून रिपोर्ट सील केला जातो. नेमका तोच जुळत नाहीये असं अनेक ठिकाणांहून फेसबुक वर वाचायला मिळत होतं.

हे खरं असेल तर याचा अर्थ सुब्रमण्यम स्वामींनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे निवडणुकीनंतर मशीन हॅक करून निकाल बदलण्यात आले. समाजवादी पक्षाची आणि भाजपची छुपी युती असल्याचं जे बोललं जात होतं त्याचा अर्थ हा असावा. शपथविधीच्या वेळी मुलायमसिंह आणि अमित शाह यांच्यामधे उफाळून आलेलंं प्रेम पाहून मन भरून आलंच होतं. भाजपला उप्र मिळालेलं यश आश्चर्यकारक आहे. जर पुन्हा निवडणूक घेतली तर हे यश रिपीट होईल का हा प्रश्न आहे.

आता आम आदमी पार्टीकडे वळूयात. बहोत लंबी स्टोरी है.

अण्णांचं उपोषण सुरू झालं तेव्हां गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी उपोषणाला बसलेल्या एका साधूच्या उपोषणाला अडीच महीने झालेले होते. प्रकृती चिंताजनक होती. उपोषणाचं इतकं अप्रूप असतं तर मेडीयाने थोडे फार तरी ते उपोषण दाखवलं असतं, पण प्रिंट मेडीयात आलेल्या फुटकळ बातम्या वगळता कुणीही तिकडे फिरकलं नाही. अण्णांच्या उपोषणाला पहिल्या तासात अजिबात पाठिंबा नव्हता. टीव्हीवरच्या २४ बाय ७ प्रक्षेपणामुळे लोक ज्या उत्सुकतेने जत्रेत जातात त्याप्रमाणे पहिल्या काही तासानंतर बाहेर पडले. सुरुवातीचे जे कार्यकर्ते होते त्यात सेवादल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे तुरळक जथे दिसून येत होते. आयटीतल्या लोकांनी ठिकठि़काणच्या उपोषणस्थळाचे व्हडिओज अपलोड करायला सुरुवात केली. यावरून ते आंदोलन देशव्यापी पण मर्यादीत पाठिंबा असलेलं होतं हे दिसून आलं.

त्याला पाठिंबा मिळवून दिला न्यूज वाहीन्यांनी. आंदोलन अर्थातच अण्णांच्या जिवावर खेळलं गेलं. अण्णांना आपण अत्यंत लोकप्रिय आहोत असं वाटू लागलं. माईक आणि कॅमेरे पाहील्यानंतर नेते ज्या पद्धतीने बोलत सुटायचे त्यावरून आणि केलेल्या मागण्यांवरून आणि सरकारला झुकवत असल्याच्या आनंदातूनच या नौटंकीचा अंदाज आलाच होता. त्या वेळी हे अराजकीय आंदोलन असल्याचं सर्वांनी एकमुखाने सांगितलं. पण थोड्याच दिवसांत या सर्वांमधे धुसफूस का व्हावी ?

अण्णांना वाटत होतं हिरो मी आहे आणि मिळालेले पैसे माझ्या संस्थेत जमा व्हावेत. मिळालेले पैसे केजरीवालांनी आपल्या संस्थेत जमा करण्याचं कारण म्हणजे हिरो जरी अण्णा असले तरी त्यांना वापरून घेतलं होतं. आंदोलनाचं डिझाइन अरविंद केजरीवालांनी केलं होतं आणि सुरुवातीपासून त्यांची त्यावर पकड होती. बोलणी करायला कुणी जायचं, कॅमे-यापुढं कुणी काय बोलायचं यातून ते दिसत होतं. अण्णांना आपला वापर झाल्याचं तोपर्यंत माहीत नव्हतं. सुरेश पठारे देखील केजरीवाल यांना फितूर असल्याचं आढळल्यावर त्यांना अण्णांनी काढून टाकलं.

या घडामोडी काय सांगतात ?

महत्वाचं म्हणजे अचानक केजरीवालांना राजकारणात जावं ही झालेली उपरती आणि त्यामागील कारणं ही सर्वात जास्त हास्यास्पद आहे. दुनिया झुकती है या उक्तीवर जर कुणाची सर्वाधिक श्रद्धा असेल तर ती अरविंदोबाबूंचीच. एकतर त्यांच्या महत्वाकांक्षा सुरुवातीपासूनच स्ट्राँग असाव्यात , किंवा नंतर टीव्ही आणि उपोषणाच्या नाट्यामुळे मुळे झालेली गर्दी पाहून ती एन्कॅश करण्याचे विचार मनात आले असावेत किंवा अगदी सुरुवातीपासूनच जे कुणी ही जुळवाजुळव करण्याच्या माग होते त्यांची हीच रणनीती असावी. मेडीया तरी कुठे कुणासाठी फुकट राबतो हो ?

