मायबोलीचा सदस्य होउन आता पाच वर्ष होतील. सुरुवात झाली होती बर्मिंगहम विद्यापिठात प्रकल्पाच्या कामासाठी असताना, एकदा सहज काही मराठी वाचायला मिळतय का हे अंतरजालावर शोधताना मायबोलीची लिंक मिळाली (गुगलचे ऋण फेडने अशक्य आहे ). विनोदी कथा, रहस्यमय कथा वाचताना वेळ कसा जायचा हे कळायचदेखिल नाही. बेफि, कौतुक शिरोडकर, चाफ्फा (कवठीचाफा ?), विशाल कुलकर्णी आणखी बर्याच लेखक मंडळींची धमाल असायची माबोवर. हळुहळु माबोकरांच्या ओळखी व्हायला लागल्या. कट्ट्यावर रोज गप्पांची मैफिल जमवता आली.थोडी हिंमत करुन मी पण एक-दोन लेख लिहिले, थोडीफार जमलेली चित्र पोस्टली. एकंदरीत सब कुछ अच्छा चल रहा था..
पण काही दिवसांपासुन काहीतरी बिनसलय, विनोदी कथा फारशा कोणी लिहित नाही, इतर प्रकारच्या कथाही जास्त येत नाहित. गेले काही दिवस ईतर प्रकार मात्र खुप जोरात चालु आहेत. जात, धर्म, राजकारण यावरुन गटबाजी, जहरी टिका, भांडणं, भांडणात एकमेकांवर शिव्यांची बरसात. ह्याशिवाय अजुन एक म्हणजे माबोवर ड्युआयडींचा फारच सुळसुळाट झालेला आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट, बहुतेक ड्युआय येतात ते एकतर काहीतरी आचरट किंवा न पटणारं लिहिण्यासाठी किंवा एखाद्याची टर उडवण्यासाठी. काही नविन लेखक पदार्पणातच वादग्रस्त विषय (प्रचंड अशुद्ध लेखनासहित) घेउन येतात, आणि त्यावर तिखट प्रतिक्रिया आल्या की मग व्यक्तिगत टिका करणे, असभ्य भाषेचा वापर आणि नंतर अॅडमिनने येउन धागा बंद करणे इथपर्यंत हा प्रवास चालतो. काही धागा लेखकांना (नाव लिहिण्याची गरज नाही, माबोकर सुज्ञ आहेत, समजुन घेतिल) तर खरच मानसिक उपचारांची गरज आहे हे लिखान वाचुन लक्षात येतं (घातक वाक्य.. आता ह्यावर जबरी प्रतिक्रिया येणार)..
तर असो, माबो परत चांगल व्हावं अस वाटलं म्हणुन हा लेख.
तुम्हाला काय वाटत, होउ शकतं मायबोली पहिल्यासारखं चांगलं? काय कराव लागेल त्यासाठी? लेख सर्वांसाठी प्रसिद्ध करण्याअगोदर काहीतरी चाळणी असावी का?
टिप : कोणाही व्यक्तीविरुद्ध हा लेख नाही, भावना दुखावण्याचा उद्देश नाही, तसं वाटल्यास कळवा, धागा खोडून टाकता येइल.
बदललेली मायबोली
Submitted by अग्निपंख on 26 May, 2014 - 00:44
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हरवल्यासारखं होऊन प्रतिसाद
हरवल्यासारखं होऊन प्रतिसाद द्यावासा वाटला. टाइप पण केला आणि लक्षात आलं की आता इथं अकाउण्ट पण नाही.
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
>>>
बाकीच्या पोस्ट मधल्या काही गोष्टी पटल्या काही नाही पटल्या पण या वरील वाक्याचा विचार करतेय![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अकाऊंट नसताना लॉगिन न करता प्रतिसाद कसा टाईप केला असावा बरे?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
तुमची पोस्ट वाचून लोकांनाच
तुमची पोस्ट वाचून लोकांनाच ब्रह्मांड आठवले आता..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता ह्या ब्रम्हांडात
आता ह्या ब्रम्हांडात मायबोलीचे तारे* आपापली कक्षा सोडुन गरागरा भ्रमण करायला लागतील.
