मुळ्याची कोशिंबीर

Submitted by तृप्ती आवटी on 22 May, 2014 - 17:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मुळा, दीड टे स्पून मोहरी, मीठ, साखर, १ टे स्पून लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

मुळा किसून त्यात मोहरीखेरीज इतर साहित्य नीट मिसळून घ्यावे. मोहरीची खलबत्यात अथवा मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यावी. खलबत्ता वापरल्यास पूड वाटीत घेऊन चमच्याने भरपूर घोटून घ्यावी. मिक्सर वापरल्यास मिक्सरमध्येच थोडी जास्त वेळ फिरवावी. घोटलेली मोहरीची पूड मुळ्याच्या मिश्रणात घालून नीट हलवून घ्यावे. कोशिंबीर तयार आहे.

वाढणी/प्रमाण: 
एक घास खाऊन धारातिर्थी न पडलेले सर्व नग आणखी एक-एक घास खाऊ शकतात
अधिक टिपा: 

बचेंगे तो और भी लडेंगे |

माहितीचा स्रोत: 
मुळे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याकडे कोवळे मुळे फार कमी वेळी मिळतात. कोवळ्या मुळाची गुळचट चव किती छान लागते. उगाच पंजाबी लोक कच्चा खात नाही मुळा उपटून. मी तर मुळ्याच्या पानांची भाजी सुद्धा करतो. खूप छान लागते. लालसर रंगाचे मुळे छान असतात चवीला. बुटके गोल गुलाबी जांभळे मुळे सुद्धा छान लागतात.

मस्त कृती तृप्ती. फोटो टाकायला काय घरात कॅमेरे नव्हते Happy

अयायी...
मुळात मुळा... त्यात फेसून मोहरी... गात्या गळ्यांनी खायची... त्यानंतर गायल्यास...
मद्यप्याल्यामर्कटाला विंचू चावल्यावर त्याला विष्णू सहस्त्रनाम गायला सांगायचं... मग जे होईल ते.
वासाबी! बर्रोब्बर. वासाबीच्या आठवणीनेच कानातून धूर आल्यासारखं झालं. ते थंडावल्यावर ह्या कोशिंबिरीचा विचार करण्यात येईल...
मुळे, मोहरी, (गाता??) गळा... सगळं आहे. त्यानंतर मी काहीही म्हटलं तरी कशाचंतरी सहस्त्रनामच असेल.

ओहोहो ...........या मुळ्याच्या बाफवर मुली अगदी मुळीच ऐकायला तयार नाहीत! सुटल्यात सगळ्या!
अगं मामे......... तो शिजता मुळा कुठून काढलास बायो? Proud
मद्यप्याल्यामर्कटाला विंचू चावल्यावर त्याला विष्णू सहस्त्रनाम गायला सांगायचं... >>>>>>>>>>> दाद ....नाही नाही ...हे अशक्य आहे :हहपुवा:
माझाही एक चटका.............
मुळ्याचा चटका
मुळा किसून घ्यावा. सगळ्यात आधी २/३ तास हरभरा डाळ भिजत घालावी. २/३ मुळे घेतले तर पाव वाटी ह.डाळ.
ही डाळ चांगली भिजली की मिक्सीत छान वाटून घ्यावी. या डाळीबरोबरच एखादा हिरव्या मिरचीचा तुकडाही वाटावा. शक्यतो पाणी घालू नये. लागले तर मग दही घालूनच वाटावी.
म्हणजे जर मिक्सरमधे नुस्ती डाळ वाटलीच जात नसेल तर......मग दही घालून वाटावी.
नंतर मुळ्याचा कीस, गोड दही, मीठ, साखर, भिजवून वाटलेल्या डाळीची भरड पेस्ट, अगदी थोडं दाण्याचं कूट हे छान मिक्स करून घ्या.
नंतर थोड्या तेलाची मोहोरी, जिरे, हिंग, २/३ कढिलिंबाची पाने व लाल सुकी तिखट मिरची घालून चांगली चरचरीत फोडणी करून ती थंड झाल्यावर या चटक्यावर ओतावी. बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी.
चांगलं मिक्स करून वाढावी.

Pages