प्रमाण ७-८ खेकड्यांसाठी लागणार्या जिन्नसाचे देत आहे. मी जास्त खेकड्यांसाठी केले आहे फोटोत.
७-८ खेकडे
रश्यासाठी
४ मोठे कांदे चिरून
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
आल्,लसुण्,मिरची कोथिंबीर पेस्ट
अर्धा चमचा हिंग
१ चमचा हळद
२ चमचे मसाला
१ चमचा गरम मसाला
चविनुसार मिठ
पाव वाटी तेल
पाणी गरजे नुसार
लिंबा एवढ्या चिंचेचा चिंचेचा कोळ (जास्त घेऊ नये.)
कांदा खोबर्याचे वाटण
साधारण पाऊण सुक्या खोबर्याची वाटी किसून
२ मध्यम आकाराचे कांदे चिरून
भ्ररायचे सारण.
१ मोठी वाटी बेसन (अंदाज येत नसेल तर थोड जास्त घेतल तरी चालेल)
पाव वाटी तांदळचा पीठ
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद पाऊण चमचा मसाला
अर्धा चमचा गरम मसाला
चवी नुसार मिठ
१-२ चिंचेचा कोळ (लिंबापेक्षाही कमी आकार होतील इतका चिंचेचा गोळा)
पहिला खेकड्यांची थोडीशी माहीती करून घेऊ.
खेकडे म्हणजे लहान मुलांचा आवडीचा बाऊ. अगदी त्यांना चालताना पाहण्या पासून ते खाण्या पर्यंत. लहानांबरोबरच मोठ्यांनाही खेकडे म्हणजे आवडते प्रकरणच. त्यात हे खेकडे लाखेने भरलेले असले म्हणजे तर अजूनच चविष्ट गंमत. तर ह्या खेकड्यांचेही अनेक प्रकार आहेत. त्यापैकी मला माहीत असलेले समुद्रातले, खाडीतले व डोंगर-जमिनीतले खेकडे. डोंगरातील खेकडे काळे कुळकुळीत पाठीचे असतात. त्यांना मुठे म्हणतात. इतर खेकड्यांपेक्षा हे जास्त चविष्ट असतात. समुद्रातील व खाडीतीत खेकडे जरा फिक्कट कळापट-करड्या रंगाचे असतात. समुद्रात तर नक्षिदार पाठीचे खेकडेही असतात.
अमावस्या-पोर्णिमे नुसार खेकडे भरलेले मिळतात असे म्हणतात. पण मी आणते त्या अनुभवा वरून तसे मला काही आठळले नाही. कधी कधी मिळतात भरलेले तर कधी कधी नाही. तर भरलेले खेकडे ओळखण्यासाठी खेकड्याची पाठ दाबून पहावी. दाबताना जर पाठ वाकत म्हणजे आत सहज जात असेल तर तो पोकळ आणि जर कडक असेल तर तो भरलेला खेकडा. शिवाय चांगल्या लाखेसाठी माद्या जास्त बघून घ्यायच्या. जर आपल्याला खेकड्यांचे पाय काढता येत नसतील तर ते शक्यतो कोळणींकडूनच काढून घ्यायचे.
खेकड्यांच्या पाठीच्या आकारा वरून नर-मादी ओळखायची. खालील फोटोतील पहीला नर खेकडा, दूसरी मादी खेकडा (खेकडीण किंवा मिसेस खेकडीण म्हणायची का? :हाहा:)
https://lh6.googleusercontent.com/-0F4ftxy9M6E/Um__7rVMOVI/AAAAAAAADyI/Z...
आता बर्याच जणांना जीवंतपणी खेकड्याचा रस्सा करणे अवघड वाटते तसेच त्यांचे इतर पायही काढायला भिती वाटते म्हणून हे खेकडे पिशवीत बांधून फिजर मध्ये ठेवा. साधारण १ तासानंतर ते पूर्णपणे मंद होतात. मग आरामात ह्यांचे पाय काढता येतात. काही जण बाजूच्या दोन मिशांसारख्या नांग्या ठेवतात. पण त्या ठेवल्याने भांड्यात जागा कमी पडते म्हणून मी ठेवत नाही.
तर आता पाककृती कडे वळू.
खेकड्यांचे पाय काढले की खेकडे आणि त्याचे पुढचे जे जाडे पाय (नांगे) स्वच्छ धुवून घ्या.