नो बडी हेट्स हिम, पॉइंट इज - हि इज नॉट लीडर्शीप मटीरियल. >>> +१ धाग्यावरच्या फोटोंमधे नळ जोडणी वगैरे आहे. नळ जोडणी, अंतर्गत रस्ते बांधणी आणि इतर अनेक कामं आमच्या भागातले नगरसेवक, आमदार, खासदार (शिवसेनेचे) कसलाही गवगवा न करता करतात. खरंच... नगरसेवकांच्या ऑफिसमध्ये कुणीही सामान्य माणूस आपले प्रश्न घेऊन जाऊ शकतो. आमच्या मेन रोडपासून बिल्डिंगपर्यंतचा रस्ता सुधारणं ह्या जन्मी शक्य वाटत नव्हतं. पावसाळ्यात खड्ड्यांमधूनच चालावं लागे. नगरसेवकांपर्यंत हा प्रश्न नेऊन तर पाहुया म्हटल्यावर खरंच अशक्य वाटलेली गोष्ट झाली. नगरसेवक्/नगरसेविका अधुन मधुन इलेक्शन जवळ आलेलं नसतानाही आमच्यातलेच एक असल्यासारखे साधेपणाने दारापाशी येऊन "काही प्रॉब्लेम आहे का?" अशी विचारपूस करतात. स्वतः दाराशी आल्यावर वेगळी मोहल्ला सभा घ्यायची गरज नाही. ग्रास रूट लेव्हलचे कार्यकर्ते हे काम करत असताना मोठ्या स्तराचे नेते पक्ष बांधणी, पॉलिसी डिसिजन्स वगैरे कामं करत असतात. जरा फुस्स झाल्यावर राजिनामा दिला तर सत्तेचा सशक्त वापर करण्याची आशाच तुम्ही धुळीला मिळवता.

सामुहिक विवाह, बालमजूरांची सुटका करणं व इतर कामं छोट्या छोट्या NGO पण करतात गवगवा न करता. वेश्यांची सुटका, पळून आलेल्या मुलांची काळजी घेऊन त्यांची घरं शोधून त्यांना घरी पोहोचवणं (समतोल फाउंडेशन) वगैरे करणार्‍या खूप संस्था आहेत. पण ह्याचा अर्था त्या राज्यकारभार सांभाळण्यायोग्य आहेत असं नाही.

समाज कार्य हे गुड गव्हर्नन्समध्ये येतंच पण फक्त तेच म्हणजे राज्य चालवणे नाही. मिळालेल्या सत्तेचा वापर समाज कार्य आणि इतर प्रश्न तडीस लावण्यासाठी उत्तम प्रकारे करता आला असता. आणि तेच तर उत्तम राज्यकर्त्यांचं लक्षण आहे.

आयबीएन लोकमत ने तर आंदोलनाचे आणि अण्णा, अरविंद यांचे अधिकृत चॅनेल असल्यासारखं वागायला सुरुवात केली होती. या आंदोलनाचे समाजावर किती खोलवर परिणाम झालेले आहेत हे सांगताना शनिवारवाड्यासमोर चार तरुणांची मुलाखत घेतली गेली. चारही तरुणांनी (तीन मुलं , एक मुलगी, वय सरासरी २२ ते २५) काळे टी शर्ट आणि जीन्स हा वेश केलेला. रंग - लालसर. कधीही उन्हार रापल्याचे लक्षण नाही. कधी कुठले काम केल्याचे ऐकिवात नाही. त्या तरुणांची वागळेंनी खूपच आस्थेने चौकशी केली. त्यांना म्हणे सिस्टीम बदलायची होती आणि सिस्टीम मधे शिरल्याशिवाय त्यांना ते शक्य होणार नव्हतं. म्हणजे काय करणार असं विचारल्यानंतर आम्ही महानगरपालिकेपासून सुरुवात करणार, मनपातलं राजकारण बदलणार, निवडणुका लढवणार, यंव करणार, त्यंव करणार वगैरे कॅमे-यापुढं सांगून झालं. वागळेंनी मनापासून कौतुक केलं. पुढे तुम्ही पाहताय, अरविंद केजरीवालांपासून देशातला तरुण कसा प्रभावित आहे, कसे बदलाचे वारे हावताहेत वगैरे वगैरे.

खरं तर यापेक्षा प्रत्यक्ष काम करणारे कित्येक तरुण असताना हेच तरुण वागळेंना कसे काय सापडले ? पुढे हे चेहरे लक्षात राहील्याने अनेकदा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतांना किंवा सिग्नल ला शेजारी उभे राहीलेले पाहीले. ते किंवा त्यांच्या तथाकथित पक्षाचे लोक कधीच घरी, मित्रांकडे किंवा कुणाकडेच आले नाहीत. निवडणुकीत काय झाले ते कळले नाही. याच तरुणांना संभाजी बागेसमोरच्या मांडवात लॅपटॉपसहीत पाहीलेले होते. वागळेंना हेच तरुण सापडण्याचे कारण हेच असेल का असेही वाटून गेले.

