मायबोलीचा सदस्य होउन आता पाच वर्ष होतील. सुरुवात झाली होती बर्मिंगहम विद्यापिठात प्रकल्पाच्या कामासाठी असताना, एकदा सहज काही मराठी वाचायला मिळतय का हे अंतरजालावर शोधताना मायबोलीची लिंक मिळाली (गुगलचे ऋण फेडने अशक्य आहे ). विनोदी कथा, रहस्यमय कथा वाचताना वेळ कसा जायचा हे कळायचदेखिल नाही. बेफि, कौतुक शिरोडकर, चाफ्फा (कवठीचाफा ?), विशाल कुलकर्णी आणखी बर्याच लेखक मंडळींची धमाल असायची माबोवर. हळुहळु माबोकरांच्या ओळखी व्हायला लागल्या. कट्ट्यावर रोज गप्पांची मैफिल जमवता आली.थोडी हिंमत करुन मी पण एक-दोन लेख लिहिले, थोडीफार जमलेली चित्र पोस्टली. एकंदरीत सब कुछ अच्छा चल रहा था..
पण काही दिवसांपासुन काहीतरी बिनसलय, विनोदी कथा फारशा कोणी लिहित नाही, इतर प्रकारच्या कथाही जास्त येत नाहित. गेले काही दिवस ईतर प्रकार मात्र खुप जोरात चालु आहेत. जात, धर्म, राजकारण यावरुन गटबाजी, जहरी टिका, भांडणं, भांडणात एकमेकांवर शिव्यांची बरसात. ह्याशिवाय अजुन एक म्हणजे माबोवर ड्युआयडींचा फारच सुळसुळाट झालेला आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट, बहुतेक ड्युआय येतात ते एकतर काहीतरी आचरट किंवा न पटणारं लिहिण्यासाठी किंवा एखाद्याची टर उडवण्यासाठी. काही नविन लेखक पदार्पणातच वादग्रस्त विषय (प्रचंड अशुद्ध लेखनासहित) घेउन येतात, आणि त्यावर तिखट प्रतिक्रिया आल्या की मग व्यक्तिगत टिका करणे, असभ्य भाषेचा वापर आणि नंतर अॅडमिनने येउन धागा बंद करणे इथपर्यंत हा प्रवास चालतो. काही धागा लेखकांना (नाव लिहिण्याची गरज नाही, माबोकर सुज्ञ आहेत, समजुन घेतिल) तर खरच मानसिक उपचारांची गरज आहे हे लिखान वाचुन लक्षात येतं (घातक वाक्य.. आता ह्यावर जबरी प्रतिक्रिया येणार)..
तर असो, माबो परत चांगल व्हावं अस वाटलं म्हणुन हा लेख.
तुम्हाला काय वाटत, होउ शकतं मायबोली पहिल्यासारखं चांगलं? काय कराव लागेल त्यासाठी? लेख सर्वांसाठी प्रसिद्ध करण्याअगोदर काहीतरी चाळणी असावी का?
टिप : कोणाही व्यक्तीविरुद्ध हा लेख नाही, भावना दुखावण्याचा उद्देश नाही, तसं वाटल्यास कळवा, धागा खोडून टाकता येइल.
बदललेली मायबोली
Submitted by अग्निपंख on 26 May, 2014 - 00:44
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद दक्षिणा.. बदल केला
धन्यवाद दक्षिणा..
बदल केला आहे.
लेखातली खरी सल पोचली. पण तु
लेखातली खरी सल पोचली. पण तु मांडलेले मुद्दे हे नविन नाहित. तु नविन असताना कदाचित ते तुझ्या इतके निदर्शनास आले नाहीत. एखाद्या ऑफिसात रुळल्यावर जसं तिथलं राजकारण दिसतं तसंच इथेही झालं असावं. व्यक्ती तितक्या प्रकृती आपण कुणाला कंट्रोल करू शकतो?
एखाद्या ऑफिसात रुळल्यावर जसं
एखाद्या ऑफिसात रुळल्यावर जसं तिथलं राजकारण दिसतं तसंच इथेही झालं असावं. >>> हे उदाहरण आवडलं.
