गुरुवर्य नरहर कुरुंदकरांचे भीष्माबद्दलचे चिंतन अतुलनीय आहे. त्यात त्यांनी अनेक बाबींचा उलगडा केला आहे. भीष्म हा महाज्ञानी, महापराक्रमी, महातपस्वी असुनदेखिल तो महा अपयशी देखिल आहे यावर कुरुंदकरांनी नेमके बोट ठेवले आहे. निर्णय घेण्याची वेळ येताच महाज्ञानी भीष्म चुकीचे निर्णय घेऊ लागतो हे कुरुंदकरांनी घटनांचे पुरावे देऊन सिद्ध केलं आहे. पुढे या भीष्माविषयक चिंतनाच्या आधारे त्यांनी आजच्या काळातल्या राजकिय परिस्थितीवर भाष्य केले आहे. समाजात चांगला कार्यक्रम आणि चांगली माणसे, वाईट कार्यक्रम आणि वाईट माणसे असा स्पष्ट भेद नसतोच. चांगल्या बाजुला असलेली सर्व माणसे चांगली नसतात आणि वाईटाच्या बाजुला उभी असलेली सर्व माणसे वाईट नसतात. महाभारत युद्धप्रसंगी हेच चित्र उभे राहिले होते. जिवनात पेचप्रसंग अशाच वेळी उभा राहतो जेव्हा यातुन निवड करण्याचा प्रश्न येतो. कुरुंदकरांनी इरावती कर्व्यांच्या युगान्तमधील भीष्मविषयक लिखाणाचादेखिल परामर्ष आपल्या चिंतनात घेतला आहे. भीष्म युद्ध आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत होता आणि दोन्ही बाजुंसाठी अडचणीचा झाला होता हे इरावतीबाईंचे प्रतिपादन महाभारताचा आधार नसणारे झाले आहे असे मत कुरुंदकरांनी व्यक्त केले आहे. कुरुंदकरांचे हे सारे चिंतन मुळातुनच वाचण्यासारखे आहे. प्रकांडपाडित्याचा आणि अफाट बुद्धीमत्तेचा तेजाळ लखल़खाट त्यात आहे. या दोन्ही विद्वानांना दंडवत घालुनच माझी मांडणी मी आता करतो. ज्ञानदेव महाराजांनी एका ठिकाणी म्हटले आहेच. राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?
आपल्या परंपरेत स्तोत्रांमध्ये शेवटी फलश्रुती दिली जाते. या स्तोत्र पठणाने काय फल मिळेल याचे त्यात वर्णन असते. भीष्माच्या आयुष्याचा कणा असलेल्या भीष्मप्रतिज्ञेची फलश्रुती काय झाली या प्रश्नाचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न एका समाजशास्त्राच्या विद्यार्थ्याचा आहे. पहिला मुद्दा, भीष्माचे सारे निर्णय ही त्याची वैयक्तिक बाब आहे असं म्हणता येईल का? मला हा मुद्दा फार महत्त्वाचा वाटतो. विशेषतः जेव्हा एखादी लायक व्यक्ती जी राजपुत्र आहे अशा व्यक्तीने पित्यासाठी निर्णय घेताना राज्याचा विचार केला होता कि नाही? जनतेचा विचार केला होता कि नाही? राजपुत्राने निर्णय घेताना कुठलाही निर्णय ही त्याची खाजगी बाब असु शकत नाही असे माझे मत आहे. हे मत आजच्या काळाला किंवा लोकशाहीला समोर ठेऊन बनवलेले नाही. ज्याच्यावर राज्याची जबाबदारी आहे किंवा येणार आहे त्याने निर्णय घेताना ती जबाबदारी दृष्टीआड करण्याची मुभा त्याला नसते असे मला वाटते. यावर कदाचित असेही बोलले जाईल कि सत्यवतीची मुले मोठी होईपर्यंत जबाबदारी भीष्मावरच राहणार होती त्यामुळे त्याने कितीही टाळलं तरी राज्यकारभार त्यालाच करावा लागणार होता. याबद्दल अधिक विवेचन पुढे येईलच.
दुसरा मुद्दा, भीष्माला इच्छामरणाचा वर शंतनुने दिला होता त्याबद्दलचा आहे. यावरामुळे भीष्म हा इतर कुठल्याही व्यक्तीपेक्षा महाभारतात अगदी वेगळा झाला आहे. कर्ण कवचकुंडलांमुळे अवध्य झाला होता, ती काढुन घेतली आणि त्याचे ते सामर्थ्य नाहिसे झाले. कृप आणि अश्वत्थामा हे चिरंजीव होते. मात्र मृत्युला इच्छेप्रमाणे थांबवण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त भीष्माकडेच होते. हे सामर्थ्य जर श्रीकृष्णाला क्षणभर देव मानलं नाही तर त्याच्याकडेही नव्हते असे म्ह्णावे लागते. आपल्याकडे शेवटचा दिस गोड व्हावा यासाठीच सारा अट्टाहास चाललेला असतो. मात्र भीष्माच्या आयुष्यातील शेवटचा दिस गोड होण्यासाठीचा वर त्याला अगदी तारुण्यातच मिळाला आहे. त्याच्या प्रदीर्घ आयुष्यातील सत्कर्माचा तो परिपाक नव्हे. त्यामुळे भीष्माने आयुष्यात जी काही कर्मे केली त्याबद्दल कर्मवाद्यांचे मत काय असणार आहे? ते सारे वर्तन योग्य होते कि अयोग्य? कर्म सिद्धांताप्रमाणे भीष्माने घेतलेले सारे निर्णय योग्य आहेत असेच म्हणावे लागणार किंवा त्याच्या निर्णयाची फळं त्याला त्याच आयुष्यात मिळाली असे तरी म्ह्णावे लागणार. कारण भीष्म हा द्यु नावाचा अष्टवसुंपैकी एक वसु आहे. तो शापामुळे पृथ्वीवर अडकलेला आहे. बाकीचे सारे गंगेने जन्मतःक्षणीच बुडवुन मारलेले आहेत आणि त्यांची सुटका केली आहे. मात्र गाय चोरण्याचा कट ज्याने रचला तो वसु भीष्माच्यारुपाने आपली शिक्षा भोगतो आहे. शिक्षा संपल्यावर त्याला दुसरा जन्म नाही. त्यामुळे त्याच्या निर्णयाचा, वर्तनाचा मागोवा घेणे शक्य आहे अशी माझी समजुत आहे.
