बदललेली मायबोली

Submitted by अग्निपंख on 26 May, 2014 - 00:44

मायबोलीचा सदस्य होउन आता पाच वर्ष होतील. सुरुवात झाली होती बर्मिंगहम विद्यापिठात प्रकल्पाच्या कामासाठी असताना, एकदा सहज काही मराठी वाचायला मिळतय का हे अंतरजालावर शोधताना मायबोलीची लिंक मिळाली (गुगलचे ऋण फेडने अशक्य आहे Wink ). विनोदी कथा, रहस्यमय कथा वाचताना वेळ कसा जायचा हे कळायचदेखिल नाही. बेफि, कौतुक शिरोडकर, चाफ्फा (कवठीचाफा ?), विशाल कुलकर्णी आणखी बर्‍याच लेखक मंडळींची धमाल असायची माबोवर. हळुहळु माबोकरांच्या ओळखी व्हायला लागल्या. कट्ट्यावर रोज गप्पांची मैफिल जमवता आली.थोडी हिंमत करुन मी पण एक-दोन लेख लिहिले, थोडीफार जमलेली चित्र पोस्टली. एकंदरीत सब कुछ अच्छा चल रहा था..
पण काही दिवसांपासुन काहीतरी बिनसलय, विनोदी कथा फारशा कोणी लिहित नाही, इतर प्रकारच्या कथाही जास्त येत नाहित. गेले काही दिवस ईतर प्रकार मात्र खुप जोरात चालु आहेत. जात, धर्म, राजकारण यावरुन गटबाजी, जहरी टिका, भांडणं, भांडणात एकमेकांवर शिव्यांची बरसात. ह्याशिवाय अजुन एक म्हणजे माबोवर ड्युआयडींचा फारच सुळसुळाट झालेला आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट, बहुतेक ड्युआय येतात ते एकतर काहीतरी आचरट किंवा न पटणारं लिहिण्यासाठी किंवा एखाद्याची टर उडवण्यासाठी. काही नविन लेखक पदार्पणातच वादग्रस्त विषय (प्रचंड अशुद्ध लेखनासहित) घेउन येतात, आणि त्यावर तिखट प्रतिक्रिया आल्या की मग व्यक्तिगत टिका करणे, असभ्य भाषेचा वापर आणि नंतर अ‍ॅडमिनने येउन धागा बंद करणे इथपर्यंत हा प्रवास चालतो. काही धागा लेखकांना (नाव लिहिण्याची गरज नाही, माबोकर सुज्ञ आहेत, समजुन घेतिल) तर खरच मानसिक उपचारांची गरज आहे हे लिखान वाचुन लक्षात येतं (घातक वाक्य.. आता ह्यावर जबरी प्रतिक्रिया येणार)..
तर असो, माबो परत चांगल व्हावं अस वाटलं म्हणुन हा लेख.
तुम्हाला काय वाटत, होउ शकतं मायबोली पहिल्यासारखं चांगलं? काय कराव लागेल त्यासाठी? लेख सर्वांसाठी प्रसिद्ध करण्याअगोदर काहीतरी चाळणी असावी का?
टिप : कोणाही व्यक्तीविरुद्ध हा लेख नाही, भावना दुखावण्याचा उद्देश नाही, तसं वाटल्यास कळवा, धागा खोडून टाकता येइल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असं सगळ्यांनाच सारखं दर काही वर्षांनी वाटत असतं.. Happy

मला ट्री व्ह्यु असलेली , १,३,७ दिवसांचे अपडेट्स दाखवणारी जुनी मायबोली (१४ वर्षापूर्वीची) प्रचंड आवडायची.
बाकी, ड्यु आय, बिन्डोक चर्चा, पालथे घडे अनादी काळापासून आहेचेत. दुर्लक्ष करणं हाच एकमेव उपाय. कारण त्यांचा हेतू चर्चा करणे , उत्तरं मिळावान्म नसून अटेन्शन सिकिंग एव्हढाच असतो.

<<तुम्हाला काय वाटत, होउ शकतं मायबोली पहिल्यासारखं चांगलं? काय कराव लागेल त्यासाठी? >> माझ्या मते आपण काहीच करू शकत नाही . फक्त अशा धाग्यांकडे दुर्लक्ष करू शकतो Happy

छान लिहिले आहे.

या अनुषंगाने लेखकानी काय नवे धागे काढायला हवेत, काय विषयांवर लेखन व्हायला हवे याचा विचार होणे फार आवश्यक आहे. म्हणजे रटाळपणा, पुनरावृत्ती टळेल,

छान

हिवाळा उन्हाळा पावसाळा परत हिवाळा असं चालू असावं मायबोलीवर. निसर्गनियम. त्याला आवर घालणे इहलोकीच्या कोणास शक्य नसावे.