नंदिनी.. बर्यापैकी सहमत.. पण
नंदिनी.. बर्यापैकी सहमत..
पण तुमच्या सारख्या कथा लेखकांनी कथा/कादंबर्या लिहिल्या तरच गुलमोहोर बहरणार ना ?
(फेसबुकासारखी आयडी टॅग करायची सोय असती तर माझ्या आवडत्या कथा लेखकांची यादी लिहिली असती इथे )
अजून एक गोष्ट म्हणजे.. हल्ली दरवर्षी होणार्या लेखन स्पर्धांमधून क्रिएटीव्ह रायटींगला वाव मिळतो ना.. लेखन स्पर्धा येऊ घातल्याची रिक्षा बघितली.. त्यामुळे त्या निमित्ताने काहितरी चांगलं वाचायला मिळले अशी अपेक्षा ठेऊया..
काही नविन लेखक पदार्पणातच
काही नविन लेखक पदार्पणातच वादग्रस्त विषय (प्रचंड अशुद्ध लेखनासहित) घेउन येतात, आणि त्यावर तिखट प्रतिक्रिया आल्या की मग व्यक्तिगत टिका करणे, असभ्य भाषेचा वापर आणि नंतर अॅडमिनने येउन धागा बंद करणे इथपर्यंत हा प्रवास चालतो. काही धागा लेखकांना (नाव लिहिण्याची गरज नाही, माबोकर सुज्ञ आहेत, समजुन घेतिल) तर खरच मानसिक उपचारांची गरज आहे हे लिखान वाचुन लक्षात येतं (घातक वाक्य.. आता ह्यावर जबरी प्रतिक्रिया येणार)..>>>
अश्या धाग्यांमध्ये अनुल्लेखास्त्रच वापरण्याची गरज आहे हे पूर्णपणे माहिती असतानाही जुने, नवे, मुरलेले, सूज्ञ इत्यादी सर्व प्रकारचे मायबोलीकर केवळ खाज शमवण्यासाठी प्रतिसाद देतात, प्रतिसादांवर प्रतिसाद देतात. हे थांबवता आले तर अॅडमिनचं साफसफाईचं ९०% काम कमी होईल.
एखाद्या ऑफिसात रुळल्यावर जसं
एखाद्या ऑफिसात रुळल्यावर जसं तिथलं राजकारण दिसतं तसंच इथेही झालं असावं. >>> ह्म्म. खरंय. राजकारण, कटुता, टोकाची मते, मानापमान हे सगळंच असतं. तरीही मी इथे येते.....निखळ वातावरण कधीतरी परतून येईल ह्या आशेने.
हे सगळं वादग्रस्त पोस्टी,
हे सगळं वादग्रस्त पोस्टी, बाष्कळपणा मुख्यत्वानं कोणत्या विभागात / ग्रूपमध्ये चालू आहे? (गुलमोहर, चालू घडामोडी, वाहते बाफ वगैरे?)
मला जरी प्रत्यक्ष आयडी काढून
मला जरी प्रत्यक्ष आयडी काढून फक्त ४-५ वर्ष झाली असली तरी मी त्याही आधीपासून मायबोली वाचत आलोय, वाचतोय आणि वाचत राहीन. बेफिकीर यांच्याशी सहमत आहे. कुठल्याही गोष्टीत काही काळाने तोचतोचपणा येन किंवा नाविन्य नसणं वगैरे तक्रारी येणारच. आपणदेखील कितीवेळा रुटीन आयुष्य जगून कंटाळतोच कि मग आपण त्याला थोड वेगळ रूप देण्याचा यत्न करत असतो.