तिसरा मुद्दा, भीष्माचा पराक्रम, त्याचा अनुभव, त्याचं ज्ञान आणि त्याचा ज्येष्ठपणा याची कौरव आणि पांडवांनी कितपत बुज राखलेली आहे? त्याला राजसुय यज्ञ्याच्या अग्रपुजेचा मान देण्याचा मोठेपणा पांडवांनी दाखवला हे एकमेव ठळक उदाहरण. अर्थात तो भीष्मानेच नाकारला. त्यानंतर एकदम युद्धाच्या शेवटी बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पाहात भीष्म पडला असताना शांती पर्वात युधिष्ठीर त्याच्याकडे उपदेश घेण्यासाठी गेला. त्या अगोदर यासाठी युधिष्ठीराला वेळ मिळालेला दिसत नाही. नैतिकतेचा धागा त्यातल्या त्यात पीळदार फक्त युधिष्ठीरातच होता असे दाखवण्याची परंपरा आहे. त्यामुळे ही उपदेश परंपरा; बाकी पांडवांना कधीही कुणाच्या उपदेशाची गरज भासलेली दिसत नाही. श्रीकृष्णाने सल्ला वेळोवेळी दिला. उपदेश फक्त गीतेतच आणि तो देखिल अर्जुनाला संभ्रम झाला म्ह्णुन. कौरवांच्या बाजुने विदुराने नीतीचे धडे दिले त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याचं दिसतं. उपदेशच म्ह्णायचं झालं तर कणिक नावाच्या कुटील नीतीज्ञाचा उपदेश कौरवांनी ऐकला आणि बहुधा अंमलात देखिल आणला. मात्र महाज्ञानी भीष्माला काही विचारण्याची तसदी कुणीच घेतलेली दिसत नाही.
चौथा मुद्दा, भीष्माच्या पराक्रमाचा, ज्ञानाचा, ज्येष्ठतेचा, त्याने आजन्म केलेल्या कुरुराज्याच्या सेवेचा प्रभाव एकुणच राजकारणावर आणि राज्यकर्त्यांवर कितपत होता? येथे मला अनिवारपणे भीष्माची तुलना गांधींशी करावीशी वाटते आहे. गांधीची मते, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे निर्णय कुणाला पटोत न पटोत मात्र आयुष्याच्या अखेरपर्यंत काँग्रेसला आपल्यामागुन फरफटत नेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते हे मान्य करावे लागेल. जनतेवर त्यांचा प्रचंड प्रभाव होता. ते जातील तेथिल दंगली ओसरत असत. ते उपोषण करायला बसल्यावर काँग्रेसला चरफडत का होईना पाकिस्तानला पंचावन्न कोटी देण्याचा निर्णय घ्यावा लागत असे. याला कुणी भावनिक अडवणुकही म्हणु शकेल. पण ते सामर्थ्य गांधीमध्ये होते आणि ते भीष्माप्रमाणे त्यांना घराण्याच्या वारसाहक्काने मिळाले नव्हते. गांधींचे सामर्थ्य त्यांच्या राजकारणातुन,त्यांच्या देशसेवेतुन निर्माण झाले होते. याउलट भीष्माचे सामर्थ्य उत्तरोत्तर ओसरतच गेलेले दिसते. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये भीष्माचा सहभाग नाही. त्याच्याकडे कुणीही सल्ला मागायला जात नाही. निर्णय भीष्माच्या मताविरुद्ध गेला तर तो बदलुन घेण्याचे सामर्थ्य भीष्मात नाही. याउलट दुर्योधन म्हणेल त्याप्रमाणेच घटना घडत गेलेल्या दिसताहेत.
मुद्दे अनेक आहेत. त्यांचा परामर्ष पुढील विवेचनात घेतला जाईलच. मात्र राजकारणात काय किंवा समाजकारणात काय निव्वळ पराक्रम, ज्ञान, अनुभव, याव्यतिरिक्त देखिल आणखि काहीतरी माणसाकडे असायला हवं असं भीष्माकडे पाहताना वाटत राहतं. हे आणखि काहीतरी म्हणजे काय याचादेखिल शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण ज्ञान, पराक्रम, अनुभव या सार्या गोष्टी भीष्मामध्ये एकवटुनसुद्धा तो एकटा पडला असेच चित्र महाभारतात दिसुन येते. (क्रमशः)
अतुल ठाकुर
अतुलजी, सुरेख लेख.
अतुलजी,
सुरेख लेख.
अरे वा! भीश्म , गान्धी, ५५
अरे वा! भीश्म , गान्धी, ५५ कोटी...
आता नथुराम मनजे अर्जुन मग नथुरामाचे गुरु म्हनजे क्रिश्ण हेही लिहा.
