आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच
माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!
असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)
नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)
अरे, आमच्या मुंबईबद्दल कुणीच
अरे, आमच्या मुंबईबद्दल कुणीच कांहीं कां बोलत नाही ! २०षटकांत १७३-८ ! चांगली सुरुवात होवूनही मुंबईला मधेंच अशी गळती कां लागते ? आज १९० सहज अपेक्षित असून १७३ करताना मारामार ? असो, पाहूं काय होतंय पुढे .
[ आजचा सामना होतोय ब्रेबोर्न स्टेडियमवर ! काय आठवणींचा धुमधडाका चाललाय डोक्यात ! अगदीं लहानपणीं वडिलांबरोबर पाहिलेल्या त्यांच्या हिरोची - सी.के. नायुडूची- मॅच.. मग वॉरेल, विक्स व वॉलकॉट ही डब्ल्यू त्रयी ... वेस्ली हॉल.. नील हार्वे, रिची बिनॉ, .... पतौडी, वाडेकर, विश्वनाथ, गावसकर, कपिल, अझरुद्दीन, ..सचिन...अनेक पाकिस्तानी व इंग्लीश खेळाडू ....! खरंच ब्रेबॉर्न म्हणजे आमच्या पिढीच्या भावविश्वाचाच अविभाज्य व लोभस भाग !! ]
मुंबईची हालत खराब. मलिंगाच्या
मुंबईची हालत खराब. मलिंगाच्या गैरहजेरीत चेन्नईपुढे मोठ्ठं लक्ष्य ठेवणं अत्यावश्यक होतं पण चांगली सुरुवात होवूनही मुंबई तें नाहीं करूं शकली. कांहीं चमत्काराअभावीं परिणाम अपेक्षितच होता !![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
रैना कडे दुर्लक्ष दिले की तो
रैना कडे दुर्लक्ष दिले की तो हळूहळू इनिंग बांधतो आणि कधी सामना स्वतःकडे खेचतो कळत नाही
रैना ट्वेंटी-ट्वेंटीचा बाप
रैना ट्वेंटी-ट्वेंटीचा बाप आहे हे आज पुन्हा त्याने सिद्ध केले. सातही सीजनमध्ये त्याने ४०० धावांचा टप्पा पार केला.
मुंबईला मात्र ज्याची भिती होती तेच झाले, फलंदाजीत पंधराएक धावा कमी पडल्यावर बॉलरची कमी पडलीच, त्यातही मलिंगाचे नसणे दुष्काळात तेरावा महिना.
त्यात अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका पडणे म्हणजे तो महिनाही ६० दिवसांचा.
हरभजनने मात्र या आयपीएलमध्ये भारी गोलंदाजी केली, त्याला भारतीय संघाचे २०-२० आणि वनडेचे दरवाजे तरी खुलायला हवेत, अवली कॅरेक्टर आहे, मजा आणतो.
रोहित शर्माने कर्णधारपद सोडून वा त्याच्याकडून काढून मायकेल हसीला दिले तर खूप उपकार होतील.
मुंबईने स्पर्धेबाहेर पडायच्या आधी १४.४ षटकात १९५ चेस करायचा ऐतिहासिक सामना याची देही याची डोळा दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार.
मुंबई विरुद्ध केकेआर ड्रिम फायनल बघायचे स्वप्न भंगले, पण नियतीला हेच मंजूर असावे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटच्या सामन्यात माझ्या आवडीचे दोन्ही संघ या एकत्र आले असते तर मी धर्म संकटात पडलो असतो.
आता मात्र फुल्ल जोश ए दिलो ऐतबार से कोरबो लोरबो जितबो रे ....
<< त्यात अंपायरच्या चुकीच्या
<< त्यात अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका पडणे म्हणजे तो महिनाही ६० दिवसांचा.>> पार्ट ऑफ द गेम ! कालच तुमच्या दुसर्या लाडक्या संघातल्या युसूफ पठाणला दोनदां असं जीवदान मिळालं, त्यामुळें फिटंफाट झाली असं समजा !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
<< रैना ट्वेंटी-ट्वेंटीचा बाप आहे >> सहमत. टी-२०त फलंदाजीच नाहीं तर गोलंदाजी व मुख्यतः क्षेत्ररक्षण यातही त्याची उपयुक्तता निर्विवाद खूपच वरच्या दर्जाची आहे !
