प्रमाण ७-८ खेकड्यांसाठी लागणार्या जिन्नसाचे देत आहे. मी जास्त खेकड्यांसाठी केले आहे फोटोत.
७-८ खेकडे
रश्यासाठी
४ मोठे कांदे चिरून
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
आल्,लसुण्,मिरची कोथिंबीर पेस्ट
अर्धा चमचा हिंग
१ चमचा हळद
२ चमचे मसाला
१ चमचा गरम मसाला
चविनुसार मिठ
पाव वाटी तेल
पाणी गरजे नुसार
लिंबा एवढ्या चिंचेचा चिंचेचा कोळ (जास्त घेऊ नये.)
कांदा खोबर्याचे वाटण
साधारण पाऊण सुक्या खोबर्याची वाटी किसून
२ मध्यम आकाराचे कांदे चिरून
भ्ररायचे सारण.
१ मोठी वाटी बेसन (अंदाज येत नसेल तर थोड जास्त घेतल तरी चालेल)
पाव वाटी तांदळचा पीठ
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद पाऊण चमचा मसाला
अर्धा चमचा गरम मसाला
चवी नुसार मिठ
१-२ चिंचेचा कोळ (लिंबापेक्षाही कमी आकार होतील इतका चिंचेचा गोळा)
पहिला खेकड्यांची थोडीशी माहीती करून घेऊ.
खेकडे म्हणजे लहान मुलांचा आवडीचा बाऊ. अगदी त्यांना चालताना पाहण्या पासून ते खाण्या पर्यंत. लहानांबरोबरच मोठ्यांनाही खेकडे म्हणजे आवडते प्रकरणच. त्यात हे खेकडे लाखेने भरलेले असले म्हणजे तर अजूनच चविष्ट गंमत. तर ह्या खेकड्यांचेही अनेक प्रकार आहेत. त्यापैकी मला माहीत असलेले समुद्रातले, खाडीतले व डोंगर-जमिनीतले खेकडे. डोंगरातील खेकडे काळे कुळकुळीत पाठीचे असतात. त्यांना मुठे म्हणतात. इतर खेकड्यांपेक्षा हे जास्त चविष्ट असतात. समुद्रातील व खाडीतीत खेकडे जरा फिक्कट कळापट-करड्या रंगाचे असतात. समुद्रात तर नक्षिदार पाठीचे खेकडेही असतात.
अमावस्या-पोर्णिमे नुसार खेकडे भरलेले मिळतात असे म्हणतात. पण मी आणते त्या अनुभवा वरून तसे मला काही आठळले नाही. कधी कधी मिळतात भरलेले तर कधी कधी नाही. तर भरलेले खेकडे ओळखण्यासाठी खेकड्याची पाठ दाबून पहावी. दाबताना जर पाठ वाकत म्हणजे आत सहज जात असेल तर तो पोकळ आणि जर कडक असेल तर तो भरलेला खेकडा. शिवाय चांगल्या लाखेसाठी माद्या जास्त बघून घ्यायच्या. जर आपल्याला खेकड्यांचे पाय काढता येत नसतील तर ते शक्यतो कोळणींकडूनच काढून घ्यायचे.
खेकड्यांच्या पाठीच्या आकारा वरून नर-मादी ओळखायची. खालील फोटोतील पहीला नर खेकडा, दूसरी मादी खेकडा (खेकडीण किंवा मिसेस खेकडीण म्हणायची का? :हाहा:)
https://lh6.googleusercontent.com/-0F4ftxy9M6E/Um__7rVMOVI/AAAAAAAADyI/Z...
आता बर्याच जणांना जीवंतपणी खेकड्याचा रस्सा करणे अवघड वाटते तसेच त्यांचे इतर पायही काढायला भिती वाटते म्हणून हे खेकडे पिशवीत बांधून फिजर मध्ये ठेवा. साधारण १ तासानंतर ते पूर्णपणे मंद होतात. मग आरामात ह्यांचे पाय काढता येतात. काही जण बाजूच्या दोन मिशांसारख्या नांग्या ठेवतात. पण त्या ठेवल्याने भांड्यात जागा कमी पडते म्हणून मी ठेवत नाही.