बाकीचे बारीक पाय असतात काढून फेका किंवा ते धुवून मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस्सा गाळून तो रस्सा करताना वापरा. ह्यामुळे चव येते पण कटकटीचे काम असल्याने मी करत नाही टाकून देते.
आता खालील फोटोत दाखवल्या प्रमाणे खेकड्याच्या कडेच्या मधोमध टोकदार जाडी टोकदार वस्तूच्या सहाय्याने खेकड्याची पाठ व पोट वेगवेगळे करा.
ह्यांच्या मध्ये जर काळसर छोटी पिशवी सारखे करखरीत वाटले तर तो भाग काढा.
आधीच पिठाचे पुढील प्रमाणे सारण करून ठेवा.
बेसन थोडे भाजून घ्या. त्यात तांदळाचे पिठ, हिंग, हळद, मसाला, गरम मसाला, चिंचेचा कोळ, मिठ टाकून थालीपिठा एवढे घट्ट करा. अगदी पातळ नकोच. चिंचेचा कोळही प्रमाणातच वापरा. जास्त नको.''
आता हे सारण खेकड्याच्या पोटाच्या उजव्या व डाव्या बाजूच्या खाचेत तसेच पाठीच्या मध्य भागात भरून घ्या.
आता पाठ आणि पोट पुन्हा एकत्र जुळवा. पहिल्यांदाच केल्यामुळे एकत्र राहणार नाही असे वाटत असेल तर दोर्याने बांधून घेतले तरी चालेल.
राहिलेल्या पिठाचे गोळे करून बाजूला ठेवा. ते नंतर रश्यात सोडता येतात.
आता आपण रस्सा करायला घेऊ.
भांड्यात तेल गरम करून त्याला लसूण पाकळ्यांची फोडणी द्या. त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत परतवा.
ह्यावर आले- लसुण पेस्ट टाकून परता मग त्यात हिंग, हळद मसाला घालून ढवळा व १ ग्लास किंवा त्यापेक्षा जास्त गरजे नुसार पाणी घाला आणि खेकडे अलगद त्यात ठेवा.
वरून खेकड्यांचे मोठे नांगे टाका.
आता झाकण टाकून चांगले उकळू द्या. पाणी भांड्या बाहेर जाईल असे वाटत असेल तर थोडी गॅप ठेवा झाकणात.
एकीकडे कांदा खोबर्याचे वाटण करायला घ्या.
कांदा अगदी चमचाभर तेलात भाजून घ्या. नंतर सुके खोबरे बाजून घ्या.
थंड झाले की मिक्सर मधून वाटून घ्या.
रस्सा उकळत असताना मधूनच हलक्या हाताने ढवळून घ्या. पहिल्या उकळी नंतर ढवळल्या नंतर पिठाचे केलेल गोळे रश्यात शिजण्यासाठी सोडा.
साधारण १५ ते २० मिनीटे तरी मध्यम आचेवर हा रस्सा उकळू द्या. पाण्याची गरज वाटल्यास मधून पाणी टाका. आता २० मिनीटां नंतर ह्यात चिंचेचा कोळ घाला नंतर खांदा-खोबर्याचे वाटण, मिठ गरम मसाला घाला. व पुन्हा चांगली उकळी येऊ द्या.
उकळले की गॅस बंद करा. वाटल्यास थोडी चिरलेली कोथिंबीर स्वादासाठी वरून पेरा.
बहुतेक टिपा मी वर दिल्या आहेतच. तरीपण चिंच कमी घाला. कारण चिंबोर्याचा रस्सा इतर माश्यांप्रमाणे आंबट चांगला नाही लागत. फक्त वास मोडण्या करीता चिंचेचा वापर केला आहे.
लाख म्हणजे काय हा ही प्रश्न बर्याचदा विचारला आहे म्हणून खालील आख्खा शिजवलेला खेकडा लाखेने भरलेला. लाख अंडे किंवा गाभोळीच्या प्रकारात मोडते.
बर्याच व्हेजी माबोकरांना फोटो पहावणार नाहीत पण बर्याच जणांनी मला ही रेसिपी विचारली होती म्हणून डिटेल मध्ये दिले आहे.
महान आहात जागू.
महान आहात जागू.
आई गं!!! भरल्या चिंबोर्या !!