काल पार वाट लावली चेन्नैनी
काल पार वाट लावली चेन्नैनी मुंबईची...
चेन्नै ऐनवेळेस मस्त खेळते.. खास करुन रैना... काल शांतपणे मॅच काढली त्यानी..
उद्या चेन्नै. विरुद्ध पंजाब... उद्यातरी पंजाबचे बॅट्समन चालले पाहिजेत.. म्हणजे. फायनल केकेआर आणि पंजाब मध्ये होईल..
इडन गार्डन मधे पावसामुळे
इडन गार्डन मधे पावसामुळे पंजाब फसली गेली.. सुरुवातीला बॉल स्विंग होईल आणि नंतर खेळपट्टी टणक होईल असा अंदाज साफ फसला
आज सेहवाग खर्या फॉर्मात !
आज सेहवाग खर्या फॉर्मात ! ३३चेंडूत ६९ [नाबाद]!! पंजाब टेरिफीक फॉर्मात; हा सामना २००+चा होणार ?
भाऊ सेहवाग चा फॉर्म !!! वोहर
भाऊ सेहवाग चा फॉर्म !!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वोहर पुल शॉट काय मस्त खेळतो.
५० चेंडूत १०० ! १० चौकार, ६
५० चेंडूत १०० ! १० चौकार, ६ षटकार !!! अभिनंदन सेहवाग !!!
जुने सेहवाग आणि नेहरा आले
जुने सेहवाग आणि नेहरा आले![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सेहवाग ने 100 केले
नेहरा ने 50 दिले
जियो रैना ...
जियो रैना ...
रैनाच्या फटकेबाजीचे कौतुक
रैनाच्या फटकेबाजीचे कौतुक करायला शब्द नाहीत.
२५ चेंडूत ८७, आणि त्यात १२ चौके आणि ६ सिक्स म्हणजे २५ पैकी १८ चेंडू सीमापार यावरूनच कल्पना यावी..
मात्र त्या फटक्यांचा क्लास निव्वळ अप्रतिम .. एवढा बेक्कार टाईमिंग पहिल्या चेंडूपासून असली फटकेबाजी आजवर नाही पाहिली ..
असल्या खेळीचा अंत मात्र जसा झाला यालाच क्रिकेट बोलतात
चेन्नई जिंकते तर सेहवाग बद्दल वाईट वाटणार आणि हरली तर रैनाचे सांत्वन करायला पुन्हा शब्द नसतील .. चेन्नईचा समर्थक नसूनही आज ते जिंकावे अशी इच्छा.
१४०च्या आसपास ३विकेटस
१४०च्या आसपास ३विकेटस गमावल्या चेन्नईने ! रैनाचं सांत्वन करायची पाळी येणारसं दिसतंय ..... कॅप्टन कूलने अफलातून खेळी केली नाहीं तर !!!
mccullam ne match
mccullam ne match ghalavali......
धोनी उगाच मागे थांबला असे
धोनी उगाच मागे थांबला असे त्याला स्वताला नक्की वाटले असणार .. (पण बोलून नाही दाखवणार तो तसा)
रवींद्र जडेजाला पुढे पाठवून आणि स्वता शेवटच्या म्हणजे सातव्या क्रमांकावर खेळायला येण्यात काय पॉईंट होता ..
एक रैनाची इनिंग वजा करता काय खेळली चेन्नई त्यांचे त्यांनाच ठाऊक ..
असो, आता मात्र विरेंदर सेहवागचे कौतुक करू शकतो.
आधीच त्याला भारतीय संघनिवडीत डावलला आणि गंभीरला मात्र परत घेतले हा निर्णय माझ्या डोक्यात गेला आहे.
