कुरडयांसाठी इन्स्टंट चीक

Submitted by तृप्ती आवटी on 22 May, 2014 - 17:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

_१ वाटी बारीक रवा
_पाणी

क्रमवार पाककृती: 

रवा पूर्ण बुडून थोडं वर पाणी राहील अशा हिशेबाने एक पूर्ण दिवस भिजत ठेवावा. दुसर्‍या दिवशी वरचं पाणी काढून टाकावं. एक वाटी पाणी आधणास ठेवावं. त्यात अंदाजाने मीठ घालावं. रवा पाण्यात घालून नीट घोटून घ्यावा. मिश्रण फार दाट झाल्यास अंदाजानं गरम पाणी घालावं. झाकण ठेवून वाफ आणावी. लगेचच चीक तयार होतो.

वाढणी/प्रमाण: 
एक-दीड वाटी चीक होतो.
अधिक टिपा: 

_नुसता खाण्यासाठी तसा झटपट आणि वासविरहीत वातावरणात चीक तयार होतो
_या चिकाच्या कुरडया पण होतात
_चिकास आंबटपणा येत नाही पण आपल्या त्या ह्या गावी कुरडयांसाठी असा आंबट नसलेलाच चीक करतात

माहितीचा स्रोत: 
मावशी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी आई बर्‍याचदा असा चीक करते. मागच्या उन्हाळ्यात इथे आली होती तेव्हा असाचं चीक करुन कुरडयापण केल्या होत्या. मस्त होतात ह्याच्या कुरडया. पण आई २-३ दिवस भिजवते रवा बहुतेक. तिला नक्की विचारुन बघते.

सोप्पा प्रकार वाटतोय! जर कुरडया करायच्या नसतील तर कसा खातात हा चीक? म्हणजे अजून काय काय करू शकतो?

छान प्रकार. करून पाहीन कधीतरी. एक मावशी त्या रव्याला ६ पट पाणी घालून थोडा चीक आटवल्यासारखा करून कोमट झाल्यावर प्लॅस्टीकवर पापड काढायची. प्रमाण आणि त्यात काय किती घालतात काही कल्पना नाही. पण देशाबाहेर असतांना हा चीक कामी येणार नक्की. थँक्स.

अर्रे! भारीए हा प्रकार... करून बघेन.

मलाही मंजूसारखाच प्रश्न पडला आहे खरा, पण तरी करून खाणार. 'अग्गद्दीच्च जर्राही आंबट नैय्ये बै' असं वाटलंच, तर ताक घालेन थोडंसं Proud

भारी! आपल्या त्या ह्या गावच्या गावकर्‍यांना धन्यवाद!
रवा अजून एखादा दिवस भिजत ठेवून आंबवणार - आंबुस वास/चव हवीच.
चीक गाळत बसण्याचे कष्ट वाचतायत ना! Happy

हो सिंडी, आंबुस वास येतो गव्ह्याच्या चीकासारखा.
स्वाती, चीक गाळावा लागतो, रव्याचे सालं निघतात. पण गव्ह्याचा चीक गाळाण्यापे़क्शा कमी कष्ट असतात.

मला आमच्या शेजार्‍रच्या गावातल्या त्या चीक आवडणार्‍यांकडे जाऊनच खायला हवा. एवढी उस्तवार करवणार नाही. Wink

मी आज हा चीक करून पाहिला. Happy
गरम पाण्यात हिंग-मीठ घालून त्यात २४ तास भिजवलेला रवा घालून मावेत शिजवला. चव आणि स्वाद 'ऑल्मोस्ट देअर' आहे. (मावेत शिजवायचा तर पाणी कमी घालावं लागेल असं दिसतंय. मी वरती दिलेलं पाण्याचं प्रमाण वापरलं, तर चीक अंमळ थुलथुलीत झालाय.)

थँक्स सिंडी... अ ग णि त वर्षांनी चीक खाल्ला smiley-happy093.gif

Pages