आई गं!!! भरल्या चिंबोर्या !! ते फोटो बघुन प्राण फक्त जायचेच बाकी आहेत .जागु य पुढे प्रत्येक रेसिपी च्या
शेवटी तुझ्या पायांचा पण फोटो टाकत जा ,म्हणजे आम्हाला नमस्कार करायला बरं पडेल.
ता.क.:- मी तुला किडनॅप करायचा प्लान बनवत आहे.;-)
सुगरण बाई __/\__ मला हे
सुगरण बाई __/\__
मला हे खायचे कसे ते ही शिकावं लागेल. तुझ्याकडे आल्यावर खायच्या पदार्थांची यादी वाढतेच आहे की ग
जागु.. मस्त ग.. मी घाटावरुन
जागु..
मस्त ग..
मी घाटावरुन आलेली... त्यामुळे... खेकडा.. कसा करायचा सासुबाई नी शिकवला..
मी असेच करते..
पण ते बेसन चे पीठ भिजवताना.. त्यात बारीक कान्दा चिरुन.. थोडे ओले खोबरे.. नि बारिक पायान्चा रस काढुन सरसरीत भिजवायचे.. नि त्या पाठीत भरायचे.. अश्या भरलेल्या पाठी, पॅन मधे थोड्या तेलावर.. दोन्ही बाजुनी छान शिजवुन / तळून घ्यायच्या...
खेकड्याचा तिखट रस, भात नि तोंडी लावायला ह्या पाठी... नि रसातले पेन्दे नि डेन्गे.. किती वेळ जेवतोय नि किती भरपुर जेवतोय त्याचा पत्ता लागत नाही.
जागु.. हे सगळे वाचुन नि फोटो बघुन.. आता लवकरच खेकड्याचा बेत करायला हवा असे बेदम वाटायला लागलेय...
तोंपासु …………खूप मस्त …. my
तोंपासु …………खूप मस्त …. my favorite ……मी घरी बनवते पण असे भरून नाही… करून बघेन एकदा
ता.क.:- मी तुला किडनॅप करायचा
ता.क.:- मी तुला किडनॅप करायचा प्लान बनवत आहे.>>>>>>>>>>> मी तुला मदत करेन ……… partnership मध्ये करु………
शलाका आ़णि सुखदा, प्लानचा
शलाका आ़णि सुखदा, प्लानचा विचार सिरियसली करत असाल तर मला विपु करा!
जागुतै, मी तुझ्याकडे क्रॅश कोर्सला येउ का गं महिनीभर?
जागु ते जिवन्त खेकडे कधी घरभर
जागु ते जिवन्त खेकडे कधी घरभर पळाले नाही का ग तुझ्या?:खोखो:
खेकड्यान्ची पळापळ बघायला फार आवडते मला.:हाहा: अर्थात, हे एनजीओ वरच बघीतलेय. आता समुद्रावर कधी गेले तर आधी खेकड्यान्ची घरे शोधुन त्यान्च्याशी खेळणार आहे.:फिदी:
बाकी तुझ्या पाककृती (मत्स्या/ शाकाहारी) दोन्ही पण जबरी असतात. तुझ्यासाठीच इथे येते.
तोंपासु....... माझी आई असेच
तोंपासु.......
माझी आई असेच बनवते!!! लाळ गळतेय गं.....
jaagu great ashes tu.
jaagu great ashes tu.
हाय जागु तुझ्या रेसिपी बघुन
हाय जागु
तुझ्या रेसिपी बघुन गावाची आठवण येते ( माझं गाव विंधणे व मोठे भोम)
आमची ही सेम पद्धत फक्त चिंच नाही घालत. मला खुप आवडतात असे भरले खेकडे. आई तिकडे गावीच गेलीये तिला सांगते येताना खेकडे आणायला कारण आता खाल्याशिवाय चैन नाही पडणार.
बादवे , बाकी तुमच्या सगळ्या रेसिपी माझी आई, मी बनविते तश्याच सेम टु सेम. त्यामुळे सगळ्यांना आवडतात म्हणुन मलाही खुप आनंद होतो कारण तुमच्या रेसीपी स्वःताच्या वाटतात.
मी तुला किडनॅप करायचा प्लान
मी तुला किडनॅप करायचा प्लान बनवत आहे.>>>>>>>>>>> मी तुला मदत करेन ……… partnership मध्ये करु……… >> मी पण पार्टनर..
पण फक्त शाकाहारीसाठी त्यामूळे मला २०% पार्टनरशिप चालेल. 
