आधुनिक सीता - २९

Submitted by वेल on 29 May, 2014 - 14:10

भाग 28 - http://www.maayboli.com/node/48670

**************************************************************************

देब बासू. दादाच्या कॉलेजमधल्या पहिल्या मित्राचा प्रसन्ना दत्ताचा मामेभाऊ. त्याला मी प्रसूनदा म्हणायचे. प्रसूनदापेक्षा बराच मोठा. प्रसूनदाच्या मोठ्या बहिणीच्या लग्नाला आम्ही गेलो होतो तेव्हा भेटला होता देबदा. आणि मग प्रसूनदाच्या लग्नात त्याला लग्नाला यायचं नाही सांगितलं होतं असं दादाकडून ऐकलं होतं. देबदा जर्मनी मध्ये नोकरी करत होता. तिथेच त्याला एक जर्मन गर्लफ्रेंड सुद्धा मिळाली होती. आणी ह्याच जर्मन गर्लफ्रेंडमुळे त्याला प्रसूनदाच्या लग्नाला येण्यासाठी प्रसूनदाच्या आजीने मनाई केली होती. आणि आज देबदाची तीच गर्लफ्रेंड इथे, माझ्यासाठी? म्हणजे..

म्हणजे एकच मला जे वाटले होते की माझ्या घरच्यांनी मला वार्‍यावर सोडून दिले तसे नव्हते. मला किती आनंद झाला मला सांगताच येणार नाही. मी आनंदाने रडू लागले. मी रडत होते तितक्यात फातिमा तिथे आली. मला रडताना पाहून तिने जेनीला विचारले, "वॉट हॅपन?"
"ओह. हर? व्हेरी व्हेरी इमोशनल लेडी. मिसिंग हर बेबी. आय होप शी डझंट गो इन मेंटल शॉक." आणि शेवटचं वाक्य बोलून तिने माझ्याकडे पाहिलं आणि मला डोळा मारला.
"क्राय क्राय गुड फॉर यु. मोर यु क्राय मोर यु विल रिलॅक्स अर्ली यु विल रिलॅक्स." आणि तिने मला जवळ घेतले. माझ्या कानात कुजबुजली. "यु मस्ट शो यु आर इन शॉक ऑफ लुझिंग युअर चाईल्ड.. यु मस्ट कीप क्रायिंग. ओन्ली देन यु विल कम हियर मोर ऑफन अँड वुइ कॅन डू समथिंग. यु मस्ट अॅक्ट वेल." थोड्याच वेळात फातिमाने जेनीला थँक्यु म्हणून माझ्यापासून दूर राहण्यास सुचवले.

जेनीने सांगितल्याप्रमाणे माझे हुंदके देणं चालूच होतं. तेवढ्यात फातिमाने माझ्यासाठी मागवलेला ज्युस आणि सँडविच आले आणि त्यासोबत फातिमासाठी कोणाचा तरी निरोप आला. ती लगबगीने त्या व्यक्तीसोबत निघून गेली. फक्त जाताना तिने जेनीला माझी काळजी घेण्यास सांगितले आणि मला स्वतःला सावरण्यास.

ती गेली आणि जेनीने मला जवळ घेतले. माझ्याशी अगदी कुजबुजत्या आवाजात बोलू लागली.
"आय अ‍ॅम हियर बीकॉज युअर ब्रदर रिक्वेस्टेड मी. टुक मी लाँग टू गेट जॉब हियर. देन वेटेड फॉर लाँग टू मीट यु हियर. फायनली वुइ मीट. वुइ विल डू समथिंग अँड टेक यु होम. स्टे रिलॅक्स्ड बट यु मस्ट कीप क्रायिंग. यु मस्ट अ‍ॅक्ट अ‍ॅज इफ यु आर डिस्टर्ब्ड अँड लूझिंग युअर बिहेवियर. वुइ नो यु हॅव सफर्ड अ लॉट. बट वुइ होप ऑल धिस विल फिनिश सून."
"विल यु टेक मी होम? रियली? ओह अ‍ॅम वेटिंग टू मीट माय फॅमिली. आर दे हियर? " मी विचारलं
"दे काण्ट कम हियर. धिस गाय विल गेट अलर्ट. काण्ट टेक दॅट रिस्क. दॅट इस व्हाय आय अ‍ॅम हियर. डू यु नो, व्हेनेवर यु कम टू हॉस्पिटल, ऑल इंडियन डॉक्टर्स आर गिव्हन हॉलिडे कम्पलसरी. आय कुड कम हियर कॉज आय अ‍ॅम नॉट इंडियन अँड माय इंडियन रिलेशन्स आर नॉट ऑफिशियल." असे म्हणून तिने माझ्या गालावर स्वतःचा गाल टेकवला. पुन्हा एकदा त्या मायेने माझे डोळे भरून आले. असे वाटले की मला एकदम छोटेसे होता यावे आणि जेनीच्या खिशात बसून मी बाहेर पळून जावे.

