Submitted by तृप्ती आवटी on 22 May, 2014 - 17:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
_१ वाटी बारीक रवा
_पाणी
क्रमवार पाककृती:
रवा पूर्ण बुडून थोडं वर पाणी राहील अशा हिशेबाने एक पूर्ण दिवस भिजत ठेवावा. दुसर्या दिवशी वरचं पाणी काढून टाकावं. एक वाटी पाणी आधणास ठेवावं. त्यात अंदाजाने मीठ घालावं. रवा पाण्यात घालून नीट घोटून घ्यावा. मिश्रण फार दाट झाल्यास अंदाजानं गरम पाणी घालावं. झाकण ठेवून वाफ आणावी. लगेचच चीक तयार होतो.
वाढणी/प्रमाण:
एक-दीड वाटी चीक होतो.
अधिक टिपा:
_नुसता खाण्यासाठी तसा झटपट आणि वासविरहीत वातावरणात चीक तयार होतो
_या चिकाच्या कुरडया पण होतात
_चिकास आंबटपणा येत नाही पण आपल्या त्या ह्या गावी कुरडयांसाठी असा आंबट नसलेलाच चीक करतात
माहितीचा स्रोत:
मावशी
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे सोपंय. सहीच.
हे सोपंय. सहीच.
सिंडे, तुम्ही इथे केलात का?
सिंडे, तुम्ही इथे केलात का?
इथे नाही. भारतातच शॉर्ट कट
इथे नाही. भारतातच शॉर्ट कट म्हणून करून बघितला आहे मावशीने.
करून , खाऊन मगच प्रतिक्रिया
करून , खाऊन मगच प्रतिक्रिया देईन
करून, खाऊन मगच नाकं मुरडेल
करून, खाऊन मगच नाकं मुरडेल असं का?
करेक्ट
करेक्ट
माझी आई बर्याचदा असा चीक
माझी आई बर्याचदा असा चीक करते. मागच्या उन्हाळ्यात इथे आली होती तेव्हा असाचं चीक करुन कुरडयापण केल्या होत्या. मस्त होतात ह्याच्या कुरडया. पण आई २-३ दिवस भिजवते रवा बहुतेक. तिला नक्की विचारुन बघते.
सोप्पा प्रकार वाटतोय! जर
सोप्पा प्रकार वाटतोय! जर कुरडया करायच्या नसतील तर कसा खातात हा चीक? म्हणजे अजून काय काय करू शकतो?
चीकावर कच्चं तेल घालून खातात
चीकावर कच्चं तेल घालून खातात किंवा दूध साखर घालून....
मिनी, २-३ दिवस ठेवल्याने
मिनी, २-३ दिवस ठेवल्याने नेहमीच्या चिकासारखा आंबुसपणा येत असेल ना?
मी केलेला, मस्त होतो. मी २
मी केलेला, मस्त होतो. मी २ दोन दिवस भिजत घातलेला मग मिक्सरमधून काढलेलं.
छान प्रकार. करून पाहीन
छान प्रकार. करून पाहीन कधीतरी. एक मावशी त्या रव्याला ६ पट पाणी घालून थोडा चीक आटवल्यासारखा करून कोमट झाल्यावर प्लॅस्टीकवर पापड काढायची. प्रमाण आणि त्यात काय किती घालतात काही कल्पना नाही. पण देशाबाहेर असतांना हा चीक कामी येणार नक्की. थँक्स.
आपल्या त्या ह्या गावी>> पण
आपल्या त्या ह्या गावी>>
पण चिकाला आंबटसर चव नसेल तर फायदा??
वाळवलेला चीक ही मिळतो ना
वाळवलेला चीक ही मिळतो ना तयार? पाणी घालून वाफ आणली की झालं.
खरच सोपा वाटतोय... करुन
खरच सोपा वाटतोय... करुन बघावा..
मस्तच! कधी चिक खावासा वाटला
मस्तच! कधी चिक खावासा वाटला तर करायला सोप्पा प्रकार.
अर्रे! भारीए हा प्रकार...
अर्रे! भारीए हा प्रकार... करून बघेन.
मलाही मंजूसारखाच प्रश्न पडला आहे खरा, पण तरी करून खाणार. 'अग्गद्दीच्च जर्राही आंबट नैय्ये बै' असं वाटलंच, तर ताक घालेन थोडंसं
nice shortcut!!
nice shortcut!!
भारी! आपल्या त्या ह्या
भारी! आपल्या त्या ह्या गावच्या गावकर्यांना धन्यवाद!
रवा अजून एखादा दिवस भिजत ठेवून आंबवणार - आंबुस वास/चव हवीच.
चीक गाळत बसण्याचे कष्ट वाचतायत ना!
हो सिंडी, आंबुस वास येतो
हो सिंडी, आंबुस वास येतो गव्ह्याच्या चीकासारखा.
स्वाती, चीक गाळावा लागतो, रव्याचे सालं निघतात. पण गव्ह्याचा चीक गाळाण्यापे़क्शा कमी कष्ट असतात.
ओह ओके. धन्यवाद, मिनी.
ओह ओके. धन्यवाद, मिनी.
मला आमच्या शेजार्रच्या
मला आमच्या शेजार्रच्या गावातल्या त्या चीक आवडणार्यांकडे जाऊनच खायला हवा. एवढी उस्तवार करवणार नाही.
मस्त आहे रेसिपी. सायोसारखंच
मस्त आहे रेसिपी.
सायोसारखंच वाटलं पण आपल्या त्या ह्या माझ्या गावात राहत नाहीत तेव्हा +१ देता येत नाही...;)
आपल्या त्या ह्या आता चिकाचा
आपल्या त्या ह्या आता चिकाचा बिझनेस सुरू करावा म्हणतायत.
मस्त रेसिपी!
मस्त रेसिपी!
मस्तय.
मस्तय.
रवा बिजत घातलाय
रवा बिजत घातलाय सकाळीच..
उद्या करुन बघेन चिक
मीपण असाच करते दोन दिवस
मीपण असाच करते दोन दिवस भिजवून. कुरडया छान होतात.
मी आज हा चीक करून पाहिला.
मी आज हा चीक करून पाहिला.
गरम पाण्यात हिंग-मीठ घालून त्यात २४ तास भिजवलेला रवा घालून मावेत शिजवला. चव आणि स्वाद 'ऑल्मोस्ट देअर' आहे. (मावेत शिजवायचा तर पाणी कमी घालावं लागेल असं दिसतंय. मी वरती दिलेलं पाण्याचं प्रमाण वापरलं, तर चीक अंमळ थुलथुलीत झालाय.)
थँक्स सिंडी... अ ग णि त वर्षांनी चीक खाल्ला
लले, वा वा! अजून चवीला
लले, वा वा! अजून चवीला अर्धी हिरवी मिरची घातली तरी मस्त लागेल.
Pages