सेहवाग तुडवत होता आणि धोनीकडे बघून त्याला रागाने चिडवत होता असाच भास आज मला होत होता. बरे झाले कोणी मॅक्सवेल वगैरे आज खेळले नाही जेणेकरून मोठ्या धावसंख्येचे पुर्ण श्रेय सेहवागच्या खात्यात आले.
सामना काढून मात्र दिला पंजाबच्या फिल्डींगने.
सामना काढून मात्र दिला
सामना काढून मात्र दिला पंजाबच्या फिल्डींगने >>> हे मात्र अगदी खरं... रैना होता तोपर्यंत अगदी सहज जिंकले असते चेन्नै.. त्याचा रन आउट खरच दुर्दैवी होता.. पण कॉल रैनाचाच होता.. बेलीचा थ्रो पूर्ण पणे मटका होता... आणि तो स्पॉट ऑन होता. धोनी कदाचित दुखापतीमुळे उशिरा आला असावा खेळायला..
संदिप शर्मानी काढलेली स्मिथची विकेट पण कडक होती.. त्याला कळालेच नाही कधी दांडकी उडली ते..
नंतर बोलताना त्याने डायरेक्ट सिनियर इंटरनॅशल खेळाडूंना दोष दिला...
>>नंतर बोलताना त्याने
>>नंतर बोलताना त्याने डायरेक्ट सिनियर इंटरनॅशल खेळाडूंना दोष दिला..
जे चुकीचे नव्हते... पण धोनी बॅटींगला आला तेंव्हा सुद्धा सामना पूर्ण हाताबाहेर गेला नव्हता पण मधल्या ओव्हर्समध्ये एकेरी दुहेरी धावा काढून धोनी आणि अश्विन ने सामना अजुन कठीण केला... शेवटच्या षटकात जी निरुपयोगी मारामारी केली ती दोन षटके आधी सुरु करायला हवी होती.... फार फार तर काय झाले असते तर वि़केट पडून मॅच हारली असती.... नॉक्-आउट मॅचमध्ये विकेट हातात ठेवुन मॅच हारण्यात आणि त्यात असा काय फरक?
पण धोनी असेही म्हणाला की he is feeling happy for preety zinta... she was with the team in all up and downs.... हे मात्र अगदी खरे आहे!
पंजाब वि कोलकता..... आपला पाठिंबा पंजाबला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चिन्नास्वामीच्या छोट्या मैदानात मिलर, मॅक्सवॅल आणि सेहवागने धुमाकुळ घालून इडनवरच्या पराभवाचा बदला घ्यावा (इडनवर पण पाऊस आला नसता तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते)
माझ्या मते नरीनने आयपीएल
माझ्या मते नरीनने आयपीएल फायनल पेक्षा वेस्टइंडीज कडून खेळायला अधिक प्राधान्य द्यायला हवेय.... फायनल खेळला तर त्याला पहील्या कसोटी सामन्याला मुकावे लागेल!
नरेन आणि उत्थापाला वजा करता कोलकत्त्याचा संघ शून्य आहे... युसुफची मागची खेळी ही वळवाच्या पावसासारखी होती.... तो आता लगेच बरसण्याची शक्यता फारच कमी.... कोलकता हरत असताना गंभीरचा चेहरा बघून तर मला गल्लीत खेळणार्या शाळकरी चिडक्या कप्तानाची आठवण होती!
पंजाबला पाठींबा. कालची मॅच
पंजाबला पाठींबा.
कालची मॅच नाही बघु शकलो.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
केबलच्या नानाची टान्ग.
सेहवाग ने परत
सेहवाग ने परत तोडावे.
मॅच पंजाबने जिंकावी.
उथाप्पाने ही परत तोडावे, पण कालच्या रैनासारखे.
उथाप्पा, सेहवाग, गंभीर अशी जुनीच नाव रन गेटर्स मध्ये आहेत. एक रैना सोडला तर बाकी करंट टीम मधील सगळे स्फोटक लोकं बुझलेल्या मेनबत्या टाईप झाले. भारतीय बॉलर्सनी मात्र बॉलिंग चांगली केली.