जागू, मस्त. अगदी सेम रेसिपी
जागू, मस्त.
अगदी सेम रेसिपी आमच्याकडे माहेरी. फरक म्हणजे फक्त पाठ पूर्ण भरतात आणि पाठ आणि पोट दोन्ही वेगवेगळं कालवणात घालतात. मोठे नांगडे सांध्यातून फोडून त्यातील पाणी चटकन चोखून प्यावे लागते. काय चविष्ट असतं ते!
पण खायला भारी त्रासदायक प्रकरण. खाण्यापेक्षा साफ करण्यात जास्त वेळ जातो.
मला एकही फोटो दिसत
मला एकही फोटो दिसत नाहीये.
थर्मेक्स चौकात हे भलेथोरले काळ्यापाठिचे जिवन्त खेकडे जुड्या करुन विकायला ठेवलेले अस्तात.
मी लाम्बुनच बघतो नि जातो.
लिम्बी खेकड्यान्ना घाबरत नाही कारण लहानपणी तिनी तिच्या मैत्रिणींकरता म्हणे खेकडे पकडलेत, नान्ग्या कशा मोडतात ते माहिते म्हणे तिला. मला म्हैत नाही. मी घाबरतो.
या खेकड्यान्चा सध्याचा दर काय?
हे खेकडे का खायचे अस्तात म्हणे?
अन पीठ आत कशाला भरतात? भजी/पकोड्यान्सारखे वरुन लेपुन तळून काढणे जास्त सोप्पे नै का?
फरक म्हणजे फक्त पाठ पूर्ण
फरक म्हणजे फक्त पाठ पूर्ण भरतात आणि पाठ आणि पोट दोन्ही वेगवेगळं कालवणात घालतात.
मग पिठ सुटुन बाहेर येत नाही?????
अजुन एक - खेकडयाच्या पोटाच्या आजुबाजुला ते मऊसर काळसर, केसाळ कायतरी असते ना (वर फोटोत पिठ भरतानाचा फोटो आहे त्यात बघा बाजुला दिसतंय ते), त्याचे काय करायचे? मी तर खेकडे धुतानाच ते काढुन फेकते. आई करायची तेव्हा ती तसेच ठेवायची बहुतेक, पण मग मी खाताना ते काढुन टाकायचे.
पण खायला भारी त्रासदायक प्रकरण. खाण्यापेक्षा साफ करण्यात जास्त वेळ जातो.

हॉटेलात कधीच खेकडे मागवण्याची हिंमत केली नाही ती या कारणामुळेच. घरी दोन्ही हात वापरुन खावे लागते.
या खेकड्यान्चा सध्याचा दर
या खेकड्यान्चा सध्याचा दर काय?
मासे एकंदरीत खुपच महाग आहेत. हल्ली किलोवर विकतात आणि रु. ४०० पासुन भाव सुरू होतो. मध्यम साईजचे लॉब्स्टर्स र्स. १२०० किलो.
दोन आठवड्यापुर्वी मला अगदीच छोटे खेकडे रु २०० ला सहा मिळालेले. घेताना मोठे वाटले, घरी आणुन साफ केल्यावर अगदीच छोटे आहेत हे ल॑क्षात आले.
काळ्या कुळकुळीत पाठीचे तळहाताएवढे मोठे (फक्त तळहातच हा, बोटे धरु नका त्यात
) खेकडे बहुतेक रु. ३०० ला ४ होते.
पुढच्या वेळेस ३०० वालेच घ्यावे लागतील.
हे खेकडे का खायचे अस्तात
म्हणे?
डाळ, भाजी, भात, चपाती, मोदक, बासुंदी, पुरणपोळी, गुळपोळी इत्यादी गोष्टी का खायच्या असतात म्हणे त्याच कारणासाठी
लिंबू, आपण भरली वांगी का
लिंबू, आपण भरली वांगी का करतो? वांग्याच्या कापांची भजी होतात पण खेकड्याची कशी होतील? त्यांच्या कवचाला पीठ चिकटेल तरी का? आणि चिकटलं तरी खाताना आधी वरचा पिठाचा थर खाऊन मग आतलं कवच काढून मग आतलं खाणेबल काय असेल ते खावं लागेल ना?
तुम्हाला खेकडाभजी हवी असतील तर कांद्याची भजी खा पाणी न घालता केलेली
मग पिठ सुटुन बाहेर येत
मग पिठ सुटुन बाहेर येत नाही?????