तर आता पाककृती कडे वळू.
खेकड्यांचे पाय काढले की खेकडे आणि त्याचे पुढचे जे जाडे पाय (नांगे) स्वच्छ धुवून घ्या.
बाकीचे बारीक पाय असतात काढून फेका किंवा ते धुवून मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस्सा गाळून तो रस्सा करताना वापरा. ह्यामुळे चव येते पण कटकटीचे काम असल्याने मी करत नाही टाकून देते.
आता खालील फोटोत दाखवल्या प्रमाणे खेकड्याच्या कडेच्या मधोमध टोकदार जाडी टोकदार वस्तूच्या सहाय्याने खेकड्याची पाठ व पोट वेगवेगळे करा.
ह्यांच्या मध्ये जर काळसर छोटी पिशवी सारखे करखरीत वाटले तर तो भाग काढा.
आधीच पिठाचे पुढील प्रमाणे सारण करून ठेवा.
बेसन थोडे भाजून घ्या. त्यात तांदळाचे पिठ, हिंग, हळद, मसाला, गरम मसाला, चिंचेचा कोळ, मिठ टाकून थालीपिठा एवढे घट्ट करा. अगदी पातळ नकोच. चिंचेचा कोळही प्रमाणातच वापरा. जास्त नको.''
आता हे सारण खेकड्याच्या पोटाच्या उजव्या व डाव्या बाजूच्या खाचेत तसेच पाठीच्या मध्य भागात भरून घ्या.
आता पाठ आणि पोट पुन्हा एकत्र जुळवा. पहिल्यांदाच केल्यामुळे एकत्र राहणार नाही असे वाटत असेल तर दोर्याने बांधून घेतले तरी चालेल.
राहिलेल्या पिठाचे गोळे करून बाजूला ठेवा. ते नंतर रश्यात सोडता येतात.
आता आपण रस्सा करायला घेऊ.
भांड्यात तेल गरम करून त्याला लसूण पाकळ्यांची फोडणी द्या. त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत परतवा.
ह्यावर आले- लसुण पेस्ट टाकून परता मग त्यात हिंग, हळद मसाला घालून ढवळा व १ ग्लास किंवा त्यापेक्षा जास्त गरजे नुसार पाणी घाला आणि खेकडे अलगद त्यात ठेवा.
वरून खेकड्यांचे मोठे नांगे टाका.
आता झाकण टाकून चांगले उकळू द्या. पाणी भांड्या बाहेर जाईल असे वाटत असेल तर थोडी गॅप ठेवा झाकणात.
एकीकडे कांदा खोबर्याचे वाटण करायला घ्या.
कांदा अगदी चमचाभर तेलात भाजून घ्या. नंतर सुके खोबरे बाजून घ्या.
थंड झाले की मिक्सर मधून वाटून घ्या.
रस्सा उकळत असताना मधूनच हलक्या हाताने ढवळून घ्या. पहिल्या उकळी नंतर ढवळल्या नंतर पिठाचे केलेल गोळे रश्यात शिजण्यासाठी सोडा.
साधारण १५ ते २० मिनीटे तरी मध्यम आचेवर हा रस्सा उकळू द्या. पाण्याची गरज वाटल्यास मधून पाणी टाका. आता २० मिनीटां नंतर ह्यात चिंचेचा कोळ घाला नंतर खांदा-खोबर्याचे वाटण, मिठ गरम मसाला घाला. व पुन्हा चांगली उकळी येऊ द्या.
उकळले की गॅस बंद करा. वाटल्यास थोडी चिरलेली कोथिंबीर स्वादासाठी वरून पेरा.
बहुतेक टिपा मी वर दिल्या आहेतच. तरीपण चिंच कमी घाला. कारण चिंबोर्याचा रस्सा इतर माश्यांप्रमाणे आंबट चांगला नाही लागत. फक्त वास मोडण्या करीता चिंचेचा वापर केला आहे.
