कुरडयांसाठी इन्स्टंट चीक

Submitted by तृप्ती आवटी on 22 May, 2014 - 17:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

_१ वाटी बारीक रवा
_पाणी

क्रमवार पाककृती: 

रवा पूर्ण बुडून थोडं वर पाणी राहील अशा हिशेबाने एक पूर्ण दिवस भिजत ठेवावा. दुसर्‍या दिवशी वरचं पाणी काढून टाकावं. एक वाटी पाणी आधणास ठेवावं. त्यात अंदाजाने मीठ घालावं. रवा पाण्यात घालून नीट घोटून घ्यावा. मिश्रण फार दाट झाल्यास अंदाजानं गरम पाणी घालावं. झाकण ठेवून वाफ आणावी. लगेचच चीक तयार होतो.

वाढणी/प्रमाण: 
एक-दीड वाटी चीक होतो.
अधिक टिपा: 

_नुसता खाण्यासाठी तसा झटपट आणि वासविरहीत वातावरणात चीक तयार होतो
_या चिकाच्या कुरडया पण होतात
_चिकास आंबटपणा येत नाही पण आपल्या त्या ह्या गावी कुरडयांसाठी असा आंबट नसलेलाच चीक करतात

माहितीचा स्रोत: 
मावशी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केला केला , परवा वेकाने चिकावर प्रश्न विचारला आणी गाडी या धाग्यावर आली, मला वाटत मागे एकदा क्रुती टाकली तेव्हा लगेच केला पण फक्त कमी भिजला बहुतेक त्यामूळे तितकासा छान झाला नाही यावेळेस जवळजवळ २ दिवस भिजला रवा , एकदा पानी बदलल , मधेच काही नाकारड्यानी कसला आन्बुस वास येतोय म्हणून विचारणा केली तेव्हाच वाटल या वेळेस जमेल , आलमोस्ट ओरिजनल च्या जवळ जाणारी चव येते.
(२ दिवस भिजवण मस्ट आहे, किबहुना अजुन अर्धा दिवसही चालेल)

मी पण परवा या धाग्यावर पोचले आणि आज हा चीक घडला. आंबुस वास जरा कमी झाला होता चीक तयार होइतो, पण ठीक आहे. पुढच्या वेळी जरा अजून ठेवीन भिजवून.

Pages