आई मेंढ्या हाकत आहे, बाप दिवंगत आहे
लुगड्याच्या झोपाळ्यावरती बाळ तरंगत आहे
पायामध्ये चाळ बांधुनी बैठकीस आल्यावर
मूल रडत नाही ना बघणे फार विसंगत आहे
स्थलांतराच्या सातत्याची चिंता नाही त्यांना
स्वार्थासाठी त्यावरती लिहिणारा खंगत आहे
तुम्ही फक्त माझे काका ना, म्हणत बिलगली पोरे
हीच एक त्या अनाथ जगण्यामधली रंगत आहे
ढकलाढकली करत मिळवती जागा जेवायाला
उद्या कदाचित नसणार्यांची अंतिम पंगत आहे
मीच एकटेपणा स्वतःचा इथे घालवत बसलो
वृद्धांना तर आश्रमात स्मरणांची संगत आहे
कुटुंबवत्सल होण्याची वेश्येला इच्छा नाही
घरात नुसत्या नजरांनी कौमार्य दुभंगत आहे
मनातले जर व्यक्त न केले, अशीच घुसमट होते
तुला रात्रभर झोप न येणे पूर्ण सुसंगत आहे
आमच्यातले प्रेम कसे वाढेल...... पाहण्यामध्ये
मी पारंगत नसलो तर मग ती पारंगत आहे
'बेफिकीर' दुनियेचे वास्तव नकोस रेखाटू तू
दुनिया तर सुधरत आहे पण गझल सवंगत आहे
-'बेफिकीर'!
काय प्रतिसाद द्यावा सुचतच
काय प्रतिसाद द्यावा सुचतच नाहीये...
आई मेंढ्या हाकत आहे, बाप दिवंगत आहे
लुगड्याच्या झोपाळ्यावरती बाळ तरंगत
आहे
े
पायामध्ये चाळ बांधुनी बैठकीस आल्यावर
मूल रडत नाही ना बघणे फार विसंगत आहे
फार वेगळे खयाल आणि मांडणी .... सलाम !
घरात नुसत्या नजरांनी कौमार्य दुभंगत
आहे<< निशःब्द ...
मनातले जर व्यक्त न केले, अशीच घुसमट
होते
तुला रात्रभर झोप न येणे पूर्ण सुसंगत आहे << सह्ही !
धन्यवाद या गझलेसाठी ..
मनातले जर व्यक्त न केले, अशीच
मनातले जर व्यक्त न केले, अशीच घुसमट होते
तुला रात्रभर झोप न येणे पूर्ण सुसंगत आहे >>>> क्या बात है ..!
आवडली खूप
आवडली खूप
शब्द नाहीत
शब्द नाहीत
आवडली
आवडली
आवडली. शेवटच्या शेराचा अर्थं
आवडली.
शेवटच्या शेराचा अर्थं नीटसा कळला नाही.
हरेक शेराने पराकोटीच अस्वस्थ
हरेक शेराने पराकोटीच अस्वस्थ व्हायला होतय ,
तुमच्या या गझलेसाठी लवून मुजरा !
-सुप्रिया.
>>शेवट्चा शेर समजला
>>शेवट्चा शेर समजला नाही<<
गझल सवंगत आहे. = सवंग होते आहे.
ते दिवंगत वगैरे शब्द वापरून असल्या गझला कराव्या लागल्याबद्द्लचे विद्ध झालेले कविकाळीज विव्हळत आहे. दुसरे काही नाही. असं लिहून ठेवलं की नंतर मग आपलीच डायरी वाचताना आपल्याला बोअर होत नाही, अन वारसांनी वाचली तर कित्तिईकित्तई ऑनेस्ट बै ते! असं त्यांना फीलींग येईल, असं आपल्याला फीलींग येतं.
हॅट्स ऑफ.
हॅट्स ऑफ.
काफियातील वेगळेपणा खयालांनी
काफियातील वेगळेपणा खयालांनी नीट पेलला आहे ..
आवडली
आवडली
डॉक्टर इब्लिस नाही तसे काही
डॉक्टर इब्लिस
नाही तसे काही नाही. 
सर्वांचा आभारी आहे.
माननिय प्रशासक हा काय प्रकार
माननिय प्रशासक
हा काय प्रकार आहे ? हे बेफिकिर म्हनजे राश्ट्रपतिचे दुत आहे का ? हे काहि पन जुलाब केल्यासारक लिहुन ठेवतात आनि दुस-याच्य इथ येउन दमदाटि करतात. हि दडपशाहि नाहि का ? आपन न्याय करावा. आपल्यावर पुर्न विश्वास आहे.
जर हे राश्ट्राति असतिल तर काहि म्हनन नाहि. पन आमच्यसारकेच सामान्य सदस्य असतिल तर सारखि सारखि प्रत्येक ठिकानि वॉर्निन्ग द्यायला यान्चा काय अधिकार आहे याचा खुलासा व्हावा. याना अशे अधिकार असतिल तर म्हनने मागे घेतो पन नसतिल तर याना कन्ट्रोल मधे ठेवावे हि नम्र विनन्ति. त्याना तक्रारि करायच्या असतिल तर आपल्याजवल करायला सान्गाव्यात हि विनन्ति.
नेहमीसारखीच...आवडली!
नेहमीसारखीच...आवडली!
नेहमीसारखीच...आवडली!
नेहमीसारखीच...आवडली!
खूप वेगळ्या धाटणीची
खूप वेगळ्या धाटणीची गझल...