अर्जुनाचा वाटाड्या आणि नथुचा वाटाड्या यांच्यात एक साम्यही आहे. दोघेही निर्वंश होऊन मेले. पहिला गांधारीच्या शापाने आणि दुसरा बहुतेक भारत्मातेच्या शापाने असणार नै का? हेही लिहा म्हणजे कर्मवीपाकाबाबत अजुन लिहु शकाल.
५५ कोटी बाबत खुलासा.
http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm
मोदी स्न्घ सत्तेत आल्या आल्या लोकान्ना इतिहास बदलायची घाई लागली
..........................
पुढिल लेखाची प्रतिक्शा करतोय
पुढिल लेखाची प्रतिक्शा करतोय
हाही भाग छान झालाय.
हाही भाग छान झालाय.
नमस्कार अतुल ठाकूर! लेख
नमस्कार अतुल ठाकूर!
लेख चांगला झालाय. माझं वाचन कुरूंदकर वा कर्व्यांइतकं नाही. मात्र लेख वाचून काय जाणवलं ते सांगतो.
१.
>> निर्णय घेण्याची वेळ येताच महाज्ञानी भीष्म चुकीचे निर्णय घेऊ लागतो हे कुरुंदकरांनी घटनांचे पुरावे देऊन
>> सिद्ध केलं आहे.
कुठल्या घटना चर्चिल्या आहेत ते मिळाल्यास बरं पडेल. एक सर्वात बहुश्रुत घटना म्हणजे वस्त्रहरणाची. द्रौपदी दासी आहे का याचं उत्तर नाही असं देता आलं असतं. पण भीष्म त्यावेळी किंकर्तव्यविमूढ झाले होते. धर्म सांभाळण्यासाठी जो युक्तिवाद करायला हवा तो जमेना.
अशीच परिस्थिती शिवाजीमहाराजांवर आगऱ्याच्या कैदेत ओढवली होती. शंभूराजांना पोटासी धरून राजांनी बहुत शोक केला, असं पुरंदरेकृत शिवचरित्रात आहे. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी शिवाजीमहाराजांकडे काही दिवस वेळ होता, तर भीष्मांकडे काही क्षण. त्यामुळे कदाचित भीष्मांना चटकन निर्णय घेता आला नसावा. अर्थात हे केवळ स्पष्टीकरण आहे, भीष्ममौनाचं समर्थन नाही.
२.
>> मात्र भीष्माच्या आयुष्यातील शेवटचा दिस गोड होण्यासाठीचा वर त्याला अगदी तारुण्यातच मिळाला आहे.
>> त्याच्या प्रदीर्घ आयुष्यातील सत्कर्माचा तो परिपाक नव्हे. त्यामुळे भीष्माने आयुष्यात जी काही कर्मे केली
>> त्याबद्दल कर्मवाद्यांचे मत काय असणार आहे?
भीष्म जरी इच्छामरणी असला तरी कर्मसिद्धांत लागू होतोच. इच्छामरण म्हणजे शेवटचा दीस गोड होणे नव्हे. वस्त्रहरणप्रसंगानंतर द्रोणाचार्यांनी 'आता मला महायुद्धात मरण येवो' असे उद्गार काढले. भीष्मांची मन:स्थितीही अशीच काहीशी असावी. त्याप्रमाणे दोघांनाही युद्धात मरण आले.
३.
>> भीष्माचा पराक्रम, त्याचा अनुभव, त्याचं ज्ञान आणि त्याचा ज्येष्ठपणा याची कौरव आणि पांडवांनी कितपत
>> बुज राखलेली आहे?
दुर्योधन भीष्मांवर उघडपणे पांडवधार्जिणेपणाचा आरोप करीत असे. मला वाटतं की पांडव भीष्मांना कौरवांसोबत राहणारे म्हणून त्यांना धार्जिणे आहेत असं धरून चालले असावेत. पांडवांच्या भूमिकेबद्दल कुठेही वाचल्याचं आठवत नाही. हा केवळ एक तर्क आहे. भीष्म शरपंजरी पडल्यावर पक्षधार्जिणेपणा निरर्थक झाला.
तसेच राज्य चालवण्याचा म्हणजे प्रशासन व इतर बाबी यांचा दांडगा अनुभव भीष्मांपाशी होता. पांडवांकडे पहिल्यांदा राज्यच नव्हतं. आल्यानंतर बहुधा लगेच द्यूतप्रसंग घडला (संदर्भ तपासून पाहावा लागेल). त्यामुळे भीष्मांचा सल्ला घेण्याची थेट गरज पडली नसावी. पण आता भीष्म जग सोडून जाणार तर तत्पूर्वी अखेरचे बोधामृत घ्यायला युधिष्ठिर त्यांच्याकडे गेला असावा.
४.
>> भीष्माच्या पराक्रमाचा, ज्ञानाचा, ज्येष्ठतेचा, त्याने आजन्म केलेल्या कुरुराज्याच्या सेवेचा प्रभाव एकुणच
>> राजकारणावर आणि राज्यकर्त्यांवर कितपत होता?
मला वाटतं की भीष्म वयोवृद्ध असल्याने त्यांनी तरुणांच्या कारभारात जरुरीपुरतेच लक्ष घातले. माझं म्हणणं ऐकाच, असा हेका धरला नाही.
असो.
हे माझं आकलन आहे. माझ्याकडे प्रदीर्घ आणि सखोल व्यासंग नाही.
आ.न.,
-गा.पै.
हे वाचायला खरच मजा येते
हे वाचायला खरच मजा येते आहे.
कुरुंदकरांचे हे सारे चिंतन मुळातुनच वाचण्यासारखे आहे. प्रकांडपाडित्याचा आणि अफाट बुद्धीमत्तेचा तेजाळ लखल़खाट त्यात आहे.>>> हे कुठे वाचायला मिळेल?