पूर्ण बीबीसाठी, बाप रे ! हू
पूर्ण बीबीसाठी, बाप रे ! हू केअर्स? लिव्ह इट .... पीपल रिअलि नीड टू गेट अ लाईफ![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
हरवल्यासारखं होऊन प्रतिसाद
हरवल्यासारखं होऊन प्रतिसाद द्यावासा वाटला. टाइप पण केला आणि लक्षात आलं की आता इथं अकाउण्ट पण नाही.>> हे कस शक्य आहे ह्याचा विचार करतोय.
असो, आपलं नाव 'ब्रह्मानन्द आठवले' असं दिसतय (सदस्य महिती मध्ये), पण ते इथे 'ब्रम्हांड आठवले' अस दिसतय, हे चुकुन झालय की असच लिहायचं होतं
हे कस शक्य आहे > उत्तर सोपं
हे कस शक्य आहे > उत्तर सोपं आहे. पण रॅशनल थिंकर्सच्या हक्कांवर गदा आणू नये असं मला वाटतं.
लेख आवडला.... बेफिकीर, विशाल,
लेख आवडला....
बेफिकीर, विशाल, कौतुक शिरोडकर, चाफ्फा यांच्या सर्व कथा.
आजही लॉगीन केल्यावर सर्वप्रथम गुलमोहर या धाग्यावर नवीन लेख आहे का ते शोधत असतो...
या सर्व लेखकांना नम्र विनंती....
"क्रुपया लिखान थांबवु नये"
या सगळ्या गोंधळाला माबोची
या सगळ्या गोंधळाला माबोची प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे. >> बेजबाबदार पोस्ट.
साती आणि आश्विनी के उत्तम
साती आणि आश्विनी के उत्तम प्रतिसाद, विषयाला पूर्णपणे धरून!!
अरबट चरबट किंवा फालतू
अरबट चरबट किंवा फालतू comments टाळण्यासाठी एक करता येईल. ज्याने धागा सुरु केलाय त्याला म्हणजे लेखकालाच आपल्या लेखावरील comment review करून publish करण्याचे हक्क द्यावेत (गुगल किंवा wordpress blogs वर हि सोय आहेच). यामुळे फालतूपणा कमी होईल, तसाच कुठली commnet / प्रतिसाद संपादित करायचा ह्याच स्वातंत्र्य लेखकाला राहील आणि सर्वात महत्वाचा म्हणजे adminला पण स्वत: प्रत्येक ठिकाणी लक्ष घालाव लागणार नाही. डु आय चा प्रोब्लेम अपोआप सोल्व्ह होइल. Admin साहेब बघा पटतंय का ?
अमित म - तुम्ही म्हणताय तसे
अमित म - तुम्ही म्हणताय तसे केले तर काही आयडी स्वतः अत्यंत बाष्कळ लिखाण करून त्यावर इतरांनी दिलेले चांगले प्रतिसाद काढून टाकतील.
इग्नोरास्त्र वापरणे हेच चांगले.
मायबोली आधीची मी पाहिलेली
मायबोली आधीची मी पाहिलेली नाही पण ऐकुन आहे , कालांतराने मायबोलीचा व्याप वाढला ,
आधी बर्याच गोष्टी अॅड्मीन स्वत: लक्ष घालुन सांभाळत होते , ( इन्द्रा म्हणतो त्याप्रमाणे )
पण मग माणस वाढली , आणि त्या अनुशंगाने येणारे परिणाम ....
सो हे चालायचच .... समाजात विचित्र लोक असतातच ....
पण मायबोली ही इतकी हवीहवीशी , छान , मस्त हवी अस वाटणारी एकाच मताची इतकी माणस या बाफवर पाहुन मस्त वाटल
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुजा यांना भरपूरसं
सुजा यांना भरपूरसं अनुमोदन.अगदी असच होतं.मनापासून म्हणतोय.बर्याचदा ते दिसून येतं.नवीन माणूस इथे लिहीणारा हिरमुसतो.त्याला जरा प्रोत्साहन मिळालं तर बरं सायबांनु...
जुन्या माबोकरांचं या मायबोलीवर प्रेम आहे तसच आमचं पण आहे. दोघांनी एकमेकांना सपोर्ट करायलाच हवा.
