Submitted by तृप्ती आवटी on 22 May, 2014 - 17:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ मुळा, दीड टे स्पून मोहरी, मीठ, साखर, १ टे स्पून लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर
क्रमवार पाककृती:
मुळा किसून त्यात मोहरीखेरीज इतर साहित्य नीट मिसळून घ्यावे. मोहरीची खलबत्यात अथवा मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यावी. खलबत्ता वापरल्यास पूड वाटीत घेऊन चमच्याने भरपूर घोटून घ्यावी. मिक्सर वापरल्यास मिक्सरमध्येच थोडी जास्त वेळ फिरवावी. घोटलेली मोहरीची पूड मुळ्याच्या मिश्रणात घालून नीट हलवून घ्यावे. कोशिंबीर तयार आहे.
वाढणी/प्रमाण:
एक घास खाऊन धारातिर्थी न पडलेले सर्व नग आणखी एक-एक घास खाऊ शकतात
अधिक टिपा:
बचेंगे तो और भी लडेंगे |
माहितीचा स्रोत:
मुळे
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माहितीचा स्त्रोत खतरनाक. मुळा
माहितीचा स्त्रोत खतरनाक. मुळा फारसा आवडत नाही. त्यामुळे पदार्थ करून पाहण्याची शक्यता नाही
पास... मुळ्याच्या वासानेच
पास... मुळ्याच्या वासानेच धारातिर्थी पडायला होतं. खाणं दूरच.
(मुळ्यांनी 'आमची कोशिंबीर अशी करायची' असं सांगून रेसिपी दिली का? )
वाढणी, टिपा.. मुळा सॅलड
वाढणी, टिपा..
मुळा सॅलड म्हणुन मुळीच झेपत नाही.. बघुयात..
मस्त! लिंबाच्या रसाने स्वाद
मस्त! लिंबाच्या रसाने स्वाद खुलतो मुळ्याचा. मोहरी घालून पाहीन आता.
माझ्या एक काकी मुळ्याचे चौकोनी तुकडे करून, पाण्यात घालून एक उकळी आणत, मग ते अलगद काढून लिंबाचा रस व गार केलेली फोडणी घालत वरनं.
मला आवडतो मुळा....करुन बघु
मला आवडतो मुळा....करुन बघु
मोहरीची पूड पाणी घालून
मोहरीची पूड पाणी घालून घोटायची का? की कोरडीच घोटायची?
करुन बघण्यात येईल. ह्यात
करुन बघण्यात येईल. ह्यात दही+खोबरं+मिरची घातली तर काकडीच्या नाकार्ड्या सारखं मुळ्याचं नाकार्ड म्हणून खपेल.
मलाही आवडतो मुळा
यात लिंबाऐवजी अधमुरे दही
यात लिंबाऐवजी अधमुरे दही उत्तम लागते.
मुळ्याचे फायदे
मुळ्याचे लसूण घातलेले स्टफ पराठे ही उत्तम होतात.
उग्र वासाची हळूहळू सवय होते (विशेषत: साबा साबू नेहमी खात असल्यास व एकत्र रहात असल्यास काय बिषाद तुमची सवय न करून घ्यायची!!)
हायला दोन दोन पंजंट गोष्टी
हायला दोन दोन पंजंट गोष्टी मिळून किती झिणझिणेल!!!
पण आपल्याला ब्वा आवडतो मुळा. त्यामुळे करून बघणेत येईल.
गाता गळा आणि शिजता मुळा म्हणतात ते काय उगीच नाही.
मामी शिजता मुळा कुठून
मामी
शिजता मुळा कुठून काढलं?
मंजूडी, या दोन्ही गोष्टींमुळे
मंजूडी, या दोन्ही गोष्टींमुळे आजूबाजूचे त्रस्त होतात.
मी घरात मुळा शिजवतील त्या
मी घरात मुळा शिजवतील त्या दिवशी जेवतच नाही. पण कच्च्या मुळ्याची थोड्या प्रमाणात कोशिंबीर खाऊ शकते.
मुळा व मोहोरीचे एकत्र कॉम्बो
मुळा व मोहोरीचे एकत्र कॉम्बो म्हणजे आधीच मर्कट तशात मद्य प्याला टाईपचे होणार की काय!! धीर एकवटून रेसिपी ट्राय करण्यात येईल.
>>>गाता गळा आणि शिजता मुळा का
>>>गाता गळा आणि शिजता मुळा
का ? दोन्हीही जास्त काळ लपून राहू शकत नहीत म्हणुन का?
मुळ्याचा चटका चांगला लागतो की..