दोन्ही लेख आवडले. >> हे कुठे
दोन्ही लेख आवडले.
>> हे कुठे वाचायला मिळेल? + १.
शूम्पी, अमितव लेख
शूम्पी, अमितव लेख आवडल्याबद्दल आभार.
गुरुवर्य नरहर कुरुंदकरांचे महाभारतावरील एकत्रित लिखाण "व्यासांचे शिल्प" या नावाने इंद्रायणि साहित्य प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे.
येथे मला अनिवारपणे भीष्माची
येथे मला अनिवारपणे भीष्माची तुलना गांधींशी करावीशी वाटते आहे. <<<< १०० टक्के बरोबर निष्कर्ष !!!
हा लेख वाचायला घेतला आणि पहिल्या दुसर्याच परिच्छेदापर्यंत येवूस्तोवर मला हेच वाक्य सुचलं
मी सत्याचे प्रयोग वाचले आहेत मला तिथे गांधीजी स्वतःवर जे जे नियम लावून घेतात / ज्या तत्वांचा आधार वेळोवेळी घेतात त्यात एकमेव कारण आत्मशोधन / आत्मौन्नती हे आहे देव देश धर्म ह्यांचा उल्लेख गांधींच्या लेखनात आला आहे पण नुसताच आला आहे गझलेसाठी वृत्तात लिहिणे अवश्यक असते म्हणून वृत्ते पाळावी लागतात तसे आहे ते
असो मला वाटते की भीष्म आयुष्यात ज्या प्रतीज्ञा / जे निर्णय घेतोय ते त्याच्या स्वतःच्या अत्मोन्नतीसाठी तो घेतो इतरांचा त्यात काही संबंध नाही /नसावा !!!! कृष्णाबिष्णाचाही नव्हे
तो एकटा पडला असेच चित्र
तो एकटा पडला असेच चित्र महाभारतात दिसुन येते<<< तो ह्या एकटेपणासाठीच आयुष्याच्या प्रवासाला निघाला आहे असे माझे मत आहे
माझ्या मते त्याच्या
माझ्या मते त्याच्या प्रतिज्ञेपायी काहीहि विशेष चांगले झाले नाही. नि पुढे बरेच काही काही वाईट घडले त्यात त्याचा काही दोष नाही.
त्याने प्रतिज्ञा केली की मी हस्तिनापूरच्या सिंहासनावर जो असेल त्याच्या सेवेत राहीन. शिवाय लग्नहि करणार नाही म्हणजे माझे वंशजहि राज्यावर अधिकार सांगणार नाहीत.
आपल्या बापाच्या कामवासनेची पूर्ति व्हावी म्हणून तशी शपथ घेतली! तेंव्हा त्याला काय माहित पुढे काय होईल.
त्या प्रतिज्ञेबद्दल त्याला इच्छामरण मिळाले पण सगळे आयुष्य दुर्दैवाचे खेळ बघण्यात गेले, नि शेवटी सगळ्या कुरुवंशाचा नाश झाला, असंख्य लोक मेले नि चांगला राजा हस्तिनापूरला आला तेंव्हा त्याने आयुष्य संपवून टाकले.
त्याच्या प्रतिज्ञेमुळे नव्हे तर सामर्थ्यामुळे हस्तिनापूरवर सुरक्षित राहिले. शिवाय वेळोवेळी बायका पळवून आणायलाहि त्या सामर्थ्याचा उपयोग झाला. या दोन्ही गोष्टीत त्याच्या प्रतिज्ञेचा काही संबंध नाही.
उलट एका प्रतिज्ञेपायी एका महाज्ञानी, महापराक्रमी, महातपस्वी माणसाच्या दीर्घ आयुष्याचा काही उपयोग झाला नाही!
अनुमोदन फक्त त्या चान्गला
अनुमोदन
फक्त त्या चान्गला राजा या शब्दाबद्दल शन्का आहे. कौरव हे जुलमी राजे होते असा महाभारतात बहुदा उल्लेख नसावा. ते पाण्डवान्चे विरोधक अsateel पण राज्य चालवायला तितकेच सक्षम होते
कौरव हे जुलमी राजे होते का
कौरव हे जुलमी राजे होते का याचे उत्तर अभ्यासक देतील. पण अकारण पांडवांशी शत्रुता हा दुर्गुण नक्कीच. हा प्रसंग लाक्षागृहाचा असो की अन्य.
पांडवांना निष्कारण द्युत खेळायला बोलावुन पुढचे द्रौपदी विटंबना आदी गोष्टी ज्ञात आहेतच.
जो राजा आपल्या वैयक्तीक आकसापोटी महायुध्द घडवुन आणतो. १२ वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासानंतर पांडवांचे राज्य परत देत नाही. शिष्ठाई नाकारुन अनेक सामान्य सैनीकांबरोबरच पितातुल्य आणि गुरु, मित्र व बंधुंचा विनाश घडवुन आणतो. असा राजा कोणत्या विषेशणाला पात्र आहे ?
मृत्युंजयानंतर खलनायकांना नायक बनवणारे लेखक वाढत चालले आहेत.
ज पाअण्डवान्चे राज्य
ज
पाअण्डवान्चे राज्य नव्हतेच.
पान्दुने राज्य त्याग केल्यानन्तरध्रुतराश्५ट्राचा रीतसर राज्याभिशेक झालेला होता. त्यामुले कौरवच राज्याचे वारस होते.
आपले राज्य बळजबरीने पान्डव हिरावताहेत हे समजल्यावर दुर्योधनाने केलेले प्रयत्न योग्यच आहेत.
आपले शत्रु सम्पावेत म्हनुन केलेले ते प्रयत्न होते.