>>उथाप्पा, सेहवाग, गंभीर अशी
>>उथाप्पा, सेहवाग, गंभीर अशी जुनीच नाव रन गेटर्स मध्ये आहेत
केदार, गंभीर नाही खेळलेला फारसा या आयपीएलमध्ये.... १५ मॅचेसमध्ये ३१२, अवघ्या २२ रन्सची सरासरी आणि ११३ चा स्ट्राइकरेट.... पहील्या वीसातपण नाही आहे तो!
काल भले खेळी सेहवाग ने आपल्या
काल भले खेळी सेहवाग ने आपल्या मुलामुळे केली असे सांगितले तरी ती खेळी फक्त आणि फक्त धोनीवरचा रागच होता हे दिसुन येत होते.. कारण सहाजिकच आहे इंग्लंड च्या दौर्यात गंभीर ची निवड केली आहे सेहवाग ची नाही .
पण रैनाच्या खेळीने धोनीला सेहवागच्या खेळीला जास्त महत्व देणे गरजेचे वाटले नाही .. रैना तेव्हा जर आउट झाला नसता तर आज आपण सेहवाग ची खेळी पुर्ण पणे विसरलेलो असतो अवघ्या २५ बॉल्स मधे ८७ रन्स ते ही ३४८ च्या सरासरीने अजुन ५ ओवर रैना उभा असता आणि शतक झाले असते तर ........निकाल केव्हाच लागला असता मॅच चा.....
मग त्याला दाखवुन देणे भागच होते की मी काय काय करु शकतो ते
पंजाब ने यंदा चेन्नई च्या समोर नेहमीच तुफ्फान फलंदाजी केली आहे. धोनीचे गोलंदाज चालले नाही हे खरे आहे.
आता रविवारी बघु.......... स्ट्राँगेस्ट बॉलिंग समोर काय करतात ????????? ३ पैकी पंजाब ने १च मॅच जिंकली आहे ज्यात कोलकताचे बॅट्समन फॉर्मात नव्हते तेव्हा सुध्दा रन्स कमीच बनवु शकलेले. ३ही मॅच मधे १७० च्या आतच गुंडाळलेले पंजाब ला. त्यामुळे परत कमी स्कोर मधे जर कोलकताने रोखले तर नक्कीच परत आयपिएल जिंकतील.
पण या वेळेला पंजाब ने जिंकावा कप.. सलग ७ आयपीएल मधे तळाच्या ३ संघात त्यांचा समावेश होत होता. आता त्यांनी मेहनत केली आहे ...
राजस्थान जे ४ थ्या नंबर वर राहतील हे ज्यांनी गृहित धरलेले खुद्द राजस्थानच यात होते.. ते ही अनपेक्षित रित्या ... गाफिल राहुन जी चुक केली राजस्थान ने ते कोलकता ने केली नाही उलट जिथे ४था नंबर चे वांदे होते तिथे त्यांनी ऐन मौक्याला ४था गिअर टाकुन एकदम २ र्या स्थानावर झेप घेतली..
कोलकता ने देखील पहिले २ मॅच जिंकल्यानंतर उतरती कळा लागलेली .. कॅप्टन ने सलग ३ भोपळे फोडलेले अश्यात खालुन सलग ८ मॅच जिंकुन अंतिम फेरीत प्रवेश करतील असे कुणाला ही वाटत नव्हते .
कालच्या मॅच मधे रैनाने जे अतिरिक्त रन्स होते ते सगळे कवर करुन दिलेले परंतु मॅकुलम वगैरे यांनी नाहक हळु खेळुन वाढीव सरासरी कमी केली जी नंतर धोनीसाठी भारी पडली त्यात एकाच ओव्हर मधे २ - २ विकेट्स गेल्या ..
माझ्या मते नरीनने आयपीएल
माझ्या मते नरीनने आयपीएल फायनल पेक्षा वेस्टइंडीज कडून खेळायला अधिक प्राधान्य द्यायला हवेय.... फायनल खेळला तर त्याला पहील्या कसोटी सामन्याला मुकावे लागेल!