लाख म्हणजे काय हा ही प्रश्न बर्याचदा विचारला आहे म्हणून खालील आख्खा शिजवलेला खेकडा लाखेने भरलेला. लाख अंडे किंवा गाभोळीच्या प्रकारात मोडते.
बर्याच व्हेजी माबोकरांना फोटो पहावणार नाहीत पण बर्याच जणांनी मला ही रेसिपी विचारली होती म्हणून डिटेल मध्ये दिले आहे.
जागूताई, >> आता मला
जागूताई,
>> आता मला प्रोटेक्शन मागायला पाहिजे हाहा खेकडेच सोडते घराभोवती. हाहा
त्यापेक्षा मी येतो पहारा द्यायला. ते खेकडे शिजवून मला द्या.
आ.न.,
-गा.पै.
हे खेकडे का खायचे अस्तात
हे खेकडे का खायचे अस्तात म्हणे? >>
जॉर्ज मॅलरी नावाच्या प्रसिद्ध गिर्यारोहकाने
"Why do you want to climb Mount Everest?" या प्रश्नाचे उत्तर "Because it's there", असे दिले होते. तेच इथेही लागू
असे प्रश्न ज्यांना पडतात त्यांनी अळूची नाहीतर भेंडीची भाजी खावी
अळू आणि भेंडीच्या वतीने मी
अळू आणि भेंडीच्या वतीने मी शोनूचा निषेध करत आहे.
रेसिपी आणि फोटो नेहमीप्रमाणेच भारी, जागूताई.
जागु, नेहमीप्रमाणेच फर्मास
जागु, नेहमीप्रमाणेच फर्मास रेस्पी.. >>+१
फोटो पण झक्कास. तोंपासु..........
हे तर भारी.. तेच पकडून त्यांना भरणार.. हा.का.ना.का. >> नीलु ,
>> अळू आणि भेंडीच्या वतीने मी
>> अळू आणि भेंडीच्या वतीने मी शोनूचा निषेध करत आहे.
फताडा अळू आणि सरळसोट भेंडी निषेधाचे फलक नाचवताहेत असं इमॅजिन करून बसल्या जागी पडणार आहे मी
दक्षी, नीट पहा ते फोटो..आधी काळे असलेले खेकडे/चिंबोरी शिजले की लाल होतात. मग आणखी थोडा वेळ मंद आचेवर ठेव (जस्ट टू बी शुअर) आणि मग तुझ्या रेसिपीचा फोटो टाक किंवा इकडच्या कुणाला खायला बोलाव...
जागुतै यावर प्रकाश टाका...माझ्याकडे छोटे खेकडे मिळत नाहीत. डायरेक्ट अलास्क्न डंजेनस क्रॅब्ज...त्यांचा रस्सा करावा लागेल...या हिवाळ्यात एकदा तरी
असं विचारतेय जणू काही अगदी
असं विचारतेय जणू काही अगदी पातेल्यअत शिजवायला ठेवूनच आलेय >> खेकड्याची खिचडी कर्तेस की काय?
तोंपासु.. आजपर्यंत एकदाच
तोंपासु.. आजपर्यंत एकदाच खेकडे खाल्लेत.. पण जाम आवडलेत.. ही रेसिपी मस्त दिसतेय.. साबांना देते
थँक्स जागु तै.......
थँक्स जागु तै.......
गामा पैलवान मेधा, स्वाती,
गामा पैलवान
मेधा, स्वाती, अनुजा, चिमुरी धन्यवाद.
वेका तिथल्या खेकड्यांचे फोटो टाक ना.
भ्रमर खेकड्याचा पुलाव करतात ना.
उशिरा पाहिला हा लेख. <<पण
उशिरा पाहिला हा लेख.
<<पण तुझ्या पेशन्सला सलाम! एव्हढी किचकट पाकृ स्टेप बाय स्टेप फोटो काढून किती सोप्या पद्धतीने लिहीली आहेस.>>
+१०
खरच.