लाअक्षाग्रुह हे कौरवान्चे पाप कसे? आपला शत्रु सम्पवायला त्यान्नी केले. पण लाक्षाग्रुहातुन सुटताना पान्डवानी कुन्ती च्या सल्ल्यावर्य्न एक भिल्ल बाइ अ तिची पाच मुले याना जाळुन मारले. स्वतःची निश्पाप प्रजा जाळणारी कुन्ती आदरणीय मानायची का हो?
या पापाचॅ फळम्।हनूण कूं ती वणव्यात जळुन मेली.
अन्धे का पुत्र अन्धा या वाक्यात ध्रुतराश्त्र व दुर्योधन दोघान्चाही अपमान होतो. द्रौपदीचे नवरे लहानपणी त्याच आन्धळ्याकडे आश्रितासारखे जगले होते, याचा विसर जिला पडला तिला दुर्योधनाने अगदी योग्य धडा शिकवला.
पांडव क्रिश्न भीश्म याना देव माननार्यानी त्यांची देवळे आनन्दाने उभी करावीत. पण यांच्यापुढे झुकाच ही सक्ती इतरांवर करु नये.
राजघराण्यातील लोकान्नी आप्पापसात वारसा हक्कासाठी भान्दावं मराव मारावं. आमी ज न्ता इचार करत नाही. त्यानी जनतेला कसे साम्भाळलं इतकेच आम्ही बघतो. म ग भले तो देवाचा अवतार असो वा बाबराचा वन्शज असो.
सुरेख लेख
सुरेख लेख अतुलजी!
कुरुंदकरांचे यावरचे लेख वाचलेच पाहिजेत.
लेख छान. <<पान्दुने राज्य
लेख छान.
<<पान्दुने राज्य त्याग केल्यानन्तरध्रुतराश्५ट्राचा रीतसर राज्याभिशेक झालेला होता.>> नाही. ध्रुतराष्ट्र्राचा कधीही
रीतसर राज्याभिषेक झालेला नव्हता तो फक्त कार्यकारी राजा होता.
आयला, कार्यकारी राजा?
आयला, कार्यकारी राजा? म्हनजेकाय हो?
आणि पान्दु कसला राजा ? अकार्यकारी राजा काय?
राज्य चालवायला तितकेच सक्षम
राज्य चालवायला तितकेच सक्षम होते
सक्षम होतेच, चालवलेच राज्य.
पण भीष्म व कृष्ण म्हणतील तो धर्म असे त्या गोष्टीत गृहित असल्याने दुर्योधनादि अधर्मी ठरले,
इथे आजचा धर्मसुद्धा कुणाला कळत नाही, तर त्याकाळचा धर्म काय कळणार?
आजकाल धर्मा ऐवजी कायद्याचे राज्य आहे (:फिदी:). हो नं?
कायद्याप्रमाणे कुणि दोषी, तर कुणि नाही!! आपल्याला पटते का ते सगळे?
असो. गोष्टीतल्या बिचार्या भीष्माबद्दल फक्त वाईटच वाटते, राग येत नाही नि आदर जरा जपूनच.
भीश्मच नव्हे मला तर दशरथ. राम
भीश्मच नव्हे मला तर दशरथ. राम लक्ष्मण कर्न ध्रुव शिवाजी सम्भाजी या महान लोकांबद्दल वाइट वाटते. हे सगळेच लोक घरच्या लबाड लोकांच्या लबाडीला पडलेले बळी आहेत.
पण्डु पुत्रप्राप्तीसाठी वनात गेला , असे लोक सान्गतात आनि ध्रुतराश्ट्र त्याच्या वतीने राज्य पहात होता असेही सान्गतात.
पण व्यासान्नी नियोग घरातच केला होता. कुन्तीला कर्ण घरातच झाला होता. दशरथानेही यज्ञ घरातच केला होता. मग मूल व्हायला हा जंगलाआट का गेला?
किन्दम रुशीच्या शापाने पडुच्या आयुश्यातला रस निघुन गेला आणि तो राज्य सोडुन / त्यागुन जन्गलात गेला.
पण काही काळाने त्याला आपण निपुत्रिक मरणार ह्रे दुख छळु लागले. त्यावेळी कुन्तीने नवर्याची अवस्था जाणुन मन्त्र वापरुन पुत्र प्राप्ती करुन दिली.
जर पन्डु राज्याला वारस आणायचा आणि पुन्हा राज्य करायचे या इच्चेने जन्गलात गेला असता तर पहिला पुत्र होताच तो पुन्हा राज्य करायला हजर झाला असता. पण त्यानन्तरही अजुन मुले झाली तरी तो वनातच राहिला. कारण तेच आता त्याचे जीवन होते. म्हणुन अखेर पर्यन्त तो वनातच राहिला . मग तिथेच तो मेला.
त्या मधल्या काळात ध्रुतराश्ट्राचा रीतसर अभिशेक झाला होता. तसेही पण्डु राज्य त्यागुन बरीच वर्शे झाली होती. जनतेने दीर्घकाळ राजाची वाट पाहुन आपले आयुश्य का बर्बाद करायचे ? ज्याने प्रजेला साम्भ्सळले तो खरा राजा. समजा पान्डु मेला नसता आणि १०० वर्शे रानातच राहिला असता तर जनतेने याची वाट पहात बसायचे का?
कुन्ती नन्तर परत आली. जर राज्य तिच्या नवर्याचे होते आणि पान्डव खरे वारस होते तर तेंव्हाच तिने का नाही मागितले ? मुलान्च्या पोशणासाठी शिक्षणासाठी तिने आश्रितासारखे आयुश्य काढले आणि नवरा नसल्याचे रडगाणे गाऊन आपला स्वार्थ साध्य केला आणि नन्तर खरा रंग दाखवला.