तसंच उत्तरेत रामलड्डू वर किसलेला कोवळा मुळा घालुन देतात तोपण मस्त लागतो
लींबू ,मोहरी वापरून पहायला
लींबू ,मोहरी वापरून पहायला हवं; माझं आवडतं - किसलेला मुळा + दही +मीठ + किंचित मिरपूड.
वरील प्रकारची कोशिंबीर एकदम
वरील प्रकारची कोशिंबीर एकदम फणकारत असेल.
मी आपली किसलेला मुळा, दही, दाण्याचं कूट, मीठ आणि कोथिंबीर घातलेली खाते. त्यात मिरची सुद्धा घालत नाही.
मुळ्याचा वास ज्यांना आवडत
मुळ्याचा वास ज्यांना आवडत नाही ते पिवळी मुगाची डाळ (भिजवलेली) घालून कोशिंबिर करून पहा. अजिबात वास येत नाहे मुळ्याचा. चांगली लागते.
वरची रेसेपी मुळेसिझनात करून पहाता यील. पण उग्र होईल असे वातते.
भिजवलेली हरभरा डाळ घालूनही
भिजवलेली हरभरा डाळ घालूनही छान लागते मु.को.
इथल्या मुळ्यांना ना वास, ना
इथल्या मुळ्यांना ना वास, ना चव! किसून कोशींबीरीत घातले तर काकडी म्हणून सुद्धा खपून जातील कदाचित
आता या रेसिपीने करुन पाहीन. मला फार आवडतात मुळ्याचे प्रकार
मुळे आणि फेसलेली मोहरी दोन्ही
मुळे आणि फेसलेली मोहरी दोन्ही आवडतात. नक्कीच करणार.
किसलेला मुळा +लिंबू +मीठ +
किसलेला मुळा +लिंबू +मीठ + किंचित हिंग + किंचित लाल तिखट, मस्त होते.
किसलेल्या मुळ्याचं पाणी पिळून
किसलेल्या मुळ्याचं पाणी पिळून जर ही कोशिंबीर अधमुरं दही घालून केली तर मस्तं लागते! कळत पण नाही की मुळ्याची आहे ती. अगदी किसलेलं खोबरंच वाटतं ते! पाणी आवडत असेल तर नंतर आमटीत टाकता येतें.
लाल मुळे मस्त
लाल मुळे मस्त लागतात...ज्यांना पांढर्या मुळ्याची अॅलर्जी आहे त्यांनी लाल मुळे ट्राय करायला हरकत नाही....
बचेंगे तो और भी लडेंगे
बचेंगे तो और भी लडेंगे |
शिजता मुळा
मुळा व मोहोरीचे एकत्र कॉम्बो म्हणजे आधीच मर्कट तशात मद्य प्याला टाईप >>>
रेसिपीला पास. मुळा किसून पीठ पेरुन भाजी, पराठे त्यातल्यात्यात ओके. नाहीतर मग नुसताच गोल चकत्या कापून सॅलड. एकंदरित कमीच आणला जातो. मुळ्यापेक्षा दुधी बरा, हलवा तरी करता येतो
आमच्याकडे आवडीने खातात
आमच्याकडे आवडीने खातात मुळ्याची कोशिंबीर …पण कृती अशी :
मुळा खिसुन + दही + दाण्याचं कूट + कोथिंबीर + मीठ + साखर + मोहरी-जिरे-हिंग फोडणी
असं सगळं कालवलं की झालं
अगदी फारच वाटल तर मुळा खिसल्यावर त्यातला पाणी काढून टाकायच… पण ज्यांना आवडतो त्यांना काही प्रश्नच नाही
अश्वीने दिलेली रेसिपी मस्त
अश्वीने दिलेली रेसिपी मस्त आहे. मी तशीच करते. मला आवडते मूळ्यांची कोशिंबिर.
आज आम्ही जिथे उतरलो आहोत
आज आम्ही जिथे उतरलो आहोत तिथे मुळ्याची भाजी होती लंचला तेव्हा ह्या बाफ ची आठवन आली. मला हसू का येते आहे ते त्या शेफ ला कळेना.
गाता गळा आणि शिजता मुळा >>>>
गाता गळा आणि शिजता मुळा >>>>
आम्ही कालच करून खाल्ली ही कोशिंबीर. जीवात धुगधुगी आहे तोवर सांगून घेतेय, भार्री उग्र झणझणाटी लागते. मुळा आणि फेसलेली मोहरीचे हार्ड कोअर फॅन्स असाल तरच खा. एरवी बदल्यापुरती राखून ठेवा पाककृती
(No subject)
मुमो काँबो थोडं वसाबी सारखं
मुमो काँबो थोडं वसाबी सारखं लागेल असं वाटतंय..म्हणून आम्चा पास.
ही रेस्पि खाऊन गात्या गळ्ञा(वाल्यां)चं़ काय होईल देव जाणे.
Pages