जवळपास पंधरा दिवस इतर कुठलीही बातमी न दाखवता ( जाहीरातींशिवाय) जणू देशात दुसरे काहीच घडत नाही अशा पद्धतीने वार्तांकन करणे हे लोकशाहीला मारक आहे. आणि हाच सपोर्ट पुढेही दोन अडीच वर्षे मिळत राहीला. प्रक्षेपणावर होणारा खर्च या वाहीन्यांनी नुकसान सोसून केला का ? मोदींकडून पैसे घेतले असं बोललं जातं, मग अरविंद केजरीवालांनी येशू ख्रिस्तासारखे प्रेषित असल्याचे संकेत दिले म्हणून या वाहीन्या अचानकच सामाजिक कार्यासाठी तयार झाल्या का ?

काय गौडबंगाल आहे हे ?

जेव्हा राहूल विरूद्ध आप ने उमेदवार दिला तेव्हा भाजप्ये नाचत होते तेच भाजप्ये मोदी विरूद्ध उमेदवार दिला तर ऊर बडवत गावभर फिरत होते Biggrin
कुमार तर ४ महिने आधीपासूनच अमेठी मधे होते तेव्हा भाजपाने छूपी मदत केली पण जेव्हा त्यांचा डाव उलटला केजरी ने मोदी विरूद्ध उभा राहीला तेव्हा कुमार ला केलेली मदत मिळू नये म्हणून इराणी ला ऐनवेळेला उभे केले
कुमार उभा राहीला तेव्हा काँग्रेस ने विचारले नाही फक्त आमच्याच विरूद्ध का?

लेटेस्ट फर्स्ट.
ब्र.आ., तुमच्या गौडबंगालाबद्दल मला काय वाटतंय ते जरा वेळाने लिहिते. (तुमच्या म्हणजे तुम्ही मांडलेल्या :हाहा:)

<<धाग्यावरच्या फोटोंमधे नळ जोडणी वगैरे आहे. नळ जोडणी, अंतर्गत रस्ते बांधणी आणि इतर अनेक कामं आमच्या भागातले नगरसेवक, आमदार, खासदार (शिवसेनेचे) कसलाही गवगवा न करता करतात.>>

अश्विनी,
नळजोडणीचे जे फोटो टाकलेत ना ते देशाची राजधानी दिल्ली इथले आहेत. १५ वर्षे राज्यसरकार मध्ये काँग्रेस आणि नगरनिगममध्ये भाजपा आहे तिथे. आता असं तर नक्कीच नसेल की बाँग्रेसने केलेल्या नळजोडण्या रातोरात आपवाल्यांनी गायब केल्या आणि नवीन नळजोडणी केल्याचे फोटो दाखवत फिरले ! वाटतं तुम्हाला असं?
बरं गवगवा किंवा प्रसिद्धीसाठी म्हणावं तर एकही चॅनेलवाला नाहीये तिथे. स्थानिक रहिवाशांनी "Proud of my AAP MLA" असं सांगत स्वतःच्या कॅमेर्‍यातनं काढलेले फोटो आहेत ते.
१०० नवीन शहरं उभी करायची स्वप्नं दाखवून मतं लुटणार्‍यांना आधी खुद्द राजधानीत वीज,पाणी व्यवस्थित पुरवणं जास्त गरजेचं नाही वाटत का?

<< आमच्या मेन रोडपासून बिल्डिंगपर्यंतचा रस्ता सुधारणं ह्या जन्मी शक्य वाटत नव्हतं. पावसाळ्यात खड्ड्यांमधूनच चालावं लागे. >>

उत्तम. खरंच छान.
मुंबईत आहात ना तुम्ही? मुंबईच्या समस्या रस्ते आणि नळजोडणी ह्यापेक्षा फार पुढच्या आहेत. पावसाळा सुरू झाला की धडकी का भरते मुंबईकरांना? २६ जुलैचा प्रलय आठवतोय ना. कॅम्पाकोलातल्या लोकांचं सध्या काय चालू आहे माहीत असेलच. अशा न जाणो किती कॅम्पाकोला आहेत तिथे. मेंढरासारखी कोंबून गाड्यांना लोंबकळत जाणारी माणसे मुंबईतच आहेत ना?
डोंबिवलीमध्ये महिला बस कंडक्टरला एका प्रवाशाने मारलं, कपडे फाडले. का तर तिने त्याला पुढच्या दरवाजातून चढू नको म्हटलं.
ह्यात कुठेच सरकारची जबाबदारी नाही म्हणता? जिथे नळजोडणीसारख्या मुलभूत सुविधा झाल्या असतील तिथे आमदार-खासदारांनी नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी उचलायला नको? की आमच्याइथे बिल्डिंगपासून मेनरोडपर्यंतचा रस्ता बिनाखड्ड्यांचा आहे एवढ्यातच आपण खुष आहोत? त्या टिचक्या रस्त्याचा कामाचा खर्च किती लावला आहे हे कोणी बघितलंय का जाऊन? (मी बघितलेलं नाही. रिपोर्ट मागू नये.)