पण्डु पुत्रप्राप्तीसाठी वनात
पण्डु पुत्रप्राप्तीसाठी वनात गेला , असे लोक सान्गतात
मी ऐकले की तो माद्रीच्या राज्यात लढाईला गेला होता, तिथे जिंकला त्याचा श्रमपरिहार करायला तो वनात गेला. तिथे त्याने किंदम ऋषींच्या पत्नी ला बाण मारून ठार केले. (आता ते ऋषी नि त्यांची बायको हरिण-हरिणी झाले होते म्हणे?! नि ते पांडूला कळायला पाहिजे होते म्हणे! उगीचच कैच्च्या कै!!) म्हणून त्या ऋषींनी त्याला शाप दिला!
आपण आपले प्रत्येक गोष्ट अगदी गंभीरपणे घेतो नि त्याचा अर्थ लावायला बघतो. मधून मधून व्यासाने पण थोडा थोडा हिंदी सिनेमा केला आहे गंमत म्हणून.
तुम्ही जे वन अत गेल्याचे
तुम्ही जे वन अत गेल्याचे ब्लताय ते शापा आधीचे. त्या वनविहारात त्याला शाप लागला.
त्याबाबत कन्फुजन नाही.
शाप घेउन तो घरी गेला . त्याचे कारभारात लक्ष लागेना. अखेर तो राज्यत्याग करुन म्हणजे ' राजीनामा ' देउन पुन्हा वनात गेला. यावेळी मात्र कायमचा गेला.
वाद आहे तो या वनवासाबाबत.
पान्डवान्ची भलावण करनारे लोक म्हनतात की हा वनवास टेम्पररी होता. तो केवळ मुले व्हावीत म्हनुन गेला होता. कायमचा नव्हे. आनी धृटार्आश्ट्र अन्यायी आणी पान्डव ख रे वन्शज असे सान्गतात.
पण मी जी वर लिहिली ती माझ्या मते खरी वस्तुस्थिती आहे.
मला वाटतं की भीष्म वयोवृद्ध
मला वाटतं की भीष्म वयोवृद्ध असल्याने त्यांनी तरुणांच्या कारभारात जरुरीपुरतेच लक्ष घातले. माझं म्हणणं ऐकाच, असा हेका धरला नाही.
गापै, आपले हे म्हणणे पटणे कठीण आहे. हा विचार अगदी आधुनिक काळातला दिसतोय. मुले मोठी झाली, कर्तीसवरती झाली, त्यांची लग्ने झाली आता त्यांना मुखत्यारी द्यायला हवी वगैरे. महाभारतकाळात बाजुला व्हायचे तर संन्यास आणि वानप्रास्थाची सोय होती. भीष्म हा मरेपर्यंत कधीही निवृत्त झाला नव्हता असे माझे मत आहे. युद्धाच्या सुरुवातीला विदुर त्यातुन बाजुला झाला, महापराक्रमी बलराम तीर्थयात्रेला निघुन गेला. हे भीष्मालादेखिल करता आले असते. पण त्याला निवृत्त व्हायचं नसावं. हेका धरण्याचा प्रश्नच नव्हता कारण आपले कुणीही ऐकणार नाही याची बहुधा भीष्माला खात्री पटत चालली होती. विशेषकरुन द्युतानंतर तर नक्कीच.
दुर्योधन भीष्मांवर उघडपणे पांडवधार्जिणेपणाचा आरोप करीत असे.
तरीही दुर्योधनाला भीष्मच सेनापती म्हणुन हवा होता हे नजरेआड करता येणार नाही. हा माणुस कितीही पांडवधार्जिणा असला तरीही अजिंक्य आहे हे दुर्योधनाला माहित होते. त्यामुळे ज्ञान, अनुभव, त्याच्या ज्येष्ठतेचा मान राहु देत बाजुला. त्याच्याकडे सल्ल्यासाठी जाण्याची गरजही नाही. मात्र युद्धासाठी भीष्मच हवा असाच एकुण विचार दिसतोय.
इच्छामरण म्हणजे शेवटचा दीस गोड होणे नव्हे
का बरं?
बाकी सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.
वैवकु, आपला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. सविस्तर मत मांडण्याचा प्रयत्न करेन
जाउद्याहो, व्यासांनी हजारो
जाउद्याहो, व्यासांनी हजारो वर्षांपुर्वि महाभारत लिहिलं, त्या काळानुसार त्यांच्याहि क्रिएटिविटीला काहि लिमिटेशन्स होत्या असं समजा...
नमस्कार. तो मुद्दा पटला.पंडु
नमस्कार.
तो मुद्दा पटला.पंडु वनवासात जाण्याचा.
दुर्योधन कणकनितीप्रमाणे पांडवांना कुंतीपुत्र मानत.पंडुपुत्र नव्हेत.तेही खरं.
बाकी प्रश्न कुंतीने राज्य कां मागीतले?
आज जी मुलं दत्तक घेतली जातात किंवा स्पर्म अॅडोप्शन करून जन्मतात्,त्यांना त्यांच्या वडीलोपार्जित संपत्तीवर हक्क सांगता येत नाही काय?? तसेच त्यावेळीही.
पंडु जिवंत असता तर कदाचीत कुंती परत आली देखील नसती.पण ती परत कां आली याचं कारण सगळ्यांनाच माहीत आहे.
भीष्मांना एकंदरीत इच्छामरणाचा सोस पडला असेल.कुठून ते वचन दिले आणि इच्छा मरण घेतले असे झाले असेल.या पांडव-कौरवांच्या भांडणाने वैतागून जाऊन त्यांना जगणे नकोसे झाले होते.पण अशावेळी त्यांची साथ सोडणे शक्य नव्हते कारण वचन. तसेच इच्छामरण घेणेही शक्य होत नव्हते कारणे दोन
१-धर्मानुसार तो पळपुटेपणा ठरतो.