बाकि थोडी लेव्हल कमी होणे किंवा नवीन विषय वाचायला न मिळणे वगैरे होऊ शकत पण त्याला इलाज नाही. कारण तसं गुणात्मक पातळी वरून बघायचं झाल तर मला अग्निपंख म्हणत आहेत त्याही आधीची म्हणजे ८-१० वर्षांपूर्वी मायबोली जास्त ताजीतवानी वाटायची. त्यामुळे हे सगळ Relative आहे. तेव्हा लोड न घेत एन्जोय करा. बाकी डू आयडी चा issue गंभीर आहे कारण त्याला आवर नाही घातला तर मायबोली लवकरच सकाळ मुक्तपीठ च्या वाटेवर जाईल
बाकी हमरीतुमरीवर येणे आणि
बाकी हमरीतुमरीवर येणे आणि वैयक्तिक टीका करणे ह्या सगळ्याला कठोर नियम असय्च्लाच हवेत. नुकत्याच मी टाकलेल्या पानिपत वरच्या पोस्त वर मारामार्या चालू आहेत आणि त्या धाग्याचा मूळ उद्देशच बाजूला राहून गेलाय. असले आयडी मायबोली admin साहेबांनी कायमचे बंद करावेत. तसच मायबोलीवर नवीन आयडी काढताना काही personal माहिती देणंही महत्वाच कराव असा मला वाटत. हे कस आणि कितपत शक्य आहे ते मला माहित नाही पण वाटल म्हणून बोललो.
हे हिंदी/मराठी चॅनल वरच्या
हे हिंदी/मराठी चॅनल वरच्या सीरियल्स सारखे आहे. त्या बकवास सिरियल्स बंद पाडुन चांगल्या तयार व्हाव्या असे वाटत असेल तर आत्ताच्या सिरियल्स बघणे आधी बंद केले पाहीजे. त्या बघत तर रहायच्या आणि त्या बकवास आहेत म्हणुन नावे ठेवायची.
माबो वर तर जुने मेंबर च जास्त हीरिरीने जात, राजकारण ह्या वर कॉमेंट देत असतात.
मला ट्री व्ह्यु असलेली ,
मला ट्री व्ह्यु असलेली , १,३,७ दिवसांचे अपडेट्स दाखवणारी जुनी मायबोली (१४ वर्षापूर्वीची) प्रचंड आवडायची. >> अगदी
जुन्या मायबोली वर कोणीही उठसुट नविन धागा काढू शकत नव्हता, तरी ही जो बाफ सुरु असेल त्यावर डुआयडी आणि हमरीतुमरीची मानसिकता तेव्हा ही होतीच. नविन मायबोली सुरु झाल्या पासुन या गदारोळात लक्षणिय वाढ झाली. तरिही या सगळ्यातुन काही वाचनिय बाफ आपल्याला मायबोलीकडे खेचुन आणतातच. किंबहुना त्या टाकाऊ बाफच्या गर्दित काही चांगले वाचावयास मिळाले की जास्त आनंद होतो.
शेवटी काय... असेल तर चिखल, तर उगवेल कमळ.
'माबो'कर 'इन्गोरास्त्र'
'माबो'कर 'इन्गोरास्त्र' जास्तच वापरतात असा माझा समज झालाय - मी इथं नवी असल्याने तो चुकीचा असू शकतो.
काही लोकांनी शिफारस केल्याने 'माबो'वर आले - पण एक तर 'गप्पा ' धागेच दिसतात समोर. पानं उलगडत जायचा कंटाळा येतो आणि त्यामुळे कदाचित चांगले लेख वाचायचे राहून जातात.
इथं काही लिहायचाही प्रयत्न केला, पण त्याला मिळालेले 'इग्नोरास्त्र' पाहून वाचायचे, वाटल्यास प्रतिसाद द्यायचा - इतकंच सध्या चालू आहे. त्यात काही चांगलं वाचायला मिळतं - त्यामुळे एखादी चक्कर असते इथं अधुनमधून
जुन्या मायबोली वर कोणीही
जुन्या मायबोली वर कोणीही उठसुट नविन धागा काढू शकत नव्हता <<< इंद्रा, असे काही नव्हते वाटते. कोणीही नवीन बीबी चालू करू शकायचा बहुतेक.
एखाद्या ऑफिसात रुळल्यावर जसं
एखाद्या ऑफिसात रुळल्यावर जसं तिथलं राजकारण दिसतं तसंच इथेही झालं असावं.>>
उदाहरण आवडलं.