<<जरा फुस्स झाल्यावर राजिनामा दिला तर सत्तेचा सशक्त वापर करण्याची आशाच तुम्ही धुळीला मिळवता.>>

जरा फुस्स ?? जनलोकपालबिल मांडल्यावर बॉंग्रेसने एकत्र येऊन जो काही दंगा केलाय तो कुणी कुणी पाहिलाय ? इथे वाचा. खालून वरवर वाचत गेलात तर मिनिटस ऑफ सेशन मिळतील. भाजपा आणि काँग्रेस निवडणूकीआधी एकमेकांवर चिखलफेक करतात, लोक पेटतात आणि आपापल्या चॉइसच्या पक्षाला मत देतात. मतं मिळाली की दोन्ही पक्ष गळ्यात गळे घालून लोकांना लुटतात.
दोन्ही पक्षांना जनलोकपालबिल का नको आहे माहीत आहे का? कारण बिल पास झाल्यावर त्यातले निम्म्याच्या वर तुरुंगात जाऊन पडतील.
सिंगापूर 'लीस्ट करप्टेड कन्ट्रीज' मध्ये ५ व्या स्थानावर आहे त्यात लोकपालबिल हे एक कारण आहे.

आणि जनलोकपालबिल पास झालं नाही आणि तरी केजरीवालांनी राजीनामा दिला नसता तर हेच बाँग्रेसी सगळीकडे ढोल वाजवत फिरले असते की बघा रे बघा, हा कसा खुर्चीला चिकटून बसला.

राजीनामा दिल्यावर त्याच दिवसापासून आपवाले फेरमतदान घ्या म्हणून मागे लागलेत. का जून होत नाहीये तिथे फेरमतदान? कारण बाँग्रेसी ओळखून आहेत लोकसभेत जागा मिळाल्या नसल्या तरी आपच्या मतांची टक्केवारी वाढलेली आहे. "मोदी फॉर पीएम, ए के फॉर सीएम" हे दिल्लीकर आधीपासून म्हणतात. कारण त्यांनाही माहीत आहे की देशात अजून आपला कोणी ओळखत नाही. त्यामुळे पीएम म्हणून मनमोहनना मत देण्यापेक्षा मोदीला मत देणं जास्त हुशारीचं आहे. आता मनमोहन जाऊन मौनमोहन आलेत ती वेगळी गोष्ट.

राजकारणात शीतावरून भाताची परीक्षा करायची नसते.
भारताची गोष्ट घेतलीत तरी प्रत्यके भागात पुढार्‍याचा वेगळा अ‍ॅटीट्यूड बघावा लागतो.मुंबईचा एखादा गल्लीतला नेता जसा त्यांच्याशि वागतो तसा लहान गावा शहरातला नेता वागत असेल हे कशावरून? आपण जसे असतो तसेच जग असावे असा बराच मोठा ग्रह मेट्रोसिटीतल्या बर्‍याच (सगळ्याच असं नाही) लोकांना असतो.बाहेरशी त्यांचं काहीच घेणं-देणं नसतं आणि हे मी अनुभवलंय..

अठराच महीन्यात तुम्ही एखाद्या पक्षाची निंदा वा स्तुती कसे काय करु शकता?तो काय कंपनी प्रोबेशन पिरिएड आहे का की एखादी स्पर्धा??

आर्थिक अजेंडा हा मुद्द महत्वाचा आहे आणि आआपला याबद्दल कोणितरी बोलायला हवं.अजूनही तो कच्चा पक्ष आहे परंतु हे असं तरी ट्रिट करणं जास्त संयुक्तीक वाटत नाही.नंदिनी यांचे मुद्दे परत ताणून-ओर्डूण आल्यासारखे आहेत. ६५ वर्षाचा रिव्यु त्यांनी गावोगावी फिरुन किंवा निदान बातम्यांवरून तरी घेतलाय का?पंचायतीची बिहार,यूपी ठिकाणी अवस्था काय आहे हे त्यांना माहीत आहेच असे समजतो.

राजकीय अपरीपक्वता हा फार मोठा इश्यु कराण्यासाठी आपण लोकांनी आधी थोडी मॅच्यूरीटी दाखवावी असं वाटतं,इतर बाबातीत पक्षांच्या अस्थित्व-कार्याबाबत आपण असू परीपक्व वगैरे पण आआप बाबतीत थोडे उथळच वागतोय असं नाही का?