एखाद्या ऑफिसात रुळल्यावर जसं तिथलं राजकारण दिसतं तसंच इथेही झालं असावं.>>>+११
माबोला परत पहिले दिवस येऊ द्या गड्यांनो.गुलमोहर बारमाही फुलू दे. नवरसाधीत्,लेखनप्रकारप्रचूर काही येऊ द्या.आई-अंबाबाईला साकडंच घालतो.जुनी मायबोली परत दिसू दे.इथल्या लोकांना काही नवं गवसू दे.
विज्ञानदास, भिडे (मालक ),
विज्ञानदास, भिडे (मालक
), अमित M आपल्या पोस्टी पटल्या..
नविन लेखकांना सांभाळुन घ्यायला हवं अस मला तरी वाटतं (नाही आवडलं तर तशी प्रतिक्रिया द्यावी, पण ती खोचक/जहरी असु नये हे माझ मत)
अमित म्हणतायेत तो पर्याय चांगला वाटतो आहे.
तसाच कुठली commnet / प्रतिसाद
तसाच कुठली commnet / प्रतिसाद संपादित करायचा ह्याच स्वातंत्र्य लेखकाला राहील ................
.............
ही मा गणी यापुर्वी मी भास्कर या नावाच्या आय डीने केली होती. सध्या ते कुठे दिसत नाहीत.
हा उपाय योग्य नाही. त्यामुळे सोयिस्कर प्रतिसाद ठेवणे आणि अडचणीत आणणारे उडवणे हे लेखकाला सोपे जाइल. त्यातुन मायबिलीच्या खर्चाने स्वतः च्या विचारण्ची फुकट जाहिरात मात्र सुरु होइल
काही वर्षापुर्वी "स्लार्ती"
काही वर्षापुर्वी "स्लार्ती" नावाचा आय डी होता. त्याची पोस्ट्स, लेख अतिशय सुंदर..आणि काहीतरी विचार करायला लावणारे असे असायचे तो कुठे गायबच झाला. (सैया निकस गये..मै ना खडी थी नावाच्या शोभा गुर्टुंच्या गाण्याचा अर्थ त्याने लिहिला होता.. अप्रतिम..)
मधे कवठीचाफा, कौतुक शिरोडकर, विशाल आणि इतरही छान रहस्यकथा लिहायचे तेही आता दिसत नाहीत.
दर महिन्याला एक सर्वोत्तम कविता निवडायचे..तेही मला वाटते काही वाद्विवाद होउन बंद झाले (हीच कविता का निवडली इ.इ).
राफा म्हणुन कोणी होता..अतिशय सुंदर विनोदी लिहायचा/लिहितो.. तेही आता दिसत नाही.
मला वाटते निवडणुका आल्यामुळे लोक Distract झाले होते त्यामुळे असेल का?.. पण आता ते सारे संपलेय.. त्यामुळे आता परत चांगले वाचायला मिळेल आणि लोक वाचतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही (नसावी).
मला स्वतःला अॅडमिनने त्यांचा वेळ कंटेंट पाहुन आक्षेपार्ह भाग उडवण्यात वाया घालवावा असे वाटत नाही. काय लिहायचे कसे लिहायचे याचे तारतम्य ज्याचे त्याला हवे.
परागला अनुमोदन. नंदिनी -
परागला अनुमोदन.
नंदिनी - तुमच्यासारख्या लेखकांचे अजुन लेख / कथा वाचायला मिळावेत अशी बर्याच माबो करांची इच्छा असते.
त्याच वेळी गुलमोहरात हल्ली बरेच लोक अक्षरशः मनात येईल ते आणि कसही लिहितात. त्यांना निराश करायचा हेतू नाही पण शुद्धलेखन तर सोडाच पण परिच्छेद, अवतरण चिन्हांचा वापरही करत नाहीत हो लोक. असलं काही वाचताना डोकं दुखतं आणि मुळ लेख तर बाजुलाच रहातो. प्रतिसादात त्या बद्दल सुचना केली तर मंडळी आपल्यावर इग्नोरास्त्र वापरतात आणि पुढचा लेख तसाच "पाडतात"! त्यामुळे हल्ली गुलमोहरात जायचा कंटाळा येतो. ही परिस्थिती कशी सुधारता येईल?
मनस्मि१८ - अगदी अगदी.
मनस्मि१८ - अगदी अगदी.
कवठीचाफा, कौतुक, विशाल, धुंद रवी ही सर्व मंडळी कुठे गायब झाली आहेत?