२-त्या मरणाने आपला उदो-उदो होणार असे इच्छामरण त्यांना हवे होते.
तसे पाहायला गेले तर इतर म्हातार्यांप्रमाणे भीष्मही साळसूद होते असे म्हणायला हवे.ते जसे तपस्वी होते,महान होते तेवढेच मुंगी होऊन साखर खाणारेही होते.महाभारतातले कुठलेही पात्र घेतले तरी ते बेरकी आहे.त्यामुळे महाभारत एक गोष्ट म्हणून वाचणेच योग्य ठरेल असे वाटते.
माझ्या वरील उत्तरांत काही संदेह असेल तर सांगा.परंतु चारी बाजूंनी विचार केल्यास ती चपखल बसतात.
महाभारतातले कुठलेही पात्र
महाभारतातले कुठलेही पात्र घेतले तरी ते बेरकी आहे.
त्यामुळेच सर्वच कथा पुनः पुनः वाचण्याजोगी, पहाण्याजोगी आहे.वर्षानुवर्षे (हजाराहून जास्त वर्षे!) लोक त्यावर चर्चा करतात, नवनवीन मते पुढे येतात. एकदा कर्ण वाईट तर एकदा चांगला. एकमत होणे शक्य नाही. व्यक्ति तितक्या प्रकृति नि या सगळ्या प्रकृतींना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य आहे या कथेत!! धन्य धन्य.
झक्की>>+१ खरे तर वर मला कर्ण
झक्की>>+१
खरे तर वर मला कर्ण एक अपवाद आहे असे म्हणायचे होते.कारण म.भा.तल्या तीन-चार पात्रांपैकी ते माझं सगळ्यात जवळचं आणि आवडणारं पात्र आहे.इतर बर्याच वाचकांसारखी त्याच्याबद्दल्,त्याच्या स्वभावाबद्दल आत्मियता आहे.पण इकडे वेगळ्याच कंमेंट्स येतील म्हणून उल्लेख टाळलेला.
अतुल ठाकूर, १. >>
अतुल ठाकूर,
१.
>> महाभारतकाळात बाजुला व्हायचे तर संन्यास आणि वानप्रास्थाची सोय होती.
>> भीष्म हा मरेपर्यंत कधीही निवृत्त झाला नव्हता असे माझे मत आहे.
बरोबर आहे. भीष्म मरेपर्यंत निवृत्त झाले नव्हते. हस्तिनापुराचं बळ भीष्मांत होतं. धृतराष्ट्र वा कौरवांत नव्हे. भीष्मांच्या तोडीचा वीर हस्तिनापुरास सापडेपर्यंत त्यांनी स्वत: कारभारात लक्ष घालणं जरूरीचं होतं.
तसेच वानप्रस्थास जाण्याअगोदर कौरवपांडवांचं खटलं मार्गी लावावं हाही हेतू असावा. पांडवांना राज्य वेगळं करून दिल्यावर कौरव आणि पांडव यांच्यात भांडणाचं कारणच मुळी उरलं नव्हतं. आता भीष्म सुखाने निवृत्त होऊ शकत होते. मात्र तेव्हढ्यात द्यूतप्रसंग घडला आणि परिस्थिती पार उलटीपालटी झाली.
२.
>> इच्छामरण म्हणजे शेवटचा दीस गोड होणे नव्हे
>> का बरं?
शेदीगोचा मला अभिप्रेत असलेला अर्थ सांगतो. शेदीगो होणे म्हणजे समाधानाने मरण येणे. तुम्हाला हाच अर्थ अभिप्रेत आहे का?
आ.न.,
-गा.पै.
अतुल, मोठाच विषय. >.गुरुवर्य
अतुल, मोठाच विषय.
>.गुरुवर्य नरहर कुरुंदकरांचे भीष्माबद्दलचे चिंतन अतुलनीय आहे >>
ही सुरुवात वाचून इथे या लेखावर, चर्चेत नरहर कुरुंदकरांचं एक अवतरण द्यावं असं वाटतं आहे , जे मला फार भावतं. ही त्यांनी 'युगांत - एक दृष्टीकोन ' या लेखात केलेली इरावतीबाईंच्या विवेचनाची चिकित्सा आहे. त्यात व्यक्त झालेलं त्यांचं मत-
'' भीष्म स्वत:च्या जीवनात विफल राहिला , चांगुलपणाच्या रक्षणातही विफल राहिला.पापाच्या बाजूने उभे राहिलेले हे निष्कलंक पुण्य सर्वस्वी विफल झाले आहे.त्याचे जीवन विफल होणे भागच होते कारण तो एक शापित जीव होता.शिक्षा म्हणून वाट्याला आलेले जीवन संपवणे त्याला शक्य होते कारण तो इच्छा मरणी होता पण हा वर भीष्माने ते शापित जीवन वाढवण्यासाठी वापरला. शेवटी शाप म्हणून वाट्याला आलेले दैव पार पाडताना दुसरे काही चांगले घडण्याचा संभवच नव्हता.ही इरावतींची भूमिका केवळ भीष्माचे स्पष्टीकरण करीत नाही तर व्यासांच्या प्रतिभेने त्यातून विसाव्या शतकात जाणवणाऱ्या अर्थशून्यतेला स्पर्श केला याची जाणीव करून देते..''
शेवटची ओळ एकदम वेगळ्याच उंचीवर गेलेली..