जरी तो पक्ष काही प्रमाणात उथळ असेलही... पण त्यांचं प्रगती पुस्तक मांडायची ही वेळ नाहीच. त्यांच्या चूकांवर सुधारणा अपेक्षीत आहेत.त्या कशा करायच्या यावर बोलायला हवं.तुम्ही त्या केजरीवालांच्या विचारांची तर विल्हेवाटच लावून टाकू लागलात.

ज्यावेळी अ.के.नी पक्ष स्थापनेचा निर्णय घेतला त्यावेळी असलेली परीस्थिती वेगळी होती.आण्णांनी ऊपोषन करून काहीच साध्य होईना तेव्हा त्यांना राजकारणात उतरणे हा एकच पर्याय समोर होता.आण्णांना मॅनेज करणं गरजेचं होतं.त्यांचा उपयोग करुन घेणं हेही योग्य आहे.चूक काहीच नाही त्यात...

खरे तर त्यांनी अठराच महीन्यात जे सत्तेत उतरण्याचं अणि सत्तेवर येण्याचं धाडस दाखवलं...आणि त्यानंतर गव्हर्नन्सबद्दलही गोष्टी घडल्या असत्या. सामान्य माणूस म्हणून त्यांनी जे केलं,तसं आणि निदान तेवढं तरी कोणी करु शकला असता काय?

मिर्ची,

>> माझ्यासारख्या राजकारणाचा वारा ही अंगाला लागू न देणार्‍या व्यक्तीला रात्री जागून कीबोर्ड बडवायला भाग
>> पाडणारा उद्रेक ! हा एकच समान विचार आहे.

पक्षबांधणीसाठी समान राजकीय विचार लागतो. हा उद्रेकजन्य विचार समान असला तरी यास राजकीय विचार म्हणता येणार नाही. अनेक सामान्य माणसे कितीतरी दशके असाच विचार करत अलेली आहेत. म्हणून सामन्यांचा म्हणून एक पक्ष होत नसतो. अगदी त्याला आमादमी पक्ष असं नाव दिलं तरी तो राजकीय पक्ष होत नसतो.

घरच्याघरी लोणचं बनवायचं असेल तर किरकोळ श्रम खर्च होतात. पण तेच लोणचं जर बाजारात खपवायचं असेल तर पार वेगळ्या प्रकारच्या अतिरिक्त बाबी ध्यानात घ्याव्या लागतात. सांप्रतकाळी आमादमी पक्ष हे घरचं लोणचं आहे.

आ.न.,
-गा.पै.

मिर्चीताईंनी मोदी धाग्यावर या प्रश्नांकडे पाठ फिरवून पळ काढला होता ते प्रश्न इथे देत आहे. उत्तर द्यायचे बंधन नाही. मात्र ठोस प्रश्न विचारल्यावर आपtards कसा पळ काढतात ते दाखवण्यासाठी हा प्रपंच.

-------------------------------------------------------------
मिर्ची, मी केजरीवालांना काही प्रश्न विचारले होते (दिल्ली निवडणुकीच्या सुमारास) त्यांची उत्तरे त्यांनी दिलीच नाहीत. पळपुटा कुठला. ती तुम्ही देणार का? द्या मग बोलू Lol

आम आदमी पार्टीच्या केजरीवालांना काही प्रश्न

(१) भ्रष्टाचाराविरोधात तथाकथित लढाई लढणार्‍या अरविंद केजरीवाल व त्यांच्या पत्नीची दिल्लीतून एकदाही बदली झाली नाही. पण अशोक खेमका व दुर्गा शक्ती यांच्या सारखी त्यांच्यावर एकदाही कारवाई झालेली नाही असे का?

(२) प्रशांत भूषण यांच्या टिप्पण्यांच्या संदर्भात आपची काश्मीर, भारतीय सेना, व तथाकथित हिंदू दहशतवाद यांच्या विषयी काय मते आहेत?

(३) आम आदमी पक्षाची रामजन्मभूमी या प्रश्नावर काय भूमिका आहे?

(४) बाटला हाऊस एनकाउंटरमधे हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी मोहनचंद शर्मा यांच्या हौतात्म्याविषयी आपचे काय मत आहे?

(५) आप केंद्रात सत्तेवर आल्यावर शीखविरोधी दंगलींतल्या आरोपींचे काय करणार?

(६) बिनायक सेन हा कोर्टाने शिक्षा सुनावलेला माओवादी नेता आप मधे कसा?

(७) भारतात इस्लामी सत्ता यावी म्हणून जाहीरपणे बोंबलणारा आणि ज्याच्या विरोधात डझनावारी वॉरंट्स आहेत अशा इमाम बुखारी या इसमासोबत केजरीवाल अनेक वेळा दिसलेले आहेत. यावर त्यांचे काय म्हणणे आहे? त्या दोघांतल्या संबंधांबाबत केजरीवाल यांच्याकडे काय स्पष्टीकरण आहे?

(८) भ्रष्टाचाराचे आरोप असलेले पवन बन्सल आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात केजरीवाल काहीच कसे बोलत नाहीत?