सँडविच खाऊन आणि ज्युस पिऊन झाल्यावर मी थोडी झोप घ्यावी अशी प्रेमळ ताकीद जेनीने मला दिली. त्यानुसार मी बराच वेळ झोपले होते. मी झोपून उठले तेव्हासुद्धा फातिमा परतलेली नव्हती. मला आश्चर्य वाटले. रफिकच्या घरातले कोणीही माझ्यासोबत इतका वेळ नाही असे प्रथमच झाले होते. जेनीला मी त्याबद्दल विचारले त्यावर उत्तर म्हणून तिने मला हलकेच थोपटले. बाहेरचा रफिकचा ड्रायव्हर कम बॉडी गार्ड सुद्धा निघून गेला असेल तर आम्हाला पळून जाता येईल अशा विचाराने मला उत्साही वाटत होते. माझ्या चेहर्‍यावरचा उत्साह पाहून पुन्हा एकदा जेनी कानात कुजबुजली. "सरीता युमस्ट कंट्रोल युअर एमोशन्स. एव्हन इफ यु आर फिलिंग हॅपी यु मस्ट शो यु आर शॉक्ड अँड डिस्टर्ब्ड. यु मस्ट ट्रेन युअर माईंड द वे युअर ग्रॅनी हॅज ऑल्वेज टोल्ड यु टू."
मी तिच्या म्हणण्याला हसून होकार दिला. दु:खी असताना आनंद दाखवणं जितकं कठिण होतं त्याहून कठिण होतं आनंदी असताना दु:खी दाखवणं. पण मला जर इथून सुटका हवी असेल तर एकच आशेचा किरण होता जेनी आणि ती सांगेल तसं मला वागणंच माझ्या भल्याचं होतं. आणि म्हणूनच जेनीने सांगितल्याप्रमाणे आजीचं ट्रेनिंग वापरत मी ध्यानाला बसले. पूर्वी कधीही ध्यानाला बसल्यावर मी आनंदी आहे हे स्वतःला सांगितले होते. आजपासून अगदी उलट सांगायचे होते स्वतःला.
"ऑल्सो युअर ग्रॅनी हॅज टोल्ड यु टू युज ऑल युअर एनर्जी टू ट्रस्ट अँड अ‍ॅट्रॅक्ट व्हॉटेव्हर रिझल्ट यु वॉण्ट. सेट टाईम लिमिट. जस्ट नाऊ ईट्स मार्च गोईंग ऑन. सेट रिझल्ट लिमिट अ‍ॅज एप्रिल एण्ड. युअर ग्रॅनी सेज इट वर्क्स. आय टू हॅव हर्ड इट वर्क्स. होप इट रियली डज. हेन्स फोर्थ आय मे जस्ट बी अराउंड यु मे नॉट बी एबल टू स्पीक मच टू यु. यु मस्ट नॉट शो क्लोजनेस विथ मी नाउ. डू नॉट सिट अँड मेडीटेट प्लीज लाय डाऊन अँड मेडिटेट." असे म्हणून ती माझ्यापासून लांब जाऊन खुर्चीत बसली.

बर्‍याच वेळाने फातिमा मी असलेल्या रूममध्ये आली. तिच्या चेहर्‍यावर कसला तरी तणाव दिसत होता. आल्या आल्या ती माझ्यावर जवळ जवळ ओरडलीच. "नो स्लीपिंग ऑल द टाईम. यु मस्ट वॉक."
फातिमा अशा प्रकारे ओरडल्यावर जेनी चटकन उठून मला उठवायला आली.
"ओह मॅम. शी इज सॅड. शी हॅज नो एनर्जी टू वॉक. आय विल होल्ड हर हँड अँड मेक हर वॉ़क." जेनीने फातिमाला सांगितले.
"ओके." असे म्हणून फातिमा खुर्चीत बसली. मी त्याच वेळी तिच्याकडे टक लावून पाहिले. त्या दिवशी प्रथमच तिच्या चेहर्‍यावर मी हलकासा मेकप पाहिला.
इथे जेनीने मला हात देऊन उठवले आणि उठवता उठवता माझ्या कानात कुजबुजली, "शो यु कॅन नॉट वॉक. डू अ‍ॅक्टिंग ऑफ फॉलिंग."
मी जेनीच्या आधाराने उठले. दोन चार पावले चालून तिच्याच सांगण्यावरून मी पडण्याचा अभिनय केला.
"गुड गोईंग. नाऊ स्टार्ट क्रायिंग. शो यु आर सॅड फॉर लुझिंग बेबी" जेनी मला उठवता उठवता पुन्हा कुजबुजली.
मी जेनीच्या सांगण्यावरून हुंदके द्यायला सुरुवात केली. जेनीने मला पुन्हा बेडवर बसवले.