कौतुक आणि धुंद रवी..
कौतुक आणि धुंद रवी.. टिव्हीसाठी लिहितात आता.. कवठीचाफा पण बहुतेक..
हल्लीचं मला फारसं माहीत नाही.
हल्लीचं मला फारसं माहीत नाही. पण सहज चाळलं तर नवीन चांगले लिहीणारे दिसले. एक तुमचा अभिषेक हा आधी नसणारा आयडी ब-यापैकी लिहीतोय. पण अशांचे उल्लेख होणार नाहीत. जे सोडून गेलेत ते अव्वल दर्जाचेच होते. पण त्यांच्या नावाने गळे काढण्याचं कारण म्हणजे तो एक क्लास होता आणि आता अशुद्ध लिहीणारा असे दोनच क्लास आहेत हे दाखवण्याचा उद्देश असू शकतो. सर्वांच्या बाबतीत नाही, पण काही असे जळके, कुजके, सडके प्रतिसाद देण्यात अगदी सुगरण आहेत. पत्ताही लागणार नाही जेवणात मिठाऐवजी भलतंच काही टाकलंय ते.
मुळात आपल्या गोटात आहे म्हणून सुमार दर्जाच्या लेखांना उचलून धरणे आणि ब-यापैकी लिहीणा-यांना अधिक चांगलं लिहीण्यासाठी प्रोत्साहन देणे हे होणं शक्य नाही. त्यासाठी विशाल मन हवं. मी जोपर्यंत होतो तोपर्यंत अनेकांनी अनुल्लेखामुळे लिखाण थांबवलं. अनुल्लेखासाठी आपल्या गप्पांच्या धाग्याचा मेंबर नाही इथपासून ते एखाद्या चर्चेत आपलं मत खोडून काढलं यापैकी काहीही कारण चालतं. एका ठिकाणी तर वाचलं होतं वाटलं नव्हतं हा या पक्षाचा निघेल , लिखाणावरून कुणाचा अदमास लागणं कठीन अशी कमेण्ट होती. ( ज्यांची होती त्यांनी हे उदाहरण म्हणून हलकेच घ्यावे). पार्ले बिर्ले सारखे बाफ म्हणजे अनिल आणि मुकेशचे बाबा आमच्याकडेच आधी कामाला होते अशा थाटाचे लोक ! जास्त नादी लागण्यात अर्थ नाही. तिथं खिडक्या लावून आणि दार उघडं ठेवून बिनदिक्कतपणे सर्वांचा उद्धार चालत असतो.
ड्युआयडी बद्दल तर काय बोलायचं. एक चांगले ड्युआयडी आणि दुसरे वाईट. आपल्या बाजूला असतात ते चांगले आणि विरुद्ध बाजूला असतात ते अर्थातच वाईट. यापेक्षा आणखी काय बोलणार ? फक्त काही ड्युआयड्यांना इतर ड्युआयचीचे मालक कोण याची अधिकृत माहीती मिळण्याचा अॅडव्हाण्टेज असतो.
>>मनीष | 27 May, 2014 -
>>मनीष | 27 May, 2014 - 04:04![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या सगळ्या गोंधळाला माबोची प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे. >> बेजबाबदार पोस्ट. <<
प्रुव इट. आय विल्बी हॅपी टु बी राँग.
<<अनुल्लेखासाठी आपल्या
<<अनुल्लेखासाठी आपल्या गप्पांच्या धाग्याचा मेंबर नाही इथपासून ते एखाद्या चर्चेत आपलं मत खोडून काढलं यापैकी काहीही कारण चालतं.. +१११११
अनुल्लेखामुळे कितीतरी चांगल्या लेखकांनी लिखाण थांबवलं असेल . नवीन लिहिणार्यांना काय पाहिजे असत?कौतुकाची थाप. चांगल लिहील असेल तर कौतुक. बेताच लिहील असेल तर जरा संयमित भाषेत नापसंती. तर त्यांना हुरूप येणार ना? पण इथे तर आपल्या गोटातल्या लोकांना अनुमोदानावर अनुमोदन आणि इतरांवर मात्र इग्नोरास्त्र किव्वा एकदम हल्लाबोल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला काही असं वाटत नाही.