(९) उपोषणादि कार्यक्रमात आधी भारतमातेचे चित्र लावणार्‍या आपने नंतरच्या आपल्या कार्यक्रमांतून ते चित्र अचानक का गायब केले?

(१०) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीच्या एका उपोषणाच्या कार्यक्रमात अन्न वाढण्याच्या प्रकाराबद्दल केजरीवाल यांना विचारले असता मीडियाला बाईट देताना म्हणाले "आम्हाला जातीयवादी (communal) लोकांकडून समर्थन नको". मग याच आम आदमी पार्टीचे लोक उत्तराखंड कधे बाबा रामदेवांच्या लोकांनी चालवलेल्या रिलीफ कँपमधे (जे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी होते) ते जेवण हादडताना दिसले होते, त्याचे काय? फुकटचे गिळताना रामदेव बाबा सेक्युलर झाले का?

(११) हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या विरोधातल्या अनेक गंभीर आरोपांबद्दल केजरीवाल शांत का?

(१२) बाटला हाऊस एनकाउंटर हा फेक होता आणि इशरत जहां अगदी गोड गोजिरी लाज लाजिरी अशी भोळीभाबडी मुलगी होती आणि तो एनकाउंटरही फेक होता असे एका पत्रात केजरीवाल यांनी मुसलमान संघटनांना लिहीण्याचे काय कारण?

(१३) दहशतवाद विरोधी एनकाउंटरांची यादी देताना केजरीवाल यांना नेहमी गुजरात कसे आठवते? आणि तेही हे सत्य असताना की काँग्रेसशासित महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश तसेच पूर्वोत्तर राज्ये आणि उत्तर प्रदेश यांत हा आकडा/यादी कितीतरी मोठी आहे.

(१४) उत्तर प्रदेशातल्या दंगलींबाबत बोलताना केजरीवाल यांनी मोदी आणि अमित शहा यांचा ठळक उल्लेख करुन समाजवादी पक्षाचा अगदी जाता जाता पुसटसा उल्लेख का केला? या दोघांचा आणि उत्तर प्रदेशातल्या दंगलींचा काय संबंध? आणि तेही हे सत्य असताना की २ काँग्रेसचे माजी खासदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि काही बसपा आणि सपा खासदारांवर दंगली भडकावल्यचा आरोप आहे. काँग्रेसविषयी इतका सॉफ्ट कॉर्नर का?

(१५) भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मयंक गांधी आणि दमानिया या आम आदमी पार्टीच्या सदस्यांची चौ़कशी करायला केजरीवाल यांनी अंतर्गत लोकपाल नियुक्त करणे आणि सीबीआयने काँग्रेसची चौ़कशी करणे यात विनोदाचा भाग वगळला तर फरक काय?

(१६) माहिती अधिकाराचा डंका पिटणार्‍या आम आदमी पार्टीच्या Core Reforms team मधल्या सदस्यांवरच भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन अनेक माहिती अधिकारात अनेक अर्ज दाखल झाले आहेत. त्या अर्जांना आप उत्तर द्यायला टाळाटाळ का करत आहे?

-----------------------------------

त्यावर या पळून गेलेल्या दमानिया + इल्मी = मिर्चीताई.

आप आणि केजरीवालच्या प्रश्नांना पास
.

<<मिर्ची.. या चित्रांत जे दिसतंय तसं खरंच झालं असेल तर ते फारच दु:खद आणि शॉकिंग आहे. पण, फक्त असलेच फरक पूर्ण भारतात आहेत असं तुमचं म्हणणं आहे काय? >>

नाही मनिष, प्रगती अजिबात झाली नाही असं नाही म्हणायचं मला. पण फार धीम्या गतीने चालू आहे. किंवा खरंतर उल्ट्या गतीने जातेय की काय असं वाटण्यासारखं चित्र आहे.
युनायटेड नेशन्स डेवलपमेंट प्रोग्रॅम मध्ये भारताचा HDI-ह्युमन डेवलपमेंट इंडेक्स एका वर्षात ११९ (२०१०मध्ये) वरून १३४ वर (२०११ मध्ये) घसरला आहे.
आकडेवारीवरून नाही ठरवायचं म्हटलं तरी आपल्या आजूबाजूला घडणार्‍या घटना पाहिल्या की असं वाटतं खरं.

<<शिवाय... 'इकॉनॉमिक/इंडस्ट्रीयल पॉलिसी काय आहे आआपची' याबद्दल पण थोडं लिहाल काय? आआपकडं अर्थतज्ञ कोण आहे?>>

खरंच मला माहीत नाही. कदाचित माझं क्षेत्र नसल्याने मी त्या खोलात गेले नाही.
इकॉनॉमिक पॉलिसी विकसित करण्यासाठी आपची समिती तयार केली आहे.
बेंगलोरचे पृथ्वी रेड्डी, रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडच्या माजी अध्यक्षा मीरा संन्याल, अतिशी मार्लिना, असीम श्रीवास्तव हे लोक आहेत.

