मध्यंतरी एक दिवस मुलांच्या खोलीत रात्री झोपले होते. त्यांच्या रूममधला बेड खिडकीपाशी आहे. पहाटे तीन-एक वाजता अचानक जाग आली आणि खिडकीतून बाहेर नजर टाकली तर खिडकीला लागूनच असलेल्या चेरी ब्लॉसमच्या आडून शर्मिष्ठेचा 'M' नजरेस पडला. अहाहा! पहाटे ची ती सुंदर, शांत वेळ, पडल्या पडल्या खिडकीतून दिसणारे अगणित चमचमणारे तारे, त्या तारका प्रकाशात चमचणारे चेरी ब्लॉसम आणि त्यात उठून दिसणारी शर्मिष्ठा! मंत्रमुग्ध होऊन पहातच राहिले कितीतरी वेळ! मग शर्मिष्ठाचे दोन तारे जोडून धृव तार्याला जोडण्याचा खेळ खेळून झाला. मंद पणे लुकलुकणार्या ध्रृव तार्याचं दर्शन घेऊन झालं.
प्रकाश चित्र नेट वरून साभार!
कित्येक वर्षांनी इतक्या निवांतपणे अशी आकाश न्हाहाळत्ये मी असं जाणवलं मला! कित्येक वर्षांपूर्वी च्या खगोल मंडळा च्या वांगणीच्या आकाश दर्शनाच्या कार्यक्रमाची आठवण झाली! आणि आपोआपच मन त्या 15-20 वर्षापूर्वीच्या तरल आठवणीं मध्ये शिरलं. आकाश निरीक्षणाची ती जादूई sessions, त्या अनुषंगाने काय काय आठवत गेलं...एकदा माझी भूतकाळाची पोतडी उघडली की त्यातून काय बाहेर पडेल, किती वेळ पोतडी उत्खनन चालेल काही सांगता येत नाही.
मी अश्या प्रकारे माझ्या काही वर्षांपूर्वीच्या भूतकाळात शिरले असताना, आपण खरं तर कित्येक अब्ज प्रकाशवर्षे पूर्वीचा भूतकाळ बघतोय ही भावना स्पर्शून जात होती - जी कधीही आकाश न्हाहाळताना मनात चमकून जाते! आज जे तारे आपण बघतोय, तो light खरं तर लाखो-करोडो प्रकाशवर्षे पूर्वी त्या तार्यांकडून निघालेला आहे, ते तारे कदाचित या क्षणी अस्तित्वातच नसू शकतात - किती गंमत आहे ना!
आकाश निरीक्षण करताना हमखास मनात येणारी दुसरी भावना म्हणजे विश्वातील ती प्रचंड अंतरं, ती भव्यता, ती गूढ- unknown ची भावना. काय आहे हे सगळं? काय उद्देश आहे ह्या सार्याचा? या इतक्या प्रचंड विश्वातलं आपलं स्थान, आपली क्षृद्रता, कशासाठी 'मी-माझं' म्हणत आपण वावरत असतो - असं सगळं मनात तरळून जाणं - हे अनिवार्य!
माझ्या आणि तार्यांच्या भूतकाळात मी अशी रममाण झाले असताना नीद्रादेवींनी परत कधी आपला अंमल चढवला कळलंच नाही!
आवडलं!
आवडलं!
मस्त लिहिलयं!! अब्ज
मस्त लिहिलयं!!
अब्ज प्रकाशवर्षे -- अब्ज वर्षे करणार का?
छान लिहिलय. असे अनुभव येतात.
छान लिहिलय. असे अनुभव येतात. मला कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर शेकडो, हजारो वर्षांपूर्वी तिकडे काय असेल असा कल्पनाविलास करायला खूप आवडत.
मस्त लिहिलंयस.
मस्त लिहिलंयस.
खुप छान
खुप छान
मस्त आहे, अजून सविस्तर लिही
मस्त आहे, अजून सविस्तर लिही ना.