तसच मायबोलीवर नवीन आयडी काढताना काही personal माहिती देणंही महत्वाच कराव असा मला वाटत.>>
कदाचित भ्रमणध्वनी क्रमांक देण आवश्यक केलं (इतरांना दिसनार नाही परंतु सदस्यत्व घेण्यासाठी आवश्यक) तर काही प्रमाणात नियंत्रण येइल, पण ह्यातुन इतर बरेच प्रश्न तयार होतील. जसे की, भ्रमणध्वनी क्रमांक ही माझी वैयक्तिक बाब आहे मी तो का द्यावा? त्याचा गैरवापर होउ शकतो का? ई. ई.
असे काही नव्हते वाटते. >>
असे काही नव्हते वाटते. >> एखाद्या विषयाचा नविन बाफ सुरु करण्यासाठी अॅडमीनला विनंती करावी लागत असे. तसेच अॅडमिन दर मराठी महिन्या नुसार नविन गुलमोहर विभाग सुरु करत. ही लिंक बघ..
इंद्रा, हो हो. गुलमोहरात नवीन
इंद्रा, हो हो. गुलमोहरात नवीन महिना उघडण्यासाठी अॅडमिनांकडे जावे लागायचे.
पण इतर विभागांत जसे भाषा, तंत्रज्ञान, आहारशास्त्र आणि पाककृती या विभांगांत पानाच्या शेवटी Start New Thread असा पर्याय असायचा.
लमोहरात नवीन महिना
लमोहरात नवीन महिना उघडण्यासाठी अॅडमिनांकडे जावे लागायचे.
पण इतर विभागांत जसे भाषा, तंत्रज्ञान, आहारशास्त्र आणि पाककृती या विभांगांत पानाच्या शेवटी Start New Thread असा पर्याय असायचा. >> हे बरोबर आहे. बहुतेक ठिकआणी कुठलाही धागा उघडता येत असे.
मागे माबो लहान असताना आम्ही तीन moderators जवळ जवळ प्रत्येक बाफ वाचून त्यावर येणार्या आक्षेपार्ह पोस्ट उडवत असू, त्या कामात दिवसाचा एखाद तास तरी सहज जात असे. जसा जसा माबोच्या व्याप वाढू लागला तसा तसा हा वेळ व्य्स्त प्रमाणात वाढू लागला त्यानंतर हे बंद होऊन जोवर भडका उडत नाही तोवर गोष्टी सुरू राहू लागल्या. (मी दरम्यान moderator पदावरून बाहेर पडल्यामूळे सध्याच्या नेमक्या पॉलिसीची मला कल्पना नाही ) सध्या मला वाटते ह्याच स्वरुपात माबो सुरू राहील कारण अगदी प्रत्येक बाफावर येणारे प्रत्येक पोस्ट वाचणे हे निवाळ अशक्य आहे. त्यामूळे लोकांच्या तारतम्यावर जे आहे ते सुरू राहणार.
या सगळ्या गोंधळाला माबोची
या सगळ्या गोंधळाला माबोची प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे.
नविन आयडी क्रिएशन, इंडक्शन प्रोसेस मध्ये बर्याच त्रुटी आहेत. जोवर हि भोकं बुजवली जात नाहित, तोवर छुप्या आयडीज (उंदीर) मागुुन धागा पेटवणार्यांचा भ्याड उपद्रव इग्नोर करत बसावं लागणार आहे.
मूळात ज्या साईटवर आपण फुकटात
मूळात ज्या साईटवर आपण फुकटात जातो आणि जिथे वेळ घालवून आपल्याला आनंद मिळतो तिथे घाणेरडेपणा करू नये इतकी पोच काही लोकांना नसते.
त्यात एखाद्या गोष्टीवरचा एखादा प्रतिसाद पटला नाही म्हणजे तो प्रतिसाददाता आपला शत्रूच असे वाटून युद्ध सुरू होते.
प्रत्यक्ष जीवनात आपण आपल्यापेक्षा वेगळे धार्मिक/ राजकीय / सामाजिक विचार असलेल्यांशी अॅडजस्ट करत जगत असति किंवा विरोध व्यक्त केला तरी हमरीतुमरीवर येत नाही .
पण इथे आय डी, ड्यू आय डी च्या बुरख्याआड असल्याने सतत स्वतःचे म्हणणे रेटत रहायची सवय लागते.
मग विरुद्ध बाजूचा तेजोभंग करण्यासाठी काय वाट्टेल ते.
