Submitted by अ. अ. जोशी on 7 June, 2014 - 06:46
खरेच हे कि फार चांगले नसे अधीरपण
सुटेल हातचे असा करू नये उशीरपण
दुखावलेस जे हृदय, करे तुझीच काळजी
असेल प्रेम आत वा असेल ते बधीरपण
सुखी बनावयास कोणता महाल पाहिजे ?
हृदय जिथे विशाल, भव्य वाटते कुटीरपण
धरून फक्त हात लावली नजर तिच्याकडे
अचूक नेम साधला नसून एक तीरपण
रहा सतर्क नित्य, शोध कोपरा न कोपरा
उभा प्रपंच भेदते सुमार एक चीरपण
जसे खुलावयास लागले तुझे हृदय पुन्हा
जगात राहिले नसेल कोणते फकीरपण
दिशेस आठही फिरा, जरी तुलाच सूट ही
फितूर बादशाह तर टिकेल का वजीरपण ?
पहा, कि पांडुरंग नाव आणि रंग सावळा
तसाच रंगतो तिथे टिळ्यातला अबीरपण
असेल काळजी 'अजय' खुशाल काळजीच घे
उगीच दाखवू नकोस फार बेफिकीरपण
प्रयोगशील शेर पाहिलास की समज 'अजय'
असद, जफर, निदा नि भट; असेल आत मीरपण
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुखी बनावयास कोणता महाल
सुखी बनावयास कोणता महाल पाहिजे ?
हृदय जिथे विशाल, भव्य वाटते कुटीरपण
रहा सतर्क नित्य, शोध कोपरा न कोपरा
उभा प्रपंच भेदते सुमार एक चीरपण
प्रयोगशील शेर पाहिलास की समज 'अजय'
असद, जफर, निदा नि भट; असेल आत मीरपण<<< वा वा, शेर आवडले
सुखी बनावयास कोणता महाल
सुखी बनावयास कोणता महाल पाहिजे ?
हृदय जिथे विशाल, भव्य वाटते कुटीरपण
असेल काळजी 'अजय' खुशाल काळजीच घे
उगीच दाखवू नकोस फार बेफिकीरपण
आवडले.
सगळे शेर आवडले तुमची शैली आणि
सगळे शेर आवडले
तुमची शैली आणि बेफी स्टाईल मस्त कंपॅटिबिलिटी साधली आहेत
(मागे एका गझलेतही हे दिसून आले होते )
एकंदर गझल खूप आवडली सगळेच शेर आणि काफिये छान निभावलेत
असेल काळजी 'अजय' खुशाल काळजीच
असेल काळजी 'अजय' खुशाल काळजीच घे
उगीच दाखवू नकोस फार बेफिकीरपण
प्रयोगशील शेर पाहिलास की समज 'अजय'
असद, जफर, निदा नि भट; असेल आत मीरपण........आवडले.
वा वा.... सगळे शेर आवडले.
वा वा....
सगळे शेर आवडले.
सगळे शेर आवडले धरून फक्त हात
सगळे शेर आवडले
धरून फक्त हात लावली नजर तिच्याकडे
अचूक नेम साधला नसून एक तीरपण
रहा सतर्क नित्य, शोध कोपरा न कोपरा
उभा प्रपंच भेदते सुमार एक चीरपण
जसे खुलावयास लागले तुझे हृदय पुन्हा
जगात राहिले नसेल कोणते फकीरपण >>>>>>
धन्यवाद मित्रांनो...
धन्यवाद मित्रांनो...:)