छॉटासा टिम्टिम ठिपका हा प्रचंड मोठा आग ओकणारा वगैरे गोळा असेल हे माझ्या मनाला पटतच नाही. मला अजूनही रात्रीच्या वेळी आकाशाकडे पाहिल्यावर एखाद्या छोट्या मुलीने हातातली फुलांची परडी रूसून फेकून दिल्याने अशी फुलं सांडल्यासारखी वाटतात.
ते प्रकाशचित्र पाहिल्यानंतर
ते प्रकाशचित्र पाहिल्यानंतर लगेच ल्क्षात आल की सध्याच्या खासकरुन शहरी वातावरणात जिथे सिटी लाईटसचा प्रभाव असतो तेव्हा इतके सुंदर प्रकाशचित्र घरगुती कॅमेर्याने येणे कठीणच आहे.
याची मालिका बनवाना. आकाशगोलातल्या तार्यांवरुन मराठी महिन्यांची नावे, काही कथा आणि आवडच असेल आणि अभ्यास असेल तर ज्योतिषशास्त्रातल्या अनेक गोष्टींच वर्णन ( तार्यांचा ग्रहगोलाच्या सानिध्यातला प्रभाव ) लिहता येईल.
मस्त लिहिलंय नंदिनीचा
मस्त लिहिलंय
नंदिनीचा प्रतिसाद आवडला.
खूप सुंदर.
खूप सुंदर.
मस्तच !! आवडेश
मस्तच !! आवडेश
धन्यवाद सर्वांना! रात्रीच्या
धन्यवाद सर्वांना!
रात्रीच्या वेळी आकाशाकडे पाहिल्यावर एखाद्या छोट्या मुलीने हातातली फुलांची परडी रूसून फेकून दिल्याने अशी फुलं सांडल्यासारखी वाटतात. >> मस्तच कल्पना, नंदिनी!
नितीनचंद्र, constellations ची मालिका बनवण्याची कल्पना चांगली आहे - पण मला एवढे constellations माहिती नाही आहेत...जमले तर माहिती आहेत तितके टाकेन...
मस्त लिहीले आहेस. तु
मस्त लिहीले आहेस.
तु माझ्यासाठी आणखी एक भूतकाळातली खिडकी उघडलीस.
शाळेच्या गच्चीवर उभे राहुन मारलेल्या अवकाश, चौथी मिती वगैरे काहिही विषय घेऊन मारलेल्या तेव्हा अति अर्थपूर्ण वाटलेल्या पण निरर्थक गप्पा
ही कल्पना कुठे / कोणाकडुन वाचली / ऐकली ते आठवत नाही.
चांदण्या म्हणजे आकाशाला पडलेल्या बारीक छिद्रांमधुन पाझरणारा देवलोकीचा प्रकाश.
ही कल्पना कुठे / कोणाकडुन
ही कल्पना कुठे / कोणाकडुन वाचली / ऐकली ते आठवत नाही.
चांदण्या म्हणजे आकाशाला पडलेल्या बारीक छिद्रांमधुन पाझरणारा देवलोकीचा प्रकाश. >>> सावली, तुझीच कल्पना असेल - - तुझ्या छोट्यांच्या पुस्तकातली! एव ढी सुंदर कल्पना तुलाच सुचू शकते!
शाळेच्या गच्चीवर उभे राहुन मारलेल्या अवकाश, चौथी मिती वगैरे काहिही विषय घेऊन मारलेल्या तेव्हा अति अर्थपूर्ण वाटलेल्या पण निरर्थक गप्पा >>> हो? काहीच आठवत नाही!
माझी नाही गं ती कल्पना. खरच
माझी नाही गं ती कल्पना.
खरच विसरलीस?
ह्म्म. मला आठवताहेत. म्हणजे हा लेख वाचल्यावर एकदम ते आठवलं!