बरं साईटवाले तरी कुठे कुठे पुरे पडणार?
हा प्रकार फक्तं माबोवरच नाही तर इतर अनेक संस्थळावर होतो.
एका संस्थळाने तर वैतागून प्रत्येक लेख अन प्रत्येक प्रतिसाद वाचून मगच प्रकाशित करायचे धोरण ठेवले.
पण हे प्रकरण एवढे वैतागवाडी झाले की ती साईटच सोडून गेले कित्येक.
दुसरी एक साईट अश्याच प्रकारे त्रस्त होती तिथे एक संपादक मंडळ बनवले गेले.
सध्या त्यांचा कारभार बरा चाललाय.
पण मायबोली फार फार वास्ट आहे. प्रत्येक धागा वाचणे प्रॅक्टीकली कठिण आहे.
असे काही इथे फारसे चालणार नाही.
एक करता येईल. प्रत्येक ग्रूपकरता उदा. राजकारण, धार्मिक, कोतबो इ. एक किंवा दोन व्हॉलंटरी संपादक द्यावेत. (त्यांची निवड कशी करावी हा अॅडमिनचा हेडेक )
त्याना पोस्ट संपादन करायचे , उडवून लावायचे अधिकार द्यावेत.
याने संपादकांच्या विपूत लोड वाढेल पण प्रत्येक धाग्यावरचा फालतू पणा कमी होईल.
एखादं टाकाऊ (आपल्या दृष्टीने)
एखादं टाकाऊ (आपल्या दृष्टीने) लिखाण आपण अनुल्लेख करुन जाऊ शकतो. पण काही धाग्यांवर सो कॉल्ड उच्चशिक्षित लोक इतका तमाशा उभा करतात की ह्यांची सो कॉल्ड बुद्धीमत्ता एका बाजूला राहते आणि गलिच्छ हमरीतुमरी चालू होते. माझी खात्री आहे की ह्याचा बहुसंख्य मायबोलीकरांना वीट आला असणार. ह्यांच्या हुशारीचं कौतुक १%च उरतं आणि लक्षात राहतो तो ह्यांनी उठवलेला वाईट्ट भाषेतला वैयक्तिक पातळीवरचा गदारोळ. दुसरा किती काही बोलला तरी आपण काय शिकलेले आहोत, आपल्याला आपल्या भाषेवर/व्यक्त होण्यावर्/विचारांवर कंट्रोल ठेवला पाहिजे वगैरे गोष्टी ह्यांच्या डोक्यातून वाफ होऊन निघूनच जातात.
कुणी म्हणेल की ते धागे उघडू नका. काही धाग्यांच्या नावावरुनच कळतं की निव्वळ धुरळा उडवून टाईमपास करायला उघडलेले असतात. ते निश्चितच टाळता येतात. पण काही धागे हे खरंच चर्चा करण्याच्या उद्देशाने असतात पण तिथेही प्रत्येक ठिकाणी ह्या ठराविक आय.डींचे हेच सुरु होते. काय कुस्ती खेळायची ती एकमेकांच्या विपुत जाऊन खेळा ना! बाकिच्यांना कशाला सक्तीचा अनुल्लेख करायला लावता त्या चर्चेच्या धाग्यांचा? वाद पण सभ्यपणे घालता येतो हे कळतंच नाही का ह्यांना?
केश्विनी, सही लिहिलं आहेस.
केश्विनी, सही लिहिलं आहेस.
मूळात ज्या साईटवर आपण फुकटात जातो आणि जिथे वेळ घालवून आपल्याला आनंद मिळतो तिथे घाणेरडेपणा करू नये इतकी पोच काही लोकांना नसते.>>> साती, या वाक्यासाठी तुला एक गाव इनाम!!!
अश्विनी लाख पते की बात !!
अश्विनी लाख पते की बात !!
वरती जे मंजूडी ने लिहिले आहे त्याला 100% अनुमोदन
असामी, अश्विनी, साती
असामी, अश्विनी, साती अनुमोदन..>>
राज थोड्या त्रुटी आहेत, पण ड्युआय, फेक अकौंटसचा प्रश्न प्रचंड पैसा आणि रिसोर्सेस असणार्या फेसबुकलाही पुर्णपणे सोडवता आलेला नाही.