मुळात कौरव सगळे वाईट आणि
मुळात कौरव सगळे वाईट आणि पांडव चांगले अशा पारंपारिक भूमिकेतूनच विश्लेषण केले की भीष्माची विफलता वाटू लागते - तो ज्ञानी असून आणि इच्छामरणाचा त्याला वरदान असले तरीही ! त्याची प्रतिज्ञा आणि नंतर त्याने घेतलेले सर्वच निर्णय राजकीय भूमिकेतून घेतले होते आणि त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागले - याला शापित जीवाचा मुलामा नंतर दिलेला दिसतो. अंबा, गांधारी आणि नंतर द्रौपदीच्या वस्त्रहरण प्रकरणी त्याने घेतलेली भूमिका कुठल्याही तत्वांवर आधारीत वाटत नाही, सगळ्याच सोयीस्कर राजकीय भूमिका होत्या. एवढा महाज्ञानि तो होता तर त्याला या सगळ्या घटनांचे त्या घडत असताना व नंतर होणारे परिणाम याबद्दल काहीतरी चिंतन केले असते.
भारतीताई, शबानाजी
भारतीताई, शबानाजी प्रतिसादाबद्दल खुप आभारी आहे.
गापैजी, आपल्याला जे स्पष्टीकरण मला द्यायचं होतं ते बरंचसं तिसर्या भागात येणारच आहे. त्यामुळे येथे ते लिहित नाही.
वैवकुजी,
असो मला वाटते की भीष्म आयुष्यात ज्या प्रतीज्ञा / जे निर्णय घेतोय ते त्याच्या स्वतःच्या अत्मोन्नतीसाठी तो घेतो इतरांचा त्यात काही संबंध नाही /नसावा !!!! कृष्णाबिष्णाचाही नव्हे
यासाठी आपण गांधींचा आधार घेतला आहे. याबद्दल माझे मत मी सांगतो. सर्वप्रथम सविस्तर मत मांडेन असे सांगुन बराच वेळ लावला यासाठी आपली क्षमा मागतो.
गांधींनी एके ठिकाणी म्हटले आहे कि राजकारण व धर्म यांना जे वेगवेगळे थेऊ इच्छितात त्यांना धर्म व राजकारण दोन्ही कळत नाही असे माझे नम्र मत आहे. याम्हणण्याचा अर्थच असा कि त्यांनी राजकारण हे देखिल धर्मसाधना म्हणुनच केले. त्या अर्थाने तुमचे म्हणणे बरोबर आहे. त्यामुळे व्यवसायात हेराफेरी करणारा मित्र जेव्हा सल्ल्यासाठी गांधींकडे आला तेव्हा त्यांनी पोलिसात जाऊन गुन्हा कबुल करुन देतील ती शिक्षा भोगण्याचा सल्ला त्याला दिला होता. गांधींची प्रत्येक कृतीच सत्य, अहिंसा या त्यांच्या तत्त्वांना धरुन असायची. गांधी आश्रमात नसताना एकदा एका ब्राह्मणाने शौचालय साफ करण्याचे काम केले होते. तेव्हा प्रचंड गदारोळ उडाला होता. गांधींच्या मोठ्या बहिणीने धर्म भ्रष्ट झाला म्हणुन वेगळा स्वयंपाक करायला सुरुवात केली होती. गांधींनी परत आल्यावर आपल्या ब्राह्मण सहकार्याची प्रशंसा केली. आणि बहिणीला "येथे असले काही चालणार नाही" असे सांगुन त्याच दिवशी तिची तिच्या घरी रवानगी केली. ही उदाहरणे लक्षात घेतली तर असं दिसुन येतं कि गांधीसाठी राजकारण काय, समाजकारण आणि त्यांच्या सर्व वैयक्तिक बारीकसारीक गोष्टी ही धर्म साधनाच होती. मात्र त्यासाठी सत्य आणि अहिंसा हा महत्त्वाचा निकष होता. अंत्योदय ही महत्त्वाची अट होती.
भीष्माच्या प्रत्येक कृतीत त्याची प्रतिज्ञा हीच एकमेव महत्त्वाची बाब दिसते आहे. त्यात आपण म्हटल्याप्रमाणे आत्मोन्नती हा उद्देश आहे हे मान्य करणे कठीण वाटते.
भीष्म जे निर्णय घेतोय ते त्याच्या स्वतःच्या अत्मोन्नतीसाठी तो घेतो इतरांचा त्यात काही संबंध नाही /नसावा
आत्मोन्नती हि दुसर्याला वगळुन करायची असेल तर वनात जाऊन गुहेत राहुन तपच करायला हवे. राज्यात राहुन अधिकाराच्या पदावर बसुन आत्मोन्नती करायची असेल तर दुसर्याचा संबंधही येणारच नाही काय? त्यावेळी गांधींचा मार्गच जास्त योग्य वाटतो. अर्थात भीष्माची तत्त्वे वेगळी असतील. भावांसाठी राजकन्यांना पळवुन भीष्म कुठली आत्मोन्नती साधणार होते? मात्र अंबेचा अस्वीकार करुन आपली प्रतिज्ञा मात्र त्यांनी राखली. त्यामुळे भीष्म हे गांधी नव्हेत असेच मला वाटते. रामकृष्ण परमहंसांनी एके ठिकाणी अनासक्तीसाठी पाण्यातल्या नावेची उपमा दिली आहे. नाव पाण्यात असावी मात्र पाणी नावेत नसावे. मला तर भीष्माने आपली नाव पाण्यात कधी उतरवलीच नाही असे म्हणायचे आहे. भीष्माने आपल्या प्रतिज्ञेशिवाय कशालाही महत्त्व दिले नाही. त्याचा आत्मोन्नतीशी काही संबंध होता असे मला वाटत नाही.
Pages