मला काही असं वाटत नाही. मायबोलीवर चांगल्या लेखनाला कायमच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जे चांगले लिहितात तेही पहिल्यांदा 'अनोळखी'च होते इतर आयडींसाठी. चांगलं लेखन असेल तर कंपूबाजी वगैरेचा काहीही फरक पडत नाही. हा माझा स्वानुभव आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
थोडीशी टिंगलटवाळी होऊ शकते क्वचित पण मुद्दाम आकस धरून एखाद्या नव्या लेखकाला नाउमेद करणं वगैरे क्वचित होतं. खरंतर कंपूबाजी, हिशोब चुकते करणं हे जुन्या आयडीजच्या बाबतच जास्त होतं
आणि माबोचा वाचक इतका वेगवेगळ्या प्रकारचा आहे, की बहुतेक लेखनाला कुणीतरी अॅप्रिसिएट करणारे भेटतातच. फक्त १५-२० लोकच इकडून तिकडून प्रतिक्रिया देतात असं अजिबातच नाही.
आय बेग टू डिफर @ वरदा maybe,
आय बेग टू डिफर @ वरदा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
maybe, not.
>> मुद्दाम आकस धरून एखाद्या नव्या लेखकाला नाउमेद करणं वगैरे क्वचित होतं. खरंतर कंपूबाजी, हिशोब चुकते करणं हे जुन्या आयडीजच्या बाबतच जास्त होतं <<
क्वचित का होईना, होतंच होतं. अन नक्कीच होतं. अगदी नेम धरुन डूख धरल्यासारखे वागणारे ठाऊक आहेत.
जौद्या.
उदाहरण द्या, इब्लिस. विशेषतः
उदाहरण द्या, इब्लिस. विशेषतः गुलमोहोर-ललित लेखनामधले. जे नेहेमी लिहितात, प्रतिसाद मिळवतात त्यांना मिळालेले सुरुवातीचे प्रतिसाद हे निश्चितपणे कुठल्याही ओळखीशिवाय मिळाले होते. जर न आवडलेले दहाजण असतील तर आवडलेलेही दहा जण होते. चिनूक्स, मामी, दाद, सूरमयी (आधीची बासुरी), स्वप्ना_राज, धुंदरवी, चौकस, मुंगेरीलाल, बेफिकीर, रसप, अगदी मंदार जोशी सुद्धा, या सगळ्यांच्या लेखनाला लोकांनी ओळखीचे म्हणून दाद दिली नाही तर लेखन आवडलं म्हणून दाद दिली. अगदी तुम्ही सुद्धा माझ्या लेखनाला कायम सकारात्मक प्रतिसाद दिले आहेत. ते माझ्याशी मैत्री आहे किंवा आपण एका कंपूतले आहोत म्हणून निश्चितच नाही.
तुम्हीच म्हणताय तसं क्वचित होतं..
पण वरती <<अनुल्लेखामुळे कितीतरी चांगल्या लेखकांनी लिखाण थांबवलं असेल>> असं वाक्य आलंय ते कुठल्या प्रकाराने जस्टिफाय करता येईल?
त.टी. - वरची यादी आठवली तशी आहे. याव्यतिरिक्त लोकप्रिय किंवा/आणि उत्तम लिखाण करणारे अनेक आयडीज आहेत. त्यांची नावे इथे नसली तरी आपल्याला आठवतील तशी वाचताना यादीत भर घालून घेणे. कळावे. कृपया. धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण वरती <<अनुल्लेखामुळे
पण वरती <<अनुल्लेखामुळे कितीतरी चांगल्या लेखकांनी लिखाण थांबवलं असेल>> असं वाक्य आलंय
वरदा हे वाक्य मी लिहिलंय . आणि मी अस झाल हि असेल अस म्हटलंय. अस झालेलंच आहे असा दावा केलेला नाही.