हॉलंटरी संपादक द्यावेत, हा सातीचा मुद्दा पटतो, पण तेव्हढा वेळ देणे सहज जमण्यासारखं नाही. रोटेशन वर कदाचित शक्य होईल.
<<< मला ट्री व्ह्यु असलेली ,
<<< मला ट्री व्ह्यु असलेली , १,३,७ दिवसांचे अपडेट्स दाखवणारी जुनी मायबोली (१४ वर्षापूर्वीची) प्रचंड आवडायची. >>१०००+
>>राज थोड्या त्रुटी आहेत, पण
>>राज थोड्या त्रुटी आहेत, पण ड्युआय, खरंच चर्चाफेक अकौंटसचा प्रश्न प्रचंड पैसा आणि रिसोर्सेस असणार्या फेसबुकलाही पुर्णपणे सोडवता आलेला नाही. <<
अहो, माबोच्याच महिला मंडळाने (संयुक्ता) हा प्रश्न फार पुर्विच सोडवलेला आहे; थोडा क्लिष्ट आहे पण इट वर्क्स...
रेटिंग देवून हा प्रश्न
रेटिंग देवून हा प्रश्न बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकेल ना?
असे रेटिंग प्रत्येक बीबी ला ठेवले/ तसेच प्रत्येक आयडी ला ठेवले तर गाळ खाली बसेल.
बीबी रेटिंग ठरवताना आयडी प्रमाणे वेटेज बदलता येईल. असं वेटेड रेटिंगची गाळणी प्रभावी ठरेल असं वाटतं.
अर्थात याने डू आय चं पेव फुटण्याची शक्याता आहेच, ती बंदीस्त वाढ/ संयुक्ता सारखी चाळण इ. करून थाबवता येईल का?
moderation हा उपाय असू*च* शकत नाही याच्याशी सहमत. काही ठराविक आयडी त्रास देऊ लागले तर त्यांना पोलीस करणे/ पूर्णपणे moderate करणे ज्यायोगे त्याच्या प्रतिसादाचा वेग मंदावेल इ.
काही काही वेळा सिन्सियर नवीन
काही काही वेळा सिन्सियर नवीन नवीन लेखक येतात सुद्धा . पदार्पणातच चांगले लिखाण करणारे . पण त्यांच्या लेखनाचा जुन्या/सुज्ञ /मुरलेल्या आयडीन कडून इतका धुव्वा उडवला जातो कि ते परत कधी लेखनाच्या भानगडीत पडताना दिसत नाहीत किव्वा काही काही नवे आयडी उसाहाच्या भरात इतके भरमसाट धागे उघडून ठेवतात कि त्यांची जुन्या माय्बोलीकारांकडून खिल्ली उडवली जाते . खिल्ली उडवण्याकरता वेगळे धागे हि उघडले जातात .हे सगळं थांबवायला हव. पण हे थांबवणार कोण ?
एखाद्या ऑफिसात रुळल्यावर जसं तिथलं राजकारण दिसतं तसंच इथेही झालं असावं.>> हे उदाहरण फारच आवडलं.
हम्म्म्म्म्म्म्म..... साती
हम्म्म्म्म्म्म्म.....
साती आणि आश्विनी के <<< +++ १००
माबो अजुनही आपली वाटते त्यामुळे अधुन मधुन चक्कर, इग्नोरणे आणि रोमणे .... क्वचित एखादा प्रतिसाद .... माझ्यासाठी सध्या हेच
मी आता वाचनमात्रही नाही. पन
मी आता वाचनमात्रही नाही. पन काल कुणी तरी लिंक दिली तर ती इथली निघाली. नेहमीचं दळण चालुच आहे. हा धागा वाचून काढला. हरवल्यासारखं होऊन प्रतिसाद द्यावासा वाटला. टाइप पण केला आणि लक्षात आलं की आता इथं अकाउण्ट पण नाही. मला खात्री आहे की हा प्रतिसाद दिल्याने ना कुणा माबोकराला फरक पडणार आहे, ना कुणी वाचलाच पाहीजे अशी अपेक्षा आहे, ना लगेच कुनी अॅक्सेप्ट करेल असं वाटतं. तसच प्रतिसाद लिहीला म्हनजे तो बरोबरच असेल असाही काही दावा नाही.