>>>>>>>>
नाही, त्यांचा देशाचा सामना नंतर आहे, ६ कि ७ जुन ला वगैरे. फक्त नियमानुसार त्याला सराव शिबीर जॉईन करायची गरज होती.
पण सध्या क्रिकेटमध्ये एवढा पैसा गुंतला आहे की नियम केले जातील शिथिल.
माझ्या माहितीनुसार शाहरुख खान स्वता वेस्टैंडिज क्रिकेट बोर्डाच्या काँटेक्टमध्ये आहे आणि सामना संपताक्षणीच त्याला पाठवतो असे बोलणे चालूय.
बाकी नारायणशिवाय कलकत्ता पंजाबला भिडणे म्हणजे मी बघणारच नाही तसे झाले तर तो सामना.
युसुफची मागची खेळी ही
युसुफची मागची खेळी ही वळवाच्या पावसासारखी होती.... तो आता लगेच बरसण्याची शक्यता फारच कमी....
>>>>>>
याच्याशी मात्र असहमत, उद्याच्या सामन्यात जे काही होईल ते होईल शेवटी क्रिकेट आहे, मात्र युसुफ बरसण्याची शक्यता नक्कीच आहे. कारण त्याच्या स्फोटक खेळीच्या आधीही तो थोडीफार चुणूक दाखवत होता. याच धाग्यावर मागे पाहिले तर माझी पोस्ट सापडेल त्या खेळीच्या आधीची की युसुफ एखाद्या सामन्यात त्याच्या फुल फ्लोमध्ये बरसण्याची शक्यता आहे या आशयाची. आणि ते जरा जास्तच खरे ठरले. आता तर त्याच्याकडे त्या इनिंगने दिलेला आत्मविश्वास सुद्धा आहे. तो फलंदाजीला आल्यावर बाद होईपर्यंत मी टीव्हीसमोरून हलत नाही एवढे मात्र नक्की.
कोरबो , लोरबो , जीतबो रे
कोरबो , लोरबो , जीतबो रे ,
केकेआर ची सगळ्यात महत्वाची ताकद आहे म्ह्णजे त्यांचे गोलंदाजी त्यातही परदेशी गोलंदाज . इतर टॉपचे संघ ३-४ परदेशी फलंदाज खेळवत असताना ते सातत्याने २ गोलंदाज अन २ ऑलराऊंडर खेळवतायत . त्यातही शाकीब फक्त गोलंदाज म्हणून कुठल्याही संघात जाईल असा आहे . टेंडो च्या गोलंदाजीची तर त्याना गरजही लागत नाही आहे .
टेंडो च्या गोलंदाजीची तर
टेंडो च्या गोलंदाजीची तर त्याना गरजही लागत नाही आहे >>>>>>> त्यच बरोबर पठाण ची आणि महान ऑलराउंडर कॅलिस ची देखील लागत नाही आहे ... हीच जेमेची बाजु आहे बरोबर ५ गोलंदाजांना ४ ओव्हर्स मिळत आहेत आणि प्रत्येक गोलंदाज आपपाप्ल्या कुवतीनुसार गोलंदाजी करत आहे त्यामुळे ६-७वा गोलंदाज वापरायची आवश्यकता वाटलीच नाही अजुन पर्यंत . पंजाब सारख्या संघाविरुध्द देखील त्यांनी आपले नेहमीचेच गोलंदाज वापरले
यावरुन त्यांची गोलंदाजीची बाजु लक्षात येते
व्हॉट्स्प वर मेसेज फिरतोय
व्हॉट्स्प वर मेसेज फिरतोय ..... आज वीर विरुद्ध झारा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पंजाब जिंकायला
पंजाब जिंकायला हवा.................पण
समोर कोलकता आहे.................... दोघांपैकी एकच जण जिंकेल ............मग..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कोलकताच जिंकणार .........![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
कोरबो लडबो जितबो रे..................................
६०० हुर्रे
६००
हुर्रे
Pages