सुंदर
खूप आवडली
तुम्ही फक्त माझे काका ना,
तुम्ही फक्त माझे काका ना, म्हणत बिलगली पोरे
हीच एक त्या अनाथ जगण्यामधली रंगत आहे>>> :'(
गझल आवडली…
आई मेंढ्या हाकत आहे, बाप
आई मेंढ्या हाकत आहे, बाप दिवंगत आहे
लुगड्याच्या झोपाळ्यावरती बाळ तरंगत आहे
पायामध्ये चाळ बांधुनी बैठकीस आल्यावर
मूल रडत नाही ना बघणे फार विसंगत आहे
स्थलांतराच्या सातत्याची चिंता नाही त्यांना
स्वार्थासाठी त्यावरती लिहिणारा खंगत आहे
तुम्ही फक्त माझे काका ना, म्हणत बिलगली पोरे
हीच एक त्या अनाथ जगण्यामधली रंगत आहे
ढकलाढकली करत मिळवती जागा जेवायाला
उद्या कदाचित नसणार्यांची अंतिम पंगत आहे
कुटुंबवत्सल होण्याची वेश्येला इच्छा नाही
घरात नुसत्या नजरांनी कौमार्य दुभंगत आहे
हे वास्तवदर्शी शेर, सत्यकथनाच्याच ठोकपणे व्यक्त झालेले आवडले. खासकरून मतला आणि स्थलांतर.
मनातले जर व्यक्त न केले, अशीच घुसमट होते
तुला रात्रभर झोप न येणे पूर्ण सुसंगत आहे
आमच्यातले प्रेम कसे वाढेल...... पाहण्यामध्ये
मी पारंगत नसलो तर मग ती पारंगत आहे
ह्या शेरांत कल्पनाविलास जाणवला. पैकी सुसंगत जास्त आवडला.
'बेफिकीर' दुनियेचे वास्तव नकोस रेखाटू तू
दुनिया तर सुधरत आहे पण गझल सवंगत आहे
'सवंगत' ही Neology आवडली.
दुसरी ओळ कडवट वास्तव रेखाटते आहे.
अस्वस्थ करते ... तरीही आवडली
अस्वस्थ करते ... तरीही आवडली .
धडा पहिला : मॅ अॅ रॅ चॅ श्यॅ
धडा पहिला :
मॅ अॅ रॅ चॅ श्यॅ हे टाईप करण्यासाठी काय करावे ?
दोन्ही हाताची बोटे स्वच्छ धुवून घ्यावीत व नंतर श्यॅ टाईप करायचे असेल तर १. एस २. एच ३. शिफ्ट + ई अशी बटणे दाबावीत.
आता तुम्ही एडमिन हा शब्द टाईप केलाय एड नी सुरू होणारी संबोधने मराठीत तितकीशी चांगली नाहीत. तेव्हा 'अॅ' टायपण्यासाठी : दोन्ही हात स्वच्छ धुवून फक्त शिफ्ट + ई दाबा.
---------------------------------------------------------
१. एस २. एच ३. शिफ्ट + ई = शॅ
जमल.
शिफ्ट + ई = अॅ हे पन जमल
शिफ्ट + ई = अॅ
हे पन जमल
नै आवडली
नै आवडली
नवीन प्रतिसाददात्यांचे अनेक
नवीन प्रतिसाददात्यांचे अनेक आभार!
विनायक -
कृपया थोडे विस्तारपूर्वक लिहिलेत तर मला त्यावर विचार करता येईल. विनंती करतो की काही गोष्टी खटकलेल्या असल्यास कृपया नोंदवाव्यात! 
गझल आवडली मतला, पंगत, सुसंगत
गझल आवडली
मतला, पंगत, सुसंगत हे शेर विशेष.
आवडली.
आवडली.
बेफिकीर, गझल चांगली आहे. पण,
बेफिकीर,
गझल चांगली आहे.
पण, १,२,४ हे शेर गझलेसाठी म्हणून घेऊ नयेत असे वाटते.
मला आवडलेले शेर,
ढकलाढकली करत मिळवती जागा जेवायाला
उद्या कदाचित नसणार्यांची अंतिम पंगत आहे
मीच एकटेपणा स्वतःचा इथे घालवत बसलो
वृद्धांना तर आश्रमात स्मरणांची संगत आहे
कुटुंबवत्सल होण्याची वेश्येला इच्छा नाही
घरात नुसत्या नजरांनी कौमार्य दुभंगत आहे
मनातले जर व्यक्त न केले, अशीच घुसमट होते
तुला रात्रभर झोप न येणे पूर्ण सुसंगत आहे
आमच्यातले प्रेम कसे वाढेल...... पाहण्यामध्ये
मी पारंगत नसलो तर मग ती पारंगत आहे
व्वा..!
इतकं सुंदर लिहू नका
इतकं सुंदर लिहू नका राव.....थरथर होते अंगाची.....शब्द दूर पळून जातात ओठातले.....अभिप्राय करणे सोडा डोळेच उघडावे वाटत नाही.....चरणस्पर्श
संतोष बेफि - छान आहे. अर्थात
संतोष
बेफि - छान आहे. अर्थात आम्ही पामर फार काही सांगू शकत नाही याबाबत.
tumachya gajlevar pratikriya
tumachya gajlevar pratikriya detana tukaram maharajanchya ambhangachya don woli tevhadhya athavalya.
maj pamara he kay thorpan
payichi vahan payi bari....................
chahate to hum aapko pahele se the, par aaj se aapke bhakt ho gaye........................
बेफी............. कसे
बेफी............. कसे आहात????
गझल अॅज युज्वल क्लास....