प्रश्न आहे तो इग्नोरास्त्राचा. ठीक आहे भांडणांवर इग्नोरास्त्र वापरावं. पण गुलमोहरा मध्ये क्रिएटीव्ह रायटिंग कुणी करत नाही अशी तक्रार पाहिली आणि लिहावंसं वाटलं
कशाला कुणी लिहायचं ? का लिहायचं ?
इथं प्रतिसाद द्यायला खूप पैसे पडतात असा आव आणला जातो. गटातटात प्रतिसाद दिले जातात. कुणी नाकारो किंवा चिडो. कंपूबाजी हे सत्य आहे. फक्त ते नाकारण्याचा इंटेलिजन्स ज्यांच्याकडे आहे त्यांनी (फक्त) आपन(च) तेव्हढे रॅथिंकर्स आहोत असा एक समज करून घेतलेला आहे. त्यामुळं इतरांना प्रतिसाद देणं म्हणजे ओबामाने वेळ काढून फिलिपिन्सच्या खेड्यातील दिवा बत्ती विभागातील क्लास फोर कर्मचा-याला समजावून सांगतो आहोत असा आव आनला जातो.
कित्येक शतकी प्रतिसाद मिळालेल्या कथा अतिशय सुमार दर्जाच्या आहेत. त्यांना प्रतिसाद मिळण्याचं कारन उघड आहे. त्याची मायबोलीवरील कारकीर्द किती दीर्घ आहे, किती गटग्जना हजेरी लावली, भोजनावळी झोडल्या यावर प्रतिसाद ठरतात. काही लेखिका तर संयुक्ताच्या पुढा-या आहेत म्हणून त्यांच्या लिखानावर देवळाबाहेर लागते तशी रांग असते.
मग एरव्ही हेच छान छान प्रतिसाद देणारे, लडिवाळ बोलणारे ड्युआयडीच्या सहाय्याने कुस्ती खेळतात. महिलांची अधिकृत संघटना असल्याने त्या पुरुषांविरुद्ध ट्रोलिंग करतात. महिलांचे प्रश्न हे अतिशय गंभीर आहेत. पण ज्या महिलांना हे प्रश्न नाहीत त्या भलत्याच गळे काढण्यात वस्ताद असतात. त्यांचं प्राधान्य प्रश्न सुटण्याकडे नसून अव्यवहार्य चर्चा करने, अतार्किक तत्वज्ञान पाजळने याकडे असतं. पुरुषांचे बुरसटलेले प्रतिसाद खोडू नका असं म्हणणं नाही माझं. पण ड्रेसकोड सारख्या थिकानी जेव्हां कुणी व्हवहार ध्यानात घेऊन लिहीतो तेव्हां त्याची ज्या भाषेत निर्भत्सना होते त्याला तोड नाही. बरं प्रतिवाद बिनतोड जरी असला तरी तो वितण्डा असल्याने समाधान होत नाही. एका भद्र महीलेने तर लिहीलं होतं बाईने बिनाकपड्याचं फिरलं तरी बलात्कार करण्याचं लायसन्स कसं मिळतं ? हा मुद्दा बिनतोड आहे, पण व्यवहारापासून हजारो प्रकाशवर्षे दूर नाही का ? नुसताच वाद असता तर ठीक. मण मधमाशा चावाव्यात तसे चिमटे काढून तेजोभंग केला जातो. अशा वेळी लोक ड्युआयडी वापरतील नाहीतर काय ? या अशा महिलांचे खूप जास्त लाड झालेत इथं.
बाकीचं काही लिहीत नाही. मायबोली सुधारावी हे काही माझं ध्येय नाही. माझं ते कामही नाही. इथल्या विद्वानांना काही सांगावं येव्हढी पात्रता नाही. फक्त बोटं दाखवताना तारतम्य पाळलं जावं येव्हढंच काय ते म्हणणं आहे.
कायमचूर्ण वापरत चला म्हणजे
कायमचूर्ण वापरत चला म्हणजे ब्रम्हांड आठवणार नाही.
Pages