>>> नाही. त्याची एक ट्रिक आहे. बाकी सगळे पदार्थ टाकायचे पण ह्या पीठ भरलेल्या पाठी तशाच ठेवायच्या. कालवणाला उकळी आली की त्या उकळीवर सावकाशपणे एक एक अलगद सोडायची. ती देखिल पीठ वरच्या दिशेला येईल अशा पद्धतीने. थोड्याच वेळात शिजतात. पीठ फार घट्टही भिजवायचे नाही नाहीतर नेमकेच घट्ट झाले पाहिजे. नाहीतर दड्ड होऊन बसेल.
जागू, मस्त रेसिपी.. मी
जागू, मस्त रेसिपी.. मी शाकाहारी आहे पण तुझ्या मांसाहारी रेसिप्या सगळ्या वाचते.
ह्म्म्म. म्हणजे ट्रायल आणि
ह्म्म्म. म्हणजे ट्रायल आणि एरर मेथडने एके दिवशी जमेल- दोन्हीही - पिठ दड्ड न होणे आणि एकेक पाठ व्यवस्थित शिजणे.
हा शुध्द मानसिक छळ आहे .. या
हा शुध्द मानसिक छळ आहे .. या बाफ वर न डोकवण्याचा अत्यंत आटोकाट प्रयत्न करत आहे.....

देवा.. ही जागू काय करतेय हे तिच्च तिला कळत नाहीय तिला माफ कर.
शलाका, सुखदा मी पण आहे तुमच्या प्लॅन मध्ये
हे खेकडे का खायचे अस्तात म्हणे?>>>> हा प्रश्न आहे !! हा काय प्रश्न आहे? हा प्रश्न म्हणजे समस्त खेकडेप्रेमींच्या अस्मितेला लागलेला धक्का मानावा का?
लिम्बी खेकड्यान्ना घाबरत नाही
लिम्बी खेकड्यान्ना घाबरत नाही कारण लहानपणी तिनी तिच्या मैत्रिणींकरता म्हणे खेकडे पकडलेत, नान्ग्या कशा मोडतात ते माहिते म्हणे तिला. >> अरेरे, फकस्त खेकड्यांच्याच कां?
जागु, नेहमीप्रमाणेच फर्मास रेस्पी.. खेकडे 'ड्यु' आहेतच... बहुधा येत्या रविवारीच.
>>>> हे खेकडे का खायचे अस्तात
>>>> हे खेकडे का खायचे अस्तात म्हणे?>>>> हा प्रश्न आहे !! हा काय प्रश्न आहे? हा प्रश्न म्हणजे समस्त खेकडेप्रेमींच्या अस्मितेला लागलेला धक्का मानावा का? <<<<
अहो नाही हो, माझी शन्का अशी की खेकडे वा समुद्रीजीव वा मासे हे "पोटभरीचे खाद्य" होऊ शकते का?
जसे की एखाद्याने आख्खी चिकन हाणली, तर त्याचे पोट भरेल की नाही? तर तसेच मासे वगैरे खाऊन पोट भरते का? की जोडीला भातपोळी वगैरे भर लागतेच?
या जगातील भारतासारखा देश सोडला तर बाकी जगात "शाकाहाराचे" अनुकरण करण्याइतपत परिस्थिती आहे वा नाही याबद्दलच शन्का आहे, जसे की सायबेरियात गेलात, तर काय खाणार? वाळवन्टात गेलात, काय्क खाणार?
असो.
थर्म्याक्स चौकात मिळतात ते हाताच्या बोटान्सहित पन्जा इतक्या आकाराचे ( पाय नान्गा वेगळ्या) असतात. कधी रेट विचारला नाही. झकोबा, तू विचारुन सान्गशील कारे?
की जोडीला भातपोळी वगैरे भर
की जोडीला भातपोळी वगैरे भर लागतेच? >> लागतेच लिंबुदा. कसं की फक्त भाजी अथवा आमटी खाऊन पोट नाही भरु शकत.
स्लर्प! माझा शाकाहारी
स्लर्प! माझा शाकाहारी रहाण्याचा निश्चय मोडणार बहुतेक!! आटोकाट प्रयत्न करतेय. पण जागुच्या रेसिप्या पाहिल्या की निर्धार डळमळीत होतोय.