भाजपा किंवा काँग्रेसला समर्थन देणार्‍या किती जणांना त्या पक्षांची इकॉनॉमिक/इंडस्ट्रीयल पॉलिसी काय आहे ते माहीत आहे? भाजपाने FDI च्या निमिताने इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये घेतलेला एक मोठ्ठा यु-टर्न मी बघितला. असं असेल तर काय अर्थ आहे पॉलिसी असूना आणि नसून?
FDI चांगलं की वाईट ह्यावर प्रत्येक नागरिकाला सखोल ज्ञान असणं शक्य नाही. पण एक गोष्ट नक्कीच खटकतेय की निवडणूकीपूर्वी ४६% FDI च्या विरूद्ध निदर्शने करणारे लोक सत्तेत आल्यावर १००% FDI आणणार म्हणतात. काय कारण असावं ह्यामागे?
भाजपा निवडणूकीपूर्वी -
FDI 1.JPGFDI 2.JPGFDI 3.jpgFDI 5.jpgFDI 6.jpgFDI 7.jpg

भाजपा निवडणूकीनंतर -
Govt moves to hike defence FDI up to 100%

हे नेमकं काय गौडबंगाल आहे?? सत्तेत आल्यावर नेमकं काय बदललं? कुणाला ही इकॉनॉमिक पॉलिसी कळली तर प्लीज मला समजावून सांगा.

विज्ञानदास

त्या वेळी परिस्थिती वेगळी होती म्हणजे काय होतं नेमकं ? मी तपशील दिलेले आहेत. आणखीही देऊ शकतो. पण दिलेले पुरेसे असावेत असं वाटतंय. दोन कोटी रुपयांवरून अण्णा आणि केजरीवाल यांच्यात धुसफूस झाली हे बाहेरही आलं. वाद विकोपाला गेल्याबरोबर अण्णांविषयी निगेटीव्ह बातम्या येऊ लागल्या तर केजरीवालांनी मला पैसे नको, मी सर्व अण्णांना द्यायला तयार आहे असं मानभावीपणे म्हणत पैसेही दिले नाही आणि कॅमेरेही दिले नाही. जर टीम अण्णा या नावाखाली आंदोलनासाठी एकत्र जमले होते तर अण्णांचा शब्द तेच सांगत असल्याप्रमाणे अंतिम असायला हवा होता. जर पक्ष काढायचा होता तर आधीच अण्णांना कल्पना द्यायला हवी होती. समजा ते म्हणतात तसे नंतर विचार मनात आले तर टीमची शिस्त पाळायला हवी होती.

एकंदर घटनाक्रमावरून आणि अण्णा सोडून सगळे एका बाजूला आणि कॅमेरेही त्याच बाजूला गेल्याचे पाहून अण्णांना या प्लॅनची कल्पना नसावी हे दिसून आलं. त्यांची सरळ फसवणूक झाली. याच कारणासाठी किरण बेदीही बाजूला झाल्या. अर्थात हे सर्व नेते त्यापूर्वीच आपल्या तोंडाळपणामुळे आणि ओढणीनृत्यामुळे मनातून उतरले होते. तरीदेखील काहींना त्यांच्यात मसीहा दिसत होता. त्यांचा भ्रमनिरास दिल्लीत सत्ता आल्यावर झाला. त्याविषयीचे प्रश्न नंतर.

<<राजकीय अपरीपक्वता हा फार मोठा इश्यु कराण्यासाठी आपण लोकांनी आधी थोडी मॅच्यूरीटी दाखवावी असं वाटतं,इतर बाबातीत पक्षांच्या अस्थित्व-कार्याबाबत आपण असू परीपक्व वगैरे पण आआप बाबतीत थोडे उथळच वागतोय असं नाही का?>> +१०००

<<सांप्रतकाळी आमादमी पक्ष हे घरचं लोणचं आहे.>> गापै, घरचं लोणचं जास्त चविष्ट आणि विश्वासार्ह असतं Wink

सन्माननीय विचारवंत,
तुमचा उद्देश फक्त आणि फक्त खोड्या काढणं हाच दिसत असल्याने तुमच्या प्रश्नांना आत्ताही पास.
'भारतमाता डायन है' च्या वेळीच तुमची आप वरच्या आरोपांची योग्यता आणि विश्वासार्हता लक्षात आली असल्याने तुमच्या असल्या उथळ प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही.
पळपुटे म्हणा नाहीतर सोशल मीडियावर भक्तगणांनी दाखवलेली पात्रता दाखवणारे शब्द वापरा. आय डोण्ट केअर.

रिटेल FDI आणि डिफेन्स FDI ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना? मग ह्याला युटर्न कसा काय म्हणणार ?