दुर्लक्ष करणं हाच एकमेव उपाय>>
फक्त अशा धाग्यांकडे दुर्लक्ष करू शकतो>>
एकंदरीत आत्ता पर्यंत अंमलात आनलेलं 'ईग्नोरास्त्र'च प्रभावी आहे तर.. Wink

अग्निपंख....१०० % सहमत , अगदी मनातल बोललात .....मी पण अ‍ॅड्मीन ना ईमेल धाडण्याच्या बेतात होते ...की हे काय चाललय इथे ..... 'ईग्नोरास्त्र' हा पर्याय असु शकतो का ? काही तरी केलच पाहिजे सगळ्यानी मिळुन हे नक्की ...... कुणी तरी न मो यायलाच पाहिजे इथे ......: अर्थात बस्के , गजानन म्ह्णतात ते पण असेल ....पण वाईट वाटते , चिडचिड होते हे नक्की कारण ही आपली मा बो आहे ना

अग्निपंख... इग्नोरास्त्र हे माबोवरचे सगळ्यात प्रभावी अस्त्र आहे.. आणि त्याच वापर बहुतेक जण व्यवस्थितपणे करतातच...

>>>>> मला ट्री व्ह्यु असलेली , १,३,७ दिवसांचे अपडेट्स दाखवणारी जुनी मायबोली (१४ वर्षापूर्वीची) प्रचंड आवडायची. <<<<<< बस्के, सहमत. मी आजही तशा ट्री व्ह्युची मागणी करतो आहे (कुणी लक्षच देत नाही तो भाग विरळा..)

मला ट्री व्ह्यु असलेली , १,३,७ दिवसांचे अपडेट्स दाखवणारी जुनी मायबोली (१४ वर्षापूर्वीची) प्रचंड आवडायची. >>
लिंबु, बस्के तुमच्यापैकी कोणाकडे ह्याचं पडदाचित्र (screenpic) असल्यास इथे पोस्टाल का? मी पाहिलेला नाही तो ट्री व्ह्यु, उत्सुकता आहे कसा होता ह्याबद्दल.

>>>> अग्निपंख... इग्नोरास्त्र हे माबोवरचे सगळ्यात प्रभावी अस्त्र आहे.. आणि त्याच वापर बहुतेक जण व्यवस्थितपणे करतातच... <<<<
हिम्स, आय अ‍ॅम डाऊट फुल्ल!

>>>> मला वाटलंच होतं लिंबूभाऊ इथे येऊन तसं लिहिणार <<<<< LOL
पण माझी नन्तरची पोस्ट मात्र किमान साताठ वर्षे जुन्या मेम्बरान्नाच अपेक्षित असणार! Wink

इग्नोरास्त्र हे माबोवरचे सगळ्यात प्रभावी अस्त्र आहे.. >>>> मान्य आहे पण किती वेळ दुर्लक्ष करणार हा पण मुद्दा असेलच ना. खुप सारे धागे आहेत वेगवेगळ्या विषयावरचे आणी तेथे तेच तेच ड्यु-आयडी येऊन त्याच त्याच फाल्तु कारणांवरुन भांडणे उकरुन काढतात. नको नको होतं अश्याने. मायबोलीवर यावेसेच वाटत नाही आजकाल.

मायबोलीवर यावेसेच वाटत नाही आजकाल.
>>>+१.
मला माबोवर येऊन आत्ताशी २ वर्ष झालेत तर असं.... तुम्ही लोकं तर फार पुर्वी पासुन पहाताय माबो. तुम्हाला किती वैताग येत असेल Uhoh

लिंबु, बस्के तुमच्यापैकी कोणाकडे ह्याचं पडदाचित्र (screenpic) असल्यास इथे पोस्टाल का? मी पाहिलेला नाही तो ट्री व्ह्यु, उत्सुकता आहे कसा होता ह्याबद्दल. >> +१

समयोचित धागा! धन्यवाद!!

दुर्लक्ष करायचं म्हणजे किती आणि कुठवर करायचं त्यालाही काही मर्यादा असतीलच नां? नको असलेले धागे मुळात उघडूच नयेत हा साधा उपाय. पण जिथे तिथे, जेव्हा पहावं तेव्हा ह्या अश्या 'इतर प्रकारांचाच' धुमाकूळ दिसला की काय करायचं?? कदाचित निवडणुकांमुळे सध्या इथे जास्तीच तापलंय असं समजावं, तर आता मुख्य समारंभ उरकला तरी इथले कवित्व काही संपत नाहिये. कोणाला किती खालची पातळी गाठता येते ह्याचीच चढाओढ.....

ओळखीच्यांना कौतुकाने माबो / एखादा धागा वाचायला सुचवणे ही नकोच वाटते आताशा……

शेवटी 'आपल्यापुरतं ठरवायचं इथे कुठे आणि कसं वावरायचं' हे आहेच. पण माबो विषयीच्या आपलेपणामुळे वाईट वाटतं हे खरंच.

