आयपीएल चे सातवे पर्व सुरू झाले आहे .... भारतात होणार, दुबईत होणार, बान्ग्लादेशात होणार की श्रीलंकेत होणार, मुंबई, राजस्थान खेळणार की नाही वगैरे चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय..... पहील्या टप्प्यासाठी संघ दुबईत जाउन पोहोचायला देखील लागलेत..... मिडीयामध्ये अजुन फारशी हवा नसली (इलेक्शन इफेक्ट) तरी सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... खेळाडूंनी आयपीएल स्पेशल ट्वीट्सचा धडाका लावलाय....अश्यात भारतीय संघाने अनपेक्षितरीत्या २०-२० विश्वचषकाचे उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारतीय चाहते जरा सुखावलेले आहेत..... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच
माझा आवडता द्रवीड यंदा पहील्यांदाच आयपीएल खेळणार नसल्यामुळे गेल्या सहा स्पर्धेतला उत्साह आता कदाचित नसेल.... पण तरीही राजस्थानच्या डगाआउट मधली त्याची उपस्थिती सुखावणारी असेलच!
असो.... हा धागा आयपीएल-७ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
फॅन्टसी लीग: (सौजन्य: उदयन)
नाव : aapali maayboli (english)
पासवर्ड : 12345 (english)
पंजाब आणि कोलकाता दोन्ही संघ
पंजाब आणि कोलकाता दोन्ही संघ जबरदस्त खेळले आहेत .. कुणाला समर्थन द्यावं हा प्रश्नच आहे...
पण 'वीरू' साठी पंजाब![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोलकत्त्याच्या मागच्या विजयात
कोलकत्त्याच्या मागच्या विजयात पाऊस आणि इडनच्या वळणार्या खेळपट्टीचा मोठा वाटा होता... पण आज चिन्नास्वामीवर सेहवाग, मिलर, मॅक्सवॅल धावांचा पाऊस पाडूदेत आणि पंजाबला त्यांचे पहीलेवहीले आयपीएल टायटल मिळू देत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Ohh.... Its Saha-Vhoara
Ohh.... Its Saha-Vhoara show..... 19 runs from an over of narine.... Great going![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वोहरा ला लवकर national team
वोहरा ला लवकर national team मधे induct करायला हवे. He is already matured to take the spot.
दोनशेचा टप्पा पार व्हायला
दोनशेचा टप्पा पार व्हायला हवा.
तिसर्या पंचाचा योग्य
तिसर्या पंचाचा योग्य निर्णय..
२०० होणार असं दिसतंय...
२०० होणार असं दिसतंय... बेफी.. फिक्सिंग केलाय का तुम्ही?
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
२०० झाले पण कोलकाताचे पंजाब
२०० झाले पण कोलकाताचे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पंजाब १९९ वर अडकली
सलग ९ सामने जिंकून आयपीएल विजेता केकेआर ठरला
नाचो
जे साहा ने आपल्या जुन्या संघाविरूध्द केले तेच चावला ने केले
(No subject)
(No subject)
कोरबो , लोरबो , जीतबो रे :)
कोरबो , लोरबो , जीतबो रे
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पन्जाबची बॉलिन्ग लैच भिकार
पन्जाबची बॉलिन्ग लैच भिकार झाली काल.
स्वैर मारा होता. मुळात त्यांच्याकडे स्पिनर फक्त पटेलच चांगला होता.
पान्डे, ओझा आणि साहा तिघेही जबरी खेळले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ज्या प्रेशरखाली ते होते ते पाहता तर त्यांच अजुनच कौतुक वाटतय.
चांगली मॅच झाली.
चावलाने बरेच रन्स दिले पण शेवटी एक सिक्स आणि फोर मारुन मॅच पण जिंकुन दिली.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ते एक बरं नैतर गंभीर त्यालाच चावला असता.
Rank..........Team
Rank..........Team Name...............................Manager............................Points
1.................BLAST TEAM............................uday inadmar....................10953
2.................Perfect Punch...........................Swaroop Kulkarni...............10482
3.................AAYANMEN...............................Hemant Shirsat...................10176
4.................Galli XI.......................................Sujit Pande...........................7297
5.................Gargi winners............................GARGI PANDE......................5209
माझ्या संगणकाचा प्रॉब्लेम
माझ्या संगणकाचा प्रॉब्लेम होता/ अजूनही आहे. उशीरा का होईना पण केकेआर व चाहत्यांचं अभिनंदन !
जितेगा भाई जितेगा .. केकेआर
जितेगा भाई जितेगा .. केकेआर जितेगा ..
