बिल्डरच्या चुकिची शिक्षा रहिवाशांना नको, लतादिदि

Submitted by Babaji on 10 June, 2014 - 00:18

बिल्डरच्या चुकीची शिक्षा रहिवाशांना नको, लतादिदि केम्पा कोलावासियांच्या पाठिशी.

लतादिदिंनी केलेल ट्विस्ट.

http://www.twitlonger.com/show/n_1s22pf7

latamangeshkar ✔ @mangeshkarlata
Follow

Namaskar.campa cola compound case ke baare mein main Maharashtra government se ek hi baat kehena chahti hun ki yaha ke makan todne se hazaaro log beghar ho jaayenge jisme kai bacche aur budho'n ka samavesh hai. Aaj tak 3 vyaktiyo'n ki jaanein is sadme se jaa chuki hai. Builders ki galti ki saza aam nagriko'n ko bhugatni pade ye anyaay hai.

http://tl.gd/n_1s22pf7
3:41 PM - 9 Jun 2014

खरच बिल्डर लोक चुका करतात नि सामान्य, गरिब मानसाला त्या चुकामुळे मनस्ताप, नुकसान भोगाव लागत. केम्पा कोला सोसायटितल्या लोकाना शिक्षा नको तर बिल्डरला करा हे लतादिदिंनी सांगितल हे बर झाल. दिदिंनि सामाजिक विषयाच्या या प्रश्नता सहभाग घेतला हे पन बर झाल. कारन आता त्यामुळ न्याय मिळल अस वाटत.

लतादिदिंच्या मुखात सरस्वति आहे.
त्यांनी सचिनला म्हटले कि मला तुला भारतरतन झालेल बघायचे आहे तर तसच झाल.
त्यानी नरेन्द्र मोदि याना म्हटले कि मला तुम्हाला पन्तप्रधान झालेले बघायला आवदेल तर तसच झाल.
त्यामुळ आता लतादिदिंनी म्हटले तस्च होईल हि शक्यता आहे.

लतादिदिंनी आपल्या D पोजिशनचा सामाजिक कामासाठि वापर करुन चान्गला आदर्श घालुन दिला आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्याम्पा कोलातील मण्डळी सामान्य असती आणि त्यानी बेकायदेशीर घराला कर्ज मागितले असते तर ब्यान्कान्नी ते दिले नसते.

पण बेकायदा इमारतीत त्यान्न्वे घर घेअतले आहे म्हणजे रोख पैसे मोजुनच व्यवहार केला असणार.

म्हणजे धनदान्डन्यान्नी रोखीने वाटेल ते घ्यावे आणि सामान्य माणसाने मात्र नियम पाळत बसायचे का?

हेच होणार असेल तर मानखुर्द झोपडपत्तीत जागा घेतलेली बरी. तसेही आमच्य एरियाचा शिलेदार गल्लीतुन डायरेक्ट दिल्लीत गेला आहे.

दुकान्या , लताबैंचं जाउ दे ! पण तु पान्डवाना खान्डव्वनाची झोपडपट्टी दिलीस आणि पुढे त्यान्नीच तुझा नाश केला. इसरलास की काय ! Proud

क्याम्पा कोलातील मण्डळी सामान्य असती आणि त्यानी बेकायदेशीर घराला कर्ज मागितले असते तर ब्यान्कान्नी ते दिले नसत>
लगोकाकू, काही वेळा बिल्डर लोक्स ५ मजले मंजुर करुन १० बांधतात, आणि फोर्जरी करुन कागदपत्र देतात बँक ते कागदपत्र बघुन कर्ज देते.

रच्याकने, दुर्योधन कानतोडे या नावाचा दुकान, दुकानराव, दुकानभाऊ हा शॉर्ट फॉर्म करनार्याना सलाम.____/\____

ते काही असो, दुकानभाऊंच्या माग च्या ' भूमिका ' काही फारशा गाजल्या नाहीत पन हा 'रोल ' मात्र गाजतो आहे "_

मागे मुसलमान बहुल कळवा मुम्ब्रा येथील अनधिक्रुत बान्धकामाबाबत जनतेला शिक्षा नको असे मुसलमान व पवारादी बोल्ले तर हिन्दुत्ववाद्यानी किती रोस्श प्रकट केला होता.

आता क्याम्पा कोला बाबत लताबैन्नी तेच विधान केले तर इथले पहारेदार गप्प का बसलेत?

आता क्याम्पा कोला बाबत लताबैन्नी तेच विधान केले तर इथले पहारेदार गप्प का बसलेत?
---- त्यान्नी काही क्षेत्र लगो आणि समविचारी साठी मोठ्या मनाने (मराठीत ग्रेसफुली) मोकळे सोडले आहे... Happy

हे क्षेत्र राज्याच्या अखत्यारित आहे का केन्द्राच्या यावर पहारेकरी आधी विचार करतील.

अजुनही आदर्षची जमीन कुणाची हे छातीठोकपणे सरकारी उच्चपदस्थ सान्गत नाही. रक्षा सचिव म्हणतात आमची जमिन/ आमचा हक्क आहे, राज्याचे सचिव म्हणतात आमची जागा, अत्यन्त महत्वाचे कागदे/ फायली गहाळ असतात. आणि या प्रकरणात ३-३ फ्लॅट मिळालेले चव्हाण पुन्हा खासदार म्हणुन जनतेला सामोरे जातात... अवैध रितीने फ्लॅट बळकावलेले IAS IFS पदोन्नती मिळते.