असो! Happy

बस्के, गजानन म्हणतात तसं त्या-त्या वेळी अशा पोटतिडीकीने लिहिलेल्या पोस्ट येणं हे ही होतच असेल! लहान- मोठ्या /खालच्या- वरच्या वेगवेगळ्या पातळ्या गाठल्या जातच असतील. शेवटी अशी नदीसारखी प्रवाही आणि सर्वसमावेशक आहे म्हणूनच मायबोली गाळ पचवून, दगडधोंडे वगळून उत्तरोत्तर वाढतेच आहे!

बस्के +१,

मीही हल्ली माबोवर येते, एक नजर फिरवते, राजकारण, फालतू धागे, सुळसुळाटी घाऊक कविता, इ. सगळं वगळून काही दिसलंच बरं तर बघते नाहीतर पुढची दोन-तीन पानं बघायचाही उत्साह राहात नाही. कदाचित पूर्वीसारखीच हीही फेज संपेल अशी आशा आहे. पण नेहेमीचेच यशस्वी काही आयडी आणि पूर्वी असलेल्या ड्युआयडीपैकीच अनेक जण परत परत येऊन भांडणं करतात, भडकावू प्रतिसाद देतात त्याचाही कंटाळा आलाय. अशा समस्त लोकांना चिक्कार वेळ असावा नेटवर एवढं लिहायला.
दुर्लक्ष करायलाही काही मर्यादा असते ती माझ्यासाठीही संपत आली आहे जवळपास. रोजच्या कामांमधून विरंगुळा म्हणून इथे यायचं पण हीच दळणं चालू असतील तर मग निदान काही काळापुरता माबोसंन्यास घ्यावा असं वाटतं. एका वाचकाने माबोवर न आल्याने काहीच फरक पडत नाही अर्थातच. पण आपल्या डोक्याला शांती!

जुने व नवे ह्यांच्या विचारांमध्ये एक गॅप आढळत आहे. जुन्यांच्या मते असे विचारमंथन आधी होऊन गेलेले आहे व त्यामुळे त्यांचे विचार आता एक विशिष्ट स्वरूप धारण करून आहेत. हे विचार म्हणजे अनुल्लेख करणे, वाचनमात्र उरणे, आवडीचे विषय वाचणे, शक्य झाल्यास त्यात सहभागी होणे व ह्यापलीकडे फार काही अपेक्षा न बाळगणे! तुलनेने जे नवीन आहेत त्यांना ह्या धाग्यावर उत्साहाने लिहावेसे वाटत आहे, आपल्या अपेक्षा व्यक्त कराव्याश्या वाटत आहेत, मायबोलीवर काय असावे / काय नसावे ह्यावर विचार नोंदवावेसे वाटत आहे. प्रदीर्घकाळ मायबोलीवर असणे व गेल्या चार पाच वर्षांपासूनच येथे येत असणे ह्यातील विचारांचा हा फरक ऑब्व्हियसली पटण्यासारखा आहे.

पण मला असेही वाटते की मायबोलीला फक्त वाचनमात्र समजणार्‍यांनी (मेबी, आधीपासूनच किंवा आजकाल) स्वतः भरपूर लेखनही करावे. ड्यु आय डी हा प्रश्न मुळीच घनघोर वाटत नाही, अनुल्लेखाने तो नष्ट होतोच होतो. दैनंदिन आयुष्यातील अनेक बर्‍यावाईट बाबींवर सर्वांकडून भरपूर लेखन झाल्यास सर्वांना मजा येऊ शकेल असे मनात आले.

चु भु द्या घ्या

ड्यु आय डी हा प्रश्न मुळीच घनघोर वाटत नाही, अनुल्लेखाने तो नष्ट होतोच होतो. >>> माफ करा बेफीजी, पण या वाक्याशी मी (तरी) सहमत नाहीये.

बरोबर दोन महिन्यांनी मायबोलीवर लॉगिन केल्यावर गुलमोहर ग्रूपची अवस्था बघून वाईट वाटले. मायबोलीवर एकंदरीतच क्रीएटीव्ह रायटींगला फार वाईट दिवस आले आहेत असा निष्कर्ष काढून मी तरी मोकळी झाली आहे.

बाकी, राजकारण वगैरे माझे आवडते विषय असले तरी माबोवर या संदर्भात अधून मधून लिहत असते तिथेही चाललेला बाष्कळपणा अनुल्लेखानेच उडवता येऊ शकतो त्याहून दुसरे प्रभावी अस्त्र नाही.

बाकी, राजकारण वगैरे माझे आवडते विषय असले तरी माबोवर या संदर्भात अधून मधून लिहत असते तिथेही चाललेला बाष्कळपणा अनुल्लेखानेच उडवता येऊ शकतो त्याहून दुसरे प्रभावी अस्त्र नाही.>>> नंदिनी, सहमती दर्शवावी लागतेय याचेच वाईट वाटतेय Sad

शिर्षकात बदल करावा लागेल बदललेली ऐवजी 'बदलेली' झालंय.

लेख अजून वाचला नाही. वाचून अभिप्राय देईनच. Happy

Pages