मायबोलीवर अक्षरश सेकंदा सेकंदाला वेगवेगळ्या धाग्यांवर इतके प्रतिसाद पडत असतात कि ते लिखाण दिवसभर पाठी पाठी जात जात एकदम १२ व्या पानालाही पाठी जात असेल . त्यातून ज्यांना वेळ आहे /अगदी शेवटच्या पानापर्यंत जाण्याचा पेशन्स आहे ते अगदी शेवटच्या पानापर्यंत जातही असतील नाही अस नाही किव्वा माझे जसे पहिल्या चार पाच पानापर्यंत धागे वाचले जातात (वेळेअभावी) तसेच बर्याच जणांचं जर होत असेल तर ते चांगल लेखन प्रतिसादा अभावी ( म्हणजेच अनुल्लेख ) पार दुसर्या दिवशी तर बादच होत असेल . कोणीतरी शोधून खणून काढल तरच ते वाचाल जाणार नाही तर नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Reddit वर जसं thumbs up देऊन
Reddit वर जसं thumbs up देऊन धागा वर राहतो असं काहीसं करता येईल आणि जसं फेसबुक वर recent stories Vs top stories असं sort करता येतं तशी व्यवस्था करता येईल. ज्यांना ज्या निकषावर धागे बघायचे आहेत त्यांना तसे बघता येतील!
जर मायबोली paid service केल्याने व्यवस्थापकीय नियंत्रण चांगल्या रीतीने वाढणार असेल तर वाजवी किंमत मोजायला अनेक लोकं तयार होतील याची खात्री वाटते.
मूळात ज्या साईटवर आपण फुकटात
मूळात ज्या साईटवर आपण फुकटात जातो आणि जिथे वेळ घालवून आपल्याला आनंद मिळतो तिथे घाणेरडेपणा करू नये इतकी पोच काही लोकांना नसते.
- साती
>>>>
हा हा हा, हसायलाच आले हे वाक्य वाचून पटकन, अर्थात सहमतीचे हास्य.
पण लगोलग एक चार दिवसांपूर्वीचाच संदर्भ सुद्धा आठवला.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
ऑफिसमधील एक नवीन कलीग, म्हणजे ३-४ महिन्यांपूर्वी जॉईन झालेली तिने मला लंचब्रेकमध्ये माबोवर भटकताना पाहिले आणि उत्सुकतेने काय असते विचारले. मी इतर काही सांगायच्या आधी मोठेपणाने इथे मी माझे लेख वगैरे टाकतो असे सांगितले, तर मग (अर्थातच) तिचे पहिलेच वाक्य - अरे वा तू लिहितोस, आणि पाठोपाठ दुसरे वाक्य - मग इथे ते प्रकाशित करायचे पैसे वगैरे द्यावे लागतात का
मग मी तिला माबोचा भलामोठा पसारा दाखवला आणि ती थक्क कम अवाक झाली. आज दुपारी पाहिले तर तिच्याकडे फारसे काम नसताना ती स्वताहून माबोवर चक्कर मारताना दिसली. म्हणजे काहीतरी आपल्या कामाचे वा आवडीचे तिला ईथे सापडले हे नक्की.
असो, अश्यांना पहिल्याच फटक्यात इंप्रेस करावे हि आपली सर्वांचीच जबाबदारी आहे असे मला वाटते, किंबहुना असा एखादा भटका मुसाफिर येऊन इथून खाली हात परत जाणे हा प्रत्येक सक्रिय माबोकराला आपल्या इज्जतचा सवाल वाटायला हवा.
मायबोलीचा चान्गले लेखक मिळाले
मायबोलीचा चान्गले लेखक मिळाले तरी चान्गला वाचकवर्ग मिळालेला नाहि. भरपुर वाचक असले तरी फार थोडेच वाचक विचारपुर्वक प्रतिसाद देताना दिसतात. बाकीचे टीन्गलटवाळी करतात नाहितर 'इग्नोर करा' अस म्हणुन स्वताच प्रतिसाद देत राहतात.
एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट,
एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट, बहुतेक ड्युआय येतात ते एकतर काहीतरी आचरट किंवा न पटणारं लिहिण्यासाठी किंवा एखाद्याची टर उडवण्यासाठी >>>>>>>> एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना स्वत:कडे चार बोट असतात हे विसरलात. लेखन चौकटीबाहेरचं असल, परंपरेला छेद देणारं असल,चारचौघात बोललं न जाणारं असल,मनाला टोचेल असं असल किव्वा न पटणारं असल तरीहि ते सत्य असत आणि विचार मान्डन्याच एक माध्यम असत. इथे तर इतरान्ना सुद्धा प्रतिकिया देता येते. प्रतिकिया देणारेच आचरट आणि टर उडवणारे असतील तर 'जशास तसे होणारच'.
Pages