>>>> दुकान्या , लताबैंचं जाउ दे ! पण तु पान्डवाना खान्डव्वनाची झोपडपट्टी दिलीस आणि पुढे त्यान्नीच तुझा नाश केला. इसरलास की काय ! <<<<<
बाकि विषयाशी मला आत्ता तरी देणेघेणे नाही, पण लगोकाकू, पान्डव "क्षत्रीय" होते बर्का..... तेवढ विसरू नका म्हणजे झाल. Wink

ब्रह्मांड आठवलेसाहेबानी छान माहितीपर लिन्क दिली... धन्यवाद. बातमीमुळे आस्चर्य नाही वाटले... लताजी काही लाभ असेल तरच लिहायचे/ बोलायचे कष्ट घेतात.

आ. न.
रॉबीनहूड>>
ते
आ.न.
रॉ.हू.

असं पाहिजे होतं का?

राजकीय वरदह्स्त व संबंधित नोकरशाहीचा सहभाग असल्याशिवाय बिल्डर्स [ किंवा झोपडपट्टीदादा ] असले चाळे करायला धजावणं शक्यच नाही. तुमच्या वन-बी-एच-के फ्लॅटची गॅलरी कांचा लावून बंद केलीत तरी तात्काळ नोटीस देणारे, इतके जादा मजले अनधिकृत असूनही इतकीं वर्षं त्याची दखल न घेतां कसे राहूं शकतात ? 'कॅम्पा कोला'तील मंडळी सधन व सुशिक्षित आहे असं निश्चितपणे वाटतं व त्यानाही या गैरप्रकाराची कल्पना असावी. पण इतरत्र होतं तसं वशिलेबाजीने हें सारं नियमित केलं जाईलच, या विश्वासावरच त्यानी जागा घेतली असण्याची शक्यता नाकारतां येत नाही. जर फ्लॅटधारकांवर कारवाई होत असेल तर त्याचबरोबर - किंबहुना त्याआधीं - बिल्डर,संबंधित राजकीय व्यक्ती व अधिकारीवर्ग यांचेवर कारवाई होणं तितकंच गरजेचं आहे. नपेक्षां, रोगाच्या कीटाणूना धष्टपुष्ट करून रोगाची लागण झालेल्यानाच मारण्यासारखं होईल. जें 'कॅम्पा कोला'ला तेंच अनधिकृत झोपडपट्यानाही लागू होतंच .

तेंच अनधिकृत झोपडपट्यानाही लागू होतंच .>>>> बेहरामपाड्यातील वांद्रे स्टेशनला लागून असलेली मध्यंतरी जळलेली(? की जाळलेली?) अनधिकृतरित्या अस्ताव्यस्त वाढ झालेली झोपडपट्टी प्रिया दत्तच्या कृपेने ऑफिशियली पक्क्या भिंती बांधून देवून पुन्हा टेचात उभी राहिली.

लगो काकू नसून काका आहे
आ. न.
रॉबीनहूड
>>रॉबीनहूड इथला प्रतिसाद (अग्गोबाई वाला) पाहुन 'लगोकाकू' असं संबोधन वापरलं गेलं आहे..

मुख्यमंत्री पदाचे उमेदवार व मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कॅम्पा कोला इमारती प्रकरणी प्रतिक्रिया :

http://zeenews.india.com/marathi/news/mumbai/do-not-take-action-against-...

<< मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कॅम्पा कोला इमारती प्रकरणी प्रतिक्रिया :>> " रहिवासी अनधिकृत बांधकामांना जबाबदार नसल्याचं राज यांनी म्हटलंय. या अनधिकृत बांधकामांना जबाबदार असलेल्या बिल्डर, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? " राज यांच्या या विधानाच्या उत्तरार्धाशीं पुर्णपणे सहमत पण पूर्वार्धाबद्दल मीं जरा साशंकच; झोपडपट्टी काय किंवा अशा इमारती काय, त्या अनधिकॄत असल्याची जाणीव असूनही त्या राजकीय पाठींब्याने व पैसे चारून नियमित केल्या जातील , निदान पाडल्या तरी नक्कीच जाणार नाहीत, या खात्रीने लोक त्या बिनधास्त घेतात व म्हणूनच अशीं बांधकामे बोकाळलीं आहेत. त्या दृष्टीने, असे रहिवासीही कमी अधिक प्रमाणात याला जबाबदार ठरतातच .

भाऊ नमसकर यांच्या दोन्ही प्रतिसादांशी सहमत.

कॅम्पाकोलातील रहिवाशी सधन व सुशिक्षित नक्कीच असणार आणि त्यांना ईमारतीच्या काही मजल्यांच्या बांधकामाला रितसर परवानगी नाही हे सुध्दा माहित असण्याची शक्यता आहे. पण पुढे मागे ते नियमित होईल असे त्यांना वाटले असेल किंवा विकासकाने त्यांना तसे पटवुन दिले असेल. ह्या प्रकरणात जेवढे तेथिल रहिवासी दोषी आहेत तेव्हढेच दोषी विकासक व शासकीय अधिकारी सुध्दा आहेत त्यांना सुध्दा शिक्षा झाली पाहिजे.

आत्तांच दोन टी.व्ही. वाहिन्यांवर सांगण्यात आलं कीं 'कॅम्पा कोला'त लता मंगेशकर यांचा फ्लॅट [२ फ्लॅटस ?] आहेत. खरं खोटं देव जाणे ! पण खरं असेल तर << दिदिंनि सामाजिक विषयाच्या या प्रश्नता सहभाग घेतला हे पन बर झाल. >> याला बाधा येईल !

Pages