खेकडे खायचे कसे ह्याचं पण फोटो सहीत वर्णन आलं पाहिजे आता
जागु तु तर ग्रेत आहेस.
जागु तु तर ग्रेत आहेस.
शकुन तुशपी धन्स.
शकुन
तुशपी धन्स.
जागु जर तुला पनीर चिल्ली येत
जागु जर तुला पनीर चिल्ली येत असेल तर ताक रेसीपी
जागु तै, यु आर ग्रेट
जागु तै,
यु आर ग्रेट !!!!!!!!!!!!!!!!!
जानु, हे खेकडे शिजल्यानंतर
जानु, हे खेकडे शिजल्यानंतर तांबडा लाल रंग कश्यामुळे येतो ? बाकी खेकडे ( नाम ही काफी है | )
जसा आपन वातन करु तसा रन्ग
जसा आपन वातन करु तसा रन्ग येइल.
तुशपी मेल कर मला. मी तुला मेल
तुशपी मेल कर मला. मी तुला मेल पाठवलाय काल तो चेक कर.
नितीनचंद्र काही प्रक्रिया होत असेल उष्णता मिळाल्यावर त्यामुळे ह्या केखड्यांच्या काळ्या पाठीचे लाल रंगात रुपांतर होत असेल. कोलंबीच्या सालीचेही असेच होते.
जागू ही रेसिपी आज पुन्हा
जागू ही रेसिपी आज पुन्हा पाहिली आणि एक प्रश्न पडला. ते जिवंत खेकडे फ्रिजर मध्ये एक तास ठेवल्यावर अगदी मंद पडतात म्हणजे नक्की काय होतं?
मरतात का ते? की जिवंतच असतात?
पूर्ण प्रतिसाद वाचून मग लिहाव
पूर्ण प्रतिसाद वाचून मग लिहाव म्हटल पण राहवल नै ...
शेवटून दुसरा फोटो ... आई ग्ग ... कातील ...
इथच फतकल मारुन ओरपायची ईच्छा होतेय ...
जागू ताई .. Hats off !
जागू कालच केले होते
जागू कालच केले होते अमेझिंग!!!!!
नुतनजे, तुमने ये काय कर दिया,
नुतनजे, तुमने ये काय कर दिया, ये तो अत्याचार है रे बाबा! अभी अगले संडे तक रुकने का बोले तो खाने का काम नय?
जागुताई, माझी आई बनवते भरले खेकडे पण बहुधा चिंचेचा कोळ वापरत नसावी.
झक्कास .........
झक्कास .........
आमच्या ईथे खेकडे आणि शिवंडी
आमच्या ईथे खेकडे आणि शिवंडी जीर्याचं वाटण घालुन करतात तो ही प्रकार टेस्टी लागतो.
नरेश माझ्या आईकडे पण नाही
नरेश माझ्या आईकडे पण नाही टाकत चिंच. पण जो विसिष्ट वास योतो तो नाही येत चिंचेमुळे.
नुतन
दक्षिणा साधारण १ तासाने मंद पडतात. जर ५-६ तास ठेवलेस तर मरतील.
किरण धन्यवाद.
कविता जीरे टाकून पहिल्यांदाच ऐकल. छान वेगळ काहीतरी.
आमच्याइथे मांसाहारात जीरे नसते.
परत एकदा नीट वाचलं सगळं.
परत एकदा नीट वाचलं सगळं. तोंपासु आहे प्रकरण ! जागू तू ग्रेट आहेस
लॉबस्टर/ क्रॅबमीट भरलेला क्रीमसॉसमधला पास्ता खाल्लाय आणि तो खूप आवडला होता पण नुसते खेकडे कसे खायचे ते कळत नाही.
रच्याकने, आत्ता फोटो बघता बघता नांग्या हलल्यासारख्या वाटल्या. शप्पथ !
जागु आमच्याकडे मांसाहारात
जागु आमच्याकडे मांसाहारात फक्त खेकडे आणि शिवंड्यानाच जीर्याचे वाटण लावले जाते.
Pages