"व्हाय डू यु क्राय ऑल टाईम? डिड यु ईट? डिड यु हॅव युर ज्युस? काण्ट यु स्टे काम अँड क्वाएट? जस्ट बिकॉज ऑफ यु अ‍ॅम आन्सरिंग सो मेनी पीपल." फातिमाला एवढं चिडलेलं मी कधीच पाहिलं नव्ह्तं. आणि तिला इतकं व्यवस्थित इंग्लिश बोलताना मी कधीच ऐकलं नव्हतं. त्यानंतरही ती काही वेळ स्वतःशीच काही तरी बोलत होती.

क्रमशः

पुढचा भाग :- http://www.maayboli.com/node/51610

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Good one

मस्त

>>>>>>>> मी त्याच वेळी तिच्याकडे टक लावून पाहिले. त्या दिवशी प्रथमच तिच्या चेहर्‍यावर मी हलकासा मेकप पाहिला.

>>>>>>>> फातिमाला एवढं चिडलेलं मी कधीच पाहिलं नव्ह्तं. आणि तिला इतकं व्यवस्थित इंग्लिश बोलताना मी कधीच ऐकलं नव्हतं.

हे थोडं फार "कुसुम मनोहर लेले" प्रमाणे वाटंतय.... Uhoh

तळटीप - माझ्या ऑफिसमधल्या हिंदीभाषीक मैत्रीणींसोबत मी ही गोष्ट share केली होती - त्यांना जाणून घ्यायचय पुधे काय ते - पुलेशु Happy

प्रयत्न?? काय चाल्लय काय!!
तुम्ही तिकडे चर्चा करता.. अन आम्ही ताटकळत बसायचं का हो??
लिहा हो लिहा लवकर!! Sad

mi khas ithe prtisad denyasathi sadasytv ghetale mazya ithe 1 ashi vyakti rahate ti javalpas ashyach prsangatun geleli aahe kimbhuna jast vait ch , aani 15 varsh zali tyach gharat aani aata tar tyach mansa sathi ni tyachya mulasathi jagatey earavi he kunala kalale nasate pan mala hi katha khup aavadli mhnun aamhi charcha kartana he samjale aani , sita tithun sutli ka as ti satat vicharat aste janu ya katha rupane ti swt: la anubhavatey.

Mala khup vait vatat jevha mi tila he sangte ki ajun katha pudhe nahi sarkleli, aani tichya chehryavarchi nirash... ashy hote.

mi marathi typing as select kelay tari post english madhe yetey... sorry... pan pl. lavkar vel kadha aani katha purn kara.. pllllllllllllz

sucheta

सुचेता - प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

तुमच्या ओळखीतल्या त्या स्त्रीला लवकरात लवकर स्वतंत्र आयुष्य जगता यावे ह्यासाठी प्रार्थना.

कट्टी...:D Lol Lol

Preetiii

Sorry g. Ofc madhun fakt pratisad denyaitkach vel milto.

Ghari laptop desktop donhi band aahe

अग!! आत्ता अशी स्थीती आहे तिची कि सार्या घरादाराला तिलाच पोसावे लागतेय. तिची सुटका तर होणे नाही, पण तिला निदान सितेची तरी सुटका व्हावी अस वाटताय ग...

तुमची कथा खूपच इंट्रेस्टिंग होत चालली आहे. प्लीज पुढचा भाग लवकर येऊद्या.

मला तुमची कथा वाचून मूळ कथा वाचायची खूप उत्सुकता आहे. पण तुम्ही याआधी जी मूळ कथेसाठी लिंक दिली होती ती लिंक मी खूप प्रयत्न करूनही ओपन होत नाहिये. तर तुम्ही मला ती लिंक देऊ शकाल का प्लीज.

अग!! आत्ता अशी स्थीती आहे तिची कि सार्या घरादाराला तिलाच पोसावे लागतेय. तिची सुटका तर होणे नाही >> Uhoh Uhoh

Pages