बाकी हल्ली ज्या पद्धतीने आपवाले त्यांची 'विचारसरणी' डिफेन्ड करतात त्यावरून आप हा एक 'कल्ट' वाटायला लागला आहे !

<<नो बडी हेट्स हिम, पॉइंट इज - हि इज नॉट लीडर्शीप मटीरियल. >>

भगोडा, खुजलीवाल, ट्रॅजडीवाल, वेश्या, पाकी एजण्ट, सीआयए एजण्ट, दलाल, बिनडोक, वेडसर, हुकुमशहा....ही स्तुतीसुमने आहेत का राज?
भाजपाच्या विरोधात उभा राहिल्यापासून असली विशेषणे आणि कमरेखालच्या भागांवरून गलिच्छ शिव्या दिल्या जात आहेत केजरीवालला.

<<आपच्या गोटातल्याच लोकांनी (शायना, कॅ. गोपीनाथ इ.) जहाजावरुन उड्या टाकलेल्या आहेत, काहि तयारीत आहेत. काय कारणं अस्तील बुवा? >>

शाझियासाठी माझं एकच उत्तर 'केजरीवाल होणं सोप्पं नाही'. फार मोठ्ठं धैर्य आणि जिद्द पाहिजे त्यासाठी. कमी पडल्या त्या. त्यांचा आक्षेप होता 'अरविंदला चौकडीने घेरलंय' अरविंदबद्दल तक्रार नव्हती त्यांची.
आप ज्या कारणासाठी अस्तित्वात आलाय त्या कारणावर त्यांची निष्ठा नसेल आणि हार-जीत असल्या गोष्टींनी मनोधैर्य खचणार असेल तर त्यांचं आप मध्ये तसं ही काय काम?

कॅप्टन गोपीनाथ, बिन्नी, अश्विनी उपाध्याय.....हे सगळे आप सोबत स्वतःहून आले होते की कोणाच्या सांगण्यावरून हे एक कोडंच आहे. आप च्या कुठल्या कामात त्यांनी सक्रिय भाग घेतल्याचं पाहण्यात नाही. अण्णा आंदोलनापासून जो काही बुध्दिबळाचा खेळ चालू आहे त्याचा ते एक भाग असावेत असंच जास्त वाटतंय.

परवा राहुल कंवलला आप खासदार भगवंत मानने सांगितलं तसं, "लोक जात आहेत तसे जॉइन ही होत आहेत. पण तुम्ही फक्त जाणार्‍यांच्या बातम्या दाखवता"

ज्याला कोणाला टीव्हीवर झळकायचं असेल त्यांच्यासाठी एक मस्त ऑफर. मिस्ड कॉल देऊन किंवा ऑनलाइन आपची मेंबरशिप घ्या. आणि ८-१० दिवसांत 'आप कशी बेक्कार पार्टी आहे' हे सांगण्याच्या वायद्यावर चॅनेलवाल्यांना फोन करा. धावत येतील ते आणि "आप चे वरिष्ठ नेते आप च्या अराजकाला कंटाळून सोडून चाललेत" अशी दिवसभर 'इस घंटेकी सबसे बडी खबर' दाखवतील ! Lol

<<रिटेल FDI आणि डिफेन्स FDI ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना? >>

कशात FDI येतोय त्याने काय फरक पडतो? समजावून सांगाल का? खरंच विचारतेय. म्हणजे मी नंतर कोणाशी ह्या पॉइंटवर वाद घालणार नाही.

<<बाकी हल्ली ज्या पद्धतीने आपवाले त्यांची 'विचारसरणी' डिफेन्ड करतात त्यावरून आप हा एक 'कल्ट' वाटायला लागला आहे !>>
बाकीच्या आपवाल्यांचं माहीत नाही. पण मी हेडरमध्ये लिहिल्याप्रमाणे जेव्हा आप त्याच्या मूळ उद्देशापासून हटेल तेव्हा माझा रामराम. मधल्या काळातल्या शंभर चुका माफ. सध्याच्या राजकारण्यांचे गुन्हे मान्य नाही करू शकत.:)

मिर्चीतै,

उत्तम धागा आणि सर्वोत्तम प्रतिसाद!! तुमच्या संयमाला आणि चिकाटीला सलाम!!
चांगले काम करत अहात. असेच चालू ठेवा.

मेडीया जर आपविरोधी असेल तर गेली अडीच वर्षे दमानिया बाईं आणि मयंक गांधीं सारख्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांनाही टीव्हीवर कशासाठी बोलावलं जात होतं ? केजरीमुखातून येणा-या प्रत्येक वाक्याला देशाचा अजेण्डा म्हणून का सांगितलं जात होतं ? अजूनही मेडीयाने २४ तास कव्हरेज देण्याचं कारण काय याचंच उत्तर मिळालेलं नसल्याने मेडीया आप वर नाराज आहे हे पचनी पडण्यास जड जात आहे.

Pages