खेकड्याची आमटी आमच्या भागात खास बाळंतीणीसाठी करतात. मिक्सरमधे नांग्या, पाय वै. सगळच बारीक करुन, गाळुन घेउन तो अर्क खोबर्याच्या आमटीत टाकतात.
झकासराव, मृणाल, जाई, सृष्टी,
झकासराव, मृणाल, जाई, सृष्टी, वर्षूताई, पराग, बन्डू, बी.एस. मृण्मयी, अगो, प्रिती, नंदीनी, मेधा, सशल, पिंगू, चर्चा, श्री, अनन्या, विद्याक, वत्सला, अश्विनी, दिनेशदा, नुतन, बेफीकीर, स्वाती, सीमा, श्रद्धा धन्यवाद.
स्वादी मस्त. एकदा करुन बघेन.
साधना मग माझ्या कडे यायचीस ना एखादा रवीवार.
दक्षिणा सुरमयी ने कमी पाप लागते का ग की लागतच नाही?
झंपी झोप येत नाही उडते.
नीलू डोळे घट्ट बंद कर.
सुखदा, शाल्मली, भानुप्रिया
या या आपण मिळून खेकडा गटग करु.
कविन यादी पूर्ण झाली की मला कळव ग. मी तयारीला लागेन.
प्रदिपा तुझी रेसिपी पण छान.
रश्मी ते खेकडे टोपात ठेवले ना आणि जर झाकणावर वजन नाही दिले ना तर झाकण काढून पण ते घरभर पळतात. पण मला खेळायला वेळ नसतो म्हणून सरळ पिशवीत गाठ मारून त्यांना फ्रिजरमध्ये टाकते.
तुझ्यासाठीच इथे येते. इतका सुंदर प्रतिसाद धन्स ग खुप खुप धन्स
गामा पैलवान बर्याच जणांना नांगडा वगैरे शब्द माहीत नाहीत. परत प्रतिसादात स्पष्टीकरण द्यावे लागले असते म्हणून सरळ पायच लिहीले.
वेका शुक्रवारी करता येतील म्हणुन गुरुवारीच टाकले.
निस्लन धन्स. माझ्या माहेरी पण नाही चिंच घालत खेकड्यात. आणि दे टाळी सेम सेम साठी.
मामी मस्त.
लिंबूदा फोटो फिकासातून टाकलेत. मागे पण तुम्हाला मी टाकलेले कुठले तरी फोटो दिसत नव्हते. कदाचीत तुमच्याकडे पिकासावरचे ओपन होत नसतील. आणि तुमच्या प्रश्नांना खालच्या प्रतिसादात उत्तरे आली आहेत.
पोटभरीचे म्हणजे नुसते नाही खाऊन चालणार कारण एक तर ते उष्ण असतात. आणि पोटभरे पर्यंत खायचे म्हटलात तर अर्धा दिवस ते खाण्यातच जाईल. ते एक एक भाग तोडून मांस काढून खावे लागतात.
नीलू तू ही कटात सामील आता मला प्रोटेक्शन मागायला पाहिजे
खेकडेच सोडते घराभोवती. 
भ्रमर बर्याच दिवसांनी ?
आर्या स्वागत आहे
>>>खेकडेच सोडते घराभोवती>> हे
>>>खेकडेच सोडते घराभोवती>> हे तर भारी.. तेच पकडून त्यांना भरणार.. हा.का.ना.का.
तेच पकडून त्यांना भरणार..>>>
तेच पकडून त्यांना भरणार..>>> त्यासाठी जागू लागणारच ना? जागू, मी आहे गं तुझ्या बाजूने
लिंबुदा.. मी आणते खेकडे
लिंबुदा.. मी आणते खेकडे थर्म्याक्स चौकातुन. साधारण २५० ते ३०० रू किलो...
आमच्या गावाला तर.. गाव निरा नदी काठी असल्यामुळे तिथे खूप स्वस्त मिळतात.. ५० ते ७० रू किलो.
पण शक्यतो गावाला लोक स्वहस्ते पकडून आणतात खेकडे/मासे विहीरीतुन, ओढ्यातुन, नदीतुन किंवा कॅनॉल मधुन
जागू खेकडे शिजलेत का कसं
जागू खेकडे शिजलेत का कसं ओळखायचं?
(असं विचारतेय जणू काही अगदी पातेल्यअत शिजवायला ठेवूनच आलेय. :खोखो:)
Pages