पण अखेरीस जे झाले ते झाले, जे जिंकले त्यांच्या आनंदात सहभागी.
काल खरे तर मी (मुंबईनंतर) कलकत्ता सपोर्टर पण प्रिती आणि सेहवागसाठी पंजाबही पहिल्यांदाच एवढ्या जवळ पोहोचून हरू नये असे वाटत असल्याने फार धर्म संकटात होतो..
त्यामुळे जो काही निकाल लागो सामना रंगतदार व्हावा हि अपेक्षा होती. अगदी चावलाने शेवटचा चौकार मारला तेव्हा वाईटच वाटले कारण सुपर ओवरची हाव धरून बसलो होतो.
कालच्या सामन्यात सेहवाग, मॅक्सी, मिलर, उथप्पा, शाकीब, गंभीर आणि गंभीरचा ट्रंपकार्ड नारायण या मोठ्या आणि स्पर्धा गाजवलेल्या नावांना बाजूला सारत साहा-वोहरा हि भारतीय खेळाडूंची जोडी पंजाबतर्फे चमकली तर कलकत्याला सुद्धा मनीष पांडे या भारतीयानेच नैय्या पार करून दिली. युसुफ पठाण देखील माझ्या अपेक्षेप्रमाणे खेळला. २०० चेस करताना मिडल ओवरमध्ये त्याने ४ षटकारांसह मारलेल्या ३५-४० धावा आणि पांडे बरोबर केलेली भागीदारी निर्णायक ठरली. तो बाद न होता तर अगदी एकतर्फी शेवट बघायला मिळाला असता, पण जे झाले ते चांगलेच झाले, अटीतटीचा सामना बघायला मिळणे हिच तर खरी आयपीएलची खासियत जी अखेरच्या सामन्यातही जपली गेली
अभिनंदन कोलकत्ता .. कोर बो लोर्बो. .. जितेबोए रे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
प्रिती झिंटा रडली
प्रिती झिंटा रडली कारण..
पियुष चावला
प्रिती झिंटा इतका वेळ
प्रिती झिंटा इतका वेळ पडद्यावर दिसत होती की ती हिरॉइन असलेल्या सिनेमात देखील इतका वेळ पडद्यावर दिसत नसेल. या बाईला इतकेदा का दाखवतात असे मी म्हंटल्यावर भारतातून आलेल्या मित्राने मला बहुमोल माहिती पुरवली की ती नटी आहे व पंजाबची टीम तिच्या मालकीची आहे.
ट्रॉफी घेतलेल्या माणसाला कधी खेळताना पाहिले नाही - पियुष चावला किंवा गंभीर किंवा मनीष पांडे पण वाटत नाही.
कुणि तरी मधेच घुसून ट्रॉफी घेतली की काय? सामना संपल्यावर सिक्युरिटी जरा ढिली झाली असावी!
भारतातून आलेल्या मित्राने मला
भारतातून आलेल्या मित्राने मला बहुमोल माहिती पुरवली की ती नटी आहे व पंजाबची टीम तिच्या मालकीची आहे.
ट्रॉफी घेतलेल्या माणसाला कधी खेळताना पाहिले नाही >>>>
कलकत्ता क्रिकेट संघाचा मालक आणि बॉलीवूडचा सुपर्रस्टार किंग खान शाहरुख खान !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बहुमोल माहिती क्रमांक २
हा तुम्हाला प्रीती झिंटासारखा वारंवार दिसत नव्हता कारण हा खूप साधी विचारसरणी आणि राहणीमान असलेला माणूस असल्याने प्रसिद्धी माध्यंमापासून चार हात दूरच राहतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तर एक मोठ्ठा उत्सव संपला.
तर एक मोठ्ठा उत्सव संपला.
आता पुनः दुसरा कुठला उत्सव आहे? बांगलादेश बरोबर चे सामने की नंतरचे इंग्लंडमधले?
कारण हा खूप साधी विचारसरणी
कारण हा खूप साधी विचारसरणी आणि राहणीमान असलेला माणूस असल्याने प्रसिद्धी माध्यंमापासून चार हात दूरच राहतो>>>
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
झक्की, >> हा तुम्हाला प्रीती
झक्की,
>> हा तुम्हाला प्रीती झिंटासारखा वारंवार दिसत नव्हता कारण हा खूप साधी विचारसरणी आणि राहणीमान असलेला
>> माणूस असल्याने प्रसिद्धी माध्यंमापासून चार हात दूरच राहतो.
खोटं वाटंत असेल तर वानरवेडे प्रेक्षागृहाच्या सुरक्षाकारांना विचारा!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आ.न.,
-गा.पै.
Pages