शर्मिष्ठा

भूतकाळात उघडणारी खिडकी!

Submitted by रायगड on 4 June, 2014 - 17:20

मध्यंतरी एक दिवस मुलांच्या खोलीत रात्री झोपले होते. त्यांच्या रूममधला बेड खिडकीपाशी आहे. पहाटे तीन-एक वाजता अचानक जाग आली आणि खिडकीतून बाहेर नजर टाकली तर खिडकीला लागूनच असलेल्या चेरी ब्लॉसमच्या आडून शर्मिष्ठेचा 'M' नजरेस पडला. अहाहा! पहाटे ची ती सुंदर, शांत वेळ, पडल्या पडल्या खिडकीतून दिसणारे अगणित चमचमणारे तारे, त्या तारका प्रकाशात चमचणारे चेरी ब्लॉसम आणि त्यात उठून दिसणारी शर्मिष्ठा! मंत्रमुग्ध होऊन पहातच राहिले कितीतरी वेळ! मग शर्मिष्ठाचे दोन तारे जोडून धृव तार्‍याला जोडण्याचा खेळ खेळून झाला. मंद पणे लुकलुकणार्‍या ध्रृव तार्‍याचं दर्शन घेऊन झालं.

विषय: 
Subscribe to RSS - शर्मिष्ठा